Google ads

Ads Area

संतचरणरज बाळकृष्ण दादा महाराज यांचे कीर्तन माहात्म्य| Santacharanraj Balkrushna Dada Maharaj yanche kirtan mahatmya

संतचरणरज बाळकृष्ण दादा महाराज यांचे कीर्तन माहात्म्य Santacharanraj Balkrushna Dada Maharaj yanche kirtan mahatmya


वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे कीर्तन सेवेतील संतचरणरज बाळकृष्ण महाराज गायकवाड हे एक ख्यातनाम कीर्तनकार असून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला किर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलभक्ती, व्यासंगी,प्रसन्न  व्यक्तिमत्त्व लाभलेल्या भूमिकेतून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर यूट्यूब च्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष किर्तनस्थळी गावोगावी जाऊन समाज प्रबोधन केले आहे. या महान कीर्तनकार महात्मा यांच्याविषयी माहिती  पुढीलप्रमाणे.

दादांचे कीर्तन ऐकत असताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असल्याने डोळ्यातून पाणी आल्यावाचून राहत नाही .कीर्तनात उभे राहताना एवढे भान हरपून जाऊन किर्तनसेवेत उतरत असतात . सुरुवातच अशी असते की गायनातून श्रोत्यांना अमृतवानी मिळत असते .प्रचंड जनसमुदाय यातून सगळ्या भाविकांना विठ्ठलमय वातावरणात नेण्याचे काम त्यांचे कीर्तन माध्यमातून होत असते .

दादांचे किर्तन म्हणजे समाजप्रबोधन करण्यासाठी देवाने दिलेली मोठी देणगी आहे.

 दादांच्या कीर्तनात गायनाची साथ खूप चांगली असते .त्यांचा आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करत असतो .अशा आवाजातून त्यांनी रचलेली चाल म्हणजे भाविकांना जणू काही अमृतधारा पोहचत आहे असाच भास होतो .


संतचरणरज बाळकृष्ण दादा महाराज (toc)

      संतचरणरज बाळकृष्ण महाराज यांची ख्याती सर्वदूर पसरली असून एक सर्वगुणसंपन्न असे कीर्तनकार असून आपल्या वाणीमुळे भक्तांच्या मनातील श्रद्धास्थान आहेत . श्रेष्ठ कीर्तनकार म्हणून नावारुपाला आलेले वसंतगडकर  महाराज याच उपाधीने ओळखले जात असले तरी दादा याच नावाने संबोधले जातात.


वसंतगडकर या नावाची ओळख | Vasantgadakar ya navachi olakh

वसंतगड हा सातारा जिल्यातील उंब्रज आणि पाटण या दरम्यान डोंगररांगेत असलेले 'तळबीड' गाव त्या गावापासून जवळच असलेले हे वसंतगड होय . हा वसंतगड शिवाजी महाराज यांनी इ. स. १६५९ रोजी स्वराज्यात सामील करुन घेतला .


वसंतगडाचा इतिहास  | VasantGadacha itihas 

भोज राजा शिलाहार यांनी हा किल्ला  बांधला आहे असे सांगण्यात येते .

मसूरचे जहागीरदार महादजी जगदाळे हे आदिलशाहीची परंपरेने चाकरी करणारा होता. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा विरोध पत्करावा लागला  होता .ज्यावेळी अफजलखानाच्या सोबत शिवाजी महाराज यांना भेटण्यासाठी गेला असता खान मारला गेला पण महादजी जगदाळे जीवंत सापडले महाराजांनी त्याचे हात तोडले आणि हा किल्ला स्वराज्यात सामील करुन घेतला .

तळबीड हे गाव मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची मुलगी महाराणी  ताराबाई याच गावातील होते.

               

किल्ल्याचे विशेष | Vasantgadache vishesh

  1 ) गणेश मूर्ती किल्याच्या प्रवेश दरवाजा जवळ आहे .

  2) चंद्रसेन महाराजांचे मंदीर आहे .

