CWG :2022 वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी|| कॉमनवेल्थ गेम्स 2022 | commonwealth games 2022
भारताचे कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धेत चार पदके मिळवून भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी चांगली बजावली आहे . कोणताही खेळ असला तरी त्या खेळामध्ये आपले प्राविण्य दाखवणे खूप महत्त्वाचे असते .
सगळ्या खेळाडूंना आपले कलाकुसर, कौशल्य हे दाखवावे लागत असते .आजकाल मैदानी खेळायला खूप महत्त्व आले असून त्यासाठी अनेक अकॅडमी उपलब्ध झालेल्या आहेत.त्यातूनच आपल्या गुरूंनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे असते .त्यातून मुलांना घडवण्यात त्यांचा वाटा असतो आणि त्यातूनच आपण अशा पद्धतीने खेळ करून आपल्या देशाचे नाव रोशन तर करतच असतो .शिवाय स्वतःचे करिअर सुद्धा चांगले होत असते अशाच खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2022 वेटलिफ्टमध्ये आपली यशस्वी कामगिरी केली आहे .चारही खेळाडू यांनी वेटलिफ्टिंगमध्ये मानाचा तुरा रोवला आहे . असाच आदर्श अरुणीमा या खेळाडूने सुद्धा अपंगत्वावर मात केली
भारताने आतापर्यंत एक सुवर्ण एक कास्य पदक आणि दोन रौप्य पदके मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .त्यामुळे भारताचे स्थान पदकतालिकेत आठव्या स्थानावर आहे .
या पद्धतीने या चार जणांनी आपल्या खेळातील कौशल्य दाखवले आहे . यांची नावे खालीलप्रमाणे आहेत .
1 ) गुरुराज पुजारी (कांस्यपदक)
2) संकेत सरगर (रौप्यपदक )
3 ) बिंदियारानी देवी ( रौप्यपदक )
4 ) मीराबाई चानू (सुवर्णपदक )
अशा महान खेळाडुंनी आपल्या भारत देशाला चार पदके मिळवून दिली असून युवा पिढीपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
संपूर्ण भारतातून त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे; त्यांच्याप्रमाणे आपणही कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपली कामगिरी बजावली पाहिजे, अशी आशा अनेक युवा खेळाडूकडून देशातील नागरिक करीत आहे .अशाच पद्धतीने यश मिळवत राहिले तर राष्ट्रकुल असो किंवा ऑलम्पिक स्पर्धा त्यामध्ये आपले कौशल्य दाखविण्यासाठी आजची तरुण पिढी खूप कष्ट करत आहे .
हसत खेळत शिक्षण घेत असताना आपण अभ्यासाबरोबर खेळ योगाचे शिक्षण याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे .त्याशिवाय आपल्याला खेळातील आनंद घेता येत नाही.
शिवाय आपले आरोग्यही महत्त्वाचे आहे म्हणून खेळ हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या तरुण युवा खेळाडूंनी पदके जिंकल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन !
आणखी वाचा