शब्दांच्या जाती सर्वनाम| shabdanchya jati sarvanam
शब्दांच्या जाती सर्वनाम |
शब्दांच्या जाती मध्ये आपण दुसरा प्रकार बघतोय सर्वनाम. आठ जातींपैकी आपण अव्यय असे आपण त्यांची तोंडओळख करून घेतली. त्यानंतर नामाचे प्रकार पाहिले. आता आपण सर्वनाम आणि त्याचे प्रकार बघणार आहोत
सर्वनाम म्हणजे काय | sarvanam mhanje kay
नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामांना असा स्वतःचा अर्थ नसतो पण तिच्या नामासाठी वापरले जातात त्या याचाच अर्थ सर्वनामांना प्राप्त मिळत असतो सर्वनाम यांना प्रतिनामे असेही म्हटले जाते.
सर्वनामाचे प्रकार | saranamache prakar
सर्वनामाचे प्रकार याविषयी अनेक मतमतांतरे असलेले दिसून येतात एकंदरीत आपल्याकडे सर्वनामाचे सहा प्रकार पाहायला मिळतात ,परंतु मराठीमध्ये आपले सर्वनाम हे स्वतंत्र शब्द जात मानले जाते पण संस्कृत मध्ये असेच मानले जात नाही 'दामले' यांनी मराठीत नऊ प्रकारचे सर्वनाम मानले आहेत तर 'चिपळूणकर' यांनी सर्वनामाचे आठ प्रकार आहेत असे सांगितले आहे.
सर्वनामाचे प्रकार
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य अनिश्चित / सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
हे सहा प्रकार सर्वनामाचे आहेत तर मराठीत एकूण सर्वनाम नऊ आहेत .
उदा.
मी, तू, तो, ती ,त्या ,ते, हे ,ह्या, जो ,जि,,ज्या, कोण ,आपण, काय, स्वतः इ.
सर्वनामाचे प्रकार
1 पुरुषवाचक सर्वनाम
पुरुषवाचक सर्वनाम बोलणाऱ्याच्या किंवा येणाऱ्या च्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडत असतात
१) बोलणाऱ्यांचा
२) ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो
३) ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीचा वस्तूंचा..
यांना व्याकरणात पुरुष असे म्हटले जाते. या तिन्ही वर्गातील नामाच्या बदल येणारे सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हटले जाते.
1 ) प्रथम पुरुषवाचक
बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती पुरुष वाचक सर्वनाम.
उदा . मी, आम्ही ,आपण, स्वतः
★ मी उद्या मंदिरात जाणार आहे.
★ आम्ही तेथे येऊ
★ आपणहून तेथे गेलो
★ स्वतः तेथे जातीने उभा होतो.
2 )द्वितीयपुरुषवाचक
ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम
उदा . तू , तुम्ही, आपण, स्वतः
◆तू एवढं काम काशील
◆ तुम्ही एवढा जागा घ्या
◆ आपण जाऊ शकता
◆ स्वतः हे काम केले
3 ) तृतीय पुरुषवाचक
ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनाम होय. उदा.तो, ती ,ते ,त्या ही पुरुषवाचक सर्वनामे होत.
★तो चांगला खेळला म्हणतात
★ती सुंदर गात होती
★त्या नेहमी सांगत
★ते सतत बोलत होते
2 ) दर्शक सर्वनाम
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवायची असेल तर जे सर्वनाम येते ते दर्शक सर्वनाम होय .
उदा .हा ,ही ,हे ,तो ती ते
★सचिन क्रिकेट खेळतो :तो चांगली बॅटींग करतो
या वाक्यात सचिन हा वाक्यातील कर्ता आहे म्हणजेच कर्ता हा नाम किंवा सर्वनाम असतोच. वरील दुसऱ्या वाक्यात सचिन ऐवजी तो शब्द वापरला आहे .त्यामुळे वाक्यसुद्धा तो बद्दलच माहिती सांगत आहे . नामाऐवजी आले असल्याने ते सर्वनाम होते व ते निर्देश करते .म्हणून तो शब्द दर्शक सर्वनाम होय .
3) संबंधी सर्वनाम :
गौण वाक्यातील जो, जी ,जे ज्याचा वापर पुढे येणाऱ्या मुख्य वाक्यातील तो,ती,ते त्या शीतोचघटक आहे घटक असे संबंध दर्शविण्यासाठी केल्यास ते संबंधी सर्वनाम होतात.
उदा .★जे चकाकते,ते सोने नसते
★जे पेराल ,ते उगवेल
★जो करेल,तो भरेल
4) प्रश्नार्थक सर्वनाम
ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा .कोण ,कोणाला ,कोणास, काय ,कोणी इ.
★रामाने रावणास मारले- - रावणास कोणी मारले ?- रामाने कोणास मारले ?
