लोकमान्य टिळक माहिती |लालबालपाल | Lokmanya tilak information in marathi | Lalbalpal
लोकमान्य टिळक जहालवादी,लालबालपाल मधील एक धाडसी, करारी बाणा ,उत्तम पेहराव असलेले थोर समाजसुधारक यांची आज आपण माहिती पाहणार आहोत. लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते लाल बाल पाल मधील एक महान कर्तुत्ववान असे लोकमान्य टिळक. भारतीय लोकांनी 'लोकमान्य' ही पदवी बहाल करण्यात आली .लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकारलेले होते. परंतु ब्रिटिश अधिकाऱ्यांनी "भारतीय अशांततेचे जनक"" म्हणून संबोधले होते .
लोकमान्य टिळक माहिती (toc)
लोकमान्य टिळकांचे बालपण
जन्म: 23 जुलै 1856
वडील :गंगाधर रामचंद्र टिळक
आई :पार्वतीबाई टिळक
पत्नी : सत्यभामाबाई
आपत्य: श्रीधर बळवंत टिळक
टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला .ते एक ब्राह्मण असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव आहे.
बाळ गंगाधर टिळक केशव गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, शिक्षक, संपादक आणि लेखक होते . लोकमान्य या नावाने त्यांना ओळखले जात होते. महात्मा गांधीटिळकांना "आधुनिक भारताचा निर्माता" असे म्हटले आहे.
लोकमान्य टिळक -आगरकर मैत्री | Lokmany tilak & Aagarkar friendship
टिळक व आगरकर यांची मैत्री प्रसिद्ध असलेली जोडी होती. 'डेक्कन कॉलेज' मध्ये असताना टिळक आणि आगरकर यांची मैत्री झाली, टिळकांनी आगरकर यांच्याकडे केसरीचे संपादक म्हणून जबाबदारी सोपवली .काही काळ त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते मात्र त्यांच्यामध्ये नंतरच्या काळात वाद निर्माण होऊ लागले .
टिळकांचे 'संस्थेतील धोरण 'यामुळे यांच्यात वाद निर्माण झाला. राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य यावर दोघांमध्ये विचारात मतभेद असलेले दिसत होते. लोकमान्य टिळक यांना असे वाटत होते की, आपल्या देशातून इंग्रज सरकार हे निघून जावेत त्यांनी आपला मार्ग हा मोकळा करून द्यावा आणि ज्या काही सुधारणा असतील त्या सुधारणा आम्ही आमच्या परीने म्हणजे भारत देशातील समस्त नागरिक करतील असा विचार टिळकांचा होता .
आगरकर यांची सविस्तर माहिती वाचा
आगरकर यांचा असा विचार होता की इंग्रज सरकार जाण्याअगोदर आपल्या देशात ज्या काही सुधारणा त्यांच्याकडून करून घेता येतील त्या सुधारणा करणे गरजेचे आहे ..आज ना उद्या इंग्रज सरकार हे जाणारच आहे परंतु तोपर्यंत तरी आपण आपला सुधारणा करून घेणे गरजेचे आहे. यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध असले तरी विचारांमध्ये थोडासा वाद होता.
टिळक यांनी सुरु केलेला गणेशोत्सव राजकीय जागृतीसाठी 1893 रोजी गणेशोत्सव सुरू केला; कारण लोकाना जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी लोक त्यानिमित्ताने एकत्र यावेत हाच उद्देश ठेवून त्यांनी गणेशोत्सवाची तयारी केली होती .तसेच महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरू केली लोकाना ब्रिटिशनविरुद्ध उभे करणे का जरी हेतू असला तरी त्यातून चांगल्या गोष्टी घडत होत्या, लोक संघटित होऊ लागले.
लोकमान्य टिळक यांचे कौटुंबिक जीवन
टिळकांच्या कुटुंब पुण्यात असताना प्लेगने धुमाकूळ घातला होता. या प्लेग मध्ये त्यांच्या घरात एकाच आठवड्यात टिळकांचा चुलत भाऊ आणि त्यांचा भाचा बळी पडला. त्याचवेळी टिळकांचा पुत्र विश्वनाथ हा ही प्लेगला बळी पडला शिवाय पत्नीचेही देहावसन झाल्यामुळे मुलांना सांभाळण्याची सगळी जबाबदारी टिळकांवर पडली होती. त्यांचे दोन्ही धाकटीमुले लहान मुले टिळक बंधू म्हणून ओळखली जात होती. आगरकर यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते त्यांच्या विचाराशी ते सहमत असायचे.
