Google ads

Ads Area

दृष्टिदान दिनाची माहिती |drushtidan dinachi mahiti

 दृष्टिदान दिनाची माहिती |drushtidan dinachi mahiti

दृष्टिदान दिन माहिती
दृष्टिदान दिन माहिती



दृष्टिदान दिन (tocs)

माणसाला पाच ज्ञानेंद्रिये आहेत .या पाच ज्ञानेंद्रियामार्फत आपल्याला जगाची ओळख होत असते. या पाचपैकी एका अवयवाची कमतरता असली तर त्यास जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते.

      कान ,नाक ,डोळा, जीभ आणि त्वचा या ज्ञानेन्द्रयांनी आपणाला सगळ्या सृष्टीचा अनुभव घेता येतो. 

कान:

कानाने आपणाला श्रावण करता येते, म्हणजे आवाज आपल्याला कळत असतो आवाजाच्या दिशेने आपण बघत असतो आणि त्याप्रमाणे आपली कृती होत असते.

नाक : 

 नाकाने आपण श्वासोच्छवास घेत असतो. नाक नसेल तर आपणाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होते, म्हणून नाक हे जीवन जगण्यासाठी उपयुक्त असा अवयव आहे.

जीभ :

जीभअसेल तर आपल्याला जे खातो त्या खाण्याच्या पदार्थाची चव कळत असते . शिवाय आपणाला बोलण्यासाठी जीभ अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.जीभ असेल तर आपणाला चव कळते आणि बोलता येत असते . चवीमुळे आपणाला अनेक  पदार्थांचा आस्वाद घेता येतो, म्हणून जिभेला महत्वाचे स्थान असलेले दिसते.

त्वचा :

 त्वचामुळे आपणाला स्पर्शाचे ज्ञान होत असते. आपल्या अंगावर पायाखाली किंवा डोक्यावर माशी असली तर आपणाला ते जाणवत असते, म्हणून त्वचेला महत्त्वाचे स्थान आहे , नाहीतर   आपल्या शरीरावर काय झाले आहे का ? याचाही आपल्याला थांगपत्ता लागला नसता ,त्यामुळे आपल्याला कोणत्या भागावर काय घडत आहे त्याचीही आपल्याला जाणीव होत असते .

डोळा :

 डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळा आहे म्हणून आपण सर्व जग पाहू शकतो, डोळा नसेल तर आपण कोणत्याच गोष्टीचा अनुभव घेऊ शकत नाही. जर एखादा पदार्थ आपणाला बघायचा असेल तर तो कसा असेल याचा जर विचार केला तर खूप गंभीर प्रश्न आहे त्यासाठी लोकांमध्ये अशी जनजागृती होणे गरजेचे आहे . जर कोणाला तो पदार्थ बघायलाच मिळाला नाही तर आपणाला तो पदार्थ कसा असेल हे जर आपण डोळे झाकून जर विचार केला तर डोळ्याचे महत्व आपणाला समजून येईल . आपण दहा पावलं सुद्धा डोळे झाकून चालू शकत नाही तरीही असे आपल्या लोकांमध्ये अंध व्यक्ती आहेत त्यांचे जीवन किती खडतर आहे हे आपण जाणून घेऊन या दिनानिमित्त लोकांमध्ये जाणीव करणे गरजेचे आहे ,कारण काही लोकांमध्ये दान करण्याची वृत्ती असते पणअशी माहिती नसल्याने त्यांनाही काही करता येत नाही 


दृष्टिदान दिन | drushtidan din

 10 जून या दिवशी जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करतात .हा दिवस मानण्याचे एकच कारण आहे आपण दृष्टी दान करू शकतो म्हणजेच ज्या व्यक्तीला दृष्टी नसेल अशा व्यक्तींना आपण मरणोत्तर इच्छेने त्यास दृष्टी देऊ शकतो याचे स्मरण म्हणून आज 10 जून रोजी हा जागतिक दृष्टिदान दिन म्हणुन साजरा करण्यात येत असतो. एखाद्याचे आयुष्य हे बदलण्याचे आपल्याही हातात आहे जन्मताच अंध व्यक्ती असणाऱ्या व्यक्तींना जगाची ओळख व्हावी यासाठी आपण आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव कोणाच्यातरी उपयोगी पडावेत यासाठी ते मृत्युनंतर त्या व्यक्तीला आपले अवयव काढून दिले तर त्याचा उपयोग होऊ शकतो .

      म्हणून प्रत्येकाने अशी इच्छा धरणे आवश्यक आहे .त्या व्यक्तीला सुख ,समाधान, आनंद मिळू शकतो म्हणजे त्याच्या आनंदामध्ये इतरांनाही आनंद मिळू शकतो म्हणून दृष्टिदान दिन हा दिवस खूप महत्वाचा आहे .

