Google ads

Ads Area

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर मराठीत माहिती | gurudev ravindranath tagor marathit mahiti

  गुरुदेव रवींद्रनाथ टागोर मराठीत माहिती | gurudev ravindranath tagor marathit mahiti

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर



गुरुदेव रवींद्रनाथ टागोर(toc)


 रवींद्रनाथ टागोर हे बंगालमध्ये जन्माला आलेले  त्यांचा जन्म 7 मे 1861  तर मृत्यू 7 ऑगस्ट 1941 झाला .या महान व्यक्तीला 'गुरुदेव'असे संबोधले जाते हे एक चित्रकार असून नाटककार ,कादंबरीकार, कवी, संगीतकार तसेच समाजसुधारक होते त्यांच्या काव्यामुळे बंगाली साहित्यात चांगला असा बदल घडून आला. त्यांना गुरुदेव या नावाने संबोधले जाते गीतांजली हा त्यांचा काव्यसंग्रह अतिशय लोकप्रिय झाला म्हणून त्यांच्या या गीतांजलीला "अगदी संवेदनशील ,ताजे आणि सुंदर "असे या कवितेचे वर्णन केले आहे. 1913 रोजी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. बंगाली साहित्य त्यांनी विपुल प्रमाणात लिहिले त्या बंगाली साहित्यावर त्यांचा एवढा प्रभाव होता की बंगाली साहित्याची दोन गटात विभागणी केली जाते एक रवींद्रपूर्व साहित्य व रवींद्रउत्तर साहित्य अशी विभागणी केली . तसेच त्यांना  'बंगालचा बार्ड ' म्हणून संबोधले जाते तसेच ते नावाजलेल्या अशा प्रतिष्ठित  "रॉयल एशियाटिक सोसायटीचे " सदस्य होते . त्यांचे जीवन कलकत्त्याच्या ब्राह्मण कुटुंबात पिराली कुटुंबात त्यांचा जन्म झाला  वयाच्या  8 व्या त्यांनी त्यांचे पहिली कविता लिहिली तर सोळाव्या वर्षी भानुसिंह या टोपणनावाने त्यांनी अनेक कविता लिहिल्या . तोपर्यंत त्यांनी वेगळ्या नावाने कविता लिहीत होते .

        1877 रोजी त्यांच्या खऱ्या नावाने कथा, नाटके प्रसिद्ध केली हे एक मानवतावादी असल्यामुळे त्यांनी या ब्रिटिश अधिकार प्रवृत्तीचा विरोध केला . त्यांनी शांतीनिकेतनची उभारणी विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्रसंगीताचे सर्जन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. त्यांना पारंपरिक शिक्षणपद्धती नको होती, पारंपरिक शिक्षणपद्धती ही केवळ पोपटपंची आहे या विचारातून शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला आणि तो यशस्वी झाला  आपले राष्ट्रगीत 'जन गण मन' तसेच बांगलादेशचे 'आमार शोनार बांग्ला ' अशी राष्ट्रगीते रचली देशांचे राष्ट्रगीताचे लेखनकर्ते, रचनाकार म्हणून जगामध्ये एकमेव असे व्यक्ती आहेत. तसेच श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यप्रेरणेतून घेतले आहे त्यांच्या कार्याचा आढावा पुढील प्रमाणे.


