Google ads

Ads Area

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव उत्साहात सुरु 15 Augast independance day amrut mhotsav utsahat suru

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव उत्साहात सुरु
15 Augast independance day amrut mhotsav
  utsahat suru


15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव हा संपूर्ण देशात अति उत्साहात सुरू आहे  'हर घर तिरंगा ' हा तीन दिवस साजरा करायचा असून त्यापैकी एक दिवस झाला. देशात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव निमित्त संपूर्ण देशात या उत्साहाचे स्वागत अत्यंत धूमधडाक्यात चालू आहे .हर घर तिरंगामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव वर्ष असल्याने अनेक दिवसापासून या कार्यक्रमाची प्रत्येक शाळेत, सरकारी कार्यालय ,संस्था, गावोगावी, शहरात,  वस्त्या वाड्यावरती, चौका चौकात 'हर घर तिरंगा' या कार्यक्रमाचा उत्साह दिसून येत आहे .

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव (toc)

प्रत्येक घरावर झेंडा फडकताना दिसत आहे. 

असा हा उत्साह सर्वांचा आगळावेगळा ,भव्य दिव्य अमृत महोत्सव सोहळा भारत देशात साजरा होताना दिसत आहे . 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव म्हणून हर घर तिरंगा निमित्त संपूर्ण भारतात याचे आयोजन केलेले आहे . 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्षी कार्यक्रमात 13 ऑगस्टला या पहिल्या दिवशी सगळीकडे झेंडा फडकताना दिसत आहे  .जसा आपला गुढीपाडवा हा सण आनंद उत्सवाचा असतो तसाच हा हर घर तिरंगा हा आपला राष्ट्रीय सण संपूर्ण भारत देशात साजरा होताना दिसत आहे . या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव कार्यक्रम हा नवचैतन्याचा नवोत्साहाचा आणि आगळावेगळा राष्ट्रीय सण असलेला दिसून येत आहे .

 हर घर तिरंगा या दिवसाचा पहिला दिवस पूर्ण झाला. 

 पहिल्या दिवसात अनेकांनी सक्रिय सहभाग घेऊन शाळांमध्ये रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा, प्रभात फेरी, समूह गायन, नृत्यकला या सगळ्या कार्यक्रमातून आपला उत्साह दाखवून देशाप्रती असणारी निष्ठा दाखवून दिली आहे . गावोगावी ग्रामपंचायतमधून झेंडा घेऊन प्रत्येक घरावर झेंडा फडकताना दिसत असल्याने संपूर्ण गावात तिरंगा लावल्याने आनंदी माय वातावरण झालेले आहे .

गावातील लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींना या उत्साचे कौतुक वाटत आहे म्हणून हा एक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव हर घर तिरंगा याचे आगळे वेगळे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करून देणारा हा आपला राष्ट्रीय सण पहिल्याच दिवशी उत्साहात साजरा झाला आहे . 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव हा साजरा करण्यासाठी अजून दोन दिवस बाकी आहेत तरीही  या दिवसाची उत्सुकता शिगेला पोहचली असून तोपर्यंत संपूर्ण देशात झेंडावंदन घरोघरी आणि शासकीय संस्था या ठिकाणी होताना दिसत आहे .

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे विशेष

  1 )  आगळेवेगळे स्वागत :

हर घर तिरंगा  कार्यक्रमात संपूर्ण गावागावात घराघरावर तिरंगा फडकताना दिसत असल्याने सगळ्यांना या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे कौतुक वाटत आहे . तसेच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या राष्ट्रीय सणाचे आगळे वेगळे स्वागत पाहून आश्चर्यचकित झाले आहेत  .

 2 )  उत्साह वाढला

आपला तिरंगा हा कोणीच जवळून निरखून पाहिलेला नव्हता कधीच स्पर्श सुद्धा करायला मिळत नव्हता तोच झेंडा प्रथमतः घरात आला ,जवळून पाहता आला  यामुळे सगळ्यांच्या मनात देशाप्रती निष्ठा वाढलेली दिसून येत आहे  .देशाचा झेंडा हा तिरंगा असतो आणि तो सगळ्या लोकांना याचे महत्त्व कळत नव्हते ते या माध्यमातून त्यांना तिरंग्याचे महत्त्व समजून आले आहे .

 3 ) तिरंगा मनात घर करुन बसला. 

आपला तिरंगा झेंडा तीन रंगाचा मिळून बनलेला झेंडा आणि त्यामध्ये अशोक चक्र आहे हे सगळ्या भारतीय लोकांना समजले आहे . जे गावाकडे राहणारी लोक आहेत त्यांना शाळेत कधीच जावे लागत नाही अशा माता पित्यांना तिरंगा हे कधीच माहीत नव्हता तो हर घर तिरंगा यातून समजला .

4)  झेंड्याचा आदर करु लागले 

 झेंड्याचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे त्यामुळे एक उत्साहाचे वातावरण संपूर्ण देशात निर्माण झालेले दिसून येते .खेडोपाडी सुद्धा झेंड्याचे महत्त्व समजले आहे .ज्यांना झेंडा कसा असतो आणि कसा असेल याची कोणतीही जाणीव नसलेल्या लोकांना घरात झेंडा आला त्याचे कौतुक खूप मोठे आहे ,त्याचा अपमान करायचा नाही असे त्यांच्या मनावर ठसलेले आहे .

5 ) लोकांप्रती झालेले बदल 

हर घर तिरंगा याविषयी अनेकांचे अनेक मतमतांतरे होते- परंतु या कार्यक्रमाची उत्साहाने सुरुवात झालेली पाहून त्यांचेही मतपरिवर्तन होऊन देश ,भक्ती ,देशनिष्ठा निर्माण त्यांनाही या राष्ट्रीय सणात सामील होताना दिसत आहेत .म्हणजेच चांगल्या गोष्टीला सुरुवात  करताना विरोध जरी झाला असला तरीही चांगली गोष्ट ही चांगलीच असते हे यातून आपण जाणून घेतले आहे .

6 )  पहिला दिवस उत्साहात:

हर घर तिरंगा या नियोजनात पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय दणक्यात झालेली आहे . हर घर तिरंगा कार्यक्रम सगळीकडे साजरा झाला त्यामुळे सगळीकडे वातावरण खूप प्रसन्न झालेले आहे . 

7)  आदराची भावना वाढीस :

 सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत असल्याने तसेच रोषणाई करुन प्रफुल्लित वातावरण  बऱ्याच ठिकाणी आपण ज्या देवस्थांची यात्रा असेल त्याचवेळी आजूबाजूला रोषणाई दिसते ;परंतु आज शासकीय कार्यालये मध्ये अशी तिरंग्यामध्ये रोषणाई दिसत असल्याने लोकांच्या मनामनात भारत देशाविषयी आदर अधिक दृढ होत आहे .

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सगळेच विद्यार्थी शाळेतील झेंडा फडकवण्यासाठी येणार नसले तरीही ज्यांनी ज्यांनी निबंध ,भाषण, नृत्य ,गायन, रांगोळी अशा विविध कला क्षेत्रामध्ये आपले कौशल्य दाखवलेले आहे असे अनेक विद्यार्थी रविवारी सुद्धा हजर होणार आहेत ; जेणेकरून या स्पर्धेतून पुन्हा एकदा 15 ऑगस्ट दिवशी त्याचा लोकांसमोर आपल्या कलागुणांना दाखवण्यासाठी हजर राहणार आहेत .

असा हा  हर घर तिरंगा या दिवसाची सुरुवात अतिशय आनंददायी आणि उत्साहात झाली आहे . यानंतर दुसरे दिवसाची सुरुवात कशा पद्धतीने झाली हे आपण marathisampurn या website वर जाऊन पहा . 


आणखी वाचा 

हर घर तिरंगा

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सूत्रसंचालन

माझा भारत देश निबंध

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध

मी झेंडा बोलतोय

स्वातंत्र्य दिन मराठी भाषण

माझी शाळा निबंध




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area