Google ads

Ads Area

छत्रपती राजर्षी शाहू महाराज माहिती| chatrapati shahu maharaj marathit mahiti

 छत्रपती राजर्षी शाहू महाराज माहिती| chatrapati shahu maharaj marathit mahiti

राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज


राजर्षी शाहू महाराज(toc)


आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक समाजसुधारक होऊन गेले या समाजसुधारकांमध्ये छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांचाही खूप मोठा वाटा आहे म्हणून या " फुले, आंबेडकर ,शाहूंचा महाराष्ट्र " असे म्हटले जाते खरोखरच या तीन नेत्यांनी समाज परिवर्तन करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. दलित, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी अशा या महान नेत्यांनी पुढाकार घेऊन दलित उद्धार करण्यासाठी आपले विचारातून लोकप्रबोधन केले .


राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन | rajashri shahu maharaj yanche jivan

छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 साली तर  त्यांचा मृत्यू 6 मे 1922  साली .

 हे छत्रपती शाहू महाराज ,राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू आणि चौथे शाहू असे त्यांना बोलत होते. कोल्हापूर या ठिकाणी वास्तव्यास असणारे हे शाहू महाराज कोल्हापूरचे संस्थान छत्रपती म्हणून ओळखले जाते हे संस्थानचे छत्रपती शाहू 1884 ते 1922 या दरम्यान झाले .यांच्या काळात संपूर्ण भारतावर इंग्रजांचा अंमल होता या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे यासाठी आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची उन्नती होण्यासाठी शाहू महाराजांनी खूप अथक प्रयत्न केले. यांचे समाजपरिवर्तन करत असताना त्यांना सनातनी वर्गांचा खूप मोठा विरोध पत्करावा लागला तरीही सनातनी वर्गाला न जुमानता त्यांनी दलित, अस्पृश्य, मागासवर्गीय लोकांचे प्रबोधन करण्यासाठी अथक प्रयत्न केले म्हणून त्यांच्या या कार्यास न्याय म्हणून राजर्षी हा किताब देण्यात आला. हा किताब कानपूरच्या कुर्मी समाजाने बहाल केला म्हणून अशा या शाहू महाराजांना शतश: प्रणाम!


शाहू महाराजांचा जन्म | Shahu maharaj yancha janm

शाहू महाराज यांचा जन्म  26 जून 1874 रोजी कागल तालुक्यातील घाटगे घराण्यात झाला त्यांचे

 वडील : जयसिंगराव 

आई : राधाबाई, 

मूळ नाव : यशवंत 

         ज्यावेळेस कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई या संस्थान चालवत होत्या त्यावेळेस यशवंतराव यांच्याविषयी त्यांनी विश्वास ठेवून याठिकाणी त्यांचे शिक्षण पूर्ण केले . शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोदा या ठिकाणी राहणारे गुणाजीराव खानविलकर यांची मुलगी लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यावेळी शाहू महाराजांचे वय केवळ 17 वर्षाचे होते आणि लक्ष्मीबाई ह्या त्यांच्यापेक्षा पाच वर्षाने लहान म्हणजे 12 वर्षाच्या होत्या. 

         त्यांची कारकीर्द समाजउद्धार  करत असताना 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ करण्यात आला त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 पर्यंत 28 वर्षापर्यंत हे कोल्हापूर संस्थानाचे राजे म्हणून कारभार पाहत होते . मुंबई या ठिकाणी 6 मे 1922 साली त्यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार त्यांनी समाजउद्धार केलेले कार्य आजही बहुजन समाजातील लोकांच्या ओठावर शाहूंचे नाव दिसत आहे .


 राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य | rajashri shahu maharaj yanche karya

समाजामध्ये जातिभेद असल्यामुळे त्यांनी आपल्या लोकांना जातीप्रथा न पाहता त्यांनी माणूस हा एकच आहे असे मानून त्यांनी आंतरजातीय विवाह देणारा कायदा 1970 साली करून तसेच पुनर्विवाह करण्याचा आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली .

 

शाहू महाराज यांची शाळा व्यवस्था | shikshan vyavstha

शिक्षण या क्षेत्रात त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे . बहुजन समाजाला शिक्षण देणे हा त्यांचा खूप मोठा वाटा आहे, कोल्हापूरच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची जी संकल्पना त्यांनी मांडली ती आजही तशाच पद्धतीने शासन राबवत आहे .अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा होत्या त्या शाळा बंद कराव्यात अशी त्यांनी मागणी केली आणि शाळा बंदही पाडल्या.

            महाराज यांचे शिक्षण त्याकाळचे ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले . शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी अभ्यास आणि शैक्षणिक सहली केल्यामुळे त्यांचे व्यवहारज्ञान आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होऊन ज्यावेळेस  1896 रोजी सगळीकडे प्लेगची साथ आणि त्यातच दुष्काळ पडलेला होता .अशा या कठीण प्रसंगी त्यांची कसोटी लागली आणि या कसोटीमध्ये ते आपली भूमिका चांगल्या पद्धतीने निभावून गेले या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांना स्वस्त धान्य वाटप, दुष्काळी कामे ,ज्यांना कोणी नाही त्यांना निराधार आश्रमाची स्थापना केली. त्यामुळे " असा राजा होणे नाही " असे प्रजेला वाटत होते .

शाहू महाराज यांचे बहुजन समाजाचा विकास |bahujan samajacha vikas

 बहुजन समाजातील लोकांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी समता ,बंधुता ,धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे स्वातंत्र्यपूर्वीही अमलात आणली होती . शाहू महाराजांचा गौरव संपूर्ण देशात  "महाराजांचे महाराज" असा करण्यात येत होता . रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. न्याय आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करून त्यांना ते मिळवून दिले म्हणून त्यांना " लोककल्याणकारी राजे " म्हणत होते .बहुजन समाजाच्या लोकांविषयी त्यांना खूप तळमळ होती, त्यांचे शिक्षणाअभावी मागासलेपण आल्याने त्यासाठी गावोगावी शाळा काढण्याचा प्रयत्न केला. ज्या घरामध्ये लहान मुले असतील त्यांचे पालक मुलांना शाळेत  पाठवत नव्हते म्हणून त्यांना दंड करण्यात येत होता .म्हणजेच आजचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत होते हाच दूरदृष्टीकोन शाहू महाराज यांना सुचला होता.

        मागास समजला जाणारा समाज यांना पुढे आणण्यासाठी त्यांचा शैक्षणिक ,आर्थिक विकास व्हावा यासाठी त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या ,गावांमध्ये हॉटेल्स काढण्यासाठी आर्थिक मदत देऊ लागले, अस्पृश्यांना शिलाई मशीन देण्यात आली आणि राजवाड्यातील जे लोक होते ते लोक यांच्याकडून कपडे शिवून घेऊ लागले ,तसेच गंगाधर कांबळे याला कोल्हापुरात मध्यवस्तीत चहाचे दुकान टाकण्यास  प्रोत्साहन दिले आणि कोल्हापूर संस्थान हे जातीभेदात अडकू नये यासाठी त्यांनी राजवाड्यात महार पैलवानांना पैलवान ,चांभार यांना सरदार आणि अभंग यांना पंडित म्हणून अशा पदव्या त्यांनी दिल्या . जे अस्पृश्य समाजातील शिक्षित झाले आहेत त्यांची तलाठी म्हणून नेमणूक केली . म्हणजेच बहुजन समाजाला त्यांनी पुढे आणण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांना बहुजन समाजासाठी यांच्या वेगळ्या शाळा होत्या त्या वेगळ्या शाळा न भरवता सगळ्यांसाठी एकच शाळा असावी आणि त्यांना व्यवसायिक शिक्षण ंतंत्र व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा त्यांनी सुरू केल्या  .

