राणी लक्ष्मीबाई यांची माहिती | Rani laxmibai mahiti
राणी लक्ष्मीबाई आपल्या भारतीय इतिहासातील एक शूर, वीर रणरागिनी स्वातंत्र्यलढ्यासाठी खंबीरपणे हातात तलवार घेऊन इंग्रजांशी झुंज देणारी, अशी स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची अग्रणी अशी सेनानी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई होय. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता म्हणून लोकांमध्ये अढळ स्थान प्राप्त झाले आहे .
राणी लक्ष्मीबाई यांचे बालपण | Rani laxmibai यांचे balpan
मूळ नाव: मनकर्णिका
वडील : मोरोपंत तांबे
आई : भागीरथी
पति : गंगाधर नेवाळकर
अपत्य : दामोदर दत्तकपुत्र
जन्म : 19 नोव्हेंबर 1835
मृत्यू :17 जून 1858
त्यांचे वडील पुण्याच्या पेशवे घराण्यात आश्रयाला होते त्यांचे वडील मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोट गावचे परंतु त्यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील काशी या ठिकाणी झाला होता. तांबे कुटुंब हे पेशव्यांच्या आश्रयाला असल्यामुळे पुणे व सातारा या ठिकाणी वास्तव्यास होते .
यांचा विवाह गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला . नेवाळकर रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगाव येथील पारोळा या ठिकाणी जहागिरी दिली त्यानंतर त्यांच्या कामगिरीनंतर झाशी संस्थांची सुभेदारी दिली. नेवाळकर यांनी इंग्रजांशी तह करून झाशी हे वंशपरंपरागत घेऊन ' महाराजा ' ही पदवी धारण करून घेतली.
आदर्श व्यक्तिमत्व राणी लक्ष्मीबाई | Aadarsh vyktimattva ranilaxmibai
म्हणून प्रचलित असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई शूरवीर ,कर्तृत्ववान, नेतृत्वगुण अंगी असणाऱ्या चतुर, युद्धशास्त्रात निपुण अशा कलागुणांनी युक्त अशा घोडेस्वार करण्यात पटाईत होत्या. त्यांचे घराणे हे राजघराण्याचे नसले तरी राजघराण्याशी संबंध चांगले होते.यामुळे राजकारण, समाजकारण यामुळे त्यांचा व्यासंग दांडगा होता .
अश्व परीक्षा करणाऱ्या महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. सर्वगुणसंपन्न अशा युद्धशास्त्रमध्येही त्यांनी आपले प्राविण्य मिळवले. मल्लखांब विद्येत त्या पारंगत होत्या. बाजीरावांच्या पदरी असणारे बाळंभट देवधर हे कुस्तीगीर आणि कसरतपटू असल्याने त्यांनी या मल्लखांब नावाचा एक नवीन प्रकार शोधून काढून होता राणी लक्ष्मीबाई यांना शिकविला . अष्टावधानी व्यक्तिमत्व असणाऱ्या, विलक्षण चपळता, मनाची एकाग्रता ,काटकपणा, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य माहीत असणाऱ्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई होत्या .
राणी लक्ष्मीबाई यांच्या काळात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने त्या जेव्हा विधवा झाल्या तेव्हा या पुरुष प्रधान संस्कृतीत राणी लक्ष्मीबाईला दुर्लक्षित करू नये, वंचित ठेवू नये म्हणून त्या पुरुषी पोषाखात वावरत होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचा विवाह श्रीमंत महाराज गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला. लग्न झाल्या नंतर मनकर्णिका चे नाव बदलून ' 'लक्ष्मी' ठेवण्यात आले लग्नानंतर प्रजेच्या मनात राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला होता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याने राज्यकारभारात लक्ष घालणे त्यांच्या पतींना आवडले नसल्यामुळे; त्यांनी आपले स्वत्व जपणे चालू ठेवले तरीही आपले युद्ध कौशल्य ,तलवारबाजी करणे हे नित्याचे होते.
राणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असतानाच त्याचे निधन झाले. गंगाधरराव यामुळे खूप कष्टी झाले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावाचा म्हणजेच वासुदेवराव नेवाळकर यांचा आनंदराव या मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले.
