Google ads

Ads Area

राजमाता जिजाबाई यांची माहिती | Rajmata jaijabai yanchi mahiti

 राजमाता जिजाबाई यांची माहिती | Rajmata jaijabai yanchi mahiti

जिजाबाई यांची माहिती (toc)


छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहीत आहेतच त्यांना घडवण्याचा मोलाचा वाटा जो कोणी उचलला तो म्हणजे त्यांच्या मातोश्री जिजाऊ ,जिजामाता ,जिजाबाई ,मासाहेब या नावाने त्यांना ओळखले जाते. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असा आपण बरेचदा ऐकले आहे तसे जिजाऊ मातेने आपल्या लहानग्या शिवबाला संस्कार देण्यात अग्रेसर होत्या, म्हणून तर आज आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजामाता यांना आदरांजली वाहताना दिसतो. त्यांच्या संस्कारांमुळे संभाजीराजे आणि  शिवाजीराजे महान आदर्श व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्रला मिळाले हे आपले भाग्यच समजावे लागेल.

जिजामाता यांचा जन्म| Jijamata yancha janm

 जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये देऊळगाव, सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी झाला. या अतिशय शूर, वीर आणि स्वतंत्र विचाराच्या असणाऱ्या, देशाबद्दल आणि आपल्या धर्माविषयी अत्यंत प्रेम होते. त्यांनी आपल्या लहान शिवबाला महाभारत, रामायण यातील शूर वीरांच्या कथा सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणे, त्यांच्यावर संस्कार करणे हा मोलाचा वाटा त्यांनी उचलला. जिजाऊ ह्या केवळ एक माता म्हणूनच नाहीतर एक आदर्श पत्नी तसेच धाडसी योध्या ,शूर ,पराक्रमी मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी असलेली तळमळ, त्यांचे जीवन अतिशय खडतर, संघर्षमय परिस्थितीतून गेले तरीही त्यांनी आपल्या या परिस्थितीवर अतिशय धैर्याने तोंड दिले. एक संघर्ष संपला तोच दुसरा दारात संघर्ष उभा राहत होता तरीही आपले मनोधर्य त्यांनी खचून न देता स्वराज्य बांधणीसाठी त्यांनी आपल्या मुलांना घडवण्यात पुढे सरसावल्या.

जन्म: 12 जानेवारी 1598 देऊळगाव सिंदखेडराजा बुलढाणा

  वडिलांचे नाव: लखुजीराजे जाधव

 आईचे नाव :म्हाळसादेवी लखुजीराजे जाधव

 पतीचे नाव  : शहाजीराजे भोसले 

मुले : संभाजीराजे शिवाजीराजे 

लोकांनी दिलेली पदवी : जिजामाता, जिजाऊ ,राजमाता, मासाहेब ,जिजाई

 मृत्यू  :17 जून 1674

विवाह : डिसेंबर 1605, दौलताबाद 


शहाजीराजे यांच्यासोबत जिजामाता यांचा विवाह| Shahajiraje & jijau yancha vivah

 फार पूर्वीपासून बालविवाह केला जात होता तसाच जिजाऊ यांचाही बालविवाह झाला .त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाही मध्ये सरदार म्हणून होते. लखुजी जाधव यांनी भोसले घराण्यातील मालोजी भोसले यांचा पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊचा विवाह केला .इ स 1605  मध्ये जिजामाता आणि शहाजी राजे यांचा विवाह झाला. शहाजीराजे सुद्धा हे लखुजी जाधवसारखे निजामशाही मध्ये सेनापती होते शहाजीराजे हे शूर वीर पराक्रमी योद्धा होते त्यांचे निजामशाहीशी,आदिलशाही,  मोगल यांच्याशी चाकरी करण्यातच जीवन गेले, परंतु त्यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी पुणे आणि सुपे ही त्यांना जहागिरी दिली असल्यामुळे विवाहनंतर जिजामाता या पुणे या ठिकाणीच वास्तव्यास होत्या. 

जिजामाता आणि शहाजीराजांचे अपत्य | shahajiraje & jijau yanche apatya

 जिजामाता आणि शहाजी राजे यांना एकूण सहा अपत्य झाली . त्यामध्ये चार मुली आणि दोन मुलगे होते. थोरला मुलगा संभाजीराजे तर दुसरा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मराठा साम्राज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली, असा हा महान योद्धा त्यांच्या पोटी जन्माला आला आणि आपला मराठा साम्राज्य उभे केले अशा या महान दाम्पत्यांच्या पोटी असा शूर योद्धा जन्माला आला.


