Google ads

Ads Area

विनायक दामोदर सावरकर यांची माहिती |vinayak damodar savarkar yanchi mahiti

 विनायक दामोदर सावरकर यांची माहिती |vinayak damodar savarkar yanchi mahiti

विनायक दामोदर सावरकर
विनायक दामोदर सावरकर


वि दा सावरकर(toc)

   एक समाज सुधारक ,भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चळवळीचे महत्वाचे खंबीर नेतृत्व भारताला लाभले. राजकारणी, कवी, लेखक, हिंदू धर्माविषयी असणारा अभिमान, भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी यासाठी महत्त्वाचे विचारवंत, मराठीविषयी असणारी त्यांची आत्मीयता, लेखक म्हणून असणारा त्यांचा व्यासंग, म्हणून 1938 साली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले . हिंदुत्वविषयी असणारा त्यांचा अभिमान, मराठी भाषा   भाषाशुद्धीची चळवळ उभी केली, त्यासाठी त्यांनी मराठी भाषेला पंचेचाळीस शब्द नवीन दिले आहेत.


स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला त्यांचे 

वडील - दामोदर पंत 

आई - राधाबाई

मोठे बंधू - बाबाराव 

लहान बंधू - नारायणराव 

मोठ्या भाऊची पत्नी- येसू सावरकरांचा सांभाळ केला

दामोदर पंत यांना तीन अपत्य होती. विनायक, बाबाराव, नारायणराव ते नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई निर्वतली म्हणून त्यांचे मोठे बंधू यांची पत्नी येसू वहिनी यांनी विनायकरावांचा सांभाळ केला  प्लेगच्या साथीमध्ये वडिलांचे निधन झाले.

 सावरकरांचे बालपण | savarkaranche balpan

सावरकरांचे बालपण नाशिक या ठिकाणीच गेले . त्यांचे प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालयात झाले अत्यंत बुद्धिमान असलेले ,वक्तृत्वावर त्यांची छाप होती, काव्यरचना करत होते, प्रतिभावंत म्हणून त्यांची ख्याती लहानपणीच बघायला मिळाली. लहान असतानाच स्वदेशीचा फटका स्वतंत्रतेचे स्तोत्र त्यांनी रचले. चाफेकर बंधू यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर  कुलदेवता भगवती हिच्यापुढे शपथ घेऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी लढेन अशी शपथ घेतली आणि 1901 रोजी यमुनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला . विवाह झाल्यानंतर त्यांनी 1902 मध्ये फर्गुसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले.


 सावरकरांची अभिनव भारत संघटना | savarkaranchi abhinav bharat sanghatana

ही संघटना सावरकर यांनी स्वातंत्र्य लढा देण्यासाठी उभारली. सुरुवातीला राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि मस्कर यांच्या साथीने स्थापन केली होती. त्याचेच मित्रमेळा ही संघटना गुप्त संस्थेची शाखा होती . नंतर या शाखेचे 'अभिनव भारत' अशी संघटना तयार झाली. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत असलेले 'जोसेफ मॅझिनी' यांनी तयार केलेले 'यंग इटली' या संस्थेवरुन हे नाव घेतले होते. ही संस्था अत्यंत क्रांतिकारक ,प्रेरणादायक असल्याने या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. 

       ब्रिटिशांनी आपल्या भारतावर अन्याय केला असल्यामुळे त्यांनी परदेशी वस्तूंची होळी केली. 1905 त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला जाण्यासाठी "श्यामजी कृष्ण वर्मा" यांनी "शिवाजी शिष्यवृत्ती" देऊन कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडन या ठिकाणी पाठवले. ही शिष्यवृत्ती मिळावी म्हणून लोकमान्य टिळक यांचाही प्रयत्न होता. लंडन या ठिकाणी वास्तव्यास असताना 'इंडिया हाऊस' मध्ये सावरकर राहत होते त्या ठिकाणी जोसेफ मॅझिनच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर करून लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी त्यांचा अट्टहास होता. 

          पुस्तकाच्या प्रस्तावनेत सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले होते हे तत्त्वज्ञान क्रांतिकारकांना खूप आवडत असे प्रस्तावनेतील तत्वज्ञान क्रांतिकारकांच्या तोंडपाठ होती .या इंडिया हाऊस मध्येच त्यांचे क्रांतिकारकांचे पर्व सुरू झाले होते .मदनलाल धिंग्रा हा क्रांतिकारक त्यांचा शिष्य बनला ,परंतु मदनलालने कर्जन वायली ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला असल्याने मदनलाल धिंग्रा यांना फाशीची शिक्षा झाली. या सर्व काळामध्ये सावरकर यांनी  इतर देशातील क्रांतिकारकांशी संपर्क ठेवला ज्या ज्या देशांमध्ये गुलाम म्हणून रहात होते. त्या देशातील क्रांतिकारक देशभक्त यांना भेटून त्यांच्या गटाशी संपर्क ठेवून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत केले होते .

