शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 1 | scholarship exam practise 1 paper|shishyavruti exam sarav paper 1
विद्यार्थी मित्रहो शिष्यवृत्ती परीक्षा जवळ येत आहे तसतशी तुमची अभ्यास झाला असेल उत्सुकता शिगेला पोहचली असेल तर अजून अभ्यास पूर्ण झाला नाही असे वाटत असेल तर फक्त प्रश्नपत्रिका वाचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो .
परीक्षेला जाताना जास्त वाचण्याची गरज नाही, त्यातून आपल्याला भीती वाटेल असे प्रश्न वाचू नका. तुमचा उत्साह अधिक वाढेल असेच प्रश्न वाचावे म्हणजे तुम्ही बिनधास्तपणे पेपर सोडवाल .शब्दसंपत्ती ,वाक्प्रचार ,शब्दांच्या जाती,विरुद्धार्थी शब्द,नाम,सर्वनाम,विशेषण ,असे सोपे प्रश्न असतील ते प्रथम सोडवा
1 ) वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
स्वामिनी ,कामिनी, मानिनी ,यामिनी
उत्तर : कामिनी
2) तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
टोकदार ,निबर ,बोथट ,मऊ
उत्तर : बोथट
3 ) खालीलपैकी शुद्ध शब्द असणारा पर्याय निवडा
वसतिगृह, लांचणास्पद, जावून,आशिर्वाद
उत्तर : वसतिगृह
4) 'उंबराचे फूल' या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.
एका वनस्पतीचे फुल,
सुगंध देणारे फुल ,
तात्काळ दिसून येणारी गोष्ट ,
क्वचित घडणारी अशक्य गोष्ट.
उत्तर : क्वचित घडणारी अशक्य गोष्ट
5 ) 'पिवळ्या फुलांची ओळख 'या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा
माळ, सोनावळी, पिवळावळी ,पितांबरी
उत्तर : सोनावळी
6) 'दैवाने हात देणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.
नशीब फिरणे,
वाईट दिवस येणे,
दैव प्रतिकूल होणे
दैव अनुकूल होणे
उत्तर : दैव अनुकूल होणे
7 ) ........ लग्नाला सतराशे विघ्ने म्हण पूर्ण करा.
राणीच्या,
पाटलाच्या,
नकटीच्या,
गाढवाच्या
उत्तर : नकटीच्या
8 ) ग्रेड या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता
गुण
,टक्केवारी,
मार्क,
श्रेणी
उत्तर : श्रेणी
9) 'चरण' या शब्दातील च वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तालव्य,
मुर्धन्य ,
दंततालव्य
,कंठतालव्य
उत्तर : दंततालव्य
10 ) मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता?
ऋ, ह, ळ ,ख
उत्तर : ळ
11) खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण ओळखा.
एकेक ,
नाहीसा
,काहीसा,
झाडीत
उत्तर : एकेक
12) गोड या विशेषणापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते?
गोडसर, गोडवा ,गोडी ,गोडगोड
उत्तर : गोडवा
13) 'ही माझी शाळा आहे'' शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.
संबंधी सर्वनाम ,आत्मचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, सामान्य सर्वनाम
उत्तर : दर्शक सर्वनाम
14) खालीलपैकी संख्याविशेषण कोणते ?
काळी गाय ,सुंदर पक्षी, दुप्पट रस्ता, रेल्वे पूल
उत्तर : दुप्पट रस्ता
15) खालीलपैकी कोणते संख्याविशेषण नाही?
काही लोक ,थोडा पैसा ,पहिला दिवस ,माझे घर
उत्तर: माझे घर
16) 'रमेशने चार आंबे खाऊन टाकले' वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा .
शक्य क्रियापद ,प्रयोजक क्रियापद ,अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद
उत्तर : संयुक्त क्रियापद
17) खालील पर्यायातून स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय शोधा .
अलीकडे ,दररोज ,सावकाश, टपटप
उत्तर : अलीकडे
18) 'सूर्य'' या नामाला पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय जोडता येणार नाही?
सारखा, फक्त, पुढे, जवळ
उत्तर : फक्त
19) 'वाहवा' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ?
आश्चर्यकारक ,प्रशंसादर्शक, मानदर्शक, हर्षदर्शक
उत्तर : प्रशंसादर्शक
20) 'खोंड' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?
तोंड ,खोंडी, सोंड ,कालवड
उत्तर : कालवड
21) ''भवरा 'या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
भवरा, भवरे ,भवऱ्या, भवरी
उत्तर : भवरे
22) 'पावसात भिजू नका' अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
षष्ठी ,पंचमी ,तृतीया, सप्तमी
उत्तर : सप्तमी
23) एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होते ?
होते,
होत नाही,
केव्हा केव्हा होते
, निश्चित सांगता येत नाही.
उत्तर : होत नाही
24) पुढील शब्दाचे सामान्यरूप कोणते भाऊ ?
भावास
भावाला
भावा
भावात
उत्तर: भावा
25) 'पावसाळा सुरू झाला ' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
कर्मणी
उत्तर : अकर्मक कर्तरी
#अधिक माहिती वाचा
शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 6
शिष्यवृत्ती परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका
शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम,स्वरूप
शिष्यवृत्ती परीक्षा 5 -8 सराव चाचणी
खूप छान सर
उत्तर द्याहटवा