        त्यांचा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा चालवणारा राजा असे त्यांना बोलू लागले, ओळखू लागले मागासवर्गीय लोकांचा शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये 50 टक्के राखीव जागा देण्यात आल्या आणि त्याची अंमलबजावणीही करण्यात आली . दूरदृष्टिकोन त्यांनी ठेवून बहुजन समाजाला पुढे आणण्यासाठी आरक्षण देणे हे काही  उच्चवर्णीय लोकांना रुचले नाही तरीही त्यांना न जुमानता शाहू महाराजांनी अस्पृश्य समजलेल्या लोकांसाठी नोकरीची संधी दिली , नोकऱ्या दिल्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच शहरात दवाखाने ,पाणवठे ,इमारती अशा ठिकाणी अस्पृश्य समाजाला समानतेची वागणूक द्यावी असा आदेश काढण्यात आला .


शाहू महाराज यांचे स्त्री उद्धार कार्य  | striyancha uddhar

व्हावा यासाठी त्यांनी 1917 साली पुनर्विवाहाचा कायदा करण्यात आला ज्या स्त्रिया विधवा असतील त्या विधवा स्त्रीला विवाह करता येईल अशीही मान्यता मिळवून दिली.समाजामध्ये अंधश्रद्धा  होती म्हणून त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. शिवाय जाती प्रथा नष्ट व्हावी यासाठी आंतरधर्मीय विवाह करण्यात आला .त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यासोबत करून दिले 100 मराठा - धनगर असे विवाह त्यांनी करून दिले म्हणजेच स्त्रियांसाठी सन्मानाची आणि  समाजात दर्जा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.


शाहू महाराज यांचे वंचित समाज विकास| vanchit samaj vikas 

ब्रिटिशांच्या काळात जातिव्यवस्थेचे शिकार ठरलेले अनेक जमाती त्या काळात होत्या त्यांना बहिष्कृत केल्यामुळे आणि कोणत्याही संधी उपलब्ध नसल्यामुळे अशा जमाती चोऱ्या, दरोडे आणि लूटमार अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असल्याने शिक्षण, सत्ता ,संपत्ती यांच्यापासून त्यांना वंचित ठेवले होते त्यांना उपेक्षित अशी वागणूक देण्यात येत होती. म्हणून इंग्रजांनीही या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला असल्याने त्यांना शिक्षण आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या .या वंचित घटकाविषयी शाहू महाराज यांना दया होती ,करुणा होती म्हणून या जमातींना गुन्हेगारी ठरवल्यामुळे त्यांच्याकडून गुन्हा होऊ नये म्हणून त्यांना गावांमध्ये दररोज हजेरी द्यावी लागत होते ही शाहूमहाराजांनी दररोज हजेरी लावण्याची प्रथा होती ती बंद केली . या जमातीतील लोकांना एकत्र करून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या जमातीतील लोकांना त्यांनी आपल्या संस्थानामध्ये नोकऱ्या बहाल केल्या दिल्या त्या नोकरीपैकी पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी म्हणून काम करू लागले यांचा समाजउद्धार व्हावा यासाठी त्यांनी त्यांना घरे बांधून दिली. ज्या भटक्या जमाती होत्या या भटक्या जमाती स्थिर व्हाव्यात यासाठी त्यांनी एका ठिकाणी राहावे, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांना घरे बांधून आणि त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले .


महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ | mhatma phule yanchi satyashodhak chalval