21 नोव्हेंबर 853 रोजी गंगाधर रावांचे निधन झाले. अशा या परिस्थितीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी पतीच्या मृत्यूनंतर आपला कारभार सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी उचलली.
झाशी संस्थान | jhashi sansthan
इंग्रज सरकारचा अंमल भारत देशावर असताना ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ब्रिटिशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत यावरून ब्रिटिश हे संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते, तरीही ईस्ट इंडिया कंपनी ही अन्यायकारक वागत असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांना पत्रव्यवहार करून ब्रिटिश सरकार बेकायदेशीरपणे वागत आहे, हे खडसावून त्यांनी पत्रव्यवहार ब्रिटीशांना केला होता.
तरीही धोरणी असणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने संपूर्ण हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निश्चय केला होता. ' 'दत्तक वारस नामंजूर' अशा पद्धतीने झाशी हे संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्यावेळेस स्वाभिमानी राणी लक्ष्मीबाई यांनी " मेरी झांशी नही दुंगी "अशा पद्धतीने उद्गार काढले झाशी हे संस्थान ब्रिटीशांनी खालसा केले. त्यांना किल्ल्यावरून बाहेर पडावे लागले आणि राजवाड्यात वास्तव्यास राहू लागले.
राणी लक्ष्मीबाई आणि 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम |1857 cha swanantrya sangram
1857 चा उठाव इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी सगळ्यात मोठा उठाव झाला, परंतु तो हा उठाव भारतातील अनेक राजांनी आपापल्या परीने केल्यामुळे संघटित नव्हता. त्यामुळे या स्वातंत्र्यसंग्रामाला यश आले नाही .महाराजांनी दत्तक वारस नामंजूर हे कारण दाखवून झाशी हे संस्थान खालसा केले होते, परंतु 5 जून1857 या दिवशी येथे शिपायांचा उद्रेक झाला होता. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले आणि कोणत्याही परिस्थितीला न जुमानता राणी लक्ष्मीबाई या झाशी किल्ल्यावर राहू लागल्या.
यामुळे इंग्रजांनी 22 जुलै 1857 रोजी झाशी किल्ल्याची जबाबदारी घेण्यास सांगितले; तरीही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या राणी लक्ष्मीबाई राज्यकारभार पाहत होत्या .त्याठिकाणी अपुरे असणारे मनुष्यबळ आणि धनधान्य, खजिना यांची वाताहत होत होती.
सैनिकांना याठिकाणी धीर देण्याचे काम राणी लक्ष्मीबाई करत होत्या. त्यांनी आपले विश्वासू अधिकारी त्या किल्ल्यावरती नेमण्यात आले. त्यांना महत्वाची पदे या ठिकाणी देण्यात आली. दिवाण लक्ष्मणराव यांना प्रधानमंत्री बनवले तर प्रत्यक्ष वडिलांना म्हणजेच मोरोपंत तांब्यांना खजिनदार बनवले .इंग्रजांविरुद्ध बंड करणारे जे सैनिक होते त्यांना आपल्या बाजूने वळवले.
ब्रिटिशांनी किल्ल्यावरील बावीस तोफा या निकामी केल्या होत्या त्या पुन्हा चालू करणे महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी चालू केल्या आणि नवीन तोफा निर्माण केल्या.
इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांची जय्यत तयारी चालू असतानाच त्यांनी आपला माणुसकीचा धर्म चालु ठेवला. होता गरीब ,अनाथ अशा गोरगरिबांना थंडीच्या दिवसात कुडकुडत बसावे लागत असल्याने दीड हजार लोकांना उबदार कपडे देण्यात आली. त्यांनी लोकांचा विश्वास वाढवला. स्वाभिमानाने जगण्यास सांगितले. आनंद जपण्याचा प्रयत्न केला , येथील स्त्रियांना बोलावून हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेऊ लागल्या, रंगपंचमी सारखा उत्सव साजरा करू लागले. अशा प्रकारची व्यवस्था लावून त्यांनी स्वराज्य निर्माण केले. असा विश्वास प्रजेला देत होत्या .