          हे तंत्रज्ञान बावीस ब्राऊनिंग पिस्तुल भारतात पाठवले. याच पिस्तुलाच्या आधारे अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. म्हणून या जॅक्सनच्या हत्येबाबत कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे व अनंत कान्हेरे या तीन अभिनव भारतच्या सदस्यांना फाशीची शिक्षा झाली. कलेक्टर जॅक्सन यांनी लोकांवर अन्याय केले, बाबाराव सावरकर यांना तुरुंगात पाठवण्यासाठी तेच कारणीभूत ठरले होते , म्हणून क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सन याचा वध केला.


          '1857 चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ सावरकर यांनी 1857 च्या  इंग्रजांविरुद्ध झालेला मोठा त्याचा इतिहास या ग्रंथामध्ये रचलेला आहे. हा उठाव म्हणजे एक बंद होता, इतिहासकारांनी जो निष्कर्ष काढला तो निष्कर्ष या ग्रंथांमधून सावरकर यांनी खोडून काढला होता ,परंतु ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशन होण्यापूर्वीच तो जप्त केला, परंतु सावरकरांचे मित्रमंडळी खूप हुशार असल्याने त्यांनी इंग्लडच्या बाहेर हा ग्रंथ प्रकाशित केला. तो इंग्रजी भाषेत होता .मराठी भाषेतील मूळ लिखाण सावरकरांचे मित्र कुटिन्हो यांनी हे जपून ठेवल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच प्रसिद्ध झाले .

या ग्रंथात राजद्रोहपर लेखन प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकर यांचे मोठे बंधू बाबाराव यांना ब्रिटीश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली ,म्हणून हा ब्रिटिशांनी अन्याय केला त्याचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रायांनी कर्जन वायली यास गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, तर नाशिकमध्ये अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा सुद्धा गोळ्या घालून त्यास ठार केले अनंत कान्हेरे यांनी जे पिस्तुल वापरले ते सावरकर यांनी पाठवलेले ब्राउनिंग जातीचे पिस्तुल चतुर्भुज अमीन यांच्या साह्याने ते पाठवले होते,

        याचा शोध इंग्रजांना लागल्यामुळे सावरकर यांना ब्रिटिशांनी अटक केली. बोटीतून त्यांना मारतात आणत असताना फ्रान्समध्ये मोरसेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारून ब्रिटिशांच्या कैदेतून त्यांनी सुटका करून घेतली ,त्यांनी पोहून किनारा गाठला पण भाषेच्या अभावी सावरकर यांचे संभाषण तेथील रक्षकांच्या लक्षात न आल्यामुळे पुन्हा ते ब्रिटिश यांच्या ताब्यात सापडले.  ब्रिटिशांनी त्यांना कैदी बनवून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरला, त्यावेळी त्यांच्यावर दोन जन्मठेप यांची म्हणजेच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली . सुमारे 50 वर्षे त्यांना शिक्षा झाली, परंतु काही नेत्यांच्या मागणीने ती वर्षे कमी केली .


 सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा | savarkaranchikalya panyachi shiksha

'इंडिया हाऊस 'या ठिकाणी अभिनव भारत ही गुप्त संघटना असून त्यांनी भारतात ब्राऊनिंग पिस्तुल पाठवली यासाठी त्यांना अटक करून भारतात आणले .या ठिकाणी त्यांना अंदमान या  ठिकाणी सुमारे शिक्षा देण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा म्हणजेच त्या ठिकाणी अंधाऱ्या खोलीत त्यांना जीवन जगावे लागत होते. त्या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक दिली गेली. खड्या बेडीत टांगून ठेवले, तेलाचा घाणा बैलासारखा ओढावा लागत होता.नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टाचे काम करावे लागत होते, यामुळे कष्टाचे जीवन आणि शारीरिक मानसिक छळ यामुळे त्यांची छळवणूक अकरा वर्षे सावरकर यांनी सहन केली. 

