बुद्ध जयंती माहिती | buddha jayanti mahiti
बुद्ध जयंती माहिती |
बुद्ध जयंती अशी साजरी करतात | buddha jayanti ashi sajari kartat
संपूर्ण जगात बौद्ध धर्मीय लोक आहेत त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला बोधगया या ठिकाणी म्हणजेच ठिकाण बिहारमध्ये असून जगभरातून बोध धर्मीय अनुयायी बोधगया या ठिकाणी येऊन प्रार्थना करतात बोधगया हे बौद्ध धर्मियांचे पवित्र धार्मिक क्षेत्र आहे त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ असून सत्याचा शोध लावण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला आणि सात वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर बोधगया याठिकाणी बोधीवृक्षाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले असताना त्यांना बोधीवृक्षाखाली बुद्धत्व म्हणजेच ज्ञान प्राप्ती झाले . तेव्हापासून वैशाखी पौर्णिमेला हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जात असून या दिवशी पौर्णिमेच्या वेळी एक महिनाभर कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार आहे, या ठिकाणी गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते या ठिकाणी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात कुशीनगर हे ठिकाण गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाण जोडले गेले आहे आहे हे ठिकाण अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे आहे. हे ठिकाण गौतम बुद्धांच्या अंतिम क्षणाच्या मृत्यूशय्येवर असलेले भू- स्पर्श मुद्रा 6.1 मीटर लांबीची मूर्ती आहे . त्यावेळच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्ध यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते.
बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध धर्मीय अनुयायी घरे स्वच्छ करून घरे फुलांनी सजवली जातात. घरांमध्ये दिवे लावतात बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे पठण करतात ,बोधिवृक्षाचीही पूजा करत असतात. त्या वृक्षांना फुले, पताकाने सुशोभित करत असतात. वृक्षाच्या झाडाच्या मुळाला दूध आणि पाणी घातले जाते, या दिवशी चांगले काम केले तर पुण्य मिळते अशी अनुयायांची श्रद्धा आहे .
आपल्या भारतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली या ठिकाणी संग्रहातील बुद्धांच्या अस्थी सगळ्यांना दर्शन करता यावे म्हणून बाहेर ठेवल्या जातात. त्या ठिकाणी लोक दर्शनासाठी आल्यानंतर प्रार्थना करतात तसेच बौद्ध परंपरेतील पवित्र धर्मस्थळे लुंबिनी,सारनाथ, कुशिनगर, दीक्षाभूमी अशाही ठिकाणी जाऊन प्रार्थना करून पूजा करतात. त्या ठिकाणी बौद्ध धर्मीयांचे सूत्रे ,त्रिपिटके यातील भागाचे वाचन करतात. काही लोक या दिवशी उपवास करत असतात ,चांगले कार्य आपल्या हातून व्हावे यासाठी दानधर्म या दिवशी करत असतात . तसेच काही ठिकाणी हा सण म्हणून साजरा करून अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात .देशात रीतीरिवाज आणि संस्कृतीप्रमाणे कार्यक्रम साजरे करून बुद्ध जयंतीचा सण उत्साहाने साजरा करत असतात बुद्ध विचारात अनुयायी राहत असतात.
भारतात बुद्ध जयंती | bhartatil buddha jayanti
गौतम बुद्ध हे संपूर्ण जगाला प्रचलित असून बौद्ध धर्मीय अनुयायी बुद्धांना गुरु मानतात. आपल्या भारतातही अशी जयंती साजरी करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली या ठिकाणी 2 मे 1950 रोजी पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती साजरी केली .या बुद्ध जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या जीवन कार्याचा परिचय लोकांना करून दिला . या जयंती उत्सवासाठी अनेक देशाचे प्रतिनिधी,भिक्खू समुदाय यांना आमंत्रित केले होते, सुमारे 20 हजार लोकांचा यात सहभाग होता तेव्हापासून आपल्या भारत देशात बुद्ध जयंतीची सुरुवात झालेली आहे .