रवींद्रनाथ टागोर यांचे जीवन | ravindranath tagor yanche jivan

 त्यांचा जन्म 1861 रोजी झाला

 वडील : देवेंद्रनाथ टागोर

  आई : शारदादेवी

 या देवेंद्र आणि शारदादेवी यांना 14 अपत्ये होती, रवींद्रनाथ हे 13 वे अपत्य होते . त्यांचे अकराव्या वर्षी मुंज झाली त्यांचे वडील हे भारतभ्रमण करण्यासाठी निघाले असताना रवींद्रनाथ यांनाही सोबत घेतले . 14 फेब्रुवारी  1873 रोजी हे दोघे भारतभ्रमण करण्यासाठी त्यांनी कलकत्ता या ठिकाणाहून पलायन केले या भारतभ्रमणामध्ये त्यांनी अनेक ठिकाणे पाहिली .रवींद्रनाथ यांनी अनेक महान व्यक्तींची आत्मचरित्र वाचली .संस्कृतकाव्य अध्ययन केले. त्यांचे पहिले प्रकाशन 1877 रोजी झाले त्यामुळे ते प्रथम लोकांसमोर आले . त्याअगोदर ते भानुसिंह या नावाने काव्य लिहित होते . त्यांनी 1877 रोजी ज्यावेळेस प्रथम लोकांसमोर आले त्यावेळेस भानुसिंह एक वैष्णव कवी होता 17व्या शतकात होऊन गेलेला हा कवी त्याच्या हे काव्य आहे त्याचे गहाळ झालेल्या रचना  आहेत असं त्यांना सांगत होते पण भानुसिंह या नावाने ते स्वतःच  ते लिहीत होते . संध्या संगीत 1882 बंगाली भाषेत पहिली लघुकथा त्यांनी लिहिली त्यांचे स्वप्न बॅरिस्टर होते त्यासाठी लंडनच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला.  त्याठिकाणी त्यानी कोणतीही पदवी प्राप्त केली नाही 9 नोव्हेंबर 1883 रोजी त्यांनी मृणालिनी देवी हिच्यासोबत लग्न केले . त्यांना 5 अपत्ये होती त्या 5 पैकी दोघांचा बालमृत्यू झाला होता. 1890 पासून त्यांनी बांगलादेशातील त्यांचे सियालदा याठिकाणी टागोर घराण्याची जी संपत्ती, मालमत्ता सांभाळायला सुरुवात केली .या काळात ते 'जमीनदारबाबू 'या नावाने ओळखले जात होते . हा काळ रवींद्रनाथ यांचा  'साधनाकाळ' म्हणून ओळखला जातो त्यांनी 'गलतगुच्छ' नावाचा चौऱ्यांशी कथांचा तीन खंडी असलेले पुस्तक प्रकाशित केले .


शांतिनिकेतन मराठी माहिती|shantiniketan marathi mahiti

बंगालमध्ये सियालदा याठिकाणी ते वास्तव्यास असताना त्यांनी हे सियालदा सोडून 1901 रोजी शांतिनिकेतन या ठिकाणी राहण्यास आले . त्या ठिकाणी आश्रम स्थापन करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता . या आश्रमात त्यांनी प्रार्थनागृहाची, प्रयोगशाळेची ,बाग बगीचा व ग्रंथालयाची स्थापना केली . शांतिनिकेतन याठिकाणी त्यांच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा मृत्यू झाला . वडिलांच्या मृत्यूनंतर 1905  रवींद्रनाथ टागोर याना नियमित वेतन मिळू लागले .त्रिपुराच्या महाराजांकडून ही आर्थिक सहाय्य त्यांना मिळाले .

       याच काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे मनोरंजन करून त्यांचे लक्ष वेधून घेत होते  .त्यांच्या कविता free verse या नावाने अनुवाद करणे त्यांनी चालू केले . 14 नोव्हेंबर 1913 रोजी स्वीडिश अकादमीतर्फे देण्यात आलेला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ यांना मिळाला .हा पुरस्कार त्यांना गीतांजली या रचनेबद्दल देण्यात आला. गीतांजलीचे भाषांतर हे रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः केले म्हणून म्हणून 1915 रोजी त्यांना ब्रिटिश सरकारने ' सर 'ही पदवी दिली, परंतु 1919 साली भारतात जालियनवाला बाग हत्याकांड झाला या हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारला ही ' सर ' पदवी परत केली  .

      1921 साली रवींद्रनाथ व कृषी अर्थतज्ञ  शांतिनिकेतन जवळ असलेले सुरुल या गावी ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली . या संस्थेचे त्यांनी श्री निकेतन असे नाव ठेवले गेले या श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा प्रयत्न केला .

  ज्ञानसंवर्धननातून केले तर अज्ञानि आणि असहाय्य असे जे ग्रामीण भागात लोक होते त्या ग्रामीण भागातील लोकांची यातून सुटका होईल यासाठी त्यांनी अनेक देशांतून विद्वान उपक्रमात सामिल करुन घेतले होते. 1930 पासून आपल्या भारत देशामध्ये जातिवाद भरपूर प्रमाणात होता म्हणून त्यासाठी त्यांनी जातिवाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू केले, त्यासाठी त्यांनी आपल्या रचनांचा उपयोग करू लागले .मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी आवाहन केले .


रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य | ravindranath tagor yanche karya


     रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली . त्यांनी संगीत ,तत्वज्ञान, नृत्य शिक्षण चित्रकला शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले कौशल्य दाखवले . यामुळे त्यांचा दर्जाही उच्च दर्जाचा ठरलेला आहे . त्यांनी अनेक प्रकारांमध्ये अनेक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला असला तरीसुद्धा कादंबरी, निबंध, लघुकथा प्रवासवर्णने अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. या साहित्यामध्ये त्यांचा यमकप्रचुरता, गेयता ही त्यांच्या काव्याची म्हणजे साहित्याची वैशिष्ट्ये होती .कविता त्यांचे आवडते लेखन होते कवितेनंतर त्यांनी लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली .लघुकथा हे बंगाली भाषेत लिहिल्यामुळे ते लघुकथाकार म्हणून ओळखले जातात .या साहित्यातून सामान्य लोकांचे जीवनमान हे त्यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश होता.


काव्य | kavya

    प्राचीन वाङ्मयाचा म्हणजेच वैष्णव रचनांचा पंधराव्या व सोळाव्या शतकातील विचारधारेचा रवींद्रनाथ टागोर यांच्यावर प्रभाव होता . भारतातील  'ऋषी ' संकल्पनेचाही रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्त्व त्यातून बहरास आले .बाऊल हा बंगालमध्ये हा  कलाकार गावोगावी फिरून आपली गीतरचना करून त्यातून समाजप्रबोधन करण्याचे काम करत होते. ते कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत .हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही धर्माची शिकवण  गितरचनेत दिसत  होती .रवींद्रनाथांनी त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांनी स्वतःच्या काव्यकृतीस नवे वळण  आणून दिले ' मनातील माणूस ' आणि 'जीवन देवता 'दोन्ही रूपके टागोर यांच्या कवितेत नेहमी दिसत असतात .


प्रार्थना|prathana


 विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर

 ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा !


दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे तू सांत्वन करावे अशी माझी अपेक्षा नाही

 दुःखावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा !


जगात माझे नुकसान झाले 

केवळ फसवणूक वाट्याला आली तर माझे मन खंबीर व्हावे 

एवढीच माझी इच्छा!


माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे 

एवढीच माझी इच्छा!


माझे ओझे हलके करून

 तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही 

ते ओझे वाहायची शक्ति मात्र  माझ्यात असावी

 एवढीच माझी इच्छा


सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन J

मी तुझा चेहरा ओळखावा दुखाच्या रात्री जेव्हा सारे जग फसवणूक करील 

तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये 


कादंबरी व साहित्य |kadambari  sahitya

रवींद्रनाथ टागोरांनी शेवटच्या कविता, चार अध्याय ,नौका डुबी,घरे बाईरे या चार लघुकादंबऱ्या लिहिल्या तर आठ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या . ' चार अध्याय 'रवींद्रनाथ टागोर यांची शेवटची कादंबरी असून राष्ट्रभक्ती म्हणजे काय ,राष्ट्रभक्ती म्हणजे काय , केवळ घोषणाबाजीने स्वातंत्र्य मिळते असे नसून असे अनेक प्रश्नांचा उलगडा या कादंबरीमध्ये केलेला दिसून येतो .

       त्यांच्या लहानपणापासूनच्या  आठवणी आहेत त्या जीवनस्मृती या पुस्तकात. पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका नीलिमा भावे यांनी केला आहे.

रवींद्रसंगीत|ravindra sangit

या संगीतामध्ये रचलेली जे काव्य आहेत  एवढ्या  2230 गीतांना चाल मिळाली आहे. या सगळ्या रचनांना रवींद्रसंगीत असे संबोधले आहे .

गगनेर खाले रवी चंद्र दीपक जबले हे पहिले रचलेले गीत 

 हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत 

भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे राष्ट्रगीत त्यांनी रचले आहे .त्यांच्यावर अभिजात भारतीय संगीत ्हणजेच बंगाली लोकसंगीत अभिजात पाश्‍चात्त्य संगीत या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा आहेत. अभिजात भारतीय संगीत त्यामधील ठुमरी संगीताचा त्यांच्यावर मुख्य प्रभाव होता .या गीतांमध्ये रवींद्रनाथांचे स्वतःचे तत्वज्ञान असले तरी त्यावर वैष्णव आणि उपनिषद यांचाही प्रभाव असलेला दिसून येतो या रवींद्रसंगीत विविध रागांमध्ये ही गीतरचना गायली आहे.