          तरीही भारतमातेला स्वतंत्र करण्याचे ध्येय डोळ्यासमोरून कधीही विरले नाही. त्यांनी तुरुंगात असतानाही आपली प्रतिभा जागी ठेवून क्रांतिकारक आणि लेखणीच्या माध्यमातून आपले महाकाव्य लिहिण्यासाठी त्यांनी आपली सर्जनशीलता जागी ठेवली आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी जे अन्याय सहन करत जे लिखाण केले त्याचा इतिहास आज संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायक असून त्यातून त्यांनी  भारतमातेसाठी शारीरिक-मानसिक छळातून त्यांनी जीवन काढले, मानसिकतेत त्यांनी महाकाव्य लिहिली गेली आहेत.


 सावरकरांची अंदमानातून सुटका | savarkaranchi andamanatun sutaka

त्यांना अंधार कोठडीत शिक्षा भोगायला लागत होती ,तेथे आपल्या भारतातील हिंदुत्वाचे राजकारण बदललेले दिसले म्हणून त्यांनी "एशियन टाइल्स ऑफ हिंदुत्व" हा ग्रंथ लिहिला.  ब्रिटिशांची बदललेली नीतीमत्ता ,मुस्लिम लीगचा वाढत असलेला प्रभाव सावरकर यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आज भारतावर जे संकट आले आहे ते संकट इंग्रजांमुळे जरी असले तरी ते कधीतरी आपला देश सोडून जातील. याची त्यांना खात्री होती, परंतु या देशांमध्ये 'हिंदू संघटन झाले पाहिजे 'हे सावरकर यांना मनापासून वाटत होते. विठ्ठलभाई पटेल, रंगास्वामी अय्यंगार यासारखे नेतेमंडळी यांनी प्रयत्न करून आणि सावरकर यांच्यामध्ये झालेला बदल ब्रिटिश अधिकारी यांच्या निदर्शनास आणून , ब्रिटिशांचे काही नियम मान्य करत असल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका 6 जानेवारी 1924 रोजी झाली. हे अंदमानातून सुटका झाली तरी त्यांचे हिंदुत्व आणि भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांची धडपड तशीच राहिली .


 सावरकरांची जीवन पद्धती | savarkaranchi jivan paddhati

 अंदमान सुटकेपूर्वीचे जीवन 

अंदमानातून सुटका होण्यापूर्वीचे जीवन अतिशय क्रांतिकारक आणि भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांचे लेखन हे अतिशय धगधगते होते ,आक्रमक असे सावरकर दिसत होते, प्रेरणास्थान सावरकर, असे त्यांचे रूप बघायला मिळत होते .

अंदमान सुटकेनंतरचे जीवन

भारत देशात इंग्रजांचे वर्चस्व असले तरी आता इंग्रजांचे वर्चस्व कधी ना कधी लयास जाणार आहे याची त्यांना खात्री होती, परंतु आपल्याच देशात आपलेच लोक आपल्या देशाच्या लोकांशी वैर पत्करण्यात पुढे आहेत .यासाठी हिंदू संघटन करणे यावर त्यांचा भर होता मराठी भाषा टिकून राहावी यासाठी भाषाशुद्धी चळवळ उभी करणारे , श्रेष्ठ साहित्यिक, सावरकर चांगले ,लोकांना मार्गदर्शन करणारे ,प्रसिद्ध वक्ते, अंधश्रद्धा न मानता विज्ञाननिष्ठेचा त्यांनी प्रचार केला, जातिभेद हा माणसाला माणसाप्रमाणे वागू देत नाही त्यामुळे जातीभेदाला विरोध केला ,त्यांनी अनेक ठिकाणी आंतरजातीय विवाह लावून दिले, हिंदू धर्मातील तत्वज्ञान लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ,असे हे श्रेष्ठ विचारवंत म्हणून लोकांसमोर ते उभे राहिले.

 अशा दोन जीवन पद्धतीमध्ये सावरकर यांचे जीवन गेले.


 सावरकरांचा जातिव्यवस्थेला छेद

 सावरकर यांनी अंदमान येथून सुटल्यावर आपल्या भारतीय समाजाचा अभ्यास केला तर भारतीय समाज हा जातीव्यवस्था, विषमता याच्यामध्ये अडकलेला आहे म्हणून असा समाज बाहेर काढण्यासाठी या लोकांना जातिव्यवस्थेचे बंधन मनातून मुक्त करणे गरजेचे आहे त्यासाठी यात त्यांनी आपल्या स्वकीयांचा विचार न करता त्यांच्यावरच कडाडून टीका केली.

