Google ads

Ads Area

वटपौर्णिमा सणाची माहिती |Vatpaurnima sanachi mahiti

 वटपौर्णिमा सणाची माहिती |Vatpaurnima sanachi mahiti



वटपौर्णिमा सणाची माहिती( tocs)

हा भारतीय संस्कृतीतील म्हणजे हिंदू धर्मातील ज्येष्ठ महिन्यात येणारा सण आहे .ही पौर्णिमा वटपौर्णिमा असते या दिवशी स्त्रियांना वडाच्या झाडाला / वृक्षाला सात फेऱ्या मारून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी त्या व्रत करत असतात .अतिशय श्रद्धेने या वडाला पूजले जाते, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणजे सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी पतीने पतीसाठी केलेले दीर्घ वटपौर्णिमेचे वृत्त होय .वटपौर्णिमा सणाची माहिती मिळवत असताना सती सावित्री यांची माहिती आपण बघणार आहोत .


सती सावित्री | Sati savitri


सती सावित्री सगळ्यांच्या परिचयाची परिचित असलेली एक आदर्श पतिव्रता म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या पतीला जीवदान मिळावे म्हणून ती यमलोकात सुद्धा पोहोचली आणि आपल्या पतीचे प्राण गेलेले परत मिळवून आणले, म्हणजेच आपल्या पतीवर प्रेम असलेले आणि पतीचे निधन झाल्यानंतर यमाकडून पतीला जीवदान मिळवलेली ही एकमेव पतिव्रता स्त्री भारतीय संस्कृतीमध्ये आपणाला बघायला मिळते. अशा या सती सावित्रीचा आदर्श सर्व स्त्रियांसमोर उभा आहे, म्हणून त्यांची पूजा आजच्या दिवशी केली जाते .


वटपौर्णिमा सणाची आख्यायिका / कथा | Vatpaurnima sanachi katha


 फार वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राहत होता. त्याठिकाणी त्याचे राज्य होते, त्या राजाला सावित्री नावाची मुलगी होती. सावित्री अतिशय शूर, धाडसी, नम्र, देखणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर पतीची निवड तिलाच करण्यास राजाने सांगितले; तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या मुलाशी विवाह करण्याचा  निश्चय केला.


सावित्रीचा पती राजा सत्यवान | Savitricha pati satyavan


हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा असून शत्रुकडुन पराजय मिळाल्यामुळे आपली पत्नी आणि मुलासह जंगलात येऊन राहू लागला. तरीही सत्यवान या मुलाशी सावित्रीने लग्न करण्याचा निश्चय केला. नारदमुनीला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच आहे हे माहीत होते म्हणून या मुलासोबत लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला; तरीही सावित्रीने याचा स्वीकार केला आणि सत्यवान सोबत लग्न केले सत्यवानबरोबर ती आपल्या सासू-सासर्‍यांचे ही सेवाधर्म पार पाडत होती . सत्यवान याचा मृत्यू तीन दिवसावर येऊन ठेपला असताना तिने तीन दिवसावर सत्यवान याचा शेवट आला असल्याने सावित्री त्यांना सोडत नव्हती. म्हणून ती लाकडे तोडण्यास सत्यवानबरोबर निघाली .

          लाकडे तोडत असतानाच तो झाडावरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला यमधर्म तेथे येऊन त्याचे प्राण घेऊन जात असताना सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. यमाने अनेक वेळा मागे येण्यास मनाई केली, तरीही सावित्रीने आपल्या पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला शेवटी माने पतीची सेवा करणारी सावित्रीचे प्रेम पाहून पती सोडून त्याने कोणतेही तीन वर मागण्यास सांगितले .

   सावित्रीने अत्यंत हुशारीने तीन वर असे मागितले की,

 1) सासूसासऱ्याचे गेलेले डोळे मिळावेत

2) त्यांचे  गेलेले राज्य परत मिळावे

3) तिला पुत्र प्राप्ती व्हावी

 सावित्रीने पती सोडून हे वर मागितल्याने तथास्तु म्हटले तेव्हा आपण दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याला सत्यवानाला जिवंत करणे भाग होते, सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली पुन्हा सावित्रीने मिळवले असल्यामुळे ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात.