चित्रकला | chitrakala

कोणतेही वय असलं तरी माणसाला कला अवगत झाली, आवड निर्माण झाली की कोणत्याही वयात शिकता येते हेच उदाहरण रवींद्रनाथ टागोर यांच्या बाबतीत म्हणावे लागेल त्यांनी अनेक प्रकारच्या कला जोपासल्या होत्या पण चित्रकला ही आवड म्हणून वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी चित्र काढण्यास सुरुवात केली . त्यांना ही  प्रेरणा फ्रान्समधील कलाकारांच्या प्रेरणेतून मिळाली . त्यांची सौंदर्यदृष्टी आणि रंगछटांमध्ये शैली दिसून येते . वेगवेगळ्या शैलींचे टागोरांनी अनुसरण केली आहे , विकसित केली आहे त्यांची हस्तलिखिते कलाकारीने सजवली आहेत


नाट्य |drama

 वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी नाटक द्यायला सुरुवात केली होती.  'वाल्मीकी प्रतिभा ' हे त्यांचे पहिले नाट्य होते या नाटकांमध्ये किर्तन भजन या पारंपारिक पद्धतीनुसार यात रचना केली आहे .'डाक घर 'या नाटकात त्यांनी  ऐहिक सुखोभोगापासून ते परमार्थिककडे नेणारा विषय या नाटकात हाताळला आहे. नाटकामध्ये अभिनयापेक्षा त्याच्या भावना समजून घेण्यावर यांचे महत्त्व आहे म्हणून 

त्यांची नाटके चांदलिका, विसर्जन ,चित्रगंधा, राजा ,माहेर खेला अशी नाटके आहेत त्यांचे नृत्यनाटिका विशेष प्रसिद्ध आहे. मणीपूर शैलीच्या अभिजात नृत्यशैलीचा रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या शैलीत वापर केला आहे.8


लघुकथा|laghuktha

 ' गलपगुच्छ ' हा रवींद्रनाथ टागोर यांचा 84 कथांचा तीन खंडी लघुकथासंग्रह प्रसिद्ध आहे .इस्त्राईल मधील सार पब्लिशिंग हाऊस  या प्रकाशनसंस्थानी रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांचा हिब्रू  भाषेत अनुवाद केला आहे एप नावाने 2006 साली हा लघुकथा प्रसिद्ध झाला आहे.


कादंबऱ्या|kadambri

गोरा 

जोगाजोग

 चतुरंग

 घरे बाईरे

  चार आध्याय

 मुक्त धारा

 राजहृषी

 शेषर  कविता


लघुकथा 

काबुलीवाला 

दृष्टिदान 

शोधीत पाषाण


नाट्य 

चंडालीका 

चित्रागंदा 

मालिनी

 श्यामा 

नाटके

विसर्जना 

राजा ओ राणी


काव्यसंग्रह

 गीतांजली 

जन्मदिले

 श्यामली, सोनार तारी 

जन्मदिने

 नैवेद्द

 पूरर्वी


जीवन चरित्र 

जीवनस्मृती

 अनुवादक नीलिमा भावे


प्रश्नावली

1 ) रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म केव्हा झाला?
= 7 मे 1861

2)  नोबेल पुरस्कार कोणत्या साहित्य प्रकारास मिळाला?
 = गीतांजली काव्यास

3) रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कधी मिळाला?
=1913

4 ) रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्नीचे नाव काय?
= मृणालिनीदेवी

5) रवींद्रनाथ टागोर यांचे जीवनचरित्र कोणते ?
= जीवनस्मृती

6) रवींद्रनाथ टागोर यांची प्रसिद्ध लघुकथा कोणती ?
= गलपगुच्छ

7) रारवींद्रनाथ टागोर यांच्या किती गीतांना चाल मिळाली ? = 2230

8 ) रवींद्रनाथ टागोर यांनी चित्र केव्हापासून सुरुवात केली ?
= वयाच्या 60 व्या वर्षी

9) रवींद्रनाथ टागोर यांना ब्रिटिश सरकारने कोणती पदवी दिली ?  केव्हा ?
= सर ही पदवी 1915 रोजी

10) रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिले?
 = भारत, आणि बांग्लादेश ही दोन राष्ट्रे
 =  श्रीलंकेचे राष्ट्रगीत त्यांच्या साहित्यप्रेणेतून झाले

आणखी माहिती पहा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area