शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 5| scholarship exam practise paper 5|shishyavruti exam sarav paper 5
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गाची परीक्षा काही तासावर येऊन ठेपली आहे .तरी विद्यार्थी मित्रहो परीक्षेचा अभ्यास करत असताना जे सोपे घटक आहेत, असे सोपे घटक दुर्लक्ष करून जमणार नाही . जे कठीण असा घटक वाटत आहे त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष करा, कारण की ते करत असताना तुम्हाला अधिक गोंधळात जायला नको, म्हणून जो भाग कधीच बघितला नाही अवघड वाटत आहे अशा भागाकडे जाता जाता दुर्लक्ष करा;
कारण तुम्हाला प्रसन्न मनाने पेपर सोडवायचा आहे. कोणतेही मनावर दडपण नको आहे, अशा वेळेस तुमचा अभ्यास होणे गरजेचे आहे. काही तास आपल्याला परीक्षेसाठी शिल्लक आहेत; त्यासाठी जाता जाता या घटकाची उजळणी सहजतेने करू शकता. परीक्षा देत असताना मनावर दडपण न येता जे येत आहे सोडवण्यासाठी प्रयत्न करा .तुम्हाला यश मिळणारच. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा !
1 ) खालील कोणता शब्द समानार्थी शब्दाची जोडी नाही .
नौबत -डंका
कवाड- द्वार
सोशिक - पीडित
अगम्य -गंभीर
उत्तर सोशिक -पीडित
2) गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे?
वि.वा. शिरवाडकर
प्र के.अत्रे
रा .ग. गडकरी
कृ. के. दामले
उत्तर रा ग गडकरी
3 )पर्यायातून धर्मवाचक नाम नसलेला शब्द निवडा
अद्भुत ,नाविन्य ,साहस, श्रीमंती
उत्तर :अद्भुत
4 ) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
भौमित्तीक
विनिमयमूल्य
स्फूर्तीस्थान
अधुनिक
उत्तर स्फूर्तिस्थान
5 )साताऱ्याजवळ प्रतापगड म्हणून एक किल्ला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.
केवल वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
यापैकी नाही
उत्तर मिश्र वाक्य
6) जंगल एक्सप्रेस हा बालकथा संग्रह कोणी लिहिला आहे?
मच्छिंद्र ऐनापुरे
मकरंद जोशी
यदुनाथ थत्ते
गोदावरी परुळेकर
उत्तर : मच्छिंद्र ऐनापुरे
7) ' यशस्वी हो ' यामधील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
स्वार्थ
आज्ञार्थी
विद्यार्थी
संकेतार्थ
उत्तर आज्ञार्थ
8) तटस्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता .
अस्वस्थ
निरपेक्ष
त्रयस्थ
पक्षपाती
उत्तर : पक्षपाती
9 )पुढीलपैकी पारिभाषिक शब्द ओळखा .
सौंदर्य
चित्रपट
संदर्भ
रेकॉर्ड
उत्तर : रेकॉर्ड
10) पुढीलपैकी नाट्यछटाकार कोण ते ओळखा
केशवसुत
दिवाकर
ग्रेस
बी
उत्तर : दिवाकर
11) सुवर्णमध्य या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा .
11 ) ' प्रकाशवाट ' हे 'आत्मचरित्र कोणाचे
जयंत नारळकर
ग प्र प्रधान
प्रकाश आमटे
उत्तर : प्रकाश आमटे
12 ) खालीलपैकी विशेषनाम ओळखा ?
सरस्वती
नवलाई
शेळी
डोंगर
उत्तर सरस्वती
13) नामाचे मुख्य प्रकार कोणते?
सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद
सामान्यनाम,विशेषनाम,भाववाचकनाम
भाववाचकनाम ,सर्वनाम, सामान्यनाम
विशेषनाम,सामान्यनाम,सर्वनाम
उत्तर सामान्यनाम,विशेषनाम,भाववाचकनाम
14 ) आम्ही रोज क्रिकेट खेळतो?
आम्ही रोज क्रिकेट खेळलो आम्ही रोज क्रिकेट खेळणार आम्ही रोज क्रिकेट खेळत होतो आम्ही रोज क्रिकेट खेळत असणार
उत्तर आम्ही रोज क्रिकेट खेळलो
15) प्रकार ओळखा तिच्याजवळ पुस्तक नाही
केवलप्रयोगी,
उभयान्वयी,
शब्दयोगी
क्रियाविशेषण अव्यय
उत्तर :शब्दयोगी अव्यय
16) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा
अतिशय खोडकर स्त्री
त्राटिका
वेंधळी
भाग्यलक्ष्मी
त्रिजता
उत्तर :त्राटिका
17 )खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ सांगा . साखरेचे खाणार त्याला देव देणार
गोड खाल्ले की देव भरपूर देतो
देवाने दिले तर गोड खावे
जो चांगले इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो
जशीच्या तसे फळ मिळत नाही
उत्तर : जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो
18) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा .
लोखंडाचे चणे खाणे
उद्योगधंदा करणे
भरपूर परिश्रम घेणे
भरपूर खाद्य खाणे
यापैकी नाही
उत्तर भरपूर परिश्रम घेणे
19) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
चोर
शिकारी
चोरटा
साव
भिकारी
उत्तर : साव
20) पुढील शब्दाचा पारिभाषिक शब्द मराठीत अर्थ लिहा
एक्स-रे ,
कि किरण
क्ष -किरण
उत्तर क्ष -किरण
# आणखी वाचा
शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 6
शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम स्वरूप