Google ads

Ads Area

योगाचे महत्त्व मराठी भाषण | yogache mahattv marathi bhashan

 योगाचे महत्त्व मराठी भाषण | yogache mahattv marathi bhashan 

योगाचे महत्त्व (toc)

नमस्कार विद्यार्थी मित्रहो आपण योग दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. आज 21 जून  हा आपल्या शाळेत उपस्थित असलेले माननीय नगरसेवक, मुख्याध्यापक ,शिक्षकवर्ग आणि कर्मचारी आणि  महत्वाचे विद्यार्थी मित्रहो आज योग दिनानिमित्त मला योगाचे महत्व सांगण्यासाठी आपण संधी दिली याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद !


 आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. या दिवशी संपूर्ण जगात योगाविषयी माहिती  जाणूनघेऊन योगा केला जात असतो.

तुम्हाला माहीत आहे का ?  हा दिवस का साजरा केला जातो ?  हे आपणाला माहीत असावे म्हणून सांगतो की  आपल्या भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी  यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेचू जी सभा आयोजित केली होती, या सभेमध्ये  "21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन " म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला .या प्रस्तावाला 193 देशातील लोक लोकप्रतिनिधींपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.  21 जून 2015 रोजी या योग दिनाची सुरुवात झाली . तेव्हापासून 21 जून हा संपूर्ण जगामध्ये  'योग दिन ' म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रहो ! हे झाले योग दिनाविषयी पार्श्वभूमी आता तुम्हाला मी योगाचे महत्त्व आपल्या जीवनात कसे आहे हे सांगणार आहे तर तुम्ही योगाचे महत्व समजून घ्या !


योग म्हणजे आपले शरीर आणि मन त्यालाच आपण आत्मा बुद्धी असे म्हटले तरी चालेल या शरीर आणि मनाला एकत्र जोडण्याचे जे कार्य असते ते योगामार्फत केले जाते. आता तुम्ही म्हणाल शरीर आपल्याला दिसते पण मन मात्र दिसत नाही आणि मग एकत्र कसे जोडले जाते पण एकत्र साधण्याचे जे काम आहे ते मनाकडे असते . 


मनाची अवस्था ही जर चांगली असेल तर आपले शरीरसुद्धा चांगले राहत असते आणि शरीर चांगले असेल तर मनाची अवस्था सुद्धा चांगल्या रीतीने राहत असते. हे समजून घ्या ! आपल्या भारतीय संस्कृतीत योगाला प्राचीन काळापासून खूप महत्त्व असलेले दिसते .आज अनेक ठिकाणी योगाचे महत्त्व सांगितले जाते . आजच्या धकाधकीच्या काळात आज मनुष्य आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता केवळ आपला प्रपंच आणि आपले ध्येय, उद्दिष्टे गाठण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतो. अशा या माणसाला स्थिर करण्यासाठी त्यांचे आरोग्य मंत्र देण्यासाठी हा योग आपल्याला समजून घेतला पाहिजे. 


आपल्याकडे भौतिक वस्तूंची कमतरता  दिसत नाही म्हणून त्याच भौतिक सुविधामध्ये रममाण होऊन आपले आयुष्य हे कमजोर करत असतो .त्यासाठी जीवन जगण्याचा मार्ग अवलंबिला पाहिजे. जीवन जगत असताना तुम्हाला सांगतो की जर  योगा केला तर पुन्हा अशी अवस्था येणार नाही .आजकाल  वयाच्या 40 नंतरसुद्धा मुलांना स्त्री-पुरुषांना आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करावा  लागत असतो .


योग प्रक्रियेमुळे आपले जीवन हे उत्साही बनत असते. मनाला ताजेपणा वाटत असतो. प्रसन्न चेहऱ्याने कोणतेही कार्य आपण उत्साहात करत असतो. आरोग्याचा मंत्र यातूनच समजायला लागेल आणि योगसूत्रे हे समजून घेतली तर घरातील इतर व्यक्तीनाही या क्रिया करुन दाखविल्या पाहिजेत .त्यांच्याकडून करुन घ्याव्या अशी आग्रहाची भूमिका सगळ्यांमध्ये असली पाहिजे .कुटुंबातील एका व्यक्तीने योगक्रिया शिकली तर संपूर्ण कुटुंब योगक्रियाला दाद देईल आणि आपले जीवन चांगले करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा  योगा स्वतः न करता आपले संपूर्ण  घर या योगामध्ये कसे येईल हे आपण पाहिले पाहिजे. यासाठी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ले लक्षात घेऊया !


विद्यार्थी मित्रहो !आपण घरातच योगा केला तरीही लागलो आपले तरीही आरोग्य हे अधिक उत्तमरित्या होत असते ,म्हणून आपले आरोग्य सांभाळा ,खाण्या-पिण्याच्या  ज्या सवयी आहेत त्यात थोडासा बदल करा आणि उत्तम आरोग्याचा मंत्र म्हणजेच योगक्रिया या समजून घेतल्या पाहिजेत . 

योगामध्ये 'शुद्धिक्रियाला' खूप महत्त्व आहे आणि ह्या शुद्धिक्रिया आपण नियमितरित्या केल्या तर आपले आंतरिक जीवन चांगले निर्माण होते आणि आपण मनाने आणि शरीराने परिपूर्ण होत असतो .जरी आपले शरीर वरून दष्टपुष्ट दिसते पण , पण योगामुळे आपली आंतरिक शक्ती निर्माण होऊन आपल्याला ऊर्जा निर्माण करून देत असते . आपल्यामध्ये ही ऊर्जा योगा केल्यानंतर कमीत कमी तीन-चार महिन्यात  बदल दिसू लागतो . ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला योगाची आवश्यकता आहे.

योगाचे प्रकार योगाचे महत्त्व अनेक आहेत त्यामध्ये योगासने हाही एक व्यायामाचा प्रकार त्याला लागून करता येऊ शकतो, म्हणून योगा बरोबर योगासने हेसुद्धा करणे आवश्यक आहे ,तर मित्रांनो मला या ठिकाणी तुमच्यापुढे साध्या सोप्या शब्दात आणि जमेल तशा शब्दात बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मान्यवरांचे आभार आणि तुम्हालाही योग दिनानिमित्त शुभेच्छा ! एवढं बोलून मी माझे भाषण आटोपते घेतो .जय हिंद !जय महाराष्ट्र !

योगाला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहेहे प्रत्येकाला समजूनघेणे गरचेचे आहे त्यासाठी गावोगावी गल्लोगल्ली योगाविषयी माहिती देण्यात यावी .

शालेय जीवनात सुद्धा हा विषय विद्यार्थ्यांना शिकविला जावा ,केवळ त्यांच्याकडून शारीरिक कसरती घेऊन त्याचबरोबर योग क्रिया करायला सांगितले तर त्यांच्यामध्ये मनाचीआणि शरीराची परिपक्वता येईल आणि त्यांचे आयुष्य सदा प्रसन्न राहील .


आणखी वाचा

21 जूनच योगा दिवस साजरा का केला जातो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area