Google ads

Ads Area

पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती | pandit neharu yanchi mahiti

 पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती | pandit neharu yanchi mahiti
पंडित जवाहरलाल नेहरु
पंडित जवाहरलाल नेहरु

पंडित जवाहरलाल नेहरु (toc)

जवाहरलाल नेहरू यांना मुले आणि फुले खूप आवडत होती अशी नेहरूंची ओळख सर्वदूर आहे. मुले त्यांना अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी  'बालदिन ' म्हणून साजरा केला जातो तर लहान मुले चाचा नेहरू म्हणत होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांनी आपल्या भारताचे नेतृत्व स्वीकारले. 
        जवाहरलाल नेहरू हे एक स्वातंत्र्य सेनानी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना चांगले सहकार्य केले .महात्मा गांधीही नेहरूंना एक आशेचा किरण म्हणून पाहत होते, भारताचे भविष्य म्हणून विश्वासाने जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाहत होते जवाहरलाल नेहरू एक आदर्श व्यक्तिमत्त्व असलेले आणि महात्मा गांधीजींचे शिष्य मानत असलेले प्रसन्न असे व्यक्तिमत्व भारताला पंतप्रधान म्हणून लाभले .

जवाहरलाल नेहरू यांचे जीवन| pandit neharu yanche jivan

  लाल नेहरू यांचा जन्मा 14 नोव्हेंबर 19न89 रोजी झाला त्यांचे वडील ; मोतीलाल नेहरू 

आलाबाद याठिकाणी वकील म्हणून प्रसिद्ध होते 

आई : स्वरूप राणी 

मोतीलाल नेहरू यांना चार अपत्य होती. तीन मुली एक मुलगा, मुलगा हा जवाहरलाल नेहरू होता.

 हे एक काश्मीर वंशाचे सारस्वत ब्राह्मण होते. त्यांनी चांगल्या उत्तम शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले त्यांनी हॅरो येथून शिक्षण घेतले ,केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून ऍडमिशन घेऊन आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये वास्तव्यास राहून त्या ठिकाणी सात वर्षे अभ्यास करून त्याठिकाणी त्यांच्यावर समाजवाद आणि आयरिश राष्ट्रवादाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडलेला दिसून येतो.


पंडित नेहरूंची राजकीय कारकीर्द | pandit neharu yanchi rajakiy karkird

ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झाले त्या वेळेस ते भारतात 1912 मध्ये आले त्यांनी आपला व्यवसाय वकिली सुरू केली .कमला कौल या मुलीशी त्यांचा विवाह 1916 मध्ये झाला. त्यानंतर लगेच 1917 मध्ये होमरूल लीग या चळवळींमध्ये ते सामील झाले . राजकारणाची खरी दीक्षा त्यांना महात्मा गांधी यांची भेट झाल्यावर,  त्यांच्या संपर्कात विचारात आल्यानंतरच वाढू लागली . 

        महात्मा गांधीनी रौलट कायद्याविरोधी मोहीम उभारली .तेव्हा गांधीं यांच्या संपर्कात आल्याने नेहरू अधिक आकर्षित झाले. त्यामुळे महात्मा गांधी हे नेहरूंकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत होते. भारताचे भविष्य नेहरूंकडे सोपवले तरी काहीही बिघडणार नाही विश्वास होता .गांधी विचारांचा प्रभाव नेहरू घराण्यावर असलेला दिसून येतो . त्यांनी या विचाराद्वारे पाश्चात्य कपडे आणि महागड्या वस्तू यांचा बहिष्कार केला. गांधींसारखे गांधीटोपी आणि खादी कुर्ता घालण्यास सुरुवात केली. त्यांची सुरुवात यातूनच दिसून येते 1920 ते 1940 या काळात असहकार चळवळ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सहभाग घेतला यामुळे त्यांना अटक करण्यात आली .

         1924 मध्ये जवाहरलाल नेहरू हे आलाहाबाद या ठिकाणी वास्तव्यास असताना महानगरपालिकेचे अध्यक्ष बनले महानगरपालिकेचे दोन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आला शिक्षण ,आरोग्य, स्वच्छता यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु 1906 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला कारण की ब्रिटिश सरकारचे सहकार्य मिळाले नसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला .

     1926- 28 यादरम्यान  जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम करू लागले . कॉंग्रेसचे अधिवेशन 1928 ते 1929 या दरम्यान होते, त्याचे अध्यक्ष त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे पाहत होते. या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू आणि सुभाष चंद्र बोस यांनी भारताला संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी पाठिंबा दर्शवला. परंतु मोतीलाल नेहरू व इतर नेते यांनी ब्रिटिश साम्राज्यात भारतात अधिराज्य हवे होते यामुळे थोडासा विचारात मतभेद झाले असले तरीही महात्मा गांधी यांनी त्यामध्ये तडजोड करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला . ब्रिटनला भारत राज्याचा दर्जा देण्यासाठी दोन वर्षाची मुदत मागितली होती. एक वर्षाने कमी व्हावी यासाठी जवाहरलाल न आणि बोस हे आग्रही होते यावर मात्र ब्रिटिश अधिकारी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

     1929 मध्ये लाहोरमध्ये काँग्रेस अधिवेशन झाले . या अधिवेशनामध्ये जवाहरलाल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले . या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी असा ठराव मंजूर करण्यात आला होत आणि त्याचवेळी 26 जानेवारी 1930 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला. 1930 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ उभी केली. ब्रिटिश अधिकारी सरकारला काही मागण्या मान्य कराव्या लागल्या.

         1935 च्या अधिनियमाच्या वतीने ब्रिटिश सरकारने  निवडणुका लागू केल्यामुळे काँग्रेस पक्षाने निवडणूका लढवण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतला. यामध्ये नेहरूंनी कोणताही सहभाग नोंदवला नाही परंतु पक्षासाठी जोरदार प्रचार करत होते. काँग्रेसने संपूर्ण भारतात सरकार स्थापन केले .मध्यवर्ती विधानसभेत चांगल्या जागा जिंकल्या 1936 1937 आणि 1945 मध्ये जवाहरलाल नेहरुंची काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली .

        1942 मध्ये भारत छोडो आंदोलन म्हणजे चले जाव ची घोषणा करण्यात येत होती त्यावेळेस त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली. 1945 मध्ये त्यांची सुटका केली. भारत आणि पाकिस्तान स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत यांची महत्त्वाची भूमिका होती .

        1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून यांची निवड करण्यात आली .

        याच वेळी पाकिस्तान यांच्या सीमेवर स्थलांतर दंगली तसेच सुमारे पाचशे राज्ये  भारतामध्ये सामील करून घेणे ,नवीन राज्यघटना तयार करणे ,संसदीय लोकशाहीसाठी प्रशासकीय व राजकीय चौकट निर्माण करणे अशा महाभयंकर संकटांना, आव्हानांना सामोरे जावे लागले.

इतर कामे 

 स्वतंत्र भारताचे पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा भारतासाठी आणल्या . भारत देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी आपले कार्य तडीस नेले तसेच त्यांनी इतरही क्षेत्रामध्ये कार्य प्रगतीपर ठेवले विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास प्रोत्साहित केले त्यामुळे कृषी आणि उद्योग या क्षेत्रात नवीन वारे निर्माण सुरू झाले . परराष्ट्र धोरणामध्ये नेहरूंची भूमिका आग्रही ठरली . नियोजन आयोग स्थापन केला .

    मार्शल टिटो आणि नासेर यांच्याबरोबर आशिया आणि आफ्रिकेत असलेला वसाहतवादाच्या निर्मूलनासाठी एकत्रितपणे सर्व उभी केली. कोरियन युद्ध संपविणे , सुएझ कालव्याचा वाद मिटवणे आंतरराष्ट्रीय समस्यांचे निराकरण करणे यामध्ये ते मध्यस्थी होते.


भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू | bharatache pahile pantaprdhan pandit neharu

गांधी यांच्या विचारांचा प्रभाव नेहरू यांच्यावर असल्यामुळे त्यांनी आपले यशस्वी कार्यक्रम करून दाखवले .काँग्रेसचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात  त्यांची महत्त्वाची भूमिका होती, गांधी विचाराने ते अतिशय प्रेरित झाले होते. 

          1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधी यांना भेटले आणि त्यांच्या विचारांचा पगडा आपल्या कारकीर्दीमध्ये करून घेतला त्यांच्या विचाराचा एवढा पगडा होता की त्यांनी ्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवून पाश्‍चात्त्य वस्तूचा बहिष्कार केला आणि खादी वापरू लागले.

