आंतरराष्ट्रीय योगा दिनाची माहिती | international yoga day
21 जून हा दिवस संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो .या दिनाला संयुक्त राष्ट्राने सुद्धा मान्यता दिलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राची जी महासभा झाली, त्या महासभेत 11 जून 2014 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्राचे 193 देशांपैकी 177 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले म्हणजेच स्थायी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स ,रशिया या देशांनाही हा प्रस्ताव मान्य होता, म्हणून या प्रस्तावावर अनेक वेळा चर्चा करण्यात आली. डिसेंबर 2014 रोजी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 21 जून 2015 रोजी जगातील पहिला योग दिन म्हणून साजरा करण्यात आला.
योगा दिन माहिती(tocs)
21 जून रोजी योग दिन साजरा का करतात? | 21 june yoga din ka sajara karatat
पूर्वीपासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला महत्त्व असलेले दिसून येते. आपले स्वास्थ्य ठीक असेल तरच आपला कार्यभाग चांगल्या रीतीने पार पाडत असतो.' आरोग्यम् धनसंपदा' या उक्तीप्रमाणे आपले आरोग्य हीच आपली धनसंपत्ती आहे .मनुष्याला आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात भौतिक साधनांचा तुटवडा नसला ;तरीही अनेक खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलते राहणीमान त्यातच नैसर्गिक वातावरणात पर्यावरणाचा असमतोल असल्यामुळे या सर्व गुणामुळे मनुष्यप्राणी हा अत्यंत कमकुवत बनत जात आहे. अशावेळेस आपले आरोग्य चांगले राहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपला विश्वबंधुत्व हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून जर आपण बंधूभावाने एकमेकाशी वागलो तर जगामध्ये शांतता निर्माण होईल, यासाठी आपले आरोग्य चांगले असेल, मन स्वस्थ असेल तर जगात शांतता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करून 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो .योगाभ्यासाने मानसिक विकार आणि शारीरिक विकार यामुळे होणारा शरीरावर, मनावर जो बदल होतो हा बदल स्थिर ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचा असतो.
योगशास्त्राचा अभ्यास योग म्हणजे युज या संस्कृत शब्दापासून निर्माण झाला आहे या शब्दाचा अर्थ असा आहे की आत्म्याचा परमात्म्याशी असलेला संबंध म्हणजेच आत्मा हा चराचरात व्यापून राहिलेला;जे चेतन आहे तो योग होय. योगाला जवळजवळ दहा हजार वर्षापेक्षा अधिक काळापासून तो आचरणात आणला जात आहे. हा वैदिक संहितेनुसार ऋषीमुनी यांच्या संदर्भानुसार प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आपणास आढळतात.
योगा अभ्यासात नेमके काय केले जाते योग अभ्यासामध्ये केवळ शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेण्याची पद्धत यांचा अभ्यास केला जातो.
आपल्या शरीरात तीन महत्त्वाचे घटक आहेत शरीर, मन आणि आत्मा यातीन घटकांचे समायोजन असणे गरजेचे असते ,तरच आपले स्वास्थ्य चांगले राहू शकते असा हा योग अभ्यास नियमिरित्या केला तर आपले आरोग्य चांगले राहते. मनुष्य या धकाधकीच्या जीवनात त्रासलेला असतो अशा वेळेस शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य त्यास लाभणे आवश्यक आहे. या योगाभ्यासातून आपली बौद्धिक पातळी हे उच्च दर्जाची होते. यातून आपले मानसिक स्वास्थ्य स्थिर राहिल्याने आत्मसंयम वाढत असतो, आपली बुद्धी स्थिर राहते. मानव चंचल न होता तो स्थिर राहून स्वास्थ्य वाढवत असतो. या सगळ्या योगाच्या फायद्यातून 21 जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात परवानगी मिळाली . आनंतरारस्त्री मानवतावादीध्यान ,योग य गुरु श्री श्री रविशंकर यांचे असलेले विचार योग प्रस्ताव मांडण्यात अगोदर मानवतावादी ध्यान आणि योग गुरु असलेले श्री श्री रविशंकर योग परी संघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन करून त्यांनी संपूर्ण जगात 21 जून हा योग दिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी केली .यासाठी योग हे विश्वशांतीसाठी एक विज्ञान नावाचे 4- 5 डिसेंबर 2011 मध्ये योग ' विश्वशांतीसाठी एक विज्ञान ' असे संमेलन भरवले होते .असा हा योग दिन साजरा करण्यापूर्वी दहा वर्षापासून या योग दिनासाठी प्रयत्न केले होते, परंतु ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना संयुक्त राष्ट्रसमोर हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला कमी वेळेत सहमती दर्शवली गेली .म्हणून हा योग दिन साजरा केला जातो.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी योगविषयी विचार | prime minister Narendra modi yoga day vishai speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा व्हावा यासाठी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत मांडलेला विचार योग दिन होय.
