Google ads

Ads Area

क्रियापदाचे प्रकार माहिती|Kriyapadache prakar mahiti

 क्रियापदाचे प्रकार माहिती|Kriyapadache prakar mahiti

क्रियापदाचे प्रकार माहिती
क्रियापदाचे प्रकार माहिती

क्रियापदाचे प्रकार (toc)

क्रियापद म्हणजे काय |kriyapad mhanje kay

1वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. या अगोदर क्रियापद म्हणजे आपण समजून घेतले आहे यामध्ये आपण क्रियापदाचे प्रकार अभ्यासणार आहोत.


क्रियापदाचे प्रकार | kriyapadache prakar

1 ) स्थिती व स्थित्यंतर दर्शक क्रियापदे 

कर्त्याचे स्थित्यंतर ( म्हणजे बदल ) व स्थिती दर्शवणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. जे आहे ते दर्शविणे म्हणजे स्थिती तर एकातून दुसऱ्यात बदल म्हणजे स्थित्यंतर होय.

उद. शिवाजी महाराज राजे होते ( स्थिती ) 

मी शेतकरी आहे ( स्थिती )

तो पोलीस झाला ( स्थित्यंतर )

अस 'हा धातू स्थिती दर्शवतो तर  ' हो 'धातू स्थित्यंतर ( बदल ). दर्शवितो

2) सकर्मक क्रियापद | sakarmak kriyapad

 या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात .क्रिया करणारे / करणारा एक असतो ती /तो सोसणारा दुसरा असतो.

कर्त्याला ' ने ' प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून पाहावे, मग ते झाल्यास ते वाक्य सकर्मक समजावे, नाहीतर अकर्मक समजावे.

उदा .गवळी दूध काढतो

हे वाक्य पूर्ण अर्थ प्राप्त होणारे आहे. नुसतेच  'गवळी  काढतो ' असं जर वाक्य दिले असते तर वाक्य पूर्ण होत नाही. क्रियापदाला ' दूध ' कर्माची जरुरी भासते, म्हणून ' काढतो ' क्रियापद सकर्मक आहे.

उदा .

' पक्षी मासा पकडतो ' (पक्षाने मासा पकडला )

शेतकरी भाजी पिकवतो..( शेतकऱ्याने भाजी पिकवली )

 आजोबा गोष्ट सांगतात  (आजोबांनी गोष्ट सांगितली )

क्रियापद हे कर्ता व कर्मानुसार बदलत असते , इतर शब्दानुसार बदलत नाही ,म्हणून वाक्यातील एखाद्या शब्दाचे लिंग ,वचन बदलल्यास क्रियापद सुद्धा त्यानुसार बदलत असतील तर तो शब्द एकतर कर्ता किंवा कर्म असतो 

 काही प्रसंगी अकर्मक वाटत असणारी वाक्येसुद्धा सकर्मक असतात.

उदा .

 अ ) राजाला तलवार शोभते ( कर्ता )

>> राजाला ढाल शोभते

>>  राजाला अंगरखा शोभतो.

आ ) तलवारीने राजा शोभला (कर्म)

>>> तलवारीने राणी शोभते

>>> तलवारीने राजे शोभले


3 ) अकर्मक क्रियापद  | Akarmak kriyapad

या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी नसते म्हणजेच क्रिया कर्त्यापासून सुरू होते असते आणि ती क्रिया  कर्त्यापाशीच थांबते,त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात . 

   क्रिया करणारा जो असतो तोच सोसणारा सुद्धा एकच असतो 

वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय जोडून वाक्य भूतकाळी करून पाहावे , नाही झाले तर वाक्य अकर्मक मानावे.

उदा . 

◆ती उठली

★तो मोठ्याने रडला

■ती बागेत पडली

★ तो तेथे गेला

★कोमलला थंडी वाजते 

★कानात भुंगे शिरले

 ★मला आंबा आवडतो.


4) द्विकर्मक क्रियापद|Dvikarmak kriyapad

ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एका वेळी दोन घटकांवर घडत असते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात .

उदा .