पंडित नेहरुंना भारतरत्न पुरस्कार| pandit neharuna bharatratn  puraskar

 नेहरू यांनी आपली कारकीर्द देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पणास लावली. त्यांनी 1928 मध्ये स्वतंत्र अशी भारत सर्व म्हणून सुरू केली . लाहोर या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष स्थान भुषविले. संपूर्ण स्वातंत्र्य भारताला हवे होते यासाठी सुभाष चंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारात साम्य होते यासाठी त्यांनी पुढाकार घेतला .

        1942 चले जाव चळवळ या चळवळी मध्ये काँग्रेस कमिटी मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो अशी घोषणा केल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर त्यांना अहमदनगर या ठिकाणी किल्ल्यात नेण्यात आल्यानंतर त्याठिकाणी तुरुंगात असताना त्यांनी  "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हा ग्रंथ लिहिला .त्यांनी अनेक भारतातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानात्मक असे प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे 1955 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार बहाल करण्यात आला.


पंडित नेहरू यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाल   | pandit neharu yancha pantapradhan kal

गांधी विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता, ज्या वेळेस 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेनी केली त्यावेळेस जवाहरलाल नेहरू यांना खूप मोठा धक्का बसला .आपल्या जीवनातील प्रकाश हरपला अशा शब्दात त्यांनी आपले गांधीजींबद्दल असणारे वक्तव्य केले. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाल बघता त्यासाठी त्यांनी अनेक उत्क्रांतीचे निर्णय घेतले. त्यांनी भारताची राज्यघटनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून पूर्ण करून घेतली. "हिंदू कोड बिल" महिलांसाठी महत्वाचे आहे म्हणून त्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला.

          संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. संविधानात अस्पृश्यता अल्पसंख्यांक त्यांना समान दर्जा, समान संधी, मिळावी अशी त्यात तरतूद करण्यात आली नियोजन मंडळाची स्थापना करण्यात, गोवा प्रश्न सोडवला आणि गोवा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. तंत्रज्ञानासाठी देशात संशोधन संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या.


जवाहरलाल नेहरु यांचे निधन |javaharlal neharu yanche nidhan

        भारताने परराष्ट्र धोरण स्वीकारले होते ,त्याच्यामध्ये पंडित नेहरू यांचा मोलाचा वाटा होता, शिवाय अलिप्ततावादी धोरण ही त्यांनी महत्त्वाचे स्वीकारले होते .त्यामुळे भारत देश कोणत्याही गटात न सामील होता स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी तत्पर असेल. 

        आपल्या शेजारील असणारे चीन यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध व्हावेत यासाठी पंडित नेहरू हे नेहमी अग्रणी होते भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमावादाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निकालात काढावा, यासाठी त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या. तरीही चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केले या घटनेचा फार मोठा त्यांना धक्का बसला .यामुळेच या धक्क्याने त्यांची प्रकृती खालावली गेली, त्यांना प्रखर असा आजार झाला आणि 1964 मध्ये दिल्ली या ठिकाणी त्यांचे  निधन झाले.

प्रश्नावली | quetion

1) पंडित नेहरू यांचा जन्म कधी झाला ?

 ---14 नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद


2) पंडित नेहरू यांचे पूर्ण नाव काय होते ?

--जवाहरलाल नेहरू


3) पंडित नेहरू यांच्या वडिलांचे नाव काय?

--मोतीलाल नेहरू


4) पंडित नेहरू इंग्लंडमध्ये किती वर्षे वास्तव्यास होते?

--सात वर्षे


5) पंडित नेहरू यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

--कमला नेहरू


6) भारत आणि चीन यांच्यात पहिले युद्ध कधी झाले ?

--1962


7) पंडित नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली देण्यात आला ?.

--1955


8 ) पंडित नेहरू यांच्या मुलीचे नाव काय ?

--इंदिरागांधी


9) पंडित नेहरू यांनी अहमदनगरच्या जेलमध्ये कोणते पुस्तक लिहिले  ?

--डिस्कवरी ऑफ इंडिया 1944


10)  पंडित नेहरू यांचे पंतप्रधान म्हणून किती वेळा नेमणूक झाली होती ?

--सलग तीन वेळा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area