Google ads

Ads Area

गुरुपौर्णिमा निमित्त मराठीत भाषण| Gurupaurnima nimitt marathit bhashan

 गुरुपौर्णिमा निमित्त मराठीत भाषण| Gurupaurnima nimitt marathit bhashan


अध्यक्ष महोदय आणि माझ्या बाल मित्रांनो आज गुरुपौर्णिमा !आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमाविषयी आणि गुरुचे महत्त्व सांगणार आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकावे अशी मी विनंती करतो.

 . मित्रांनो आज गुरुपौर्णिमा संपूर्ण भारतात साजरी केली जाते .गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरूचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे आपण मोठेपणी काहीतरी बनण्यासाठी प्रयत्न करत असतो .असा गुरु प्रत्येकाला मिळत असतो. "आई माझा गुरु आई माझा कल्पतरू" असे आपण म्हणतो हे खरंच आहे. आईनंतर आपले शिक्षक हे आपले गुरु असतात .त्यांनी घडवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घेतलेले असते लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते, याप्रमाणे गुरु आपल्याला एका मातीच्या गोळ्यापासून एक सुंदर असा माठ बनवत असतो .


 तसेच आपण अज्ञानी असतो, अडाणी असतो ह्या जगाचा आणि आपला काहीही संबंध नसतो. तरीही आपल्याला ह्या जगात काय चाललं आहे हे देण्याचं काम हे आपले गुरु करत असतात. 


म्हणून मला असं वाटतं की गुरुशिवाय आपलं जीवन निरर्थक आहे. माणसाने नेहमी एकमेकांविषयी आदर राखला पाहिजे ,ठेवला पाहिजे. त्यातून आपली प्रगती करु शकतो हे आपण म्हणतो, पण खरंतर एक तरी असा गुरू हवा की तो आपलं सर्वस्व बनला पाहिजे .मग तो  लहान असो किंवा छोटा असो ह्या गुरुजवळ गेल्यानंतर आपल्याला सगळया जगाचा विसर पडला पाहिजे. दुःखाचा विसर पडला पाहिजे .म्हणून गुरुशिवाय आपल्याला तारणारा कोण नसतो आपले संपूर्ण ज्ञान शिष्याला देण्यासाठी तत्पर असतो. अशा  शिष्याला घडवण्यासाठी आपले सर्वोपरी प्रयत्न करत असतो .शिष्य कच्चा असला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही किंवा तो शिकतच नाही म्हणून त्याच्याकडे  जाणूनबुजून दुर्लक्ष करून चालत नाही . गुरू म्हणजे जोपर्यंत तो कच्चा आहे जोपर्यंत शिकवत राहावे. जोपर्यंत तो त्या गोष्टी शिकण्यासाठी लायक बनत नाही तोपर्यंत गुरचं काम आहे की त्याला घडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. 


शिष्यानेही आपल्या गुरुचे महत्त्व समजून घेऊन आपल्याला तारणारा फक्त आणि फक्त गुरुच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण गुरूचा संवाद म्हणजे परमेश्वराची संवाद असल्यासारखेच आहे. आपल्याला प्रत्यक्ष भगवंतापाशी जाता येत नसले तर भगवंताजवळ जाण्याचे जे ज्ञान, जे समाधान मिळत असतं तेच समाधान आपल्याला गुरूच्या चरणापाशी मिळत असतं.  असा गुरू आपल्या जीवनामध्ये मिळणं हे आपल्यासाठी खूप भाग्याचे असते आणि असा गुरू जर आपल्याला मिळाला तर असं समजून जा की आपली भगवंताने जीव - शिवाची भेट घडवून आणली आहे आणि अशा या गुरूला आपले सर्वस्व अर्पण करून त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे  गरजेचे आहे .

 म्हणून तुम्हाला सांगतो की  गुरुअज्ञा मानून आपला उद्धार करणे गरजेचे आहे तरच आपण काहीतरी जीवनात कमवून ठेवू. काहीतरी करूया कारण गुरूशिवाय आपल्याला तारणारा आणि आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणचा नसतो .मार्गदर्शन तर भरपूर करतात, पण गुरू म्हणून जे काही  नातं असतं ते नातं ते वेगळंच असतं. त्या वेगळ्या नात्यात आपल्याला जे समाधान मिळत असते त्या समाधानाची बरोबरी जगात कोणत्याच सुखात नसते .


आपल्याला कार्य करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते ती मात्र गुरुशिवाय आपण करू शकत नाही म्हणून मला गुरुपौर्णिमेनिमित्त बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद! तुम्हालाही गुरुपौर्णिमेच्या सगळ्या  माझ्या मित्रांनाआणि गुरुजनांना शुभेच्छा ! 


 माझे हे छोटेसे भाषण गुरुचरणी अर्पण करून पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद !


आणखी वाचा

नामदेव महाराज यांची माहिती

लोकमान्य टिळक यांची माहिती




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area