Google ads

Ads Area

शब्दांच्या जाती विशेषण माहिती आणि प्रकार | shabdanchya jati visheshan mahiti & prakar

 शब्दांच्या जाती विशेषण माहिती आणि प्रकार | shabdanchya jati visheshan mahiti & prakar

शब्दांच्या जाती विशेषण
शब्दांच्या जाती विशेषण



विशेषण माहिती (toc)

 विशेषण म्हणलं की आपल्याला थोडसं वेगळं वाटतं. विशेष म्हणजे आपण काही तरी त्याच्यात विशेष आहे असं म्हणतो. पण व्याकरणदृष्ट्या विचार केला तर विशेषण म्हणजे कोणाविषयी तरी आपण काहीतरी बोलत असतो. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण विशेष असेच म्हणतो पण व्याकरणामध्ये आपण विशेषण असे म्हणत असतो  म्हणजे शब्दांच्या जातीपैकी आपण विकारी शब्दातील तिसरा घटक बघणार आहोत ,तो म्हणजे विशेषण होय.

 विशेषण म्हणजेच काय ? | visheshan mhanje kay?

नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.

 विशेष्य : ज्याचे वर्णन केले जाते ते विशेष्य होय.

विशेषण : वर्णन करणारे शब्द म्हणजेच विशेषण.

विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते.


विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात | visheshanache mukhya tin prakar


1) गुण विशेषण 

2) संख्या विशेषण 

3) सार्वनामिक विशेषण


1 ) गुणविशेषण | gunvisheshan

ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात.

उदा.

 मोठी माणसे

 पिकलेले जांभळ

 वृद्ध माणसे

 कडू कारले

 पिसाळलेला कुत्रा

 चपळ घोडा

 भित्रा ससा

 सुंदर हरीण

 हसरा माधव

 रडका पिंकू

 काळी म्हैस इ .


2 ) संख्याविशेषण | sankhyavisheshan

 ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात .

उदा . पाच मुले 

चौदा कला

 तिसरा वर्ग

 नववी इयत्ता

 दुप्पट सैनिक

 पुष्कळ धान्य 

काही माणसे

पंचविसवा वाढदिवस

द्विगुणित आनंद 

चौपदरी रस्ता

संख्यावाचक विशेषणाचे प्रकार| sankhyavachak visheshanache prakar


1) गणनावाचक संख्याविशेषण

या विशेषनाममध्ये केवळ गणती म्हणजेच गणना (मोजणे) करण्याकडे लक्ष असते त्यास गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात.

गणनावाचक विशेषण दोन पद्धतीने लिहितात.

१ अक्षरांनी 

२ आकड्यांनी


गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन प्रकार पडतात

अ ) पूर्णांकवाचक: पूर्ण संख्या असलेले म्हणजेच पूर्णांकवाचक होय

उदा . एक, दोन, तीन, चार, पाच, सहा ,सात ,आठ ,पन्नास, शंभर ,हजार ( 1,2,3,4,5,6,7,8,...50,..100...1000 )


ब) अपूर्णांकवाचक :पूर्ण संख्येत या संख्या वाचल्या जात नाहीत त्याच अपूर्णांकवाचक संख्या होय .

पाव, अर्धा ,पावून ,चतकोर                         ही                  

 क) साकल्यवाचक  ( सर्वच्या सर्व )

उदा. दोघे, उभयता,द चारही ,पाची,


तो चौपदरी रस्ता आहे 

ही माझी पँट आहे 

काकांना चार मुले आहेत

आम्ही पाचही भावंडे साताऱ्यात शिकलो.


संख्याविशेषणाचे आणखी  प्रकार पाहायला मिळतात.


2 ) क्रमवाचक विशेषण

उदा. पहिला वर्ग , 

पाचवा बंगला, 

नववी इयत्ता 

विसावे वर्षे

 वरील वाक्यातील पहिला ,पाचवा, नववी ,विसावे हे वस्तूंचा क्रम दाखवतात अशांना क्रमवाचक विशेषण म्हणतात.

