Mpsc 2022 मुख्य परीक्षेत झालेला बदल | mpsc main exam 2022 change structure
एम पी एस सी परीक्षा ही यूपीएससी च्या धर्तीवर होणार असे आयोगाने स्पष्ट केले आहे.हा बदल 2022 पासून होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी असेल, ज्यांनी राज्यसेवेचा फॉर्म भरला आहे; त्यांच्यासाठी हा बदल असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही दोन पेपर मध्ये असते.
mpsc मुख्य परीक्षा 2022 बदल( toc)
पूर्व परीक्षा
पेपर 1 सामान्य ज्ञान
पेपर 2 csat
पेपर 2 मध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे ,
तर सामान्य ज्ञान पेपर 1 पेपर मध्ये मेरीट लावले जाते. मुख्य परीक्षेला जाण्यासाठी पूर्व परीक्षा पेपर केवळ पास होणे गरजेचे आहे ,तर सामान्य ज्ञान या पेपरमध्ये उत्तीर्ण होऊन त्यामध्ये मेरीट लावले जाते. मेरीटमध्ये असेल तरच मुख्य परीक्षेचा फॉर्म भरला जातो.
मुख्य परीक्षा ही सुद्धा पूर्वीच्या पद्धतीनुसार न होता यूपीएससी च्या धर्तीवर ही परीक्षा होणार आहे. जी परीक्षा यापूर्वीसुद्धा अशीच होती .पुन्हा त्याच पद्धतीने होणार आहे .
परीक्षेचे स्वरूप असे असेल
एम पी एस सी मुख्य परीक्षा झालेला बदल 2022 | Mpsc main exam change 2022
1 ) परीक्षेचे स्वरूप : वर्णनात्मक
2 ) एकूण पेपर : 9
3 ) अर्हता (पात्र ) पेपर:-
● पेपर 1 भाषा ( मराठी) : 300 गुण ( 25 % पात्र होण्यासाठी)
● पेपर 2 : इंग्रजी 300 गुण (25 % पात्र होण्यासाठी)
4 ) गुणवत्ता यादी करता विचारात घेतले जाणारे पेपर व त्यांचे गुण
१) निबंध (मराठी किंवा इंग्रजी माध्यम) 250 गुण
२) सामान्य अध्ययन - १ 250 गुण
३) सामान्य अध्ययन - २ 250 गुण
४) सामान्य अध्ययन -३ 250 गुण
५) सामान्य अध्ययन-४ 250 गुण
६) वैकल्पिक विषय पेपर -१ 250 गुण
७) वैकल्पिक विषय पेपर- 2 250 गुण
----------------------------------------
एकूण 1750 गुण
5 ) मुलाखत 275 गुण
----------------------------------------