1) गुरुजी विद्यार्थ्यांना मराठी शिकवितात .

2) आजोबाने नातूला गोष्ट सांगितली. 

3) राजूने मधूला पिशवी दिली.


वरील वाक्यात शिकवतात, सांगितली, दिली ही क्रियापदे सकर्मक असून त्यांना प्रत्येकी दोन कर्मे आहेत.


पहिले वाक्य 

शिकविणारे कोण ?-- गुरुजी ,

गुरुजी हा कर्ता. 

शिकविण्याची क्रिया कोणावर घडते ?   ' मराठी व विद्यार्थी ' यांच्यावर

     अशीच गोष्ट सांगितली व दिली या वाक्यातील क्रियापदाची आहे . या क्रियापदाला दोन कर्मे लागतात .अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे म्हणतात .

द्विकर्मक क्रियापदाचे दोन प्रकार पडतात.

अ ) प्रत्यक्ष कर्म : 

वस्तुवाचक ( दान दिले जाणारे ) कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात.

 उदा .मराठी ,पिशवी ,गोष्ट

प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय नसतो व विभक्ती प्रथमा असते . अशा वाक्यात प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते.

    द्विकर्मक वाक्य वर्तमान काळातील असल्यास तर ते कर्तरी प्रयोग असते ,जर भूतकाळातील वाक्य असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो .याचे कारण असे की  अशा वाक्याचा प्रयोग प्रत्यक्ष कर्मावरून ठरतो .

ब ) अप्रत्यक्ष कर्म : 

व्यक्तिवाचक कर्मांना ( दान घेत असलेले ) अप्रत्यक्ष कर्म म्हणतात त्यांना स,ला ,ना,ते हे प्रत्यय असतात व विभक्ती चतुर्थी असते.

उदा .विद्यार्थी,नातू,मधू ही अप्रत्यक्ष कर्मे होत . (वरील वाक्यातून )


प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदायी चतुर्थी मानतात.


5 ) उभयविध क्रियापदे | ubhayvidh kriyapad

  या ठिकाणी क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतींनी वापरले जाते, त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. 

उदा. अ )  1 .त्याने खिडकीचे दार उघडले. 

              2 . त्याच्या खिडकीचे दार उघडले.

 दोन्ही वाक्यात 'उघडले ' हे क्रियापद आहे .पहिले वाक्य ते सकर्मक वापरले, त्याने हा कर्ता व दार हे कर्म आहे दुसऱ्या. वाक्यात उघडणारे कोण ? तर दार.  उघडण्याची  ही क्रिया दारावरच घडते.

उघडले हे अकर्मक आहे .

ब)  1.  अर्जुनाने धनुष्य मोडले

  2.  ते लाकडी धनुष्य मोडले

पहिल्या वाक्यात मोडले हे सकर्मक आहे ,तर दुसऱ्या वाक्यात ते अकर्मक आहे. म्हणजेच एकच क्रियापद दोन  वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते. अशांना उभयविध क्रियापदे म्हणतात.

उदा . काप ,आठव ,स्मर, लोट हे धातू या प्रकारचे आहेत.


6 )  संयुक्त क्रियापद| sanyukt kriyapad

कधी कधी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी मुख्य क्रियावाचक शब्दाला दुसऱ्या एखाद्या क्रियापदाचे सहाय्य ( मदत ) घ्यावे लागते, अशा दोन शब्दांचे मिळून बनलेल्या क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात.

   यातील मुख्य क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत  नाहीत, म्हणून त्याला ' धातुसाधित 'असे म्हणतात. तर अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य घेतलेल्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद म्हणतात .

 संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोन्ही शब्दातून एकच क्रिया दर्शवणे जरुरी आहे .दोन्ही शब्दातून वेगवेगळ्या क्रिया दर्शविल्यास संयुक्त क्रियापद नसते.