कला जपण्यासाठी प्रयत्न करत होते .त्यांच्या कला जोपासता यावेत म्हणून त्यांना मुक्त मनाने कला जोपासण्याची संधी देत होत्या, म्हणून किल्ल्यावर नाटकाचे प्रयोगही ठेवण्यात आले, त्याच्यामध्ये रासक्रीडा ,बाणासुर ,चित्रलेखा अशी नाटके त्यांनी त्या ठिकाणी योजली आणि स्वतःही त्या नाटकाचा आनंद घेत होत्या त्यांनी झाशी हे सुरक्षित, समृद्ध आणि सुसंस्कृत झाशी शहर करण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे प्रजेच्या मनात राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी आस्था वाढत गेली.
त्यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण झाले ,परंतु हे सगळे असतानाच सर ह्यू रोज याने 21 मार्च 1857 रोजी आपली फौज घेऊन झाशीजवळ आला यावेळेस राणी लक्ष्मीबाई यांनी निशस्त्र भेटण्यास यावे किंवा युद्धास तयार रहावे. परंतु ब्रिटिश सरकार विश्वासघातकी असल्यामुळे अशा भारतात शहरात ब्रिटिशांचे शासन नको आहे म्हणून त्यांनी सर ह्यू रोज यांची भेट घेण्याचे नाकारले. त्याचवेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून इंग्रजांविरुद्ध लढण्याचे ठरवले.
सर ह्यु रोज| Sir hyu roj
हा कर्तबगार आणि पराक्रमी असा उत्तम प्रतीचा सेनानी होता . राणीने भेटण्यास नकार दिल्यामुळे झाशी घेण्यासाठी झाशीच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर आपल्या ताबा मिळवला .त्या टेकड्यांवर तोफा लावून झाशीची बाजू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला ,पण घौसखान याने त्यास प्रत्युत्तर दिल्याने त्याकाळची दोन शिवमंदिरे वाचवली. नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील जी तोफ होती ती बंद पाडून त्या ठिकाणी किल्ल्याला खिंडार पाडण्याचे काम चालू केले ,परंतु सैन्यांनी रातोरात खिंडारे बुजवण्यासाठी दगड, विटा,चुना गोळा करुन खिंडार नीट होण्यासाठी प्रयत्न केले .यामध्ये स्त्रियांचाही सहभाग जास्त होता हे मात्र विशेष होते .
फंदफितुरीमुळे झाशी गेली
समाजात कुठेही गेले तरी फितूर हे असतातच राजकारण असो किंवा पूर्वीच्या काळी राजे त्यांच्याही काळात फितुरी चालतच होती, तशाच पद्धतीने झाशी या ठिकाणीसुद्धा इंग्रजांनी फितूरी केली. झाशीमधील शंकर किल्ला या ठिकाणी जी पाणीपुरवठा करणारी विहीर आणि दारुगोळा निर्माण होणारा जो कारखाना होता ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली.
त्यामुळे महत्त्वाचा दारूगोळा आणि पाणीपुरवठा कमी होत असल्यामुळे पेशव्यांकडे मदतीची याचना केली ,यावेळी तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई यांच्या मदतीला धावून आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाई यांनी धैर्याने तोंड दिले. सर ह्यू रोज यांनी झाशीला मिळणाऱ्या पाणीपुरवठा आणि दारुगोळा कारखाना हे उद्ध्वस्त केल्यामुळे झाशीची बिकट अवस्था झाली असतानाच स्वतः लढायचे असे ठरवले.
त्यांनी सर्व सैनिक यांना धीर देण्याचे काम केले .रणांगणात मृत्यू आलाच तर विधवांना उपरे होऊ देणार नाही अशी निर्वाहाची व्यवस्था करण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी सैन्यांना विश्वासात घेऊन आपले कार्य चालूच ठेवले .राणी लक्ष्मीबाई यांचे महत्त्वाचे कार्यकर्ते खुदाबक्ष व घौसखान हे इंग्रजांच्या विरुद्ध लढत असताना मृत्युमुखी पडले .