 स्थापन केली होती त्यांच्या या सत्यशोधक चळवळीचे कार्य पुढे नेण्याचे काम शाहू महाराज यांनी केले . याच काळामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला जो संघर्ष आहे तो संघर्ष शाहू महाराज यांच्या काळात झाला . हे एक महाराष्ट्रासाठी एक मोठे सामाजिक वादळ होते आणि या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ जी होती ती अधिकच पुढे आली. हे सत्यशोधक चळवळ जी आहे ती कोल्हापूर संस्थानांमध्ये त्यांनी उभी केली आणि आपलं काम पुढे चालवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही बहुजन समाजाचा विकास व्हावा यासाठी त्यांना पुढे केले .'दलितांचा नेता' "भारतीय अग्रणी नेता " म्हणून शाहू महाराजांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अशा नावाने घोषित केले. पुढील काळामध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या दलित अपेक्षित वर्गाचे नेतृत्व करावे असेही डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना आवाहन केले . डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक लिहिले परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले म्हणून शाहू महाराज यांनी तात्काळ आर्थिक सहकार्य करून मूकनायक हे चालू ठेवले.


शाहू महाराज यांचे शाळा स्थापन | shala sthapan


 बहुजन समाजाला पुढे आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा स्थापन केल्या आपल्या राजवाड्यामध्ये समदृष्टीने वागत होते. त्यांना शिक्षणाच्या संधी मिळवून देत आणि सर्वसामान्य लोकांना शिक्षणातून त्यांचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक समाजाच्या दृष्टीने त्यांनी शाळा स्थापन केल्या .गटानुसार त्यांनी शाळा स्थापन केल्या 

  • प्राथमिक शाळा
  •  माध्यमिक शाळा
  •  पुरोहित शाळा
  •  युवराज/ सरदार शाळा
  •  पाटील शाळा
  •  उद्योग शाळा 
  • संस्कृत शाळा
  •  सत्यशोधक शाळा 
  • सैनिक शाळा
  •  बालवीर शाळा
  •  डोंबारी मुलांची शाळा
  •  कला शाळा

 अशा शाळा त्यांनी स्थापन करून समाजउद्धार करण्याचे काम त्यांनी केले आहे .


शाहू महाराज यांचे वसतिगृह निर्माण | hostel nirman

मुलांना शिक्षण मिळावे त्यांची आर्थिक परिस्थिती शिक्षण घेण्यासाठी चांगली नसल्याने मुलांचे शिक्षण थांबले जाते . यासाठी त्यांना अस्पृश्य ,दलित, मागासवर्गीय मुलांना शिक्षण मिळावे यासाठी निवासी शाळा स्थापन करून म्हणजेच त्यांना वस्तीगृहाची सोय करून देण्यात आली एकूण 26 ठिकाणी त्यांनी वस्तीगृहाची सोय करून दिली जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण थांबवता येणार नाही त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवून त्यांनी आपला उद्धार करावा यासाठी अशा वस्तीगृहातून प्रवेश घेऊन आपले शिक्षण चालू ठेवावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले . त्यांनी  26 वसतिगृह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली.

 अशा प्रकारे आपण शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला ,एकंदरीत लोककल्याणकारी राजे ,राजर्षी शाहू चौथे शिवाजी म्हणून ज्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली असे बहुजन समाजाचे महान समाजसुधारक शाहू महाराज यांना शतशः प्रणाम !

प्रश्नावली

1 ) शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला ?
  = 26 जून 1874

2) छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव कोणते होते ?
= यशवंत

3 ) कोल्हापूर संस्थान शाहू राजांकडे किती वर्षे होते ?
= 28 वर्षे

4 ) राजर्षी शाहू राजे यांनी किती वसतिगृह स्थापन केली ?
 = 26

5 ) कोल्हापूर संस्थांमध्ये बहुजन समाजातील लोकांना शिक्षण मिळावे म्हणूम किती टक्के आरक्षण ठेवले होते ?
 = 50 ℅

6 ) स्त्रियांचा उद्धार व्हावा यासाठी त्यांनी कोणते कार्य केले ?
 =  विधवा पुनर्विवाह,देवदासी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न 

7) शाहू महाराज यांनी त्यांच्या चुलत बहिणीचे कोणासोबत लग्न लावून दिले ?
= धनगर समाजातील यशवंतराव होळकर


आणखी माहिती पहा



 
★★★★★★★★■■■■■■■■■■■★★★★★★★★



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area