शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी सराव चाचणी 5 --8 वी| स्कॉलरशिप परीक्षा मराठी सराव परीक्षा| scholarship exam subject marathi test 5 - 8 वी
विद्यार्थी मित्रांनो नमस्कार !
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असते हे शिष्यवृत्ती परीक्षा जरी अनिवार्य नसली तरीही, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या मूलभूत संकल्पना पूर्ण होऊन तो शालेय जीवनात चांगल्या रितीने अभ्यासाचे कौशल्य प्राप्त करून सो स्वयं अध्ययनद्वारे आपला मार्ग निवडण्यासाठी आणि कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी या स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात.
आज आपण मराठी विषयातील शिष्यवृत्ती परीक्षेत महत्त्वाचे विचारले जाणारे प्रश्न विचारात घेऊन 20 मार्काची सराव चाचणी घेत आहोत .चाचणी इतर विद्यार्थ्यांनाही पाठवा.
शिष्यवृत्ती परीक्षा मराठी (toc)
प्रश्न क्र.1 खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडून लिहा.
क्षमा करणे चांगले ,परंतु केलेली क्षमा विसरून जाणे, हे त्यापेक्षाही चांगले आहे .दुसऱ्याला केलेली क्षमा आपण लक्षात ठेवली की, अहंकार वाढतो. क्षमा करावी व विसरून जावे. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती क्षमेमध्ये आहे.
जो माणूस क्षमाशील आहे त्याला संरक्षणासाठी बाह्य कवचाची आवश्यकता लागत नाही. सुडाचा आनंद हा एक दिवस टिकतो परंतु सेनेचा आनंद हा सदैव टिकतो; जीवनातील सारे दुःख पचवण्याचे सामर्थ्य वाढणे म्हणजे क्षमावृत्ती वाढणे होय. आपण जगाला क्षमा करत राहिलो की,तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो व अखंड आनंद प्राप्त होतो.
१) आपला अहंकार केव्हा वाढीस लागतो?
अ ) दुसऱ्यास क्षमा केल्याने
ब ) दुसऱ्या क्षमा न केल्याने
क) क्षमा आहे वीरांचे पोषण असल्याने
ड) क्षमा केली आणि ती लक्षात ठेवली की
2 ) जीवनात दुःख पचवण्याचे सामर्थ्य वाढल्याने काय होते?
1 ) पैसा मिळतो
2 ) त्यागाची भूमिका वाढते
3) आनंद मिळतो
4 )क्षमावृत्ती वाढीस लागते
प्रश्न. 2 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखून लिहा.
१ ) उत्तेजन देणे
अ ) आनंद देणे
ब )प्रोत्साहन देणे
क )धीर देणे
ड)मदत करणे
2 ) समाधान वाटणे
अ )प्राण्यापेक्षा जपणे
ब) हायसे वाटणे
क भाजी मारणे
ड अभय देणे
प्रश्न .3 दिलेल्या पर्यायांपैकी रिकामी जागेत योग्य नाम निवडून लिहा.
1) राजू ने गणरायाला दुर्वांची•••••• वाहिली.
अ ) पेंडी
ब) गड्डी
क) जुडी
ड ) मोळी
2 ) ••••••हा एक निशाचर प्राणी आहे .
अ ) कावळा
ब ) गाय
क ) वटवाघुळ
ड )मोर
प्र1श्न .4 पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन ओळखा.
1) आजोबांनी मला स्वच्छतेचे संदेश स्पष्ट करून सांगितले.
अ )एकवचन
ब ) अनेकवचन
क) उभयवचन
ड )आदरार्थी बहुवचन
2) मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले.
अ) एकवचन
ब )अनेकवचन
क ) उभयवचन
ड )आदरार्थी बहुवचन
प्रश्न .5 पुढील म्हणींचा रिकाम्या जागी पर्याय लिहा.
1) आले ••••••• मना तेथे कोणाचे चालेना.
अ )पाटलाच्या
ब ) सावकाराच्या
क ) देवाजीच्या
ड )प्रभुच्या
2) पदरी पडले •••••• झाले
अ) वाया
ब) निष्फळ
क ) मान्य मान्य
ड ) पवित्र
या सराव चाचणीची उत्तरे पहा
👎👇👇
https://www.marathisampurn.com/2022/07/5-8-scholarship-exam-subject-marathi.html
☝️
.