Google ads

Ads Area

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक महापूजा | aashadhiekadashi nimitta mukhyamantri Eknath shinde yanchya haste vitthalrukminichi mahapooja.

 आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक महापूजा | aashadhiekadashi nimitta mukhyamantri Eknath shinde yanchya haste vitthalrukminichi mahapooja.



नवनिर्वाचित माननीय एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल हे सर्व सामान्य चा दैवत आणि सगळ्यांना हवासा वाटणारा आपला विठ्ठल रुक्मिणी या मंदिरात सापत्नीक महापूजा करण्याचा योग माननीय मुख्यमंत्री यांना मिळाला या विठ्ठलापुढे माननीय मुख्यमंत्री यांनी कोणती मागणी केली .


मुख्यमंत्री यांच्या हस्ते महापूजा (toc)


प्रारंभी विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीचे मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला .तर श्री औसेकर महाराजांनी प्रस्ताविक केले ,तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज  यांनी केले .

विठ्ठलापुढे साकडे 

बा विठ्ठला समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त व्हावे सर्व अडचणी लोकांच्या दूर व्हाव्यात यासाठी विठ्ठलाच्या चरणी त्यांनी साकडे घातले.


कोणत्या दाम्पत्यास मान मिळाला

आषाढी वारीत प्रत्येक वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी सोबत वारकरी संप्रदायातील दाम्पत्य  मुख्यमंत्री यांच्यासोबत महापूजेचा मान  मिळत असतो. असा हा मान मु. रुई ता. गेवराई जि.बीड श्री मुरली भगवान नवले (52) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले (47 )या दांपत्याला महापूजेचा मान मिळाला.


माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


माननीय मुख्यमंत्री यांनी वारकऱ्यांसोबत केलेले भाषण


समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही केली.

महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असले तरीही कृषी विभागात उद्योग ,शिक्षण ,आरोग्य या सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार आहेत .समाजातील प्रत्येक घटक या क्षेत्रापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  महाराष्ट्र शासन सर्वसामान्यांचे आहे अशी भावना लोकांच्या मनामध्ये रुजली गेली पाहिजे . यावर्षी पावसाला काही ठिकाणी उशिरा सुरुवात झाली तर काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील असेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले .


राज्यात 12 कोटी जनतेच्या वतीने महापूजा

 आषाढी वारी एक मोठे महापर्व आहे या वारीला खूप मोठी परंपरा लाभलेली असून या वारीनिमित्त मला महापूजेचा मान मिळाला हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे राज्यातील 12 कोटी जनतेच्या वतीने शासकीय महापूजेचा मान मिळाला असून सर्व महाराष्ट्र जनतेला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा असे मुख्यमंत्री यांनी आपले विचार व्यक्त केले .


वारकरी सन्मान व मोफत एसटी पास 

शासकीय महापूजेचा मान मानाचे वारकरी श्री मुरली भगवान नवले व त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या दांपत्यांना मिळाला. या जोडीला माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना राज्य परिवहन महामंडळ (एसटी ) वर्षभरासाठी मोफत पास वितरण करण्यात  आला .यावेळी एसटी महा मंडळाचे वाहतूक व्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड विभाग नियंत्रक विलास राठोड हे उपस्थित होते.


रिंगण विशेषांक

आषाढी वारीत 'रिंगण' हा एक महत्त्वाचा वारीसाठी महत्त्वाचा घटक आहे वारीत घोड्याचे रिंगण होत असते अशाच रिंगणाविषयी माहिती या रिंगण या विशेषांकात सादर केली.  हा विशेषांक माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .


निर्मल दिंडी पुरस्कार

  पंढरपूरची वारी हे महाराष्ट्रासाठी खूप प्राचीन प्राचीन व अध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा जोपासली आहे या वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या समाज प्रबोधन समाजकार्य करण्याचे काम करत असतात  .या वाऱ्यांचा आदर्श पुढे ठेवून ' ' निर्मल वारी हरित वारी ' या अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात येत असतो. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह ) 

द्वितीय क्रमांक ह भ प भाऊसाहेब महाराज खरवडकर दिंडी मुक्काम पोस्ट शेरा तालुका रेनापुर जिल्हा लातूर  (75 हजार रुपये व सन्मान चिन्ह ) 

तृतीय क्रमांक पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (50 हजार रु आणि सन्मान चिन्ह) देऊन दिंडीला प्रदान करण्यात प्रदान करण्यात आले. 

ग्रीन बिल्डिंग पुरस्काराचे वितरण हे यावेळी करण्यात आले.


 निष्कर्ष 

आषाढी वारी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र सह अन्य राज्यातील लोक ही या वारीसाठी अतुरतेने सामील होत असतात काही वारकरी आपापल्या गावच्या किंवा आवडीच्या संतांच्या पालखीसोबत पायी पंढरपूरला चालत येतात. या वारीला ऊन, पाऊस ,वारा याची पराकाष्ठा न मानता अखंड 20 दिवस सतत  पायी प्रवास करून पांडुरंगाच्या भेटीची आतुरता लागलेली असते . असा हा पांडुरंग परमात्मा सर्वांच्या हृदयात  स्थान असते. सगळे वारकरी आणि भक्तजन यांना तो नेहमी आपलाच आणि हृदयात असलेला एकमेव विठ्ठल असा आहे .या ठिकाणी सगळ्यांना आपला वाटत असतो ,कोणते निर्बंध या ठिकाणी नसतात म्हणून असा हा आनंद सगळ्यांच्या आवडीचा आणि श्रद्धेचा विषय असतो, म्हणून  वारकरी  पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या भेटीच्या इच्छामुळे दाखल होत असतात


आणखी माहिती वाचा

नामदेव महाराज यांची माहिती

आषाढी वारी संपूर्ण माहिती वाचा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area