धातुसाधित +सहाय्यक क्रियापद= संयुक्त क्रियापद


मुले बागडू लागली  ( खेळणे )

ती येत आहे ( येणे )

हा पेरू खाऊन टाक (खाणे )

, संयुक्त क्रियापदामधील धातुसाधित हा मुख्य क्रियावाचक शब्द असतो ;पण दोन्ही शब्दातून वेगवेगळ्या क्रिया दाखविल्यास त्यातील शेवटचा जो शब्द हा मुख्य क्रियापद असतो तर त्यापूर्वी येणारा शब्द धातुसाधित असतो.

उदा .  ' एवढा ढोकळा खाऊन जा ' या वाक्यात दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत .यामध्ये खाण्याची व जाण्याची अशा दोन क्रिया आहेत. त्यातील 'खाऊन' हे धातुसाधित आहे तर  'जा ' हे मुख्य क्रियापद आहे.


7 ) सिद्ध क्रियापद | siddh kriyapad

 क्रियापदामधील मूळ  जो धातू असतो त्यास सिद्ध धातू असे म्हणतात . अशा धातूला प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

उदा . वाच -वाचतो 

पळ - पळतो 

खा  - खातो

 लिही -  लिहितो 

जेव  - जेवतो


8 ) साधित क्रियापदे | Sadhit kriyapad

नाम 'विशेषण, क्रियापद व अव्यय अशा विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या  धातूंना साधित धातू असे म्हणतात.  अशा साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदाला 'साधित क्रियापद' असे म्हणतात.

उदा.

1) नाम साधित : तो चेंडू लाथाडतो.( लाथ ) पाणावले हाताळले, डोकावले,लोळावले

2) विशेषण साधित : त्या सुंदर चित्रावर माझे डोळे स्थिरावले ( स्थिर) उंचावला, एकवटला

3) अव्यय साधित : जातीच्या बंधनामुळे माणसे मागासली  (मागे ) पुढारले, खालावले

4)धातुसाधित : आम्ही हे मोटर फलटणहून आणवली (आण) मागितली ,बसले

9) प्रयोजक क्रियापद| prayojak kriyapad

एखादी क्रिया घडण्यासाठी इतर कोणाकडून तरी प्रेरणा मिळत असते त्यामुळे ती क्रिया होत असते म्हणजेच दुसऱ्याकडून प्रेरणा घेऊन ही क्रिया घडते. म्हणजेच दुसरा त्यास क्रिया घडवण्यासाठी उत्तेजीत करत असतो, त्यावेळेस या क्रियापदास प्रयोजक क्रियापद म्हणतात. 

उदा. श्याम बाळाला झोपवितो.

       गुरुजी मुलांना शिकवतात

       शिक्षक मुलांना हसवतात

       आई मुलाला चालवते

        आई मुलाला पळवते

         आई मुलाला घडविते 

          आई मुलाला भरविते 

          आई मुलाला कपडे घालविते 

          आई मुलाला शिकवते

या वाक्यात कर्ता हा कोणाकडून तरी क्रिया करून घेत असतो म्हणून यास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.


10 ) शक्य क्रियापद | Shakya kriyapad

शक्य या शब्दातच शक्यता लपलेली आहे यामध्ये कर्त्याला काम करण्याची शक्यता आहे ,तो ते काम करण्यासाठी सामर्थ्य  आलेले असते .

उदा . मला आता काम करवते

       मुलाला एक मैल पळवते

       आईला आता खाववते

         राजुला आता चालवते

        आजोबाला आता बसवते

           घोड्याला आता पळवते

          पिंट्याला आता बोलवते

           रेड्याला आता खाववते

            विजयला काम करवते

              गीताला पूजा करवते


 म्हणजेच या वाक्यातून  हे काम करू शकण्यास सामर्थ्य  शक्यता,आहे असे दर्शवले जाते त्यास शक्य क्रियापद असे म्हणतात.