वटपौर्णिमाचे धार्मिक वृत्त | Vatpaurnimache Dharmik vrutt

 या वटपौर्णिमा सणाचे धार्मिक वृत्त असे आहे की; ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध त्रयोदशी या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत तीन दिवस व्रत करावे असा नियम आहे. ज्यांना तीन दिवस शक्य नसेल त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशीच वृत्त केले तरी चालेल सावित्रीसह ब्रह्मदेव ह्या व्रताचे महत्त्वाची मुख्य देवता आहे, तर सत्यवान- सावित्री, नारद या व्रताच्या देवता आहेत.


 वाटपौर्णिमेचे वृत्त असे करतात | Vatpaurnimache vrutt kase kartat


 आपल्या शेजारील ओढा, नाला, समुद्रकिनारा जवळ जसे असेल असणारे वाळू घरी आणून त्या वाळूवर सत्यवान -  सावित्री यांच्या मूर्ती ठेवून त्यांची पूजा  केली जाते. त्या सावितत्रीची प्रार्थना केली जाते संध्याकाळी सावित्रीची कथा ऐकावी अशी पूजा केली जाते .


वडाच्या झाडाचे महत्व |Vadachya jhadache mahttva

 सत्यवान सावित्री यांच्या आख्यायिकानुसार जरी वडाची पारंपरिक पद्धतीने पूजा करत असले तरी कोणाचे घराचे संवर्धन करणे गरजेचे आहे अतिशय भक्कम असा हा वृक्ष असून त्याची पूजा करण्यात येत असल्याने वड आणि पिंपळ या झाडाला पवित्र मानले जात असल्याने या वृक्षांची पूजाही केली जाते यामुळे वडाचे झाड ससा तोडलेले न जाता त्याची पूजा केली जाते


वटपौर्णिमा या सणानिमित्त सगळ्या महिलांना आपल्या पतीविषयी असणारे प्रेम दृढ होण्यास चांगला योग असतो .दिवसभर वडाला झाडाचे पूजन झाल्याशिवाय जेवण करीत नाहीत तोपर्यंत आपल्या पतीच्या विचारात गर्क होऊन श्रद्धेने ह्या सणामध्ये सामील होत असतात .

        वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारुन जन्मोजन्मी हाच पती मिळाला पाहिजे ह्याच हेतूने ह्या सगळ्या महिला वडाची पूजा करतात .

       संसार म्हणले की भांडण तंटा असतोच पण त्यातूनही आपण एकमेकांना समजून घेऊन त्यातून आपला मार्ग काढणे गरजेचे असते ,त्यासाठी वटपौर्णिमा या सणाच्या निमित्ताने महिलांना पतीविषयी असणारी ओढ ,प्रेम ,आपुलकी अधिकच वृद्धिंगत होण्यास मदत होत असते, म्हणून स्त्रियांच्या आवडीचा सण आहे .


वटपौर्णिमा सणाचे महत्त्व| vatpaurnima sanache mahttva


1)   पतीपत्नी मधील सलोख्याचे नाते निर्माण होण्यास मदत होते 

2 ) महिलांना पतीविषयी असलेले प्रेम वाढत जाते .

3) संसारात जरी दोघांमध्ये विचारात तफावत असली तरी पत्नीच्या मनात पतीविषयी असणारा भाव ह्यातून व्यक्त होत असतो .

4 ) पतीला सुद्धा आपल्या पत्नीने आपल्यासाठी उपवास केला आहे जाणीव होऊन त्यातून त्याच्याही मनात पत्नीविषयी प्रेम वाढत  जाते .

5) वडाच्या झाडाकडे श्रद्धेने पाहिले जाते .

6) सती सावित्री आणि सत्यवान यांच्या जीवनातील प्रसंग आठवून सती सावित्रीप्रमाणे नाही जमले तरी; आहे त्या स्थितीत पतीला साथ देण्याचा प्रयत्न करणार अशा मनोमन विचार करत असणार म्हणूनच एवढ्या श्रद्धेने दिवसभर वृत्त करीत असतात .

7 ) आपली संस्कृती जपण्यास या सणाच्या निमित्ताने लहान मुलांवर संस्कार होत असतात .

8 ) पर्यावरण चांगले राहत असते .

9) गावागावांमध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असते .

आणखी माहिती वाचण्यासाठी 
कर्तृत्ववान महिलांना मानाचा मुजरा

1 ) अरुणीमा सिंह

2) राणी लक्ष्मीबाई

3) राजमाता जिजाबाई

4 ) संत नामदेव यांची माहिती




      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area