हा विचार असा होता की, "योग आपल्या प्राचीन भारतीय परंपरेची एक अमूल्य अशी देणगी आहे .योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचे प्रतीक आहे .योगा मनुष्याला स्वास्थ्य देणारा आहे .मनुष्य आणि प्रकृती यामध्ये सामंजस्य असते हा योग विचार संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा असा आहे, म्हणून योग प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या जगाच्या भल्यासाठी हा एक समग्र दृष्टीकोन प्रदान करणारा असा आहे." हा विचार जगासमोर मांडला.
योगा म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम नाही तर स्वतः मध्ये एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी हा योग आहे .हा योग म्हणजे आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत मध्ये योग चेतना बनून आपल्याला येणाऱ्या परिस्थितीस जुळवून घ्यायला मदत करत असतो .21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. 11 डिसेंबर 2014 रोजी 177 देशातील सभासदांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास अनुमती मिळाली .भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव केवळ 90 दिवसाच्या आत पूर्ण बहुमताने तो मान्य करण्यात आला .
योग दिन केव्हा घोषित करण्यात आला | Yoga day kevha ghoshit kela
11 डिसेंबर 2014 रोजी राष्ट्रातील 177 देशातील सभासद देशांनी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली .या उपक्रमाला अनेक देशांनी समर्थन दिले. सर्वात प्रथम नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोईराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावास समर्थन दिले 193 देशांपैकी 177 देशांनी या प्रस्तावास मान्यता दिली.
पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा झाला? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र तेल सभासद असणारे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव सर्व सामान्य पणे 193 देशांपैकी 177 / 175 देशांनी मान्यता दिली..
योगाचे जीवनातील महत्व | yog jivanatil mahattva
योग म्हणजे शरीर ,मन (आत्मा, बुद्धी )यांचा एकत्रित रित्या संयोग होय. मन आणि शरीर आपले जीवन जगण्यासाठी एक आवश्यक योगक्रिया असावी लागते. अशी योगक्रिया आपल्या जीवनाशी निगडीत असते. शरीर स्वास्थ्य नसेल तर मन कितीही खंबीर चांगले असले तरीही शारीरिकरित्या कमजोरी असल्याने मन कमजोर होत जाते. शरीरस्वास्थ चांगले असेल आणि मन ,आत्मा जर मानसिकदृष्ट्या विफल झाला असेल तर शरीरस्वास्थ्य सुद्धा ठीक चालत नाही .अशा मनाला आणि शरीराला एकत्रितरीत्या योगाच्याद्वारे 'योग माध्यमातून आपणास त्यातून आपल्या स्वास्थ्यासाठी जीवन चांगले राहण्यासाठी ,सदृढ होण्यासाठी, याचा उपयोग होत असतो, म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात योगाला महत्त्व दिले पाहिजे . आपण आपले जीवन जगण्याचा योग हा योगाआधारे आपण व्यवस्थितरित्या करून घेतला पाहिजे .योग दिनाचे औचित्य साधून आपण 21 जून पासून योगा करण्याचा योग आणला पाहिजे. आपले जीवन सुखकर करून इतरांनाही सुखी समाधानाने जगण्यासाठी योगाची माहिती दिली पाहिजे.
आणखी वाचा
★★ 21 जूनलाच योग दिन का साजरा करतात