संत नामदेव महाराज अभंग भक्ती माहिती | Sant namdev maharaj abhang bhakti information
आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी असे म्हटले जाते .अशा पवित्र भूमीत आपला उद्धार झाला हेच आपले भाग्य आहे. अशा या पावन (महाराष्ट्र ) भूमीत आपला जन्म होणे हेच आपल्या जन्माचे सार्थक मानावे लागेल ; कारण ह्या भूमीत अनेक थोर व्यक्ती घडून गेलेल्या आहेत .अनेक पराक्रमी पुरुष या ठिकाणी जन्मले असून त्यांच्या कृपेचाच प्रसाद म्हणून आज आपण सुस्थितीत जीवन जगत आलेलो आहे .
महाराष्ट्र या भूमीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले त्यापैकी वारकरी संप्रदाय हा एक महत्त्वाचा असा संप्रदाय असून या संप्रदयात अनेक जाती-धर्माचे संत होऊन गेले आहेत .त्यामुळे असे संत सर्व जाती धर्माचा विचार न करता त्यातून माणुसकी धर्म निभावताना दिसले आहेत त्यांच्या विठ्ठल भक्तीने सर्व सामान्य लोकांनाही आपलंसं करण्याची ताकद या वारकरी संप्रदायाची आहे .
नामा तयाचा किंकर |Nama tayacha kinkar
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदायाचे बीज रोवले असून या संप्रदायाला चांगली अशी स्थिती आली आहे .संतएकनाथ महाराज हे संप्रदायवाढण्यासाठी त्यांचा काळखूप महत्त्वाचा असलेला दिसून येतो.अंधकारयुग म्हणून या एकनाथ महाराज यांच्या काळाला बोलले जात होते ,तो त्यांनी भक्तीचा महिमा दाखवून दिला . तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस ठरले आहेत .संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे कार्य हे पंजाबपर्यंत नेण्याचे काम केलेले आहे .संत नामदेव हे ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन संत असून विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त होते .
संत नामदेव यांचे जीवन | Sant namdev yanche jivan
नाव : नामदेव दामोजी रेळेकर जन्म 26 ऑक्टोबर एक बाराशे 70 गाव नरसी नामदेव जिल्हा हिंगोली मराठवाडा आईचे नाव गोणाई वडील दामाजी रेळेकर पत्नी राजाई आपत्य महादेव गोविंद विठ्ठल नारायण मुलगे लिंबाई मृत्यू 3 जुलै १३५० व्यवसाय शिंपी काम असे 15 माणसांचे कुटुंब होते नामाची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई या सुद्धा संत नामदेव यांच्या घरी राहत होते त्याही विठ्ठल भक्त असून त्यांनी शेवटपर्यंत दासी म्हणून त्यांच्या घरात सगळे कामे केली
संत नामदेव यांच्या विषयीच्या आख्यायिका
1) संत नामदेव हे लहान असताना त्यांचे वडील गावी जात असल्याने देवाला नैवेद्य ठेव असे बाल नामदेवाला सांगितले. दुसऱ्या दिवशी वडिलांनी सांगितल्याप्रमाणे संत नामदेवने नैवेद्य घेऊन देवापुढे ठेवला. "जोपर्यंत विठ्ठल तो खात नाही तोपर्यंत मी जागचा हलणार नाही म्हणून तिथेच उभा राहिला" देव नैवेद्य खात नाही म्हणून बाल नामदेवाने आपले डोके विठ्ठला समोर आपटायला सुरुवात केली. तेव्हा विठ्ठल त्या ठिकाणी प्रकट होऊन त्यांनी स्वतः नामदेवाच्या हातचा नैवद्य खाल्ला अशी आख्यायिका आपल्यासमोर आहे
2 ) बाजारात शिंपी काम करत असताना कपडे विकण्याचा धंदा त्यांचा होता त्यावेळेस गाढवाने त्यांच्या हातातील भाकरीचे नेले असता कोरडेच भाकरी खाण्यापेक्षा त्याबरोबर तोफ घेऊन जा असे म्हणून त्यांच्या पाठीमागे धावणारे हे संत नामदेव असेही आख्यायिका आहे
3) नागनाथ या ठिकाणी संत नामदेव देवदर्शनासाठी गेले असता त्या ठिकाणी पुजाराने त्यांना अडवले आणि थोडा वेळ थांबण्यास सांगितले असता ते पाठीमागील बाजूस जाऊन बसले.
भगवंताविषयी असणारी ओढ पाहून ते मंदिर पूर्वेकडे असलेले पश्चिम दिशेला त्यांना दर्शन झाले .आजही औंढा नागनाथ हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे, अशीही आख्यायिका आहे.
नामयाची दासी संत जनाबाई| namyachi dasi sant janabai
संत नामदेव यांच्या घरी संत जनाबाई येऊन रहात होत्या .संत नामदेव यांची भक्ती पाहून त्याही विठ्ठलमय झाल्या होत्या. त्यांच्या कामधंदामध्ये विठ्ठलच त्यांना मदत करत आहे ,असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांच्या अभंग रचनेत विठ्ठल हाच असतो .
