Google ads

Ads Area

शब्दांच्या जाती क्रियापद, धातू ,धातुसाधित / कृदंत ,कर्ता, कर्म यांची माहिती | shabdanchya jatiKriyapad,dhatu,dhatusadhite/ krudant,karta,karm mahiti

 शब्दांच्या जाती क्रियापद,धातू ,धातुसाधित / कृदंत ,कर्ता, कर्म यांची माहिती|shabdanchya jati Kriyapad,dhatu,dhatusadhite/ krudant,karta,karm mahiti


क्रियापद धातू,कर्ता,कर्म
क्रियापद धातू,कर्ता,कर्म


क्रियापद,धातू ,धातुसाधित ,कर्ता ,कर्म (toc)

क्रियापद म्हणजे काय|kriyapad mhanje kay

 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. 

तो रडतो 

तो बोलतो 

आम्ही प्रार्थना म्हणतो 

क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तो वाक्यातील मुख्य शब्द असतो म्हणून त्याला मुख्यपद असे म्हणतात .तर इतर शब्दांना उपपदे असे म्हणतात.  


 धातू म्हणजे काय|dhatu mhanje kay


क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात; 

उदा  :1)  पळतो --हे क्रियापद

           पळ -- हा मूळ धातू ,मूळ शब्द

          2)  खातो -- क्रियापद

               खा -     धातू

          3)  जेवतो -- क्रियापद

                जेव -     क्रियापद

          4)  बसतो -- क्रियापद 

                 बस -- धातू

           5 )  चालतो -- क्रियापद 

                 चाल -- धातू 

           6 ) लिहितो -- क्रियापद 

                  लिही --  धातू

            7 )  वाचतो -- क्रियापद 

                    वाच -- धातू  


धातुसाधित / कृदंत | Dhatusadhite /krudant mhanje kay


तर धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवित  नसेल तर त्याला धातुसाधित / कृदंत असे म्हणतात .

धातूला जेव्हा प्रत्यय लागून जे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थपूर्ण करत असतात तर त्यांना आपण क्रियापदे म्हणतो. उदा.

 बस  -बसतो /बसला /बसतात 

तसेच धातूला  णे ,  त ,ता  ,ना , ऊ, ऊन  हे प्रत्यय लागून क्रियावाचक वाचक शब्द बनतात .

 बसणे ,बसत ,बसता, बसताना ,बसू , बसून 

ह्या शब्दातून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही .

हे  शब्द नाम , विशेषणे , क्रियाविशेषण यांचे कार्य करतात. धातूपासून तयार झालेले असे शब्द असतात त्यांना धातूसाधिते किंवा कृदंत असे म्हणतात .

धातूंना जोडल्या जाणारे प्रत्यय यांना संस्कृतात ' कृत प्रत्यय ' म्हणतात कृत  ( = करीत ) 

कृदंत ( = कृत + अन्त ) म्हणजेच ज्याच्या अंती केवळ कृत (= क्रियादर्शक ) प्रत्यय आहे असा शब्द .

उदा .1)  खा - मूळ धातू 

            खाणे - धातुसाधित / कृदंत

            खातो --   क्रियापद

         2) बस -- मूळ धातू 

             बसणे - धातुसाधित / कृदंत

             बसतो - क्रियापद

          3 )  गा - धातू 

               गाणे -   धातुसाधित / कृदंत

               गातो -- क्रियापद

           4) कर - धातू 

               करणे - धातुसाधित/ कृदंत

               करतो - क्रियापद

           5) चाव - धातू 

                चावणे -   धातुसाधित / कृदंत

                चावतो - क्रियापद


   क्रियापद म्हणजे काय | kriyapad

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

धातूला प्रत्यय जोडून तयार केलेला शब्द पूर्ण क्रिया दर्शवित असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात.

1 )   चढ  - धातू

      चढणे /चढत/चढून-  धातुसाधित / कृदंत

      चढतो/ चढला  - क्रियापद


   2)  धातू - रड

  धातुसाधित /कृदंत - रडणारा /रडून/ रडताना

 क्रियापद - रडतो / रडला


  ★ धातू - वाच


  ★ धातुसाधित /कृदंत - वाचणारा / वाचून  / वाचताना


  ★क्रियापद - वाचतो / वाचला



धातुसाधितांचे कार्य व उपयोग

धातुसाधित नाम  :   त्याचे रडणे लांबूनच ऐकू आले

धातुसाधित विशेषण  :    हिरवा पोपट उडून गेला

 धातुसाधित क्रियाविशेषण  :  तो पळताना पडला


धातूची वैशिष्ट्ये 

★ म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द 

★धातू ही शब्दजाती विकारी आहे

 तिला लिंग, वचन, पुरुष ,काळ व अर्थ असे पाच प्रकारचे विकार होतात.

 ★धातू विकार होऊन जे रूप तयार होते ते क्रियापद होय. ★धातू ही क्रियादर्शक शब्दजाती असली तरी ती प्रत्येक धातू क्रिया दाखवतोच असे नाही, काही धातू क्रियादर्शक असतात तर काही धातू सत्तादर्शक , स्थितीदर्शक , स्थित्यंतरदर्शक असतात.


