Google ads

Ads Area

हेरंब कुलकर्णी शिक्षणविषयक विचार| हेरंब कुलकर्णी यांचे विद्यार्थी विचार | हेरंब कुलकर्णी यांची माहिती | Heramb kulkarni thought in education field . अध्यापनकसे असावे | how teaching field

 हेरंब कुलकर्णी शिक्षणविषयक विचार| हेरंब कुलकर्णी यांचे विद्यार्थी विचार | हेरंब कुलकर्णी यांची माहिती | Heramb kulkarni thought in education field . अध्यापनकसे असावे | how teaching field


शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे माननीय हेरंब कुलकर्णी सर्वसामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीतील काही बदल हे सुचवले आहेत .विद्यार्थी विकास हाच आपल्या शिक्षण पद्धतीत महत्त्वाचा असून हाच विकास करणे अभिप्रेत असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार त्यांना आपल्या ज्ञानाच्या क्षेत्रात आपली कवाडे उघडली पाहिजेत.


शिक्षण क्षेत्रात प्रगती होणे महत्त्वाचे आहे ;शिक्षकांनी  विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी त्यांची जशी भूक आहे तशा पद्धतीने त्यांना प्रेरित करणे गरजेचे आहे. 


हेरंब कुलकर्णी यांची पुस्तके | heramb kulkarnis bopk

●आमच्या शिक्षणाचं काय?

●कॉमन मॅन कवितासंग्रह

 ●जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स 

●परीक्षेला पर्याय काय?

 ●बखर शिक्षणाची 

●शाळा आहे -शिक्षण नाही !

●सहावा वेतन आयोग काय खरे? काय खोटे?


 हेरंब कुलकर्णी यांचा लेख ( विचार) | heramb kulkarnis post


जसा आला तसाच upload करीत आहे ,कारण मला तो खूप भावलेला आहे .

प्रत्येक शिक्षकाने या लेखाच्या आधारे काही गोष्टी लक्षात घेतल्या की मा .हेरंब कुलकर्णी सरांना अभिप्रेत असलेले शिक्षण सर्वांना मिळेल यात शंकाच नाही.


 हा लेख पुढीलप्रमाणे आहे त्या लेखातील विचारानुसार शिक्षक प्रेरणा घेतील आणि आपले अध्ययनाचे कार्य चांगले नेटाने चालेल..


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

मी  नेमकं कसं शिकवावं....? 

(हेरंबकुलकर्णी)


एकदा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.


सर्वजन दिवसभर 


व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?* 


स्पेलिंग पाठ करावेत की नाही?* 


कविता कशी शिकवायची?* 


अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे?* 


याचा काथ्याकूट करीत होतो*. 


संध्याकाळी ५ वाजले.* सर्वांना जाण्याची घाई* होती. 

सर्वजन उठू लागताच* ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले* आणि म्हणाले, _"मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."_ 


वैतागाने सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले, 


_"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली*.

 मी एक छोटे उदाहरण* सांगतो. ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."*_ 


'आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने सर्व ऐकू लागले...


ते म्हणाले की,


_"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे* तिथे एक , नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे*. आजूबाजूला एक ही घर नाही*. एकदा संध्याकाळी नवर्‍याला अचानक गावाला जावे लागले*. पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि 

अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले*._ 


_ती आई काय करेल?*_


_सांगा ना काय करेल?_"

 

ते आम्हाला विचारू लागले.


आम्ही सारे शांत झालो.                 


कुणीच काही बोलेना. 


ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले,  


_*"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का?*

 

*की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"*_


_"सांगा ना... काय करेल यातलं?"_


आम्हाला मुद्दा कळला होता. 


ते *किंचित हसले* आणि पुढे म्हणाले, 


_*"ती यातले काहीच करणार नाही*

. *ती तिला जे सुचेल ते करील*. ती त्याला *कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल...  त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."*_


ते पुढे म्हणाले की, 


_*"हे सारे ती का करील?"*_ 


_"हे तिला सारे का सुचेल?"_ 


*_"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!!!"_*


त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले, 


_"त्या बाईसारखे *तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का?* *तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल* तर माझ्या मित्रांनो, *तुम्ही जे काही वर्गात कराल*, तेच *उपक्रम* असतील, *तीच अध्यापनाची पद्धती असेल*. तुम्ही *हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल* आणि *तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."*_ 


_*"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"*_


आणि *ते शिक्षक शांतपणे खाली  बसले.*


*आम्ही थक्क झालो...* 

( हेरंब कुलकर्णी )

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

वरील लेखावरून असे वाटते की आपणही मुलांना घडवत असताना केवळ आपले अध्यापनाचे काम संपले असे न करता त्यात आपले मूल आहे असे समजून जर आपली कृती झाली तर आपणही उत्तम अध्यापक होऊ शकतो .शिक्षक हा उत्तम तर असतोच आपल्या समोर बसलेले मूल त्याची मानसिक अवस्था समजून घेऊन आपल्या कृती झाल्या तर मुलांना अधिक आनंददायी शिक्षण मिळू शकेल .


आणखी वाचा 

★ पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ समिती.

★★गुरुपौर्णिमा मराठी भाषण






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area