             रत्नागिरीमध्ये राहून त्यांनी समाजसुधारणा करण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि विचारामंथन करून जातिव्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास अस्पृश्यांसाठी मंदिरे बंद होती, ते बंद मंदिरे सगळ्यांसाठी खुली करण्यात आली. अनेक आंतरजातीय विवाह केले रत्नागिरी या ठिकाणी पतितपावन मंदिर सर्वांसाठी खुले केले. सामुदायिक भोजनालय सुरू केले, सुमारे पंधरा आंतरजातीय विवाह करून दिले.

आपला समाज सुधारण्यासाठी जातीव्यवस्था, मानणाऱ्या समाजव्यवस्था याचा निषेध केला. उच्चवर्णीय त्यांच्याही घरात ढ जन्माला येतो तर शूद्र समजणाऱ्या लोकांमध्येही ज्ञानी जन्माला येतो हे समाजाने मान्य केले पाहिजे. म्हणून कोणतेही  अज्ञान न बाळगता सज्ञान राहणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्था याला हद्दपार करणे गरजेचे आहे .

           यासाठी आपल्या मानसिकतेतून त्यांनी ज्ञान हे अनुवंशिकतेनुसार येते हा गैरसमज काढून टाकणे गरजेचे आहे ,कोणत्याही घरात कुठेही ज्ञानी हा जन्माला येऊ शकतो. याचा स्वीकार करणे गरजेचे आहे मग तो कोणत्याही जातीत जन्माला तरीही त्याचा स्वीकार आपण करणे महत्त्वाचे असते.  यातून आपल्या समाजाची प्रगती होईल हे सावरकरांनी सांगितले .त्यासाठी त्यांनी सात बेड्या ह्या आपल्या मनातून आणि समाजातून घालवणे गरजेचे आहे सात बेड्या पुढीलप्रमाणे..

  • वेदोक्त बंदी 
  • शुद्धी बंदी
  •  बेटीबंदी
  •  रोटीबंदी 
  • स्पर्श बंदी 
  • व्यवसाय बंदी
  •  सिंधू बंदी 

आजही आपल्याकडे बेटीबंदी आहे म्हणजे आंतरजातीय विवाह होत नाहीत .सावरकरांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाला केवळ समर्थनच नाही तर आंतरजातीय विवाह लावून दिले.


 सावरकरांचे हिंदू महासभेचे कार्य  | hindu mahasabheche karya


         सावरकर हे अंदमानातून सुटल्यानंतर आपल्या हिंदू धर्माविषयी आणि लोकांमध्ये माणुसकी निर्माण व्हावी यासाठी आपल्या विचारमंथनातून लोकांमध्ये विचार जागृत करत होते. 1937 नंतर हिंदुमहासभेचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित रहावे लागत होते.  अनेक दौरे त्यांना करावे लागत होते, त्यांनी या सभांमध्ये हिंदूनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले .त्यायासाठी त्यांनी लढा दिला.

           हिंदू महासभेचे कार्य करत असताना त्यांच्याकडे महत्त्वाचे गुण होते. क्रांतिकारक ,साहित्यिक, समाजसुधारक आणि हिंदूंचे संघटन करणे या चार गुणांच्या आधारे आपला लढा जोरदार चालू ठेवला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी भारताची सुरक्षा लक्षात घेऊन शस्त्रसज्जता आणि सीमेवर असणारे सैनिक यांची संख्या वाढवणे त्यांची सुरक्षीतता ठेवणे यासाठीही त्यांनी आपले विचार मांडले.

        सावरकर यांनी आपला भारत देश चांगला बनावा यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले .जवळजवळ साठ वर्षे त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि आपले राष्ट्र चांगले राहावे यासाठी खूप परिश्रम घेतले. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, अंधश्रद्धा लोकांच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि जातीव्यवस्थेला विरोध करणाऱ्यांवर टीका करत होते ,नुसते विचार मांडून असते गप्प बसले असे नसून त्यांनी तसे कृतिशील कार्यक्रम करून दाखवले .हिंदुत्वविषयी त्यांना अतिशय कळवळा होता म्हणून हिंदू महासभेचे कार्य  त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडले. 


