Google ads

Ads Area

आषाढी वारी पंढरपूरची वारी | Pandharichi vari ,aashadhi vari

आषाढी वारी|पंढरपूरची वारी माहिती| Pandharichi vari ,aashadhi vari


 पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल म्हणजेच पांडुरंग असून या पांडुरंगाला भेटण्यासाठी संतांच्या संपूर्ण महाराष्ट्रातून पालख्या पंढरपूर या ठिकाणी जात असतात .या पपालख्यांबरोबर  लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी जात असतात यालाच वारी असे म्हणतात. ही वारी करणारा वारकरी संप्रदाय असतो .वारकरी म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाला भेटण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी जाणारा लोक समुदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय होय. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे .


पंढरीची वारी( toc)


वारीचे वैशिष्ट्य |varichehe vaishitya|

वारीचे वैशिष्ट्य असे सांगता येईल की सर्व भागातून अनेक जाती धर्माचे भक्तमंडळ विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या पण सोबत कोणताही भेदभाव न मानता भक्तिभावाने एकत्र येत असतात आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत असणाऱ्या भक्तांना ' माऊली ' या नावानेच उद्देशून बोलले जाते. वारी हा एक विश्वातला आनंदसोहळा असतो. वारी म्हणजे पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भक्तमंडळी एकत्र पायी चालत जाणारा लोकांचा समुदाय होय .हे वारकरी पंढरपूर या ठिकाणीच जात असल्याने याला वारी असे म्हणतात. ही वारी पंढरपूर येथे वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लोक जात असतात.यापैकी आषाढी वारी ही सगळ्यात मोठी वारी असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव अशा अनेक महान संतांच्या पालख्या पंढरपूर या ठिकाणी जात असतात. 

या वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताच भेदभाव नाही. लहान मोठेपणा नाही ,या वारकरी संप्रदायात ईश्वराचे नामस्मरण करणे हाच भक्तीभाव मनी ठेवून वारी करत असतात .वारी ही एकादशीनिमित्त किंवा इतर दिवशी नित्यनेमाने करणाऱ्या लोकांचा समुदाय असतो .वारकरी म्हणजेच वारी करणारे लोक होय, जो नित्यनेमाने वारी करतो तो वारकरी होय. वारकरी धर्म जो जाणतो,वागतो त्याला वारकरी धर्म म्हणतात. वारकरी धर्माला भागवत धर्म असेही  म्हणतात. 

पंढरीचा वारकरी  हा पंढरीचा वास, चंद्रभागेचे  स्नान आणि विठोबाचे दर्शन घेण्यासाठी वारी न चुकता वारकरी वारी करत असतो .अशी भागवत धर्माची धारणा आहे म्हणूनच आषाढी वारी ही प्रत्येक वर्षी करून महिला पुरुषांच्या मनात महत्त्वाचे श्रद्धेचे स्थान असते .


वारकरी म्हणजे काय ? | varakari mhanje kay

पंढरपूर या ठिकाणी नित्यनेमाने पायी किंवा कोणत्याही माध्यमाने जाणारा लोकांचा समुदाय असतो. वारकऱ्यांचा  विठ्ठल हा त्यांचा आराध्य दैवत मानून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यासाठी भगवंताच्या स्मरणात राहण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. गळ्यात माळ असेल आणि तो नित्यनेमाने वारी करत असेल तरच तो वारकरी म्हणता येतो. असा वारकरी पंथ समजत असतो.


 वारकरी यांचा जयघोष |varakari yancha jayghosh

 वारकरी संप्रदाय कोणतेही कार्य करत असताना  "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करत असतात.हा  जयघोषात भेद दिसतो .काही ठिकाणी

 " माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय "

 अशा अनेक जयघोषात वारकरी आपला श्रद्धेने जयघोष बोलत असतात.


 पंढरीच्या वारीचा इतिहास  | pandharichya varicha itihihas

पंढरीची वारी खूप वर्षापासून चालत आली आहे. तेराव्या शतकापासून ही परंपरा चालत आली आहे. असा उल्लेख सापडला जातोय संत ज्ञानेश्वर महाराज  यांच्या घरातही वारी चालू होती. ज्ञानदेवांचे वडील वारी करत होते असे म्हटले जात होते उल्लेख आढळतो .ज्ञानदेवांनी आपल्या भागवत धर्माची पताका सर्व  जाती धर्मातील लोकांना एकत्रित करुन वारीची परंपरा चालू ठेवली. संत एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज यांनीही वारी ची परंपरा अखंडितपणे चालू ठेवली. त्यानंतर तुकाराम महाराज यांच्यानंतर अनेक संत मंडळींनी वारीची परंपरा ठेवली आहे . या वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देश असा आहे की पंढरीची वारी करणे हा त्यांचा महत्त्वाचा विषय आहे. या वारीतून भक्त मंडळींची असणारी लोकाभिमुखता व समाजभिमुखता वृत्ती दिसत असते .असा हा वारकरी वारी करत असतो, म्हणूनच त्याला वारकरी असे म्हटले जाते. ज्ञानदेव यांच्या प्रभावातून हा वारकरी संप्रदाय झाला आहे असे म्हटले जात असून ,वारकरी संप्रदायाचा आद्यप्रवर्तक भक्त पुंडलिक असाच मानावा लागतो. भक्त पुंडलिकामुळेच पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल हा आलेला आहे. त्यांच्यापासूनच या संप्रदायाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. या वारीचे साधारणत पाच कालखंड मानले जातात .

1) ज्ञानेश्वर पूर्व काळ भक्त पुंडलिकाचा काळ

2 ) ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज यांचा काळ

3 )एकनाथ महाराज यांचा काळ

4 ) तुकाराम महाराज यांचा काळ

5 ) संत तुकाराम महाराज यांच्यानंतरचा काळ 


वारीचे प्रकार | variche prakar

वारीचे दोन प्रकार केले जात असतात 

1 ) आषाढी वारी

 संतांच्या पालख्या आपल्या गावातून पंढरपूर या ठिकाणी येत असतात  .

2 ) कार्तिकी वारी

 ही वारी म्हणजे आपापल्या गावाला पंढरपूर वरून पालख्या माघारी जात असतात  असे म्हटले जाते.


पालखी सोहळा | Palakhi sohala

ज्ञानदेवांची पालखी 

सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख हैबत बाबा होते . हैबतबाबा यांच्या प्रयत्नातून पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे .यांनी ज्ञानेश्वर महाराज पादुका ह्या दिंडी समारंभ मोठ्या थाटाने पंढरपूरला  नेत असतात .ज्ञानेश्वर पालख्यांचे स्वागत पूर्वी हत्ती, घोडे ,राजे साहेब असत .पालखीचा खर्च त्या काळचे राजे करत होते.

 तुकोबांची पालखी : 

तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा पाहत होते. हे ज्ञानदेव आणि नामदेव महाराज यांच्या काळातील होते . संत तुकाराम महाराज पंढरपूरला वारी घेऊन जात होते .तुकाराम महाराजानंतर त्यांचा पुत्र नारायण  महाराज पंढरपूर येथे नेत असत.

👏जय जय राम कृष्ण हरी 👏👏जय जय राम कृष्ण हरी👏

हे ही वाचा

एकनाथ महाराज यांची माहिती

अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा

संतचरणरज बाळकृष्ण महाराज गायकवाड यांची माहिती

संत नामदेव महाराज यांची माहिती



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area