शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 3| scholarship exam practise paper 3|shishyavruti exam sarav paper 3
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी या दोन्ही वर्गाची परीक्षा काही तासावर येऊन ठेपली आहे .तरी विद्यार्थी मित्रहो परीक्षेचा अभ्यास करत असताना जे सोपे घटक आहेत, असे सोपे घटक दुर्लक्ष करून जमणार नाही . जे कठीण असा घटक वाटत आहे त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष करा, कारण की ते करत असताना तुम्हाला अधिक गोंधळात जायला नको, म्हणून जो भाग कधीच बघितला नाही अवघड वाटत आहे अशा भागाकडे जाता जाता दुर्लक्ष करा;
कारण तुम्हाला प्रसन्न मनाने पेपर सोडवायचा आहे. कोणतेही मनावर दडपण नको आहे, अशा वेळेस तुमचा अभ्यास होणे गरजेचे आहे. काही तास आपल्याला परीक्षेसाठी शिल्लक आहेत; त्यासाठी जाता जाता या घटकाची उजळणी सहजतेने करू शकता. परीक्षा देत असताना मनावर दडपण न येता जे येत आहे सोडवण्यासाठी प्रयत्न करा .तुम्हाला यश मिळणारच. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा !
1 ) नंदी या शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार काढून टाकला तर कोणता शब्द तयार होईल?
मधी
सरिता
नदी
नद
उत्तर : नदी
2) ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा .
कठोर व्यंजने
उष्मा व्यंजने
मृदू व्यंजने
महाप्राण व्यंजने
उत्तर : मृदू व्यंजने
3 ) चिदानंद या शब्दाचा विग्रह ...... असा आहे .
चित+ आनंद
चीत + आनंद
चीद +आनंद
उत्तर : चित + आनंद
4 ) माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारचा आहे ?
सामान्य नाम
भाववाचक नाम
विशेष नाम
द्रवाचक नाम
उत्तर :: विशेषनाम
5 ) खालील शब्दातील विभक्ती प्रत्यय सांगा .
तो शाळेतून घरी आला
चतुर्थी
तृतीया
षष्ठी
पंचमी
उत्तर : पंचमी
6) 'खेळ' या नामाचे सामान्य रूप काय होईल?
खेळी
खेळू
खेळ
खेळा
उत्तर: खेळा
7) स्वतः या सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा
संबंधी सर्वनाम
आत्मवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम
उत्तर : आत्मावाचक सर्वनाम
8) 'दुसरा' कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
धातू साधित
गुणविशेषण
अनिश्चित
क्रमवाचक
उत्तर : क्रमवाचक
9 ) काळ ओळखा : पृथ्वी सूर्याभोवती फिरते .
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमानकाळ
रितिकाळ
उत्तर :वर्तमानकाळ
10) क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
क्रिया करणारा
क्रिया वस्तूवर घडते
ज्याच्यात कर्म असते
उत्तर : वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
11 ) एकदा -दोनदा- तीनदा -हजारदा ही कोणते क्रियाविशेषण आहेत
स्थितिवाचक
आवृत्तीवाचक
सातत्यवाचक
गतीवाचक
उत्तर : आवृत्तीवाचक
12 ) 'लवकर' या शब्दाची जात ओळखा.
क्रियाविशेषण
उभयान्वयी
क्रियापद
यापैकी नाही
उत्तर : क्रियाविशेषण
13 ) समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे.
कालवाचक
स्थलवाचक
हेतवाचक
तुलनावाचक
उत्तर : स्थलवाचक
14) खालील शब्दाचा प्रकार ओळखा
असेच यश पुढेही मिळवा
आश्चर्यदर्शक
हर्षदर्शक
संमतीदर्शक
प्रशंसादर्शक
उत्तर : प्रशंसादर्शक
15) पुढील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा
मरावे परी ;कीर्ती रुपी उरावे
समुच्चयबोधक
न्यूनत्वबोधक
विकल्पबोधक
परिणामबोधक
उत्तर : न्यूनत्वबोधक
16) खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.
राजाने राजवाडा बांधला
कर्तरी
भावे
कर्मणी
भावे कर्मणी
उत्तर :कर्मणी
17) प्रयोग ओळखा
आता माझ्याने काम करवते
कर्मणी
कर्तरी
भावे कर्तरी
कर्मणी
उत्तर : कर्मणी
18) अबब ! केवढी प्रचंड आग ही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे
होकारार्थी
विधानार्थी
उद्गारार्थी
प्रश्नार्थी
उत्तर : उद्गारार्थी
19) खालील शब्द शुद्ध स्वरूपातील ओळखून लिहा .
उंबरठा
उंबराथ
उंबरटा
उंब्रठा
उत्तर :उंबरठा
20 ) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा
सूचना न देता येणारा -अतिथी
पाव्हणा
जावई
पाहुणचार
अगंतुक
उत्तर :आगंतुक
# आणखी वाचा
शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 6
शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम व स्वरूप