वरील वाक्यात 'राम व रावण' या नामाबद्दल कोणी ,कोणास' हे शब्द वापरले आहेत .म्हणून ती सर्वनामे होतात ,पण त्यांचा वापर नामांची पुनरावृत्ती टाळणे हा नसला तरी प्रश्न विचारणे हा आहे ; म्हणून यास प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.
5) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम :
काय ,कोण हे सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.
उदा.
★त्या डब्यात काय आहे ते सांग.
★कोणी, कोणास काय बोलावे !
★कोण ही गर्दी !
★कोणी यावे टिकली मारुन जावे
★तिच्या मुठीत काय ते सांग पाहू !
विधानार्थी व उद्गारवाचक वाक्यात वापरलेले कोण व काय हे शब्द अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असतात; परंतु वरील सर्वनामांचा वापर प्रश्नार्थक वाक्यात केल्यास ती प्रश्नार्थक सर्वनामे होतात.
6) आत्मवाचक सर्वनाम
आपण, स्वतः , निज या सर्वनामांचा वापर स्वतः या अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे होतात . अशावेळी ती कर्त्यानंतर वापरली जातात.
उदा . 1 .मी स्वतः त्याला पाहिले
2 .तो स्वतः मोटार होशील का ?
3. तो आपण होऊन माझ्याकडे आला.
4. पक्षी निज बाळांसह बागडते.
वरील वाक्यात आपण या सर्व नावाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो ,तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते .यालाच कोणी 'स्वतःवाचक सर्वनाम' असेही म्हणतात .
'आपण व स्वतः' हे दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. तेव्हा या दोन्हीत फरक इतकाच की पुरुषवाचक 'आपण' हे फक्त अनेकवचनात येते .
आत्मवाचक 'आपण' हे दोन्ही वचनात येते. पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या आरंभी येऊ शकते, आत्मवाचक आपण तसे येत नाही. 'आपण' हे 'आम्ही' व तुम्ही या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व स्वतः या अर्थाने येते. तेव्हा ते आत्मवाचक असते.
प्रश्नावली
1) संबंधी सर्वनामाचे उदाहरण खालील वाक्यातील काळ ओळखा
★जो करतो, तो बोलतो .
★कोणी ऐकावे, कोणी बोलावे .
★कोण काय बोलणार .
★तो करतो व बोलतो.
उत्तर :जो करतो, तो बोलतो .
2 ) आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य खालील वाक्यातून ओळखा
*आपण आता खेळूया
*आपण केव्हा येणार ?
*आपण आमचा मान राखालात.
* ती आपण होऊन आली
उत्तर: ती आपण होऊन आली
3 ) निश्चित आत्मवाचक सर्वनाम खालील उदाहरणातून ओळखा
* निज
* आम्ही
* ते
* आपण
उत्तर : निज
4 )
★आपण आत जाऊया
★आपण आत यावे
★आपण घाबरलो
★ तो ठरवतो
वरील वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे ते ओळखून लिहा.
उत्तर :आपण आत यावे
5 ) सर्वनामांना ..........असे म्हणतात
★क्रियाविशेषण
★विशेषनामे
★ सर्वनामे
★प्रतिनामे
उत्तर: प्रतीनामे
6 ) हरी, घरी कोण येऊन गेले ?सर्वनाम ओळखा.
उत्तर : कोण
7 ) 'टेबलावरील ती माझी वही आहे ' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार सांगा.
उत्तर: दर्शक सर्वनाम
8 ) स्वतः या या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा.
★संबंधी सर्वनाम
★आत्मवाचक सर्वनाम
★दर्शक सर्वनाम
★प्रश्नार्थक सर्वनाम
उत्तर: आत्मवाचक सर्वनाम
9 ) सर्वनामाचे मुख्य प्रकार किती?
★पाच
★सात
★नऊ
★सहा
उत्तर : सहा
10 ) मी बाजाराला आलेलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा
★आलेलो
★बाजाराला
★ मी
★आहे
उत्तर : मी
11) 'ज्याला कर नाही डर कशाला ' सर्वनामाचा प्रकार ओळखा.
★ दर्शक सर्वनाम
★ संबंधी सर्वनाम
★ प्रश्नार्थक सर्वनाम
★ सामान्यनाम
उत्तर : संबंधी सर्वनाम
12) ' हा ,ही,हे ' हे सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत
★संबंधी सर्वनाम
★ प्रश्नार्थक सर्वनाम
★ दर्शक सर्वनाम
★ आत्मवाचक सर्वनाम
उत्तर : दर्शक सर्वनाम
मित्रहो ! सर्वनामाच्या उदाहरणांचा अशा दिलेल्या प्रश्नांचा सराव केला तर तुमची चांगली तयारी होईल आसनी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण निर्माण होणार नाही.
marathisampurn या site वर जाऊन मराठी व्यकरणाचा अभ्यास करा .