जिजामाता यांचे कार्य| Jijamata yanche karye

जिजामाता या शिरूर धैर्यवान सद्गुणी कुशल घोडेस्वार तलवारबाजी यामध्ये तरबेज होत्या हेच गुण शिवाजी महाराज यांना संस्कारातून देण्यात आले युद्धकौशल्य राजनीति शूरपणा दूरदृष्टी पणा असे महत्वाचे गुण शिवाजी महाराज यांच्यामध्ये करण्याचे महत्त्वाचे कार्य जिजाऊंनी केले

जिजाऊंचा मोठा मुलगा संभाजी याच अफजलखानाने मारले यामुळे अफजल खानास मारण्यास जिजाऊंनी शिवाजी महाराज यांना प्रेरित केले

पुणे या ठिकाणी वास्तव्यास असताना शहाजी राजे यांची जागे रे चांगल्या रीतीने सांभाळत होत्या पुण्यातील कसबा पेठ येथील गणपती मंदिराची स्थापना केली तसेच तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला

शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई यांचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे अन्याने धर्मपरिवर्तन झाले होते म्हणून त्यांच्या इच्छेनुसार धर्मपरिवर्तन हिंदू धर्मात करून घेतले तसेच शिवाजी महाराज यांचा यांची मुलगी सखुबाई बजाजी निंबाळकर यांच्या मुलाला दिली या सगळ्या प्रसंगातून जिजाऊंचे द्रष्टेपणा आणि सहिष्णुता हा गुण त्यांच्याकडे होता असे दिसून येते

शिवाजी महाराज यांनी कोणत्या वेळेस स्वारी केली, कोणती लढाई जिंकले, कोणते किल्ले गमावले या सर्व लढायांचा तपशील त्या स्वतः जवळ ठेवत होत्या.

 महाराजांच्या गैरहजेरीत राज्याची धुरा चांगल्या रितीने पार पाडत होत्या .

ज्यावेळेस शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेत असताना त्यांनी आपले कार्य चालू ठेवले, त्यावेळेस त्यांनी रांगणा किल्ला जिंकला.

 जिजामाता यांनी स्वराज्याचे तोरण बांधले गेले.

 त्यांच्याकडे दूरदृष्टीपणा होता ,त्यांच्याकडे दूरदृष्टीपणा लखुजी जाधव (वडिलांकडे)यांच्याकडे असताना समाजात असलेल्या चालत असलेले राजकारण याचा सर्वांगीण निरीक्षण असल्याने विवाहानंतर तोरणा किल्ला हा महत्त्वाचा किल्ला असल्याने स्वराज्य स्थापन करण्याचे याच किल्ल्यापासून सुरुवात करण्यात आली. 

शिवाजी महाराज हा मोठा योद्धा करण्याचे श्रेय जिजामाता यांच्याकडेच जाते त्यांनी महाराजांना तलवारबाजी, घोडेस्वार याचे प्रशिक्षण दिल्याने शिवाजी महाराज त्यात अग्रेसर होत गेले. 

स्वतः जिजामाता ह्या शूर योद्धया होत्या. ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळा या ठिकाणी अडकले असताना त्या स्वतः हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन शिवाजी महाराज सुटका करण्यासाठी निघाले असताना नेताजी पालकर यांनी त्यांना अडवले आणि स्वतः महाराजांना सोडवण्यासाठी पन्हाळा ठिकाणी गेले.

सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ला अतिशय भक्कम किल्ला होता ,तो घेताना तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचे म्हणजे रायबाचे लग्न बाजूला ठेवून कोंडाणा किल्ला सर करण्यासाठी गेले, परंतु त्या ठिकाणी ते धारातीर्थी पडले,पण तो किल्ला जिंकला म्हणून या किल्ल्याला "गड आला पण सिंह गेला" असे म्हटले जाते . म्हणून या किल्ल्याला सिंहगड असेही म्हटले जाते. जिजामाता यांनी रायबाचे लग्न स्वतः हजर राहून लावले यावरून त्यांचे केवळ आपल्या घरांविषयी प्रेम होते असे नसून स्वराज्यातील प्रत्येक व्यक्ती आपलाच मावळा आहे आणि प्रत्येक मावळ्याची काळजी त्यांना होती हे दिसून येते.