त्यानंतर 1951 मध्ये आंबेडकर यांनी बुद्ध जयंती महोत्सव तीन दिवस साजरा केला . दिल्ली नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातील बुद्ध जयंती 1953 सालापासून सुरुवात केली. 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्धजयंती दिल्ली या ठिकाणी साजरी केली. भारतात बुद्ध जयंती महोत्सवाची परंपरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरुवात केली म्हणून त्यांना बुद्धजयंती महोत्सवाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध जयंतीनिमित्त सुट्टीसाठी आग्रह धरला. | buddha jayanti holiday
देशात इतर सर्व धर्मीयांचे संस्थापक यांच्या जन्मदिनी पुण्यतिथीनिमित्त देशात सार्वजनिक सुट्टी असते मग महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्याही जयंतीनिमित्त सुट्टी मिळावी यासाठी ते आग्रही होते अशी मागणी त्यांनी केंद्र सरकार यांच्याकडे केली .अशी मागणी 1942 पासूनच त्यांनी केली होती, पण या मागण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने तथागत गौतम बुद्ध जयंतीला सार्वजनिक सुट्टी मिळेल असे जाहीर केले मात्र महाराष्ट्रात त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई या ठिकाणी झालेल्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
बुद्ध जयंतीचे महत्त्व| buddha jayantiche mahttv
जगात म्हणजेच संसारात दुःख आहे मग हे दुःख नाहीसे करण्यासाठी गौतम बुद्धांनी अनेक मार्गाचा अवलंब केला. यासाठी त्यांनी आपले स्वतःचे घर सोडून ध्यानधारणा, तपश्चर्या, साधना केली आणि वैशाखी पौर्णिमा या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झाले म्हणजेच मानवाला दुःख कशामुळे होते हे दुःख दुःखाचे मूळ आणि ते नाहीसे करण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग गौतम बुद्ध यांना सापडला म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतात.
सुरुवातीला बौद्धधर्म हा सोपा, साधा, मानवतावादी, करुणा करणारा, समानतेने वागणारा, असा होता . या बौद्ध धर्माचा प्रणेता हा असामान्य असूनही मानवदेह धारण केल्यामुळे लोकांना आपलासा वाटत गेला . गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले आणि जगात दुःख कसे निर्माण होते या दुःखाचे मूळ सापडले आणि त्यासाठी तो अनुसरायचा मार्गही सापडला त्यांना प्रथम चार आर्यसत्ये याचा साक्षात्कार झाला .
चार आर्यसत्ये charaaryasatye
बौद्ध धर्म यांचा म्हणजेच धम्माचा आर्यसत्ये हे बौद्ध धर्माचा पाया समजला जातो .साधारणता 25 75 वर्षांपूर्वी सारनाथ याठिकाणी गौतम बुद्ध आणि त्यांचे पाच शिष्य होते . या पाच शिष्यांना जो विचार सांगितला तो विचार म्हणजेच चार आर्य सत्ये होय हे आर्यसत्ये पाहू या .
जगात दुःख आहे
दुःखाचे कारण
दुःख निरोध म्हणजेच वासना इच्छा
दुःख निरोधाचा मार्ग
1) दुःख
जगात खूप दुःख आहे. अनेक कारणामुळे मनुष्याला दुःख भोगावे लागत आहे त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टीसाठी मनुष्याला दुःख होत असते. त्यामध्ये आपल्या मनासारखी गोष्ट घडली नाही तर दुःख होतेच जी गोष्ट आपणास हवी आहे अशी गोष्ट प्राप्त झाली नाही तर मनुष्याला दुःख होते.
2 ) दुःखाचे मूळ
गौतम बुद्ध यांनी जगात दुःख आहे पण हे दुःख आपले अज्ञान असल्यामुळे निर्माण होते आपली अपेक्षा, इच्छा जी आहे ती दुःखाचे मूळ कारण असते. आपली इच्छा, तृष्णा, वासना, आवड हेच आपल्या दुःखाचे मूळ असते.
