साने गुरुजी यांची संपूर्ण माहिती | Saneguruji yanchi sampurna mahiti
श्यामची आई हे पुस्तक आपण लहानपणापासून वाचले आहे. शिवाय श्यामची आई हे मराठी माणसाला सगळ्यांच्याच परिचयाचे आहे . श्यामची आई म्हणजेच सानेगुरुजी यांची आई .या श्यामच्या आईने म्हणजेच सानेगुरुजी यांच्या आईने साने गुरुजींना संस्कार दिले, उत्तम ज्ञानाने घडवले,या संस्काराने आज सानेगुरुजी आईच्या संस्कारांमुळे मोठे झाले आहेत . साने गुरुजी गांधी विचारांमुळे आणि आईच्या शिकवणीने विचाराने मोठे बनले. ते जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानू लागले त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेऊया.
सानेगुरुजी यांची माहिती(toc)
साने गुरुजी यांचे बालपण | Saneguruji yanche balpan
मूळ नाव : पांडुरंग सदाशिव साने
जन्म : 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला.
खोताच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला ,खोताचे घराणे म्हणजे श्रीमंत आणि वैभवसंपन्न असे समजले जात होते. तशी त्यांच्या आजोबांची परिस्थिती खूप चांगली होती , परंतु त्यांचे वडील सदाशिवराव यांच्या काळात मात्र त्यांची आर्थिक स्थिती बिघडली गेली. अशाच परिस्थितीत साने गुरुजी यांचा जन्म झाला. आर्थिक स्थिती जरी बिघडली असली तरीसुद्धा त्यांच्या आईने त्यांना मात्र संस्काराची शिदोरी चांगलीच दिली गेली होती, त्यांच्या शिकवणीचा प्रभाव त्यांच्या बालमनावर रुजला गेला आणि त्या विचाराच्या आधारेच पांडूरंग मोठा होऊन सगळ्यांच्या मनात रुजला गेला. असा हा बाल श्याम पुढे होऊन साने गुरुजी म्हणून प्रसिद्ध झाले.
सानेगुरुजी यांचे शिक्षण | Saneguruji yanche shikshan
त्यांनी आपल्या बेताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षण चालूच ठेवले होते. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम .ए ची उच्च पदवी प्राप्त केली .त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जळगाव या ठिकाणी अमळनेर तालुक्यात प्रताप हायस्कूलमध्ये अध्यापनाचे काम सुरू(1924 ते 1930 ) केले .अध्यापनाचे काम करत असतानाच त्याठिकाणी असलेले वसतिगृह सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी अधिक चांगल्या रीतीने निभावली त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर झालेल्या संस्काराचा धडा विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांमध्ये सेवावृत्ती भाव आणि स्वावलंबी जीवन कसे जगावे या विषयी मार्गदर्शन करत होते .त्याच ठिकाणी प्रताप तत्वज्ञान केंद्र स्थापन करून स्वतः त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला .अध्यापनाचे कार्य करीत असतानाच त्यांनी 1928' विद्यार्थी 'हे मासिक सुरू केले. विद्यार्थी हा शिक्षणातील महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे मासिक सुरू केले होते.
सानेगुरुजींवर महात्मा गांधी यांचा प्रभाव | Sanegurujiinvar Gandhijincha prabhav
महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला असल्याने ते महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे खादीचा वापर करत होते. म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून देशाच्या हितासाठी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत हिरहिरीने भाग घेतला, म्हणून त्याकाळात त्यांनी 'काँग्रेस ''नावाचे साप्ताहिक सुरु केले. इंग्रजांचा वाढता प्रभाव आणि शेतकऱ्यांची परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांना भरावा लागणारा कर हे माफ व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जळगाव मधील फैजपुर नेते कांग्रेस अधिवेशन 1936 साले भरले होते ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. याठिकाणी गांधीजींच्या विचारानुसार ग्रामस्वच्छतेचे कामे केले. तसेच त्यांनी ' राष्ट्र सेवा दलाची ' स्थापना सुद्धा केली .