" धरीला पंढरीचा चोर" हा अभंग प्रसिद्ध आहे .विठ्ठल हा चोर आहे आणि तो चोर निसटून जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु जनाबाई म्हणतात की हा चोर मी नामस्मरणाच्या जोडीने त्याला हृदयात कोंडले आहे ,तो आता सुटू शकत नाही देवाने कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केला, सुटून जाण्याचा प्रयत्न केला, विनवणी केली ,तरी जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी त्याला हृदयातून सोडणार नाही .म्हणजेच नामस्मरण हे त्याचेच करत राहणार आहे .असे संत जनाबाई यांचे मत या अभंगातून व्यक्त झाले आहे .
यावरून संत नामदेव यांच्या संत जनाबाई यांचीही अभंग रचना अतिशय उत्कट आणि भगवंत प्रेम ,भाव असणारे अभंग दिसून येतात .
संत नामदेव यांचे निवडक अभंग| Sant namdev nivadak abhang
संत नामदेव यांनी खूप मोठी अभंग रचना केलेली आहे त्यांचे सुमारे अडीच हजार अभंग प्रसिद्ध आहेत .त्यांनी शौरसेनी भाषेत अभंग रचना केली आहे आणि 125 पदे त्यांनी लिहिली आहेत( हिंदी भाषेत रचना आहे) 62 अभंग हे नामदेव जी की मुकबानी हे शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात गुरुमुखीत घेतलेले आहेत .
संत नामदेव यांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानलेले आहे त्यांच्या अभंगाचा ठेवा आजही आपल्या मनात साठवून राहिलेला आहे त्यांचे काही निवडक अभंग हे आपल्या परिचयाचे आहेत .
अभंग रचना
1) देह जावो अथवा राहो |
पांडुरंग दृढ भावो ||||
2) कानडा राजा पंढरीचा |
3 ) अमृताहूनि गोड नाम तुझे देवा|
मन माझे केशवा का वा नेघे||१||
4 ) अवघाची संसार सुखाचा करीन|
जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ||१||
विठोबाचे नाम गाईन मनोभावे|
चित्त तेणे नावे सुख पावे ||२||
5 ) आतां माझी चिंता तुज नारायणा|
रूक्मिणीरमणा वासुदेवा ||१||
6 ) आता होणार ते होवो पंढरीनाथा|
न सोडी सर्वथा चरण तुझे||१||
7 ) आम्हां सापडले वर्म | करु भागवत धर्म ||१||
अवतार हा भेटला | बोलू चालू हा विसरला ||२||
8 ) आशा मनीषा तृष्णा लागलीसे पाठी|
धाव जगजेठी स्वामी माझ्या||२||
9) ऐसी चाल नाही कोठे|
नमस्कार आधी भेटे||२||
10 ) ऐसे माझे मना येते पंढरीनाथा |
न सोडी सर्वथा चरण तुझे ||१||
अशाप्रकारे संत नामदेव यांची अभंग रचना आहे त्यांचे दोन हजार पन्नास एवढे जरी अभंग असले तरी त्यांचे बरेच अभंग हे परिचयाचे असून त्या अभंगातून विठ्ठलभक्तीचा महिमा दिसत आहे .
अशाप्रकारे नामदेव यांचे माहात्म्य पाहिले. त्यांचे प्रसिद्ध झालेल्या अभंगातून आपणास विठ्ठलभक्तीचा ध्यास हाच खरा जीवनाचा मार्ग आहे . हे त्यांच्या अभंगातून आपणास दिसून येते; म्हणून अभंगाची रचना त्यांची विठ्ठलभक्तीमय असलेली दिसून येत आहे . या भक्तीभावामध्ये त्यांची करुणा दाटलेली दिसून येत आहे .
प्रश्नावली
1 ) संत नामदेव यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
>>राजाई
2) संत नामदेव यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
>>दामाजीशेठ रेळेकर
3 ) संत नामदेव यांच्या आईचे नाव काय होते ?
>>गोणाई
4 ) संत नामदेवांनी किती अभंग रचले आहेत ?
>> सुमारे अडीच हजार (2500)
5 ) संत नामदेव कोणत्या राज्यापर्यंत वारकरी संप्रदायाचे भागवत पताका नेली आहे?
>> पंजाब राज्य
6 ) संत नामदेव हे कोणाच्या समकालीन संत होते ?
>>>संत ज्ञानेश्वर महाराज
7 ) संत नामदेव यांचे गुरु कोण होते ?
>>>विसोबा खेचर
# आणखी माहिती पहा
संत नामदेव महाराज निवडक अभंग अर्थासहित
संतचरणरज बाळकृष्ण महाराज यांचे कीर्तन माहात्म्य