प्रथमा ,द्वितीया ,सप्तमी हे संस्कृतमधील क्रमवाचक विशेषणे मराठीतही वापरतात.


2 )आवृत्तीवाचक संख्याविशेषण:

 दहावी पिढी, 

 द्विगुणित आनंद,

 दसपट मुले, 

 दुप्पट पैसे 

वरील वाक्यात दहावी, द्विगुणित ,दसपट,दुप्पट ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे दाखवत असतात अशा शब्दांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

आणखी उदाहरणे: चौघडी, चौपदरी, शतगुणित


3) पृथकत्ववाचक संख्याविशेषण 

ह्यात ही विशेषणे वेगवेगळी पृथक असा बोध करुन देत असतात .

उदा. एकेक मुलगा

 दहादहांचा  मुलांचा गट 

यातील ' एकेक,पाचपाचदा, दहादहांचा ' ही विशेषणे वेगवेगळा असा बोध करुन देतात.


5 ) अनिश्चित संख्यावाचक विशेषणे

यामध्ये कोणतीही निश्चित अशी कोणतीही संख्या दाखवली जात नाही.म्हणून यास अनिश्चित संख्यावाचक विशेषणे म्हणतात .

उदा .

 सर्व रस्ते 

 थोडी मुले

 काही पक्षी

 इतर माणसे

 इत्यादी जिल्हे


इतर उदाहरणे: अल्प,अन्य,एकंदर  ( सर्व एकत्र )


2) सार्वनामिक विशेषणे :

एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केल्यास अशा सर्वनामास सर्वनामिक विशेषण म्हणतात.


हा मनुष्य

तो पक्षी

माझे पुस्तक

 तिच्या बांगड्या

 असल्या टोप्या

 कोणता देश

  वरील जी वाक्ये आहेत त्या वाक्यातील हा, तो, मी ,ती असा ,कोण हे मुळात सर्वनामे आहेत. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा शब्द, परंतु ह्या वाक्यामध्ये सर्वनामांच्या पुढे नामे आली आहेत, ही सर्वनामे नसून त्यांच्यापुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजेच ती विशेषणाचे कार्य करत असतात सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषांना सार्वनामिक किंवा सर्वनामसाधित विशेषण असे म्हणतात.

         मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशा वेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता  त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो .

मी  - माझा माझे माझी माझ्या 

तू  - तुझा तुझी तुझ्या तुझी

तो- -  त्याचा त्याची त्याचे त्याच्या

तुम्ही - तुमचा तुमचे तुमच्या तुमची

हा - असा असला येत का एवढा आमका

जो - जसाजसा ला जितका जेवढा

आम्ही - आमचा आमचे आमच्या

ती -  तिचा तिच्या तिचे

तो - तसा तसला तितका तेवढा तमका

कोण - कोणता केवढा

काय - कसा कसला

उदा . असला / ( वाईट) नवरा नको ग बाई !

हा आमचा / ( पांढरा) घोडा आहे.



3 ) धातुसाधित विशेषणे : 

धातू म्हणजे क्रियापदाच्या मूळ शब्दाला असे म्हणतात. धातूंना प्रत्यय जोडून त्यांचा नामापूर्वी विशेषणासारखा उपयोग होतो.

 उदा.पिकलेला पेरू

 बोलणारे मूल

 पेटती काडी

वाहती गंगा

 धावणारी गाडी

वरील उदाहरणांमध्ये पिक, बोल, पेट ,वाह,धाव हे  मूळ धातू आहेत . त्यांना प्रत्यय जोडून जे शब्द बनतात ती नामापूर्वी येतात ती विशेषणे या विशेषांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. तसे पाहिले तर ही सारी विशेषणे गुणविशेषणच आहेत ,पण धातूंना निरनिराळे प्रत्यय लागून बनलेले हे शब्द विशेषणाचे कार्य करतात. म्हणून धातुसाधित विशेषणे असा वेगळा प्रकार मानतात.