सानेगुरुजी यांचे सामाजिक कार्य | Saneguruji yanche samajik karya
समाजात होत असणाऱ्या जातिभेदामुळे लोकांमध्ये विषमता निर्माण होत होती, हे त्यांना माहीत असल्याने लोकांमध्ये जातिभेद, अस्पृश्यता, रूढी, परंपरा यांना नेहमी त्यांनी छेद दिला . ईश्वर हा सगळ्या लोकांचा असतो तो कोणत्या जातीमध्ये विभागला गेला नसून पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर हे सगळ्यांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी आग्रह धरला. यासाठी त्यांनी 1946 रोजी महाराष्ट्रभर दौरा केला. यावेळी त्यांची अशी अपेक्षा होती की, महात्मा गांधी यांचा पाठिंबा मिळावा पण तो मिळाला नाही. तरीही साने गुरुजी यांनी आपला लढा चालूच ठेवला आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला म्हणून त्यांना या मुद्द्यावर यश मिळाले.
साने गुरुजी यांचा स्वातंत्र्यानंतरचा काळ | Saneguruji यांचा4 swatantryanantarcha kal
आपल्या भारत देशाला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी साने गुरुजी यांचीही धडपड चालू होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ' समाजवादी पक्षात' गेले त्यांनी 'आंतरभारती' चळवळीच्या मार्गाने भारत जोडण्याचा प्रयत्न केला आंतरभारतीच्या माध्यमातून अनेक राज्यातील लोकांनी एकमेकाविषयी असणारे द्वेष संपवून त्यांच्यातील संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या भाषा समजून घेतल्या पाहिजेत असे या चळवळीत सांगितले जात होते, म्हणून ते स्वतः तमिळ ,बंगाली भाषा शिकून लोकांना प्रेरित करत होते .त्यांनी 'साधना ' साप्ताहिक सुरु केले आणि आपले लेखन कार्य हे चालूच ठेवले.
साने गुरुजी विद्यार्थी प्रिय शिक्षक| Saneguruji vidhyarthipriy shikshak
साने गुरुजी यांनी आपली उच्च शिक्षणाची पदवी प्राप्त करून अध्यापनाचे काम करत होते ;पण नुसते अध्यापनाचे काम न करता मुलांवर संस्कार घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या बालमनावर देशप्रेम ,स्वावलंबी जीवन, सेवाभावी वृत्ती याची शिकवण दिली .मुलांवर संस्कार करत असताना त्यांच्या जीवनाचे सार होते "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे " मुलांवर संस्कार करीत असताना केवळ त्यांना पुस्तकी ज्ञान न देता त्यांचे मनोरंजन करून त्यांच्यावर संस्कार करावेत यासाठी त्यांचा खटाटोप होता. हसत खेळत शिक्षण देण्यावर त्यांचा भर होता.
साने गुरुजी यांची देशनिष्ठा |Saneguruji yanchi dedhanishtha
साने गुरुजी यांनी आपल्या भारतीय संस्कृतीवर आणि हिंदू धर्मावर अतिशय प्रेम होते. या प्रेमापोटी त्यांनी 'भारतीय संस्कृती ' हा ग्रंथ लिहिला .आपली भारतीय संस्कृती चांगली आहे, म्हणून अशा या भारतभूमीत महापुरुष जन्माला आले हे त्यांना कौतुक वाटत असून अशा या महापुरुषांचे आपल्या लेखन कौशल्याच्या आधारे त्यांनी महापुरुषांची 'चरित्रे ' लिहिली गेली आहेत "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " हे त्यांच्या लेखन कौशल्ययातून त्यांनी भारत वासियांना दिलेली एक अनमोल अशी देणगी आहे.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे |khara to ekachi dharma
साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म हे काव्य रचत असताना समाजामध्ये विषमता ,अन्याय, जातिभेद ,अस्पृश्यता, अंधश्रद्धा ,उच्च नीच या सगळ्या गोष्टीला विरोध करत माणूस धर्म हाच खरा धर्म आहे म्हणून त्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे म्हटले आहे.
खरा धर्म याचा अर्थ माणसाला माणसाप्रमाणे वागवले पाहिजे.
स्वतः मध्ये माणुसकी आजमावली पाहिजे .
जो दुःखाने ग्रासला आहे त्याचे अश्रू पुसले पाहिजेत .
जो अनाथ आहे अशाला सहाय्य केले पाहिजे .
जो दीन ,दलित आहे अशाला आधार दिला पाहिजे .
एखादयाला दुःख होत आहे त्याचे दुःख दूर करण्याचे काम करावे .
कोणाला तुच्छ समजू नये.
सगळ्यांमध्ये बंधुभावाप्रमाणे नाते असावे.
आपल्यापाशी जे आहे ते ते आपण वित्त किंवा विद्यादान द्यावे.
आपण सगळे प्रभूची लेकरे असून आपणच एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करून परस्परा बद्दल द्वेषाने वागत असतो म्हणून त्यांच्या लेकराप्रमाणे वागावे .
