संत नामदेव यांचे निवडक अभंग अर्थासहित|sant namdev nivadak abhang arthasahit
1) देह जावो अथवा राहो |
पांडुरंगी दृढ भावो ||१||
संत नामदेव या अभंगात देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगा तुझी कास सोडणार नाही . माझ्या देहाचे काहीही झाले तरी तूच सखा आहेस तुझ्याशिवाय मला कशाचीच इच्छा नाही ,असे नामदेव महाराज म्हणतात .
आपल्या देहाचाही विसर व्हावा एवढी उत्कट भक्ती त्यांनी केली असल्याने त्यांचा अभंग हा अभंग प्रसिद्ध आहे .
2) कानडा राजा पंढरीचा |
मन माझे केशवा का वा नेघे||१||
याविषयी खूप मतमतांतरे आहेत पण आपण त्याकडे लक्ष न देता, हा जो राजा आहे तो सगळ्यांची चोखपणे कामे करत असतो .ही कामे जो खरा भक्त असतो त्याच भक्तांच्या घरातील कामे त्यास आवडत असतात .देव हा भावाचा भुकेला आहे याची प्रचिती या अभंगातून येत असते .
3) अमृताहूनि गोड नाम तुझे देवा|
या अभंगात संत नामदेव असे म्हणतात की अमृत हे सर्वश्रेष्ठ असूनही या अमृतापेक्षा विठ्ठला तुझे नाव म्हणजेच नाम हे अत्यंत गोड आहे. या नामाची ज्याला चव कळाली त्याला अमृत हे फिके वाटेल, असेच नामदेव महाराज या ठिकाणी म्हणतात. त्यांना अमृताची गोडी हे विठ्ठल नामापेक्षा अधिक नाही. विठ्ठल नाम हे गोड आहे त्यातच आम्हाला खरा आनंद वाटत आहे. अमृताची गोडी आम्हास नको आहे; परंतु नामाची गोडी आम्हास पाहिजे आहे त्यातून उद्धार होऊ शकतो हे या अभंगात नामदेव महाराजांनी सांगितले आहे.
4 ) अवघाची संसार सुखाचा करीन|
जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ||१||
विठोबाचे नाम गाईन मनोभावे|
चित्त तेणे नावे सुख पावे ||२||
या अभंगात संत नामदेव म्हणतात की हा अवघाची संसार म्हणजे हा जो संसार आहे तो सुखाचा करीन म्हणजेच जरी ह्या संसारामध्ये राहत असलो तरी त्या संसारामध्ये सुखापेक्षा दुःख आहे आणि ह्या दुःखाची झळ हे तुझ्या भक्तीशिवाय काहीच नाही .कितीही संसारात दुःख, कष्ट, यातना झाल्या तरी त्यातून बाहेर पडायचे तर तुझ्यामध्ये शक्ती आहे, म्हणून ह्या संसारातून निवृत्ती न घेता त्यात राहून तुझी भक्ती करणे हेच महत्वाचे आहे.
5 ) आतां माझी चिंता तुज नारायणा|
रूक्मिणीरमणा वासुदेवा ||१||
संत नामदेव या अभंगात म्हणतात की रूक्मिणी पतीराया माझी चिंता तुलाच आहे .मी जे काही आहे हे सगळे तुझ्यामुळेच आहे. म्हणून मला जे हवे आहे ते तुला माहित आहे म्हणून माझी चिंता मी करत नाही तर तूच करून घेतो आहे. त्यामुळे मला कोणतेही काळजी नाही. माझे सगळे कार्य तुझ्याच हातात आहे, कारण मी तुला समर्पित भावाने अनन्यभावाने शरण आलो आहे .आणि तूच माझा उध्दारकर्ते असे संत नामदेव महाराज रुक्मिणीच्या पतीरायाला म्हणजेच वासुदेवाला अभंगातून सांगत आहेत .म्हणजे विनवणी करत आहेत.
6 ) आता होणार ते होवो पंढरीनाथा|
न सोडी सर्वथा चरण तुझे||१||
या अभंगात संत नामदेव महाराज म्हणतात, की, आता काही झाले तरी चालेल पण मी आता तुझे चरण कधीही सोडणार नाही तुझ्या चरणाची मला आस लागलेली आहे आणि ही आज माझा शेवट झाला तरीही मी माघार घेणार नाही तुझ्या चरणांची भक्ती हेच माझ्यासाठी खरा उद्धार आहे. माझ्या देहाचे काही झाले तरी मी तुझी भक्ती सोडणार नाही. हे अभंगात सांगितले आहे.
7 ) आम्हां सापडले वर्म | करु भागवत धर्म ||१||
अवतार हा भेटला | बोलू चालू हा विसरला ||२||
या भागात संत नामदेव महाराज म्हणतात की आम्हाला भगवंत भक्तीची ओढ लागली आहे .आम्हाला आता आमच्या हातात एक वर्म सापडले आहे म्हणजेच मार्ग सापडला आहे. त्यामुळेच मी आता भगवत भक्ती करणार आहे .चालता, बोलता आम्हाला फक्त तुझाच ध्यास लागला आहे . सहजतेने मी हे नाम घेतच राहणार आहे. तुझा मार्ग सापडला आहे आणि त्या मार्गानेच आम्ही चालणार आहे.
8 ) आशा मनीषा तृष्णा लागलीसे पाठी|
धाव जगजेठी स्वामी माझ्या||२||
9) ऐसी चाल नाही कोठे|
नमस्कार आधी भेटे||२||
या भागात संत नामदेव महाराज म्हणतात की असे कोणतेही चाल नाही की परमेश्वर आपल्याला लगेच बंद येईल त्यासाठी भक्ति केल्याशिवाय आपल्याला तो विठ्ठल हा भेटणार नाही आणि भेट झाल्याशिवाय त्याचे अलिंगन आपल्याला मिळणार नाही ;म्हणून बघतेची आस हेच महत्त्वाचे खरे भक्ती आहे.
10 ) ऐसे माझे मना येते पंढरीनाथा |
न सोडी सर्वथा चरण तुझे ||१||
अभंगात संत नामदेव महाराज म्हणतात की पंढरीनाथा मला अशी इच्छा निर्माण झाली आहे की मी आता तुझे चरण धरले आहेत ,तुझे चरण आता मला सोडण्याची आवश्यकता नाही. मला ह्या संसाराची कोणतीच आशा उरली नाही. मला आता फक्त तुझे चरण दिसत आहेत. या चरणापासून मला कधीही दूर जायचे नाही ,असे माझ्या मनाला वाटत आहे.
असे संत असे संत नामदेव महाराज यांचे निवडक अभंग असून विठ्ठल भक्तीची ओढ सर्वत्र दिसत आहे संसारापेक्षा, अमृतापेक्षा त्यांना विठ्ठल भक्तीची ओढ लागली आहे . नामस्मरण हेच त्यांचे महत्त्वाचे ध्येय असून देहाचा विचार न करता विठ्ठलाचे चरण महत्वाचे आहेत . यासाठी त्यांनी असे विठ्ठल भक्तीचे चरण धरले आहेत त्यातून ते माघार घेऊ शकत नाहीत; म्हणून अशा विठ्ठलाच्या भक्तीसाठी हुरहूर वाटत आहे .
#आणखी उपयुक्त माहिती वाचा
संतचरणरज बाळकृष्ण महाराज यांचे कीर्तन माहात्म्य
संत नामदेव महाराज की जय
उत्तर द्याहटवा