4 अव्ययसाधित विशेषणे : 

अव्ययापासून बनलेल्या या विशेषयांना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात.

           वर, खाली, मागे, पुढे या मूळ अव्ययांना चा ,ला ,ईल प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात ते विशेषणाचे कार्य करताना आढळतात.

 वरचा माळा

खालची गच्ची

 मागील दार

 पुढची झाडी


5) परिणामवाचक विशेषण:  

जे शब्द संख्येत मोजता येत नाहीत,ते शब्द नामापूर्वी वापरलेले प्रमाणदर्शक शब्द असतात, त्यास परिणामवाचक विशेषण म्हणतात.

 उदारणार्थ.

 काही लोक 

 थोडे पाणी


6 ) समासघटित विशेषणे

सामासिक शब्दांचासुद्धा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो, त्याला समासघटित विशेषणे म्हणतात.

उदा .दसमुखी रावण

 एकवचनी हरिश्चंद्र

नवरात्र महोत्सव


विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात

1 ) अधिविशेषण / पूर्व 

नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधि /पूर्व विशेषण म्हणतात. 

विषेशण हे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी येते .

 उदा . ' शहाणा ' मुलगा शांत असतो.

          ' शांत ' मुलगा सगळ्यांना आवडतो.

2) विधिविषेशण / उत्तर

नामानंतर येणाऱ्या विशेषाना विधि/ उत्तर विशेषण म्हणतात.

उदा .गुलमोहर मोहक दिसतो.


          नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही असला तरी तो विशेषणच असतो, 

          तर क्रियापदबद्दल माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो .


प्रश्नावली

1)  खालील शब्दातील गुणविशेषण ओळखा 

 - दहा लिटर दूध 

--अर्धा मीटर कापड

--कडू कारले 

-पुष्कळ धान्य

उत्तर . कडू कारले


2) खालील नामसाधित विशेषण कोणते ?

- दयाळू माणूस

 - हसरे माणूस

 - धावती गाडी 

- वाहती नदी

उत्तर - दयाळू माणूस


3 ) खालीलपैकी सर्वनामिक विशेषण कोणते ?

सर्व फुले 

चौकट फुले 

सुंदर फुले

ती फुले

उत्तर : ती फुले


4 ) धातुसाधित विशेषण ओळखा.

- पुढचे घर 

- फडकी माडी

- चौथी भिंत

- उंच इमारत

उत्तर : पडकी माडी


5) गणनावाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते

एक तास

 काही तास 

पुढचा तास

 मागील तास

उत्तर : एक तास


6)  अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

दोन मजली 

राबते घर

मधले घर

 आमचे घर

उत्तर :  मधले घर


7) नामसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखून लिहा

- मोडके खेळणी 

- तिची खेळणी

 - लाकडी खेळणी 

- आकर्षक खेळणी

उत्तर : लाकडी खेळणी


8 ) क्रमवाचक संख्याविशेषणाचे उदाहरण लिहा

- एक तास 

- चौपट भिंत

- बारावे वर्ष 

- दोनदोनच्या जोड्या

उत्तर : बारावे वर्ष


9) श्रावण या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणते

 - श्रावण 

- श्रावणी

-  श्रवणीय

 - श्रावणमास

उत्तर : श्रवणीय


10 ) 'असला नवरा नको ग बाई !' या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे

- गुणविशेषण 

- दर्शक विशेषण 

- सार्वनामिक विशेषण

 - अनिश्चित विशेषण

उत्तर: सार्वनामिक विशेषण


11 ) 'आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला' अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

 - गुणविशेषण

 - आवृत्तीवाचक

 - क्रमवाचक 

- अनिश्चित

उत्तर : आवृत्तीवाचक


12) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे . अधोरेखित शब्दांच्या विशेषणाचा प्रकार ओळखा ( संदिग्ध प्रश्न )

साधित विशेषण

नामसाधित विशेषण 

परिणाम दर्शक विशेषण

 अविकारी विशेषण

उत्तर :नामसाधित विशेषण









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area