दृष्टिदान दिन का साजरा करतात |drushtidan din ka sajara karatat

नेत्र चिकित्सक डॉक्टर आर. ए .भालचंद्र या महान सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . या दिवशी आपल्या मृत्यूनंतर आपण नेत्रदान करावे यासाठी हा अट्टाहास आहे . यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत यामुळे ज्याला दृष्टी नाही अशा व्यक्तीला दृष्टी देऊन त्याचे जीवन आनंददायी करण्याचे काम या नेत्रदिनाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रसार आणि जागृती निर्माण होऊन लोकांमध्ये सेवाभावी वृत्ती निर्माण होऊ शकते


दृष्टिदान कोणी करावे | drushtidan koni  karave

 डोळा हा निसर्गाने म्हणा किंवा ईश्वराने माणसाला खूप मोठी देणगी दिलेली आहे , जर एखाद्या व्यक्तीला दृष्टी नसेल तर अशा व्यक्तींना दृष्टी देण्याचे काम आपणही केले पाहिजे . यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात नऊ लाखापेक्षा अनेक व्यक्ती अंध आहेत नेत्रदान केल्यामुळे लाखो लोकांना दृष्टी प्राप्त झाली आहे.                       यासाठी 1979 नंतर अंधत्व निवारणासाठी नेत्रदान शिबीर कार्यक्रम घेण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रात 13 नेत्रचिकित्सक पथके स्थापन झाली. नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने यामध्ये कोणत्याच व्यक्तीला भीती बाळगण्याची गरज नाही नेत्र दान करणारी व्यक्ती जर मृत्यू पावली तर मृत्यूनंतर दोन तासाच्या आत त्या व्यक्तीचे डोळे काढणे गरजेचे असते . 

नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीने अगोदर आपल्या नातेवाइकांकडून तशी नोंद फॉर्म वर करून घेणे गरजेचे असते . त्याशिवाय नेत्रदान करता येत नाही. नातेवाईकांची परवानगी असेल म्हणजेच नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीचे वारसदार जे कोणी असतील त्यांची परवानगी मिळणे गरजेचे असते, त्याशिवाय नेत्रदान करता येत नाही म्हणून अगोदरच मृत्यूपूर्वी याची नोंद घेणे गरजेचे असते टाइम्स ऑफ रिसर्च फाउंडेशन यांच्या पाहणीनुसार साडेपाच 5.5 लाख नेत्र दान व्यक्तींपैकी वयोगट 15 ते 40 ,तर 60 वर्षावरील फक्त 4  टक्के लोक नेत्रदान करत आहेत; परंतु या जनजागृतीमुळे ही संख्या वाढणे गरजेचे आहे यासाठी दृष्टीदान या दिवसाचे महत्त्व आपण समजून घेणे गरजेचे आहे


 दृष्टिदान केव्हा करू शकतो  drushtidan kevha kru shakto

वय वर्ष 1 पूर्ण असलेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करण्यासाठी पात्र होऊ शकते . नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मृत्युपत्रात अशी नोंद करणे गरजेचे असते त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर  नातेवाईकांनी जबाबदारी घेणे महत्वाचे असते .त्यांची परवानगी असल्याने त्यांनी परवानगी दिली तरच नेत्रदान करता येते. एका व्यक्तीने नेत्रदान केल्याने दोन व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो. 

  यासाठी कोर्नियानी याचा वापर करणे गरजेचे असते म्हणजे संपूर्ण डोळा काढून घेणे याचा अर्थ नाही तर डोळ्याचा कोर्नियाचा  वापर करून अंध व्यक्तीस दृष्टी त्या ज्ञानाचा उपयोग ज्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीच्या जीवन सुखकर होत असते म्हणून नेत्रदान दिनानिमित्त सगळ्यांनी आपल्या अवयवांचा उपयोग इतरांनाही व्हावा अशी इच्छा मनात भरणे गरजेचे आहे त्यानुसार आपण ही मराठी पत्र लिहून कशा पद्धतीचे जनजागृती करणे गरजेचे आहे मिळत असते व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदान करणे गरजेचे असते त्यासाठी चोवीस तासाच्या आत कोर्नियाचे प्रत्यारोप करून दृष्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो.

     नेत्रदान हे श्रेष्ठ दान असे म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे दान करणे गरजेचे आहे. दानाचा उपयोग ज्या व्यक्तीला होतो त्या व्यक्तीचे जीवन सुखकर होत असते, म्हणून नेत्रदान दिनानिमित्त सगळ्यांनी आपल्या अवयवांचा उपयोग इतरांनाही व्हावा अशी इच्छा मनात धरणे गरजेचे आहे त्यानुसार आपणही अशा पद्धतीची जनजागृती करणे गरजेचे आहे

पुढे येणाऱ्या वटपौर्णिमा सणाची माहिती पाहण्यासाठी link open करा 

ttps://www.marathisampurn.com/2022/06/vatpaurnima-sanachi-mahiti.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area