त्यामुळे परिस्थिती खूप वाईट झाली. ब्रिटिश सैन्य झाशी शहरात उतरले या शहराची वाताहात थांबावी यासाठी त्यांनी स्वतः हातात तलवार घेऊन रणांगणात उतरण्याचा निश्चय केला आणि तो अमलात आणला . प्रत्येक रणांगणात उतरल्या त्यांची तलवार गोऱ्या शिपायांवर सपसप चालत होती. हे पाहून राजा ह्यू रोजही आश्चर्य करु लागला .एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे पाहू लागला.आपला पराभव अटळ आहे हे ओळखून त्यांनी रातोरात झाशी सोडले. अकरा दिवस इंग्रजांशी झुंज देत होते. राजा सर ह्यू रोज यानेही सर्वोत्कृष्ट हिंमतवान, कर्तबगार ,युद्ध कौशल्य असणारी स्त्री म्हणून उल्लेख केला आहे.
झाशी सोडल्यानंतर त्या पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेल्या परंतु आपला पराभव झालेला त्यांना स्वस्थ Jबसू देत नव्हता. त्यांनी त्या ठिकाणीही सैन्याची कवायत चालू ठेवली. त्यांची चौकशी सुरू केली ,इंग्रजांना रोखण्यासाठी त्यांनी आपले कौशल्य पणाला लावू लागले. त्यांनी सैन्यामध्ये चर्चा सुरू केल्या. हे असतानाच 17 जून 1858 रोजी ब्रिटिश अधिकारी स्मिथ हा आपले सैन्य घेऊन ग्वाल्हेरला पोहोचला.सराय याठिकाणी पोहचला.
त्याने थोडीही उसंत न देता हल्ला चढवला .राणी लक्ष्मीबाई ह्या रणांगणामध्ये उतरल्या .धैर्याने ,शौर्याने लढत होत्या त्यांचा आवेश पाहून सैन्यही त्वेषाने लढत होते. ब्रिटीशांचा पराभव होणारच हे निश्चित असतानाच दुसऱ्या बाजूने फौजा आल्या त्यामुळे दोन्हीकडून होणारा हल्ला यामुळे त्यांना पराभवाची चिन्हे दिसू लागली .
अशा परिस्थितीत आपल्या सैनिकांसोबत बाहेर पण पडल्या ,त्यांचा 'सारंग 'नावाचा घोडा हा शेवटच्या लढाईत नव्हता. त्यामुळे तो ओढ्यापाशी अडकला .त्या इंग्रजांशी लढत असतानाच घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कुशीत तलवार लागली, परंतु राणी लक्ष्मीबाई यांचा पुरुषी वेष असल्यामुळे इंग्रज त्यांना ओळखू शकले नाहीत .
जखमी अवस्थेत असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांचे सेवक रामचंद्र देशमुख यांनी फुलबाग येते बाबा गंगादास यांच्या मठात आणले, परंतु उपचार करून काही फायदा नाही, आपला देह इंग्रज सैन्याच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती .फुलबाग याठिकाणी त्यांचा वयाच्या 23 व्या वर्षी मरण आले. 17 जून रोजी संध्याकाळी त्या स्वर्गवासी झाल्या ,परंतु 18 जून ला इंग्रज सरकारने लक्ष्मीबाईंना मृत घोषित केले .असे असल्याने आजपर्यंत 18 जून ही त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते.
FAQ
1 ) राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म केव्हा झाला ?
उ. 19 नोव्हेंबर 1835
2) राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव काय ?
उ .मोरोपंत तांबे
3) राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव काय ?
उ .गंगाधर नेवाळकर
4 ) राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय ?
उ .मनकर्णिका
5) राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे नाव काय होते ?
उ .सारंग
6) राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचे नाव काय?
उ .दामोदर
7 ) दत्तक वारस नामंजूर हे कारण दाखवून झाशी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने खालसा केले ?
उ .गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी
8 )कोणत्या ब्रिटिश अधिकाऱने झाशी घेण्यासाठी झाशीला वेढा दिला ?
उ .सर ह्यू रोज
9) राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह कधी झाला?
उ. 19 मे 1942
आणखी वाचा
आदर्श माता जिजाऊ ज्यांनी घडविला शिवबाला
अरुणीमा सिन्हा अपंग असूनही माऊंट एव्हरेस्ट शिखर करणारी
खूपच उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती sir
उत्तर द्याहटवा