  3)  कृष्णातळे, कोयनातळे आहेत त्यांच्या काठावर जुन्या          समाध्या आणि सतीशिळा आहे .

 4 ) किल्ल्याच्या चोहोबाजूनी चार डौलदार बुरुज आहेत .

  5 ) किल्ल्याचे प्रवेशद्वार जे आहे ते इंग्रजांनी तोफेच्या              साहाय्याने पाडलेले आहे .

 6 )  बामणोली डोंगररांगेत असलेले ते तळबीड गाव .


 दादांच्या कीर्तनसेवेचे विशेष| Dadanchya kirtanseveche vishesh


1) दादांचे कीर्तन अफाट समुदाय यांच्यासह संगीताची जोड असलेले अफलातून असे कीर्तन आज सगळ्या लोकांना youtube च्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे .

 2 ) कीर्तनसेवा करत असताना महाराजांनी मोठ्या उत्साहाने कीर्तन सांगण्यासाठी येत असतात. 

ज्ञानाचा व्यासंग आणि  असलेली भक्तिभावना यातून कीर्तनरुपी सेवेची सुरुवात होत असते .

3) कीर्तनात असलेल्या दैवी गुणांमुळे श्रोत्यांना व्यवहारी जगातून भान हरवून 'विठ्ठलमय' करण्याची ताकद वाणीत असते .

4 )  त्यांच्याकडे असलेली दैवी संपत्ती यामुळे श्रोत्यांना तर आनंद होतोच; पण त्यांचे शिष्यपरिवार जो आहे त्यांनाही youtube च्या माध्यमातून सर्वदूर त्यांची ख्याती पसरली आहे .

5)  कीर्तनात घेतलेला अभंग जोपर्यंत भाविकांना समजत नाही तोपर्यंत त्यांच्याच भाषेत सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करीत असतात .त्यामुळे कीर्तनातून काहीतरी बोध घेऊन गेल्याचा आनंद श्रोत्यांना होतच असतो .

 6) विठ्ठल भक्तीची आवड निर्माण करुन देण्याची प्रेरणा त्यांच्या कीर्तनातून मिळत असते .

 7) वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या दर्शनाने आत्मसमाधानी होत असतो,असेच आत्मसमाधान देण्याचा प्रयत्न दादा कीर्तनात देत असतात.


निष्कर्ष 

     दादांच्या एकंदरीत कार्याचा उल्लेख पाहता त्यांनी वसंतगड याठिकाणी खूप मोठे संस्थान उभे केले आहे .या संस्थानातून अनेक मुले वारकरी संप्रदायाशी जवळीक साधून आहेत त्यातून त्यांच्यावर जे संस्कार होतात त्याची शिदोरी आयुष्याची पुंजी असते .

 असे हे दादा सर्वगुणसंपन्न सगळ्यांचे परिचयाचे आहेत त्यांची असलेली भक्तीभावना पाहून त्यांना आधुनिक काळातील संत म्हणणे योग्य आहे .

  उत्कृष्ट कीर्तनकार भरपूर आहेत पण या दादांकडे अशी काय प्रतिभाशक्ती आहे की एकदा का त्यांचा व्हिडिओ पहिला की अनेक व्हिडिओ बघण्याची इच्छा होतेच .आपल्या वाणीने सगळ्यांना कीर्तनाचीआवड निर्माण केली आहे त्यामुळे त्यांचे हे सामाजिक कार्याचा उल्लेख होणं गरजेचं असून त्यांना  समाज प्रबोधनकार म्हणून भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे असे गुणवान , व्यासंगी, प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले,अनेकांचे आधारस्तंभ आहेत . 

  दादांचे हे कार्य म्हणजे वारकरी संप्रदायातील भक्तांना आणि समाजातील सगळ्या लोकांना मार्गदर्शन देत असणारे दादा आहेत . 

              👏👏 जय जय रामकृष्ण हरी👏👏

आणखी वाचा 

आषाढी वारीची माहिती





★★★♂♀♀♂♂★★★♀♂♂♂♂♂★★★♂♀♀♀♀★★★★

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area