Google ads

Ads Area

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन !|maharashtrache navnirvachit mananiy mukhyamuntri eknathaji shinde yanche abhinandan

 महाराष्ट्राचे नवनिर्वाचित माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन !|Maharashtrache navnirvachit mananiy mukhyamuntri Eknathaji shinde yanche abhinandan

मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आपणास शुभेच्छा ! आपले हे कार्य उत्तोरोत्तर विकासाभिमुख होत राहो यासाठी तुम्हांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे पद असते या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून  मा. एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा परिचय आपणास करून देत आहे . मी केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्याचा परिचय आपणासमोर मांडत आहे .


पक्ष कोणताही असला तरी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी जी असते ते खूप मोठी असते , हे सांभाळण्याचे काम, नेतृत्वगुण, ज्यांच्याकडे आहे अशाच एकास मुख्यमंत्री पद सर्वानुमते दिले जाते या पदाचा खूप मान राखला जातो, राज्यातील कोणत्याही पदापेक्षा मुख्यमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते .अशा महान असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ रावजी शिंदे यांनी आजच मुख्यमंत्री पदाची शपथ राजभावनात  घेतली.

एकनाथ शिंदेंचा परिचय(toc)




एकनाथ शिंदे यांचे बालपण व जीवन| eknath shinde yanche jivan

 नाव :   एकनाथ संभाजी शिंदे

 जन्म  : 9 फेब्रुवारी 1964 रोजी झाला.

पत्नीचे नाव : लता एकनाथ शिंदे

 मुलाचे नाव  : श्रीकांत एकनाथ  शिंदे

 शिक्षण :     पदवी (मराठी व  राजकारण)

 पक्ष  :      शिवसेना

जीवन परिचय 

 जीवन परिचय देत असताना त्यांच्या जो कार्यकाल उपलब्ध आहे त्यावरून देण्याचा प्रयत्न करीत आहे .

प्राथमिक शिक्षण ;  ठाणे किसननगर क्र. 3 या ठिकाणी  महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे झाले .

माध्यमिक शिक्षण : हे मंगला हायस्कूल या ठिकाणी झाले .

केवळ 20 वर्षातच त्यांनी राजकारणात सहभाग घेऊन समाजकारण करण्याचा प्रयत्न केला .त्यावेळचे महान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि ठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या सहवासात आणि त्यांच्या नेतृत्वगुणामुळे अनेकांनी शिवसेना या पक्षात सहभाग नोंदवला .त्यामध्ये एकनाथ शिंदे हेही सामील होते .त्यांचे कार्य पाहून आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना 1986 रोजी किसननगर येथे शिवसेनाचे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती केली .तेव्हापासून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक-राजकीय क्षेत्रामध्ये साथ देऊन होते .ज्यामध्ये त्यांचे गरिबांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देणे गरिबांना अन्नधान्याची समस्या,अशा वृद्ध लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते .ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अशा ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन  करत न्याय मिळवून देत होते. यामध्ये एकनाथ शिंदे हे प्रमुख नेतृत्व करत होते.

1986 रोजी सीमाप्रश्नी साठी झालेल्या आंदोलनात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाग घेतला या आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना बेल्लारी याठिकाणी 40 दिवस तुरुंगवास भोगावा लागला.


एकनाथ शिंदे यांचे शालेय जीवन  | eknath shinde yanche shaley jivan

एकनाथ शिंदे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मंगला हायस्कूलमध्ये 10 चे शिक्षण घेतले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीत पुढचे शिक्षण हे अपुरे राहिले .शिकण्याची जिद्द त्यांच्यामध्ये प्रबळ होती हे शिक्षण त्यांनी आपल्या जीवनात स्थैर्य आल्यानंतरच त्यांनी पूर्ण केले. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली . मराठी आणि राजकारण या विषयांमध्ये केले 77 .25 ℅ गुण मिळवून पदवी शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट झाले असल्यामुळे आणि शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले परंतु त्यांनी मुलाला जिद्दीने डॉक्टर बनवले. श्रीकांत कल्याण लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत .


एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द | ekanath shinde yanchi rajakiy karkirda

1997 साली त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. नगरसेवक पद मिळाले. 2004  सालापर्यंत हे पद त्यांनी सांभाळले , परंतु त्यांनी आपले कार्य मर्यादित न ठेवता ठाणे जिल्हा संपूर्ण आपल्या कार्याचा ठसा उमटवत राहिले. त्यांच्या या कार्याचा विचार करून मा. बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 च्या विधानसभा निवडणूकसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघात   उभे केले आणि प्रचंड मतांनी  विजयी झाले .त्यांचे कार्य पाहून ठाणे जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख आणि आमदार हे दोन्ही पदे त्यांना सांभाळावी लागत होती. असे दोन्ही पदे सांभाळणारे शिवसेनेतील एकमेव नेते होते. जनतेचे प्रश्न सोडवत असल्याने जनतेच्या मनात कायम त्यांच्याविषयी निष्ठा, श्रद्धा, आपुलकी वाढत गेली आणि 2009, 2014 आणि 2019 अशा निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघातून विधानसभेवर निवडून येत होते.


 आमदार आणि जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असतानाच 29 जून 2022 रोजी  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली .

20 वे मुख्यमंत्री आहेत


विधिमंडळात केलेल्या कार्याचा आढावा 

★ 2004 ते 2014 यादरम्यान दहा वर्षाच्या काळामध्ये विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते.

★ आमदार या नात्याने अनेक लोकांच्या समस्या घेऊन समस्यावर सातत्याने त्यांनी आवाज उठवला .

★ ठाणे जिल्ह्याचा आणि लोकसंख्या याचा विचार करून  ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणली.

★तसेच मेट्रो याचा सुद्धा त्यांनी विचार केला.

★ठाणे आणि मुलुंड या दरम्यान नवीन विस्तारित ठाणे स्थानक

 तसेच ठाणे येथील लोकांच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला.

★सागर सुरक्षा बरोबर पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले.

★महागाई  वाढल्याने अनेक ठिकाणी भाषण देऊन लोकांना मदत करण्याचे प्रयत्न करत होते.

★ 26 /11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पोलीस दलात आधुनिकीकरण आणि सागर सुरक्षा अधिक बळकट करावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत .


विरोधी पक्षनेते म्हणून महत्त्वाची भूमिका

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली .परंतु एका महिन्यात सत्तेत सहभागी झाले.  विरोधी पक्ष म्हणून एक महिना त्यांनी चांगल्या पद्धतीने बजावले. विरोधी पक्ष नेते म्हणून जी भूमिका पार पाडावी लागत होती, ती भूमिका त्यांनी अतिशय कर्तव्यनिष्ठपणे पार पाडली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन पिकांचे पावसामुळे झालेले नुकसान ,भरपाई देण्यासाठी सरकारला भाग पाडले, सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई घोषित करावी लागली. हे सगळे  काम एक महिना विरोधी पक्ष नेते म्हणून कार्य करीत असताना अतिशय धडाडीने करून दाखवले.

एम एस आर डी चे होणारा जीवन हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून संकल्पनात्मक मुंबई पुणे महामार्ग या प्रकल्पासाठी आणि तसेच राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी एम एस आर डी सी ची निर्मिती झाली .या उपक्रमाद्वारे पुणे- मुंबई द्रुतगती मार्गामुळे शहराचा कायापालट झाला .देशातील पहिला हा द्रुतगती महामार्ग होता. मुंबईमध्ये या 55 उड्डाणपूल आणि वांद्रे वरळी सी लिंक हे महत्त्वाचे प्रकल्प उभे राहिले . सत्ता बदल झाल्यामुळे या कामास स्थगिती मिळाली होती.

अशा अवस्थेत आलेल्या एम एस आर डी सी ला पुन्हा पुनरुज्जीवन करून देण्याचे काम अवघ्या पाच वर्षात एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले .2014 मध्ये सत्तेवर आले असताना या कार्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी प्रयत्न केले. याच माध्यमातून मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग, पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार वाढवला .वाशी -ठाणे या दरम्यान असलेल्या खाडीवर तिसरा पूल बांधण्यात आला. वांद्रे वर्सोवा सी लिंक, शीळ- कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भात 27 रेल्वे उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्गचे एकूण सुमारे 1600  किलोमीटर लांबीचे काम हाती घेण्यात आले. हे सगळे काम  करत असताना या कामाबरोबरच विरार -अलिबाग मल्टीमोडेल कॉरिडॉर एम एम आर डी कडे असलेले महत्त्वाचे काम एम एस आर डी कडे सोपवण्यात आले. ठाणे -बोरवली भुयारी मार्ग वर्सोवा -विरार सी लिंक, गायमुख फाउंटन हॉटेल घोडबंदर उन्नत मार्ग असे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे हे काम थोड्याच काळात पूर्ण होईल.


