21 जून योग दिन म्हणून का साजरा केला जातो |21 june international yoga day why celebration in this day
21 जून योग दिन म्हणून साजरा केला जातो यासाठी आपण हे पाहूया यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन कारणे आपणाला सांगता येतात. यावर खगोलशास्त्र हे असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात .उत्तरायण आणि दक्षिणायन जून महिन्यात 21 तारखेला सूर्य आपली स्थिती बदलत असतो . उत्तरायण अवस्था बदलून दक्षिणायन अवस्थेत सुरु होतो . म्हणजेच ह्या दिवसापासून लहान दिवस होत असतो .
21 जून योग दिवस का ? ( toc)
21 जूनचे असलेले नैसर्गिक महत्त्व | 21 juneche naisargik magattv
योग हा एक नैसर्गिक बदल असल्याने जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरु होत असते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि वातावरणातील उष्णता कमी होत जाते. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो, यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असल्यामुळे सूक्ष्मजीव जंतू वातावरणात वाढु लागत असतात.
यामुळे माणसांचे आजार वाढण्यास सुरुवात होत असते म्हणून योगाभ्यासाने शरीर, मन आत्मा हे स्वस्थ राहत असल्याने योगाचे महत्व लोकांना समजावे. त्यामुळे आपली प्रकृती नीट व्यवस्थित असली पाहिजे म्हणून या वातावरणाचा पहिला दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडण्यात आला होता.
21 जून सर्वात मोठा दिवस | 21 june big day
तसेच हा 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असल्याने मनुष्याला दीर्घायुष्याचा लाभ मिळावा यासाठी योगा महत्त्वाचा आहे आपल्या धारणा आणि विश्वास वाढविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असल्याने 21 जून हाच दिवस निवडण्यात आला.
योग ही एक जीवनशैली | yog hi jivanshaili
एकंदरीतरित्या योगाने मनुष्यामध्ये एक उत्साही असे वातावरण निर्माण होत असते. आपल्या वागण्या बोलण्यात योगाने एक जीवन जगण्याची नवीन पद्धत निर्माण होत असते. या पद्धतीला अनुसरूनच सगळ्या माणसांनी या योगपद्धती अवलंबली पाहिजे. ही एक जीवन शैली आहे ही जीवन शैली आपण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे आणि आपण योगाच्या आधारे त्याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.
योग दिनाच्या शुभेच्छा | yog dinachya shubhechcha
संपूर्ण जगात योगाचे महत्व असल्याने आज सगळ्या जगात योग दिन साजरा केला जातो. हा दिवस निवडण्याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे .योग दिनाला काहींचा विरोध जरी असला तरीही आरोग्य आणि आपले जीवन निरोगी राहण्यासाठी या योगाला महत्त्वाचे स्थान असलेले दिसून येते. या योगमध्ये कोणताही धार्मिकता नसून केवळ मनुष्याला आपले आरोग्य चांगल्या रीतीने सांभाळता यावे यासाठी योगाचा जीवनातील लाभ लक्षात घेता हा योग दिन सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे . त्यासाठी आपणही या दिवसापासून आपल्या जीवनात योगा करण्यासाठी योग आणला पाहिजे. आपले आरोग्य सांभाळा आपले आरोग्य हीच एक आपली संपत्ती आहे. ही संपत्ती जशी पैशाच्या स्वरूपात आपण समजतो, तसे आपले आरोग्य हीच संपत्ती सांभाळणे आपल्या हाती आहे आणि ते आपण पूर्ण करावे अशी आशा व्यक्त करतो योग दिनाच्या शुभेच्छा!
आणखी वाचा