3 ) दुःख निरोध
आपल्या जीवनात दुःख येते हे दुःख येऊ नये यासाठी दुःख नाहीसे करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या मनात लोभ, द्वेष ,मत्सर नसेल तर आपल्याला दुःख होणार नाही, यासाठी मनुष्याने धम्म जाणून घेतला पाहिजे . तो आपल्या आचरणात आणला पाहिजे .
4 ) दुःख निरोधाचा मार्ग
गौतम बुद्ध यांनी जगात दुःख आहे सांगितले, त्या दुःखाचे मूळ कारण वासना, इच्छा सांगितली ही वासना इच्छा नष्ट होऊ शकते म्हणजे दुःख नाहीसे होऊ शकते यासाठी या दुःखाचा नायनाट करण्यासाठी म्हणजेच दुःख येऊ नये यासाठी दुःख निरोधचा मार्ग सांगितला आहे. गौतम बुद्धांचा धम्म हा जीवनाचा चांगला मार्ग सांगत असतो. धम्म म्हणजेच नीती होय आणि नीतीचा विकास म्हणजे च दुःख निरोध .नीती आचरणात आणली तर मनुष्य आपल्या उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो .यालाच धम्म शिकवणीप्रमाणे अष्टांगिक मार्ग असे म्हणतात.
अष्टांग मार्ग|aashtang marg
सम्यक दृष्टी
सम्यक संकल्प
सम्यक वाणी
सम्यक कर्म
सम्यक उपजीविका
सम्यक व्यायाम
सम्यक स्मृती
सम्यक समाधी
सम्यक याचा अर्थ चांगले, म्हणजेच आपली जगाकडे बघण्याची दृष्टी चांगली असावी आपले, विचार चांगले असावेत ,आपली वाणी चांगली असावी ,आपल्या तोंडातून अपशब्द जाणार नाहीत, आपल्यामुळे कोणीही दुखावणार नाही, आपले कर्म चांगले असावेत ,आपले जीवन जगण्याचा मार्ग चांगला असला पाहिजे .आपले आरोग्य चांगले असले पाहिजे आणि चांगल्या गोष्टी स्मृतीत असल्या पाहिजेत त्यामुळेच आपले जीवन समाधानाचे होईल .आपल्याला समाधी लागू शकते असा अष्टांग मार्गाचा अर्थ सांगता येईल.
प्रज्ञा, शील ,करुणा | pradnya,shiil ,karuna
गौतम बुद्ध यांचा असा विचार आहे की जीवनात यशस्वी आणि चांगले राहण्यासाठी शीलाचे महत्व आहे ,त्यासाठी आत्मसंयम म्हणजेच नीती ,समाधी म्हणजेच मनसंयम , प्रज्ञा म्हणजेच ज्ञानवंत म्हणून प्रज्ञा ,शील व समाधी या तीन गोष्टींना धम्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे .या तीन बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारलेला आहे आणि हा अष्टांगिक मार्ग करायचा असेल तर या तीन गोष्टी आचरणात आणणे आवश्यक आहे .
पंचशील तत्वे | panchshil tattve
पंचशील बौद्ध धर्मातील एक नियमावली आहे, ,पाच गुण आहेत .म्हणजेच हे पाच गुण, नियम पंचशील तत्वे आहेत मनुष्याने आपल्या जीवनात आपल्या कर्मावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाईट प्रवृत्ती पासून दूर कसे राहील यासाठी पंचशील तत्त्वांची आपल्या शिष्यांना शिकवण दिली .
मी हिंसा करणार नाही
मी चोरी करणार नाही
मी व्यभिचार करणार नाही
मी खोटे बोलणार नाही
मी मादक पदार्थांची साठवणूक आणि सेवन करणार नाही
अशा पद्धतीने गौतम बुद्ध यांनी विचार व्यक्त केले आहेत . चांगले राहण्यासाठी या पाच शिलाचे महत्व सांगितली आहेत हे पाच नियम प्रत्येक बौद्ध अनुयायी यांनी आपल्या जीवनात अनुसारण करणे गरजेचे आहे .
आणखी माहिती वाचा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान
खूपच छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा