Google ads

Ads Area

इयत्ता 10 मराठी घटक चाचणी |Unit test 10th marathi

       इयत्ता 10 मराठी घटक चाचणी |Unit test

      10th marathi



         प्रथम घटक चाचणी 2022 

      इ .10 वी      विषय - मराठी         गुण 20


प्र .क्र.1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 

१) आकलन : 

आकृती पूर्ण करा:

 बैठे खेळ कोणते खेळत होते. ............

भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच पडवीत, सोप्यात ,कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो.चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, चुळूचुळू मुंगळा, भोवरा ,गोट्या असले खेळ असायचे ,तर कधी घरातल्या सरपनातील लाकडं काढून विटी-दांडू, भोवरं बनवीत बसायचं .भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधंनच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची.


2) आकलन : 

   1) भिंगऱ्या गोल व्हाव्यात म्हणून [       ] यावर घासत होते

   2)  पाटी काळी करण्यासाठी 【     】 याने घासली जात

3 ) स्वमत : 

तुम्हाला खेळायला आवडते का?तुम्हाला माहिती असलेल्या एका खेळाची माहिती लिहा.


प्र .२ पुढील कविता वाचून दिलेल्या कवितेच्या आधारे कृती लिहा.

१) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती  करा

 आकलन : 

       1) कोणत्या गोष्टीत सुख मानू नये 【  ...  .. 】

       २) 【.... ..】 घालू नये काही केल्या.

   आळसे सुख मानू नये | बाष्कळपणे बोलो नये|


पैज होड घालू नये | काही केल्या |

कोणाचा उपकार घेऊ नये | घेतला तरी राखो नये |

परपीडा करू नये | विश्वासघात | 

व्यापकपणा सांडू नये |पराधेन होऊ नये |

आपले ओझे घालू नये | कोणीयेकाशी


२) कृती सोडवा

 1 ) परपीडा याचा अर्थ सांगा ..

 2 ) उपकार घेतल्यावर   【         】


 ३) स्वमत : 

दुसऱ्याचे ओझे आपल्यावर असते तेव्हा कोणते अनुभव येतात ते लिहा .


प्रश्न 3 .पुढीलपैकी एक कृती लिहा.

 स्वातंत्र्य दिनादिवशी तुमच्या शाळेत कवायत घेण्यासाठी लेझीम,गणवेश, डंबेल्सची मागणी करणारे पत्र लिहा .

                          किंवा 

'हर घर तिरंगा'' निमित्त झेंड्याची विक्रीसाठी जाहिरात तयार करा .


प्रश्न ४ . व्याकरण

    1 ) पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करून समासाचे नाव लिहा :

      महाराष्ट्र

     रामलक्ष्मण

  2 ) गिरी' हा प्रत्यय लावून शब्द तयार करा

  3 ) पुढील  शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

        ज्याने भरपूर वाचन व लेखन केलेला असा. 【       】

 4)  पुढील पारिभाषिक शब्दाचा मराठीत अर्थ लिहा . 

       Tax


# आणखी वाचा

निबंध : भारत माझा देश निबंध

मी शाळा बोलतेय


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area