  सावरकरांचे मृत्यूपत्र | savarkranche mrutupatra

  1966 मध्ये त्यांनी आपल्या 83 व्या वर्षी अन्नपाणी औषध सगळ्या गोष्टींचा त्याग करून 26 फेब्रुवारी 1966 रोजी आपले देहावसन ठेवले. प्राणत्याग करण्यापूर्वी त्यांनी 'माझे मूर्तीपत्र' लिहून ठेवले होते. त्यात असे लिहिले होते ,माझे प्रेत हे विद्युत वाहिनीवर जाळण्यात यावे 

  • प्रेत खांद्यावर माणसांनी नेऊ नये 
  • गाडी चा वापर करू नये 
  • शववाहिकेतूनच यातूनच स्मशानात घेऊन जावे 
  • माझ्या मृत्यूनंतर कोणीही दुखवटा पाळू नये
  •  कोणताही विटाळ, सुतक समजून समाजाला त्रास होईल या पद्धतीने कोणतीही गोष्ट करू नये
  •  पिंडदान करू नये 
  • पिंडाला काकस्पर्श होईपर्यंत थांबू नये 

या सगळ्या गोष्टी पाळू नयेत.

सावरकरांचे साहित्य  | savarakaranche sahitya

सावरकर यांनी मराठी भाषेचा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता म्हणून मराठी भाषा आपली समृद्ध करण्यासाठी त्यांनी मराठी भाषाशुद्धी चळवळ यासाठी खूप परिश्रम घेतले. त्यांनी 10000 पेक्षाही जास्त पाने मराठीत लिहिली आहेत ,तर 1500 इंग्रजी भाषेमध्ये पाने लिहिली आहेत .त्यांची महत्वाची पुस्तके .

  1.  1857 चे स्वातंत्र्यसमर 
  2. अखंड सावधान असावे
  3.  संगीत अंधश्रद्धा भाग एक
  4. अंधश्रद्धा भाग दोन
  5.  भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  6.  माझी जन्मठेप 
  7. क्रांतिघोष
  8. गरमागरम गरम चिवडा
  9. गांधी आणि गोंधळ
  10. जोसेफ मॅझिनी
  11. महाकाव्य गोमांतक
  12. नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
  13.  माझ्या आठवणी
  14.  रणसिंग 
  15. संन्यस्त खडक आणि बोधिवृक्ष 
  16. सावरकरांचे पत्रे 
  17. भाषाशुद्धी
  18. तेजस्वी तारे
  19. मोपल्याचे बंड
  20. सावरकरांच्या कविता
  21.  हिंदुत्वाचे पंचप्राण
  22.  हिंदुराष्ट्र दर्शन 
  23. मोपल्यांचे बंड 
  24. काळे पाणी

ही पुस्तके प्रसिद्ध असली तरी 'सागरा प्राण तळमळला' जयस्तुते ,तानाजीचा पोवाडा, या कविता त्यांच्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत.


प्रश्नावली

1) विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म केव्हा झाला?

 -- 28 मे 1883 


2 ) विनायक सावरकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

--दामोदर सावरकर


 3) सावरकर यांच्या आईचे नाव काय होते ?

- राधाबाई


 4 ) सावरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

  - यमुनाबाई


 5) सावरकरांच्या मोठ्या भावाचे नाव काय होते ?

  --बाबाराव सावरकर 


6 ) सावरकरांच्या आईच्यानंतर सावरकर यांचा सांभाळ कोणी केला ?

 - मोठे बंधू बाबाराव यांची पत्नी येसू


7 ) अभिनव भारत संघटना  कोठे स्थापन झाली?

 - लंडन


8 ) इंडिया हाऊस कुठे आहे ?

  - लंडन 


9 )सावरकर यांचा हुतात्मा शिष्य कोण ?

- मदनलाल धिंग्रा 


10 )मदनलाल धिंग्राने कोणाचा वध केला?

 - कर्झन वायली


11) अनंत कान्हेरे यांनी कोणाचा वध केला ?

 - कलेक्टर जॅक्सन 


12 )सावरकर यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते?

- अंदमान (सेल्युलर जेल)


13 )सावरकर यांची अंदमानातून केव्हा सुटका झाली ?

 - 6 जानेवारी 1924 


14 )सावरकर यांच्या  सुटकेसाठी कोणत्या नेत्यांनी प्रयत्न केले ?

 - विठ्ठलभाई पटेल ;रंगस्वामी अय्यंगार 


15 )सावरकरांनी किती आंतरजातीय विवाह घडवून आणले ?

 - 15 


16 ) सावरकर यांनी रत्नागिरी येथे कोणते मंदिर स्थापन केले?

  - पतितपावन मंदिर 


17 )सावरकर यांनी मराठी भाषेत किती पाने लिहिली आहेत ?

- सुमारे  10,000


18 ) सावरकर हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केव्हा आणि कोठे होते ?

  - मुंबई 1938 


पंडीत नेहरू यांच्याविषयी माहिती बघूhttps://www.marathisampurn.com/2022/05/pandit-neharu-yanchi-mahiti.html


★★★★★★★■■■■■■★★★★★★★★★★

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area