Google ads

Ads Area

पुणे म्हाडात 5000 घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी|Pune mhada online application

 पुणे म्हाडात 5000 घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी|Pune mhada online application 


पुण्यात घर पाहिजे तर काळजी करू नका म्हाडा घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी 5069 घराची सोडत . पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे म्हाडा या गृहनिर्माण योजना अंतर्गत पुणेकरांना तसेच पुण्यात राहू इच्छित असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे तुमच्यासाठी हे 5069 सदनिकांची सोडत आहे. या सदनिका विक्रीसाठी अर्ज नोंदणी म्हणजेच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा शुभारंभ 10 जूनपासून करण्यात आला आहे . 


 या प्रक्रियेची सोडत दिनांक 29 जुलै 2022 रोजी गृहनिर्माण भवन, आगरकर नगर ,पुणे या ठिकाणी होणार आहे. 

 स्वप्नातील हक्काचे घर

 या स्वप्नाची घरांची सोडत संगणकीय असणार आहे, त्यानुसार सदनिकेचे वितरण करण्यात येणार आहे. गृहनिर्माण योजनेत सहभागी होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी

 सदनिकांच्या सोडतीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी नियमावली आहे.

ही नियमावली मार्गदर्शक आहे. या पुस्तकामध्ये सर्व नियम दिलेले आहेत अर्ज भरण्याच्या अगोदर हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे. हे पुस्तक https://lottery.mhada.gov.in/ लिंक वर म्हाडाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या नियमावलीचे सर्व अर्ज भरण्यापासून सोडत  होइपर्यंत निमावली दिली आहे. याचे मार्गदर्शन यामध्ये आहे.

 प्रक्रियेचे स्वरूप

 पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे म्हाडा योजनेत अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 9 जून 2022 पासून सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेचे अर्जदार नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला सुरवात झाली असून 10 जुलै रात्री 11.59 पर्यंत नोंद करता येणार आहे, तर 11 जुलै रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे. 12 जुलै या दिवशी अर्जदाराला अनामत रक्कम बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस द्वारे भरणा करायचा आहे. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर या अर्जदारांची  स्वीकृत यादी ची प्रसिद्धी 21 जुलै रोजी सायंकाळी 6  वाजता https://lottery.mhada.gov.in/ 

 संकेतस्थळावर केली जाणार आहे .

संगणकीय सोडत

संगणकीय सोडत काढली जाणार असून सदनिकांचे वितरण 29 जुलै 2022 रोजी पुणे मंडळाच्या गृहनिर्माण भवन आगरकर नगर याठिकाणी करण्यात येणार आहे,

 महत्वाची सूचना 

या सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडून कोणताच प्रॉपर्टी एजंट सल्लागार किंवा प्रतिनिधी नेमलेला नाही, त्यामुळे कुठल्याही अर्जदाराने यासंदर्भात परस्पर व्यवहार करू नये जर तसे केले पुणे मंडळ कुठल्याच फसवून ऑफिस व्यवहारास जबाबदार राहणार नाही ,असे म्हाडाकडून आव्हान करण्यात आले आहे याची नोंद प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area