एकनाथ शिंदे यांचे आरोग्य मंत्री म्हणून कार्य|| Eknath shinde yanche aarogya mantri mahanun karya


 एकनाथ शिंदे यांचे कार्याचा गवगवा पाहून माननीय उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली. या आरोग्यमंत्र्याचा कालावधी सात ते आठ महिनेच होता. या कमी कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले.

 खालील प्रमाणे कार्य केले.


★एमबीबीएस डॉक्टर्स आणि तज्ञांची 890 पदे मंजूर करून भरती केली.

♀ कंत्राटी डॉक्टर्स हे एमबीबीएस ग्रामीण रुग्णालयात आदिवासी भागामध्ये जाऊन सेवा देत होते त्यांना नियमित करण्यासाठी दहा वर्षे प्रश्न प्रलंबित होते,हे प्रलंबित प्रश्न त्यांनी सोडवले .738 बीएमएस डॉक्टरांना कायम करुन घेतले.


♀ राष्ट्रीय योजनेअंतर्गत राज्यात 34 हजार कमी वेतनात कर्मचारी काम करत होते. त्यांना किमान वेतन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.


♀ राज्याच्या सर्व भागांमध्ये सेवा देणारे आशा वर्कर म्हणजेच आशा सेविका यांच्या वेतनात वाढ करण्यात आली.


♀ ग्रामीण भागात डायलीसीस सुविधा उपलब्ध करून दिली यासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 102 डायलिसिस मशीन खरेदी करून पुरवण्यात आली.


♀ प्राथमिक आरोग्य केंद्रचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत 1100 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यरत आहेत .अजून पाच हजार दोनशे उपकेंद्राचे आरोग्यवर्धनी केंद्रात रूपांतर करण्यासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे.


♀ कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला.  आरोग्यमंत्री या नात्याने मेळघाट पॅटर्न या ठिकाणी स्वतः दोन दिवस त्या ठिकाणी आरोग्य सेवकमहिला बालविकास सेवक सामील होते .कुपोषण मुक्त करण्यासाठी असा आराखडा पहिल्यांदाच करण्यात आला.


♀  गरीब लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली.यासाठी केंद्र सरकारने 60 दवाखाने बांधण्यास मंजुरी देण्यात आली .


♀ ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला गती देण्यात आली. 

हाजुरी या ठिकाणी गरिबांना सुविधा मिळावी यासाठी जितो ही सेवाभावी संस्था च्या वतीने महावीर जैन रुग्णालय सुरू करण्यात आले. 

तसेच डायलिसिसची सुविधा देखील उपलब्ध करून दिली.

एकनाथ शिंदे यांच्या या आरोग्य मंत्री म्हणून उल्लेख असताना त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख हेल्थ इंडेक्स मध्ये राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे.


 एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री म्हणून कार्य

 ठाणे हे नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे ठाणे शहराचा कायापालट होण्यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतीने नियोजनबद्ध विकसित शहर करण्यासाठी भर दिलेला आहे. या योजना त्यांनी खालीलप्रमाणे आहेत 

★क्लस्टर डेव्हलपमेंटला मंजुरी

 अंमलबजावणी प्रक्रियेला सुरुवात .

★ठाणे आणि मुलुंड या दरम्यान असणारे नवीन रेल्वे स्थानक यास मंजुरी देण्यात आली.

★वडाळा ते घाटकोपर ठाणे मेट्रो

★ ठाणे शहरांतर्गत मेट्रो प्रकल्प

★कल्याण -ठाणे मुंबई जलवाहतूक 

★ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशलिटी रुग्णालय

★ ठाणे स्थानक पूर्व येथे सॅटिस प्रकल्प 

★कोपरी पुलाचे रुंदीकरण

★ अन्नदानगर ते साकेत- बाळकुम एलिव्हेटेड रस्ता

★बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग

★फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार

★ कोपरी ते पटणी खाडी पूल

★ बाळकुम ते आत्माराम पाटील चौक बाह्यवळण रस्ता

 ★ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र्य धरण

★बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा

 अशा अनेक प्रकारे त्यांनी ठाणे शहरासाठी ठाण्याच्या विकासासाठी हे बदल घडवून आणले आहेत. असे हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभले आहेत अशा या महान कर्तृत्ववान असलेल्या शिंदे सरकार यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा !

आणखी वाचा

1 जुलै म्हणजे वेतनवाढ

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area