न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना| new english school sthapna | डेक्कन एज्युकेशन सोसायटी| फर्ग्युसन महाविद्यालय स्थापना | Deccan education society| Fergusion college sthapan
विष्णुशास्त्री चिपळूणकर नोकरीला असताना विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरवले होते .त्यावेळेस आगरकर आणि टिळक यांच्याविषयी त्यांनी ऐकले होते. चिपळूणकर हे टिळक आणि आगरकर या दोघांनाही भेटले आणि 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली . त्यावेळी टिळक यांनी कोणताही मोबदला न घेता शिक्षक म्हणून काम स्वीकारले 1882 मध्ये लगेच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा मृत्यू झाला टिळक आणि आगरकर यांनी वेडबनरन ,स्वार्थ मंडलिक, तेलंग, दांडेकर, केळकर, भांडारकर यांच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ही संस्था स्थापन झाल्यानंतर लगेच या संस्थेमार्फतच 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक हे गणित व संस्कृत विषय शिकवत होते .
लाल बाल पाल | Lal bal pal
लाला लजपतराय ,बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे ब्रिटिशांविरुद्ध एकमेकांशी विचाराने जवळ आले होते त्यांचे विचार ब्रिटिशांना देशातून परतावून लावणे हा उद्देश होता . या लाल बाल पाल यांचे विचार एकमेकांशी मिळतेजुळते असल्यामुळे या तिन्ही जणांना लाल बाल पाल असेच संबोधले जात होते .
होमरूल लीग चळवळ | Homrul leeg chalval
टिळक हे मंडळाच्या तुरुंगात असताना त्यांनी आपले ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र हे चालूच ठेवले होते, तरीही मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. ८ जून 1994 मध्ये त्यांना मं डालेच्या तुरुंगातून सोडण्यात आले .त्यांनी आपले काम हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चालूच ठेवले होते. त्याचवेळेस काँग्रेसमध्ये मतभेद झाल्यामुळे त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळक यांनी आपले प्रयत्न सुरू केले, परंतु या प्रयत्नाला अपयश आले, म्हणून त्यांनी एक स्वतंत्र संघटना स्थापन केली या संघटनेचे नाम होमरूल लीग असे ठेवण्यात आले .या होमरूल लीगचे ध्येय ''स्वराज्यप्राप्ती' असे होते.
जहाज आणि मवाळ गट | jahal & mavalgat
इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी जहाल आणि मवाळवादी असे दोन गट निर्माण झाले होते. मवाळवादी गट हा इंग्रजांना अर्ज, विनंती करून आपल्या देशाची खरी परिस्थिती सांगून आमच्या देशातून निघून जावे आणि आम्हाला स्वातंत्र्य द्यावे अशी विनंती करणारे मावळवादी होते.
या मवाळ गटामध्ये नामदार गोखले आणि महात्मा गांधी यांचा समावेश होता .
जहालवादी यांची भूमिका अशी होती की इंग्रज हे भारतातून सहजासहजी जाणार नाहीत त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे म्हणून त्यांना प्रतिकार करावा आणि या देशातून त्यांना सळो की पळो करून सोडून त्यांना येथून हाकलून लावणे असाच पर्याय दिसतो. म्हणून जहालवादी आणि मवाळवादी असे दोन गट तयार झाले होते .टिळक हे एक जहालवादी गटातील अग्रगण्य असे नेतृत्व करणारे महत्त्वाचे नेते होते.
गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी
लोक संघटित होणे गरजेचे आहे म्हणून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका आग्रह धरला. त्यामुळे लोक संघटित होतील आणि आपले विचार त्यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचतील असा त्यांचाअट्टहास होता ;म्हणून महाराष्ट्र मध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
असे हे लोकमान्य टिळक भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतिशय कठोर शब्दांमध्ये आपली भाषा वापरत होते ."सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय"? अशा जळजळीत शब्दात अग्रलेख त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध लिहिला होता. त्यांनी आपल्या भारत देशातून निघून जावे यासाठी लोकमान्य टिळक आग्रही होते . जहालवादाचे प्रमुख नेते होते .त्यांनी मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य 'हा ग्रंथ लिहून आपले आध्यात्मिक बाजूही मांडली आहे. इंग्रजांनी भारतीय व्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप करू नये यासाठी प्रयत्न करणारे महत्त्वाचे विचाराचे भारतीय नेते होते.