Google ads

Ads Area

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | 15 Augast independence day essay in marathi

 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | 15 Augast independence day essay in marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध निमित्ताने आपणास या निबंधाच्या माध्यमातून भारत देशाविषयी असणारे माझे विचार मी आपणांसमोर मांडत आहे. भारत देश हा आपला सुजलाम, सुफलाम आहेच शिवाय आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते .अशा या भारतभूमीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले अशा या महान व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त करुन स्वातंत्र्य दिनानिमित्ताने निबंध आपणांसमोर सादर करीत आहे .

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा स्वतंत्र झाला. आज जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तरी ज्यांनी भारत देशात राज्य केले अशा ब्रिटिशांनी भारत देशास खूप छळले आहे. येथील लोकांना अत्याचाराची वागणूक दिली . म्हणून भारत स्वतंत्र झाल्याचा आनंद आजही साजरा केला जातो 

स्वातंत्र्य दिन हा एक आपला राष्ट्रीय सण आहे या राष्ट्रीय सणानिमित्त संपूर्ण शासकीय  कार्यालयात झेंडावंदन उत्साहाने साजरा केला जातो. भारत देशातील प्रत्येक सोसायटी, गृहनिर्माण संस्था ,शाळा , छोट-मोटे उद्योगधंदे (कंपन्या) महत्त्वाचे असणाऱ्या संस्था, संघटना या ठिकाणी झेंडावंदन केले जाते .

स्वातंत्र्य दिनानिमित्त अगोदरच आठ -दहा दिवस पूर्व तयारी म्हणून कली जाते  .या तयारीला अनेक शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उत्साही असतात शाळा परिसर स्वच्छ केला जातो तसेच विद्यार्थ्यांना कवायतीचे प्रकार शिकवले जातात .झेंडा वंदन झाल्यानंतर प्रत्यक्ष कवायत केल्यानंतर बक्षीस सत्कार समारंभ आणि महत्वाचे नेते मंडळी यांचेही भाषण होत असते.

#

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी खूप प्रयत्न केले आहेत .त्यांचे भारत देशावरील ऋण हे कधीच फिटणारे नाही, जसे आपल्या आई वडिलांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही .

तसेच भारत  देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली .अशा या महान नेत्यांना समाजसुधारकांना मानाचा मुजरा करत आहे .

मला खरोखर आनंद वाटत आहे की हा राष्ट्रीय सण प्रत्येक सहा महिन्यातून आपण साजरा करत असतो तरीही या सहा महिन्यातून का होईना आपण एवढ्या उत्साहाने एकत्र आलेलो असतो, तुम्हाला या भारत भूमीविषयी प्रेम असणे गरजेचे आहे पण, या भारतवासीयांनीं आपले नाते हे देशाशी टिकवून ठेवणे गरजेचे आहे . 

आपले राष्ट्रगीत ,वंदे मातरम या गीतांचे आपण आदरपूर्वक गायन केले पाहिजे. संस्काराने प्रेरित होऊन आपण अशा संस्कारामध्ये मार्गदर्शन  करुन आपला सगळा उद्धार केला पाहिजे . आपल्या भारत देशाने खऱ्या अर्थाने माणसाला मानवतावादी दृष्टिकोनातून चांगली भूमिका दिलेली आहे .

 माझ्या भारत देशाला मनस्वी सलाम जय हिंद जय महाराष्ट्र!

आणखी वाचा

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी

स्वातंत्र्य दिनाचे भाषण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area