कर्ता ,कर्म म्हणजे काय  | karta karm mhanje kay

क्रियापद हे वाक्यातील महत्त्वाचा शब्द असतो क्रियापद आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होत असल्यामुळे क्रियापदाला खूप महत्त्व असते .काही वेळेस क्रियापद नसतानाही वाक्य आपण बोलत असतो ,पण त्याने अर्थपूर्ण होत नाही, काही वाक्यात क्रियापद हे गुप्त म्हणजेच म्हणीवजा व वाक्यात तो गुप्त किंवा गाळलेल्या स्वरूपात असतो .

उदा.

★एकी हेच बळ  (आहे )

 ★सगळे मुसळ केरात ( गेले )

 ★शितावरून भाताची परीक्षा (होते.)

       

      क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोण असतो त्यास कर्ता असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी क्रिया करणारा म्हणजेच तो वाक्यातील कर्ता असतो. हा कर्ता क्रियापदाने दाखविलेली  क्रिया कर्त्यापासून निघते आणि ती कोणावर तरी घडते . हा कर्ता दाखविलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे  होय.

      म्हणजेच वाक्यातील क्रियापदाने दाखवलेली जी क्रिया  त्यापासून निघते आणि ते दुसऱ्या कोणावर तरी घडत असते त्या क्रियांचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्याचे कर्म होय.

    एकंदरीत आपल्या असे लक्षात आले असेल की कर्ता म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता म्हणतात , तर क्रिया कोणावर घडते ते त्याचे कर्म होय


 वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधावे | krta ,karm kse shodhave

वाक्यातील कर्ता व कर्म शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा लागतो. त्यामुळे धातूला ' णारा 'हा प्रत्यय लावून कोण ? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.

उदा .

1) राम आंबा खातो

या वाक्यात खातो हे क्रियापद असून त्यात 'खा' हा धातू आहे. त्याला  ' णारा ' हा प्रत्यय लावून खाणारा कोण ? असा प्रश्न केला की 'राम' हा कर्ता मिळतो.

        वाक्यात कर्ता, कर्म, क्रियापद हे मुख्य असतात कर्ता शोधल्यानंतर कर्म शोधावे.  वाक्यातील कर्म शोधताना मुख्य क्रियापद आणि दाखवलेली क्रिया कोणावर घडते असा प्रश्न करावा ती क्रिया ज्या वस्तूवर किंवा प्राण्यावर घडते ते त्याचे कर्म.

उदा .

' राम आंबा खातो '  खाण्याची क्रिया कोणावर घडते ?आंब्यावर. म्हणून 'आंबा 'हे कर्म .


2 )' रामाने रावणाला मारले 'या वाक्यात मारणारा कोण  ? राम. म्हणून राम कर्ता. मारण्याची क्रिया कोणावर घडते ? रावण म्हणून रावण हे कर्म


3 ) 'मला लाडू आवडतो'  या वाक्यात आवडतो हे क्रियापद . 'आवड ' हा धातू  प्रश्न करू की  आवडणारे कोण (पण येथे पदार्थ असल्यामुळे )आवडणारे काय ? तर - लाडू ; म्हणून या वाक्यात लाडू हा कर्ता. ( मला हा करता नाही)


4 ) ' विद्यार्थी प्रामाणिक आहे ' या वाक्यात 'आहे' हे क्रियापद आहे तर ' अस ' हा मूळ धातू आहे. असणारा कोण ? -विद्यार्थी हा कर्ता आता असण्याची क्रिया कोणावर घडते ? विद्यार्थ्यावरच.  क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. म्हणून या वाक्यात कर्म नाही.  आहे हे क्रियापद अकर्मक आहे.


आणखी काही उदाहरणे


1 ) त्याला थंडी वाजते. वाजणारी कोण ?  थंडी - हा कर्ता.


2) राजाला मुकुट शोभतो -  शोभणारा कोण ?  मुकुट- हा कर्ता .


3) मला चंद्र दिसतो - दिसणारा कोण ?  चंद्र  -  हा  कर्ता .


वरील वाक्य त्याला, राजाला ,मला हे कर्ते नव्हेत यावरून तुमच्या असे लक्षात आले असेल की -

     क्रिया करणारा जो कर्ता व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे ते कर्म.


आज आपण शब्दांच्या जातीतील क्रियापद या घटकाची माहिती मिळवली .क्रियापद केवळ समजून घेऊन आपल्याला वाक्यरचना करता येत नाही ,त्यासाठी लागणारे शब्द  माहीत असणे गरजेचे आहे .धातू हा शब्द त्याला प्रत्यय लागल्यानंतर धातुसाधित शब्द तयार होतात. हे आपण शिकलो. वाक्यातील कर्ता  तसेच वाक्यातील कर्म ओळखता येणे गरजेचे आहे . 

           या लेखामध्ये कर्ता ,कर्म ,धातू ,धातुसाधित /कृदंत या शब्दांची ओळख करुन घेतली आहे . याचा व्यवस्थित अभ्यास करुन आपल्या समरणातून जाणार नाहीत अशी उदाहरणे यात दिलेली आहेत .

पुढील व्यकरणाचा घटक अभ्यासण्यासाठी marathisampurn ला भेट द्या.

1 ) समास



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area