Google ads

Ads Area

महाराष्ट्र दिन व कामगार दिन माहिती | maharashtra din &kamagar din marathit mahiti

 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन माहिती | maharashtra din & kamagar din marathit mahiti

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन माहिती
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन माहिती



महाराष्ट्र दिन व कामगार दिन(toc)

1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो  "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असा प्रत्येकाच्या ओठावर हे गाणे तरळलेल जाते अशा या महान महाराष्ट्र  राज्याची स्थापना कशी झाली, हे आपणास माहीत असणे गरजेचे आहे महाराष्ट्र म्हणजेच महान असे राष्ट्र असे म्हटले जाते आणि खरोखरच हे राष्ट्र म्हणजे एक महान असे राष्ट्र,महाराष्ट्र ही संतांची ,शूरांची, पराक्रमाची, त्यागाची, बलिदानाची भूमी आहे  शूरवीर महायोद्धे त्यांची भूमी आहे . महान महाराष्ट्राचा इतिहास माहित असणे गरजेचे आहे म्हणून 1 मे महाराष्ट्र दिन साजरा कसा करतात का करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 महाराष्ट्र राज्याची स्थापना | maharashtra rajyachi sthapna

 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र स्थापन करून या राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे तेव्हापासून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नवीन महाराष्ट्र राज्याची जबाबदारी स्वीकारली अशा या महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक इतिहास खूप मोठा असून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महाराष्ट्र भूमीने आपला प्रचंड सहभाग नोंदवला आहे. देशाचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महान शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

          संपूर्ण जगात या महाराष्ट्र राज्याची ख्याती पसरलेली आहे या महाराष्ट्र भूमीत मोठमोठे कलाकार, नेते, थोर विचारवंत संत ,महंत, साहित्यिक जन्मास आले आणि त्यांनी आपला महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आपल्या जिवाची पर्वा न करता महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी जीवाची बाजी केली.


 महाराष्ट्र दिन असा करतात साजरा|maharashtra din asa kartat sajara

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसे महाराष्ट्र स्वतंत्र झाला म्हणून मोठ्या उत्साहात महाराष्ट्र या राज्याची महती गात असतात . मराठी माणूस मोठ्या उत्साहाने या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जसा स्वातंत्र्यदिन साजरा करतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र दिन सुद्धा साजरा करत असतात विविध ठिकाणी म्हणजे शासकीय कार्यालये या ठिकाणी महाराष्ट्र दिन हा ध्वजारोहण करून साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे कार्यक्रम साजरे केले जातात आणि महाराष्ट्र या राज्याविषयी आपले मनोगत सांगण्यासाठी अनेकांचा पुढाकार असतो आणि असाच पुढाकार ऐकत असताना सगळेजण महाराष्ट्र राज्याची ख्याती ऐकत असताना भारावून जात असतात .

शाळेमध्ये विद्यार्थी महाराष्ट्र दिनाविषयी भाषण करत असतात, त्यानंतर शिक्षक महाराष्ट्र राज्याचे महत्त्व पटवून सांगून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे असणारे जागतिक पातळीवर महत्त्व पटवून देऊन महाराष्ट्र राज्याविषयी गीते सामूहिक पद्धतीने गायली जातात. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मिती करण्यासाठी 106 हुतात्म्यांचे बलिदान झाले. त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते आणि महाराष्ट्र हे सातासमुद्रापलिकडे कशा पद्धतीने आपली थोरवी या गीतांमधून आणि भाषणांमधून व्यक्त करीत असतात.


 महाराष्ट्र दिनाचा इतिहास |maharashtra dinacha itihas


महाराष्ट्र दिन का साजरा करतात  | maharashtra din ka sajara kartat

महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असाच एक दिवस महाराष्ट्र हे एक स्वतंत्र राज्य  स्थापन करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटन येथे अनेक लोक एकत्र जमले होते हा जमाव यासाठी होता,की  राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्र या राज्यात मुंबई हे नाकारली होती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसे चिडून होते अनेक सभा उधळून लावल्या, या निर्णयाचा निषेध म्हणून अनेक लोक फ्लोरा फाउंटन याठिकाणी एकत्र आले. चर्चगेट आणि बोरीबंदर या दोन ठिकाणापासून फ्लोरा फाउंटन याठिकाणी लोक चौकात जमा झाले त्याकाळचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार हा मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांना लाठीमार करण्यात आला ,तरीही मराठी सत्याग्रही मागे हटले नाहीत .त्यामुळे पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला आणि या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रसाठी लढणारे 106 आंदोलक हुतात्मे झाले म्हणून या हुतात्म्यांच्या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि मुंबई ही महाराष्ट्र राज्याची आहे यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते  आणि म्हणून जनसमुदायासमोर सरकारचे नमते घेऊन 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना मुंबईसह करण्यात आली आणि 1965 मध्ये जे 106 हुतात्मे झाले त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकांची उभारणी केली गेली .

महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे यासाठी आणि मुंबई ही महाराष्ट्राची असावी यासाठी 106 हुतात्मे झाले . 21 नोव्हेंबर 1956 रोजी या आंदोलकांना वीरगती प्राप्त झाली .


महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचे योगदान  | maharashtratil thor vyktinche yogdan

महात्मा गांधी यांनी महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले गेले आहे .

कवयित्री महादेवी वर्मा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या यांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा आहे असे म्हटले आहे . महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे शूरवीर पराक्रमी शौर्यवान देश प्रेमी यांची परंपरा या महाराष्ट्र राज्याला लाभली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रार्थना याच महाराष्ट्र राज्यात केली. लोकांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न केले या छत्रपती शिवरायांपासून वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू, नाना पाटील ,गोपाल कृष्ण गोखले यांनी आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज दिली हेच  या महान महाराष्ट्रात देशभक्त होऊन गेले .

महाराष्ट्रातील संत | maharashtratil sant 

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि त्यानंतर वारकरी संप्रदायाला पुढे नेण्यासाठी अनेक संत मंडळी या महाराष्ट्र भूमीत जन्मास आले ,त्यापैकी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी ,संत गोराकुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज, संत चोखामेळा ,संत कान्होपात्रा, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत एकनाथ, संत जनाबाई संत सेना महाराज


महाराष्ट्रातील समाज सुधारक  | maharashtratil samajsudharak

महाराष्ट्र या राज्यात अनेक महान थोर विचारवंत होऊन गेले भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेकांनी अनेक कष्ट सहन केले, तरीही त्याची पर्वा न करणारे असे महात्मा फुले महात्मा, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील,अण्णा भाऊ साठे अशा महान विचारवंतांनी समाज सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर, राजगुरू, नाना पाटील

नव महाराष्ट्राचे स्वप्न पाहणारे लेखक, बुद्धिवादी, प्रबोधनकार यांच्या विचाराने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. एस एम जोशी ,आचार्य अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे ,या सर्व बुद्धिवादी वर्गांनी संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले .


 बुद्धी वाद्यांचे विचार मराठीविषयी

 महाराष्ट्र विषयी असणारे विचार

गोविंदाग्रज : मंगल देशा |पवित्र देशा |

                 महाराष्ट्र देशा| प्रणाम घ्यावा माझा हा ,

                श्री महाराष्ट्र देश| राकट देशा| कणखर देशा 

                दगडाच्या देशा| नाजुक देशा!

                  कोमल देशा! फुलांच्याहि देशा||


श्रीपाद कृष्ण कोल्हटकर :

       बहु असोत सुंदर संपन्न की महा,

      प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा


कुसुमाग्रज :

.           माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,

            हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा


वसंत बापट :

           भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा 

           गौरीशंकर उभ्या जगाच मनात पूजिन रायगडा 


समर्थ रामदास स्वामी 

           मराठा तितुका मेळवावा 

           महाराष्ट्र धर्म वाढवावा


ज्ञानेश्वर महाराज :

            माझ्या मऱ्हाटीची बोल कवतुके|

             परी अमृतातेंही पैजा जिंके |

          . ऐसी अक्षरे रसिके| मेळविन ||


 माधव जुलियन :

          मराठी असे आमची मायबोली


ग रा मोगरे :

                  माता तशी स्वभाषा

                   शेवाया होय आपणा उचित

                     किंबहुना मातेहुनि अधिक हिची 

                     योग्यता असे खचित


ना के बेहरे : 

                  भाषा आमची छान

                  मराठी भाषा आमची छान


संत एकनाथ महाराज : 

       संस्कृत वाणी देवे केली 

      तरी प्राकृत काय चोरापासून झाली 


हुतात्मे झालेल्यांची नावे | hutatme jhaleli nave

  1. रामचंद्र सेवाराम
  2. सिताराम पवार
  3. जोसेफ पेजारकर
  4. चिमनलाल शेठ
  5. शंकर खोटे
  6. भास्कर कामतेकर
  7. धर्माजी नागवेकर
  8. रामचंद्र जाधव
  9. पी एस जॉन
  10. के जे झेवीयर
  11. वेदीसिंग
  12. शरद वाणी
  13. रामचंद्र भाटिया
  14.  गंगाराम गुणाजी 
  15. बंडू गोखले
  16.  निवृत्ती मोरे 
  17. आत्माराम पानवलकर 
  18. बालप्पा कामाठी
  19. धोंडू पारदुले
  20.  भाऊ कदम 
  21. यशवंत भगत
  22.  बाबू दाते 
  23. पांडुरंग जाधव
  24.  गोपाल कोरडे
  25.  पांडुरंग धाडवे 
  26. गोविंद जोगल
  27.  अनुप महावीर 
  28. विनायक पांचाळ 
  29. सिताराम महादे
  30.  सुभाष बोरकर 
  31. गणपत तानकर 
  32. सीताराम गयादीन
  33.  गोरखनाथ जगताप 
  34. महंमद आली 
  35. तुळशीराम बेलसरे
  36.  देवाजी पाटील 
  37. शामलाल जेठानंद 
  38. सदाशिव भोसले
  39.  भिकाजी रंगाटे
  40. वासुदेव मांजरेकर 
  41. भिकाजी बांबरकर
  42.  सखाराम ढमाले
  43.  नरेंद्र प्रधान
  44.  शंकर कुष्टे
  45. दत्‍ताराम सावंत
  46.  बबन भरगुडे 
  47. विष्णू बने
  48.  सिताराम राडये
  49.  तुकाराम शिंदे 
  50. विठ्ठल मोरे 
  51. रामा विंदा
  52. एडमिन साळवे
  53.  बाबा सावंत 
  54. वसंत कन्याळकर
  55.  विठ्ठल साळुंखे 
  56. रामनाथ अमृते 
  57. परशुराम देसाई
  58.  घनश्याम कोलार
  59.  धोंडू सुतार 
  60. मारुती मस्के 