खरा तो एकची धर्म हे समस्त मानव जातीला एक प्रेरणादायी विचार साने गुरुजी यांनी आपणापुढे ठेवला आहे
साने गुरुजी यांचे साहित्य | Saneguruji yanche sahitya
साने गुरुजी यांनी लेखन भरपूर प्रमाणात केले आहे. त्यांच्या साहित्यात मानवतावादी दृष्टिकोन, सामाजिक सुधारणा आणि देशभक्ती असणारी मूल्ये त्यांच्या साहित्यात दिसून येतात .त्यांनी लेखन करत असताना भारतीय संस्कृती आणि माणसातील असणारे मूल्ये याचा विचार करून त्यांनी आपली बरीच पुस्तके ( साहित्य ) हे तुरुंगात पूर्ण केले . 'श्यामची आई' हे प्रसिद्ध पुस्तक (कादंबरी ) नाशिकच्या तुरुंगात असतानाच त्यांनी लिहिले .त्यांनी एकूण 73 पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचने हेसुद्धा धुळे या ठिकाणी तुरुंगात असताना लिहिले आहे. बेंगलोर या ठिकाणी तुरुंगात असताना तिरुवललिवर नावाच्या कविच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. हेंरी थॉमस यांच्या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्र यांच्या 'द स्टोरी ऑफ हुमन रेस 'या पुस्तकाचे मराठी मध्ये ' मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले . महापुरुष यांच्या चरित्रावर 'मोरी गाय ' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले .आई वडिलांच्या प्रेमापोटी त्यांनी ' ' ' 'मोलकरीण' ही अप्रतिम अशी कादंबरी त्यांनी लिहिली. यावर मराठी चित्रपट निघाला.
त्यांची महत्त्वाची पुस्तके
- श्यामची आई
- रामाचा शेला
- शबरी
- सती
- श्याम खंड 1, 2
- मोरी गाय
- भारतीय संस्कृती
- भारतीय नारी
- भारताचा शोध
- पत्री
- धडपडणारी मुले
- दिल्ली डायरी
- त्रिवेणी
- तीन मुले
- जीवनप्रकाश
- महात्मा गौतम बुद्ध
- चित्रकार रंगा
- गोप्या
- गोड शेवट
- गोड गोष्टी
- महात्मा गांधींचे दर्शन
- कुरल
- उमाळा
- अमोल गोष्टी
- कलिंगडाच्या साली
- कर्तव्याची हाक
- गीताहृदय
- दारूबंदीच्या कथा
- नवा प्रयोग
- सुंदर पत्रे
- सुंदर कथा
- साक्षरतेच्या कथा
- सोन्या मारुती
- स्त्री जीवन
- स्वर्गातील माळ
- स्वदेशी समाज
- राष्ट्रीय हिंदुधर्म
साने गुरुजी आंतरभारती स्थापन करण्याचा उद्देश | Saneguruji yanchi aantarbharati sthapan
साने गुरुजी यांनी आपले अध्यापनाचे कार्य सोडून देशसेवेसाठी देश स्वतंत्र करण्यासाठी सहाय्यकेले . सविनय कायदेभंग चळवळीत सामील झाले .यामुळे त्यांना तरंगात डांबले गेले. त्यावेळेस ते 1930 मध्ये त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना त्यांचा दक्षिणेकडील अनेक भाषिकांशी (लोकांशी) संपर्क आला. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती हे आपणाला ज्ञात असले पाहिजे ,त्यांनी आंतरभारती हे रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनप्रमाणे असावी अशी इच्छा मनात धरून साहित्य संमेलनामध्ये बोलताना व्यक्त केली. त्यांचे हे कार्य पैसा गोळा करूनही पूर्ण झाले नाही.
FAQ
1 ) साने गुरुजी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 24 डिसेंबर 1899
2) साने गुरुजी यांची कोणते इच्छा अपूर्ण राहिली?
उत्तर : आंतरभारती स्थापन करण्याचा उद्देश
3) श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर : साने गुरुजी
4) साने गुरुजी यांनी कोणते मंदिर सगळ्यांसाठी खुले करावे यासाठी उपोषण केले ?
उत्तर :पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर
5) साने गुरुजी कोणत्या घराण्यात जन्माला आले?
उत्तर : खोतांच्या घरी जन्माला आले
आणखी वाचा
साने गुरुजी मातृ हृदय असणारा शिक्षक
उत्तर द्याहटवा