 शक्य  क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद फरक

शक्य  क्रियापद

रामला मैदानात खेळवते  

बाबांना भाकरी  खाववते

आईला स्वयंपाक करवतो

श्यामला आता चालवते

 मला आता खावविते

श्यामला टेकडी चढवते

 सीतेला मैदानात पळवते 

श्यामला नदीत पोहवते

आईला गावाला राहवते

 बाबांना शेतात काम करवते

आजोबांना आजारपणातून बरे झाल्यापासून खावविते


प्रयोजक क्रियापद

शिक्षक विद्यार्थ्याना शिकवितात 

आई मुलाला बसविते 

बाबा मुलांना पळवितात 

जादूगार लोकांना हसवतात 

पोलीस चोरांना पळवतात 

डॉक्टर रुग्णांना नाचवतात


11) अनिमित किंवा गौण क्रियापद| Aniyamit/ gaun kriyapad

या क्रियापदातील धातू जे असतात ते ठामपणे सांगता, दाखवता येत नाहीत. अशा क्रियापदांना अनिश्चित आणि अनिमित ,गौण क्रियापद असे म्हणतात.


उदा. पाहिजे ,नको ,नये, नलगे ,आहे ,नाही ,नव्हे 

आज दीपावली आहे 

उद्या गावाला जाऊ नको

 पाऊस मोठा नाही 

तिला चहा पाहिजे 

तिचे असे वागणे बरे नव्हे 

माधवास अधिक सांगणे नलगे

विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले 

सूर्य पश्चिमेकडे मावळत असतो

 सुनिता बाजारात जाते 

राघव अभ्यास करतो 

साहित्य संमेलनात सहभागी व्हावे


यात असे धातू असतात की त्यांना काळाचे व अर्थाचे म्हणजेच आख्यातांचे सगळेच प्रत्यय लागतात असे नाही तर ते थोड्या वेगळ्याच प्रकारे चालत असतात.


12) भावकर्तुक क्रियापद| Bhavkartuk kriyapad

★  क्रियापदांचा कर्ता स्पष्ट नसतो, 

★क्रियेचा मूळ अर्थ म्हणजे भाव तोच त्याचा कर्ता मानावा लागतो. 

 ★ यात कर्ता दिलेला नसला तरी तो आपल्याला आपोआप समजतो. 

★यामध्ये क्रियापदाचा कर्ता हा स्पष्ट दिसत नसल्याने अकर्तुक क्रियापदे असेही याला म्हटले जाते.

उदा .चौधरी जाण्यापूर्वीच उजाडले ( दिवस उजाडला )

आम्ही घरी येण्यापूर्वीच मावळले  ( दिवस मावळला )

आज सकाळपासून आईला  मळमळते ( पित्त झाल्याने मळमळते)


13) करणरूप क्रियापद (होकार दर्शक) | Karanrup kriyapad

क्रियापदामधून होकार दर्शवला जातो म्हणजेच क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते तेव्हा या क्रियापदाच्या रूपाला करणरूप क्रियापद म्हणतात.

नेहमी खरे बोलावे 

सतत चिंतन करावे

 व्यसनाधीनता टाळावी

 मुलांनी खरे बोलावे


14 ) अकरणरूप क्रियापद ( नकार दर्शक ) | Akarunrup kriyapad

  वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान नकारार्थी असले तर त्या क्रियापदाच्या रूपाला अकरणरुप म्हणतात, म्हणजेच क्रियापदामधून नकार दाखवला जातो. 

नकारदर्शक शब्द नाही : नको ,नये ,नव्हे ,न 


लोकांनी खोटे बोलू नये

 व्यसन करू नये

 पावसात भिजू नये

उघड्यावरचे पदार्थ खाऊ नको

तू न आलेला बरा

अशा पद्धतीने आपण आज क्रियापद आणि क्रियापदाचे प्रकार अभ्यासले. शब्दांच्या जातीमध्ये क्रियापद आहे. सगळ्यात महत्त्वाचा घटक असून समजून घेण्याला थोडासा अवघड जरी असला तरी क्रियापद हे खूप महत्त्वाचे आहे वाक्यअर्थपूर्ण होण्यासाठी क्रियापदाची आवश्यकता असते, म्हणून या क्रियापदाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. या घटकाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. शब्दांच्या जाती हा घटक सगळ्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणून यापुढील व्याकरणाचा घटक आपण अभ्यासणार आहोत.

1 ) समास आणि त्याचे प्रकार




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area