माझी शाळा निबंध | my school essay
माझी शाळा ही खूप सुंदर आहे .माझ्या शाळेत खूप विद्यार्थी आहेत मला माझी शाळा खूप खूप आवडते. या शाळेतील कर्मचारी एकजिवाने काम करत असतो. त्यामुळे आम्हाला चांगले ज्ञान देण्यासाठी शिक्षक नेहमी उत्साही असतात .
शाळा म्हणलं की ज्ञानदान देऊन चालत नाही तर महत्त्वाचे म्हणजे संस्कार देण्याची ती एक ज्ञानाची खाण आहे. .या ज्ञानाच्या खाणीतून अनेक मोती बाहेर पडत असतात .काही मुले आपले अस्तित्व सिद्ध करू लागली आहेत .त्यासाठी आपल्या शाळेची आठवण कधीच विसरत नाहीत .
शाळेत जे हवे ते मिळत असल्याने कोणत्याच विद्यार्थ्यांना वेगळेपणाची वागणूक मिळत नाही अशी सर्वगुणसंपन्न माझी शाळा आहे .
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली रे
शाळा असली की इमारत ,मैदान ,वातावरण,विद्यार्थी असणारच आहेत मी त्याविषयी जास्त सांगणार नाही ,परंतु माझी शाळा ही अधिक कशी चांगली आहे ते मी बोलणार आहे .
आजकाल शाळेविषयी अनेक वेगवेगळे विचार येत असतात .मोठी इमारत ,मोठे मैदान ,भरपूर मुले म्हणजेच बऱ्याच पालकांनी परिस्थिती नसतानाही अशा शाळांची फी परवडत नसून अशा शाळेत मुलांना पाठविण्यात येत असते .
शाळा ही शाळा असते त्याठिकाणी कोणत्याही सुविधा असो अगर नसो विद्यार्थी घडणाऱ्या गोष्टी असल्या की की मग शाळा सुंदर वाटू लागते .
माझ्या शाळेत पालकांना सुद्धा लहान व्हावं आणि शाळेत जावे असेच वाटत असावे. कारण आमच्या शाळेचे निसर्गाच्या सानिध्यात असणं सगळ्यांचे आकर्षण करुन घेत आहे.येतील उपक्रम मुलांच्या बुद्धीला वाव देणारे आहेत.अशा ह्या शाळेत मुलं घडली जातात .
माझी शाळा म्हणून खूप चांगली आहे यातून आमचे मन कधीच निघत नाही .आमचे वय कितीही झाले तरी अजून वाटते आपल्या शाळेत जाऊन बसावे .पण,पुन्हा येतील का सगळीच मुले ? ,पुन्हा तोच गोंगाट आणि तोच मार, पुन्हा भेटेल का कधी ? ही शाळा खूप आवडते .त्यामुळेच तर आम्ही घडलो आहे .
शाळा आमची किती छान
आम्ही रोज शाळेत जाणार
अशी शाळा माझी खूप भारी आहे .
# अधिक माहिती वाचा
purn.com/2022/07/my-ideal-village-essay-majhe-aadarsh.html