जिजामाता यांच्याकडून शिवाजी महाराज यांना मिळालेले संस्कार, शिकवण| jijamatachi shivajirajena dileli shikavan

 लहान मुलावर संस्कार जसे घडतात तसाच तो मुलगा घडत असतो याचे उदाहरण म्हणजे जिजामाता यांचेच द्यावे लागेल; खरोखरच जिजामाता यांनी बालशिवाजी यांना चांगले संस्कार देऊन शूरवीर असा महान योद्धा निर्माण केला. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजी महाराज यांच्यावर पडलेले संस्कार यातून स्वराज्य स्थापनेचे कौशल्य त्यांना मिळाले हे कौशल्य कोणते मिळाले ते खालील प्रमाणे.

1 ) जिजाबाई यांनी बाल शिवाजी यांना राजनीतीचे धडे शिकवले :  शिवाजी महाराज यांच्यामध्ये दूरदृष्टीपणा हा अंगी बाणला गेला लहानपणापासून रामायण ,महाभारत यामधील कथा सांगत असल्याने महान पराक्रमी असे योद्ध्ययांची कथा सांगितल्यामुळे शिवाजी महाराज यांच्यामध्येही अशाच पद्धतीचे धाडस, शौर्य, त्याग, देशनिष्ठा वाढीस लागली या सगळ्या गुणामुळे एक महान पराक्रमी धाडसी बलवान शक्तिशाली शूर असा योद्धा शिवाजीराजे बनले .

2) आदर करण्यास शिकवले

 स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे, ज्येष्ठ लोकांचा आदर करणे, परस्त्री मातेसमान मानावी असे जिजाबाई यांनी त्यांना शिकवले म्हणून तर त्यांच्या मावळ्यांनी फिरंग्यांची स्त्री महाराजांसमोर उभी केली; असताना या स्त्रीचा आदर सत्कार करून ती स्त्री मातेसमान मानून त्या स्त्रीला माघारी पाठवले हे सगळे संस्कार जिजामाता यांच्यामुळेच त्यांच्याकडे आले.

3 ) पशुपक्षी यांच्यावर प्रेम करायला शिकवले.

4)  तसेच स्वराज्य स्थापन करत असताना जनतेचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य समजून ते कर्तव्य पार पाडत असताना समाजविघातक कार्य ज्यांनी केले असेल त्यांना कडक शिक्षा द्यायचे .

5 ) शिवाजी महाराज यांना युद्ध कौशल्य, राजनीति तसेच तलवार चालवणे, घोडेस्वार करणे, युद्ध कौशल्य याचे सगळे शिक्षण जिजाबाई यांनी दिले.


प्रश्नावली

1) राजमाता जिजाबाई यांच्या पतीचे नाव काय होते? 

>>>शहाजीराजे भोसले 

2)  जिजाबाई यांचा जन्म केव्हा व कोठे झाला?

 >>>1598 .देऊळगाव ,सिंदखेड ,बुलढाणा जिल्हा.

 3) जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते?

 >>>लखुजी जाधव 

4)  शहाजीराजे भोसले यांच्या वडिलांचे नाव काय होते?

 >>>मालोजी भोसले

5 )  शिवाजी महाराज यांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते ?

>>> संभाजी राजे 

6)  मालोजीराजे भोसले यांच्या मुलांची नावे काय होती?

>>> शहाजीराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले

 7 ) शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना कोणी मारले होते?

 >>>अफजल खान 

8) शिवाजी महाराज यांच्या मेव्हण्याचे नाव काय होते?

 बजाजीराजे निंबाळकर 

 9 ) शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

 >>>सईबाई 

10) सईबाई यांच्या भावाचे नाव काय होते ?

>>>बजाजी निंबाळकर 

11) जिजाबाई यांचा मृत्यू केव्हा व कोठे झाला ?

   >>>    17 जून 1674 रोजी राजगड किल्ल्याजवळ पाचड गावात झाला.

 12 ) जिजामाता यांच्या मृत्यूपूर्वी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किती दिवस अगोदर झाला होता? 

  >>>बारा दिवस

आणखी माहिती वाचा 

लोकमान्य टिळक यांची माहिती

मित्र कसा असावा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area