11वीची पहिली प्रवेश यादी 3 ऑगस्ट 2022 जाहीर होणार |11 th admission first list 3 Augast 2022
अकरावीची प्रप्रवेश क्रिया ही अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे . अकरावीची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केली असून पहिली प्रवेश यादी 3 ऑगस्ट 2022 रोजी लागणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभाग मंडळाचा( सीबीएससी ) दहावीचा निकाल लागेपर्यंत ही 11वी ची प्रवेश प्रक्रिया होती थांबिवली होती .आता या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शिक्षण विभागाने या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक 25 जुलै रोजी जाहीर केले आहे .
ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश अर्ज भरले नसतील त्यांनी हे प्रवेश अर्ज 27 जुलै पर्यंत भरणे आवश्यक आहे.
त्यानंतर प्रवेश अर्ज बंद होतील ज्या विद्यार्थ्यांना भाग 1 आणि भाग 2 असे प्रवेश अर्ज भरायचे राहिले असतील त्यांनी तात्काळ हे अर्ज भरून आपल्या प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदणी अर्जाचा भाग 2 भरून तो (लॉक) बंद करणे यासाठी 27 जुलै पर्यंतच कालावधी आहे.
11 वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादी गुरुवार 28 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल .
गुणवत्ता यादीवर असणाऱ्या हरकती, आक्षेप विचारात घेतल्यानंतरच पहिल्या फेरीची प्रवेश यादी ही जाहीर करण्यात येणार आहे .
भाग दोन भरून झाल्यानंतर त्या भागामध्ये महाविद्यालयाचे पसंतीक्रम अंतिम करणे आणि त्यानंतर अर्ज लॉक केल्यानंतर जे पसंतीक्रम निश्चित कले आहेत त्यावरच प्रवेश प्रक्रिया विचारात घेतली जाणार आहे .
11 वीची ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्यात पुणे, मुंबई ,नाशिक, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील इ . अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असतो
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची ही सुविधा 30 मे पासून उपलब्ध करून देण्यात आलेली होती .तर भाग दोन हा महाविद्यालयाचे पसंती क्रम नोंदवण्यासाठी 22 जुलैपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली होती .ती प्रक्रिया 27 जुलै रोजी पर्यंतच असून ,ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले नसतील त्यांनी लवकरात लवकर हे अर्ज भरणे आवश्यक आहे.
आपला प्रवेश पसंती क्रमांकानुसार अंतिम यादीची 3 ऑगस्टपर्यंत वाट पाहणे गरजेचे आहे .
अशी असेल प्रक्रिया
1 गुणवत्ता यादीवर आक्षेप ,हरकती नोंदविणे
28 जुलै ते 30 जुलै
2 ) पहिली नियमित (प्रवेश) फेरी
3 ऑगस्ट रोजी
3) मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे ,रद्द करणे
3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट
4 ) दुसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त जागा जाहीर
7 ऑगस्ट
5 ) दुसरी नियमित फेरी
7 ते 17ऑगस्ट
6) तिसरी नियमित फेरी
18 ते 25 ऑगस्ट
7) विशेष फेरी
26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर
अधिक माहिती यासंकेतस्थळावर पहा
हे ही वाचा
हेरंब कुलकर्णी यांचे विचार शिक्षक कसा असावा
शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिकासंच
नवोदय विद्यालयात शिक्षक भरती परीक्षा अभ्यासक्रम
Sahil
उत्तर द्याहटवाSahil
उत्तर द्याहटवा