61 .मुनीमजी पांडे

 62.भाऊ भास्कर

 63.धोंडू पुजारी

64. हृदयसिंग दारजेसिंग

 65.शंकर राणे

66. पांडू अवरीकर

67.विजयकुमार बडेकर

 68.शंकर राणे 

69.धोंडू जाधव

 70.रामचंद्र चौगुले

 71.कृष्णाजी शिंदे 

72.बालमोहन

 73.चुलाराम मुंबराज 

74.करपैया देवेंद्र

 75.काशिनाथ चिंदरकर

76. रघुनाथ बिनगुडे 

77.अनंता

78.गंगाराम गुरव 

79.रतनु गोंदिवरे

80.सय्यद कासम

81.भिकाजी दाजी

82.अनंत गोलकर

83.किसन वीरकर

84.सुखलाल बनस्कर

85.पांडुरंग वाळके

86.फुलवरी मगरू

87.गुलाब खवले

88.बाबुराव पाटील

89.लक्ष्मण थोरात

90.ठमाबाई सूर्यभान

91.गणपत भुते

92.मुनशी अली

93.दौलतराम मथुरादास

94विठ्ठल चव्हाण

95.देवजी राठोड

96.रावजीभाई पटेल

97.होरमसजी करसेटजी

98.गिरधर लोहार

99.सतू  वाईकर

100)गणपत जोशी

101.माधव तुरे

102.मारुती बेंनालकर

103.मधुकर बांदेकर

104.लक्ष्मण गावडे

105.कमलाबाई मोहिते

106.सीताराम घाडीगावकर

107 .शंकर तोरस्कर


कामगार दिनाची माहिती |  kamagar dinachi mahiti

कामगार दिन आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच जागतिक कामगार दिन असेही म्हटले जाते .

या दिवसात म्हणजेच 1 मे रोजी हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो कामगारांच्या हक्काचे जे मानधन वेतन ,काम करण्याच्या तासिका यासाठी सगळ्या कामगारांनी संघटित कामगार संघटित होऊन चळवळी उभ्या केल्या प्रमुख मागणी अशी होती की आठ तास काम म्हणजे प्रत्येक कामगार हा आठ तासांपेक्षा जास्त काम करणार नाही यासाठी पहिली मागणी  21 एप्रिल1856 ऑस्ट्रेलिया या देशातील कामगारांनी केली. तेव्हापासून या देशात हा दिवस सुट्टीचा दिवस ठरला गेला 

       या देशाच्या पावलावर पाऊल ठेवून अमेरिका, कॅनडा देशातील आराजाकातावादी संघटनांनी 1 मे 1856 रोजी आंदोलने सुरू केली असेच आंदोलन सुरू असताना हे आंदोलन बंद करावे म्हणून आंदोलन कर्त्यांना दूर करण्यासाठी 4 मे 1856 रोजी शिकागोमध्ये 6 आंदोलन करते मृत्युमुखी पडले.

 ही घटना कामगारांच्यासाठी झालेली होती म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रिमांड लेविन यांनी केली ही  मागणी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत 1989 मध्ये केली. म्हणून या परिषदेतच 1 मे 1890 हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे  .तेव्हापासून आज तागायत 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो  .हा जागतिक कामगार दिन हा दिवस जगभरात 80 देशाहून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

        कामगार आणि त्यांच्या हितासाठी नवीन नवीन अशी नियमावली तयार करून कामगारावर अन्याय शोषण होणार नाही याची दक्षता या दिवसानिमित्त करण्यात येते म्हणजे कोणताच कामगार हा अन्याय सहन करणार नाही तसेच या कामगाराला बारा तास काम करावे लागणार नाही तरीही आजही आपल्याकडे बारा तास लोकांना काम करावे लागत आहे .याची दखल सगळ्या कामगारांनी घेणे गरजेचे आहे. आजही प्रत्येक सोसायटीमध्ये वॉचमेन म्हणून जे लोक काम करत असतात त्यांना कमी वेतन देऊन बारा तास काम करावे लागत आहे याची दखल शासन आणि कामगार चळवळ यांनी घेणे गरजेचे आहे .


अक्षय्य तृतीया सणाविषयी माहिती

https://www.marathisampurn.com/2022/05/akshayya-trutiya.html






    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area