Google ads

Ads Area

अक्षय्य तृतीया सणाची मराठीत माहिती | akshayya trutiya सणाची मराठीत माहिती

 अक्षय्य तृतीया सणाची मराठीत माहिती | akshayya trutiya  sanachi marathit mahiti

अक्षय्य तृतीया सणाची माहिती
अक्षय्य तृतीया सणाची माहिती

 अक्षय्य तृतीया माहिती (toc)

अक्षय्य तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो  हिंदू धर्मातील प्रथेनुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया हा सण येत असतो कालविवेक हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये या सणाचे व्रत कसे करावे हे सांगितले आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी मदत करण्याचे महत्त्व आहे तसेच हा दिवस म्हणजे आखा तीज असेही या दिवसाला म्हटले आहे.


 अक्षय तृतीया या दिवशी असणारे मुहुर्त 

अन्नपूर्णा देवी जयंती

 नर नारायण या दोन देवाची जयंती 

परशुराम जयंती

 बसवेश्वर जयंती

 तसेच हयग्रीव जयंती 

या दिवशी भगवान व्यास्मुनी यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला असे समजले जाते आणि त्यांचे लेखनाचे काम गणपती यांनी केले असे आख्यायिका असलेली दिसते.


  अक्षय्य तृतीया सणाचे धार्मिक महत्व | akshayya trutiya sanache mahttva

असे समजले जाते की हा सण पूर्वज जे होऊन गेले त्यांचे ऋण हे आपल्यावर असते हे ऋण आपण फेडणे गरजेचे आहे म्हणून या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणजे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे जेवण म्हणून या सणाकडे पाहिले जाते. आपल्याच नातेवाईकांपैकी एकाला पितर म्हणून घरी जेवणासाठी बोलावण्यात येते या दिवशी पितर म्हणजे आपले पूर्वज असा मनात निश्चय करून त्याचे विधीप्रमाणे चरणाची पूजा करुन विधीप्रमाणे आंब्याचा रस आणि पुरणपोळी  या पित्राला जेवण घालतात त्यामुळे असे केल्याने तो पितर संतोष पावतो त्यामुळे आपल्याही घरात वर्षभर आनंद  राहत असतो असे समजले जाते. शिवाय पूर्वजांना एक घास म्हणून पक्षासाठी घरावरती ठेवला जातो तो जर घास पक्षाने खाल्ला तर घर मालकाला अत्यानंद होत असतो .

        तसेच या शुभ दिवशी दान केलेले जे काही फळ असते ते अक्षय असे असते म्हणजेच न संपणारे असे असल्याने अक्षय तृतीयाच्या दिवशी देवदेवतांना कृतज्ञतेचा भाव ठेवून त्यांची उपासना करून त्यांचा कृपाशीर्वाद घेतल्याने तो कधीही क्षय  पावत नाही अशी समजूत आहे .म्हणजेच या शुभ दिवशी जे काही शुभ कार्य कराल ते अक्षय म्हणजेच न संपणारे असे असल्याने ते दीर्घ काळ टिकून राहत असते.


  अक्षय्य तृतीयाची कथा | akshayya ttutiyachi ktha

अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेता युग सुरू झाले असे म्हटले जाते या सणादिवशी म्हणजेच या ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग यांची मिळून जी वर्षे आहेत या सर्व वर्षाला किंवा त्या काळाला महायुग असे म्हणतात ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे म्हटले जाते.


शेतीसंबंधी प्रथा | shetisambandhi pratha

  या दिवशी बलराम यांची पूजा केली जाते कारण की तो कृषीसंस्कृतीचा पालक आहे म्हणून त्याची या दिवशी पूजा केली जाते . उन्हाळ्याचे दिवस असल्याने मातीत बी घालणे आणि पेरणी करणे हे महत्त्वाचे  असते या दिवशी गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर शेत नांगरली जातात आणि अक्षय तृतीयाला मशागत करण्याचे काम अशी प्रथा आहे . कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे या दिवशी जेवढे बी पेरले असेल ते बी उगवून आल्यावर तर ते झाड मोठे झाले झाले तर त्यापासून मिळणारे जे उत्पन्न आहे ते विपुल प्रमाणात येत असते. भरभरून येत असते. 

          तसेच या दिवशी वृक्षारोपणही केले जाते .आयुर्वेद मध्ये असे सांगितले जाते की औषधी वनस्पती आहेत यादिवशी  औषधी वनस्पती लावल्यानंतर त्या कधीही नाश पावत नाहीत म्हणजे त्या औषधांचा तुटवडा कधीच पडत नाही .


अक्षय्य तृतीया सणाचे धार्मिक व सांस्कृतिक  महत्त्व | akshaya trutiya sanache dharmik aani sanskrutik mahttva

       या दिवशी जवळच्या असणाऱ्या आपल्या नदीत किंवा नदी नसेल तर समुद्रामध्ये किंवा गंगेत स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते . या दिवशी ब्राह्मणांना दक्षिणा दान देणे महत्वाचे आहे या दक्षिणाबरोबर आहे तूप,साखर ,फळे ,तांदूळ याचेही दान केले जाते. ब्राह्मणास भोजन घालणे हेही महत्त्वाचे आहे . या दिवशी दानाचे महत्व असून ते देणे अधिक महत्त्वाचे आहेत ..

       साडेतीन मुहूर्तापैकी हा सण असल्यामुळे वस्त्रे दागिने यांची खरेदी करणे महत्त्वाचे आहे तसेच याबरोबरच घरामध्ये नवीन वस्तू, नवीन आर्थिक व्यवहार करणे, गृहप्रवेश करणे असे विविध सण शुभ मुहूर्तावर करत असतात.


 अक्षय्य तृतीया दिवसाचे महत्त्व  | akshaya trutiya sanat divsache mattva

या दिवशी भारतातील उत्तराखंड या राज्यातील बद्रीनारायणाचे जे मंदिर आहे ते मंदिर या दिवशी उघडले जाते हे मंदिर अक्षय तृतीया दिवशी उघडले जाते आणि दिवाळीतील भाऊबीज या सणादिवशी बंद होत असते.

 नर नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता अशी समजूत आहे

 परशुराम हा दशावतारातील एक अवतार असून या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.

 गंगास्नानाला खूप महत्त्व आहे या दिवशी गंगेचे स्नान झाले तर तो मनुष्य पापापासून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीमध्ये धारणा असलेली दिसून येते.

 कृष्णाने युधिष्ठिरलाअसे सांगितले की या सणादिवशी म्हणजे या तिथीला केलेले दान कधीही संपत नाही म्हणजे वाया जात नाही म्हणून यातिथीला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि देवता यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व कर्म अक्षय होते म्हणजे अविनाशी होते म्हणजेच संपत नाही.

 याच दिवशी गंगेचे स्वर्गातून आपल्या पृथ्वीवर अवतरण झाले आहे अशी आख्यायिका समजली जाते.


अक्षय्य तृतीया सणाचे स्त्रियांसाठी महत्व akshayya trutiya sanat striyansathi mahhattva

 चैत्र महिन्यात स्त्रिया चैत्रगौरीची पूजा करून या दिवशी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घरी ठेवतात या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला अनेक स्त्रियांना घरी बोलावून त्यांना फुलांचा गजरा भिजवलेले हरभरे,पन्हे देतात या स्त्रियांच्या समारंभाचा जो उत्सव आहे तो उत्सव अक्षयतृतीया या सणादिवशी समाप्त होत असतो .


 अक्षय्य तृतीया सणाचे प्रांतानुसार पूजा विधि |akshayya trutiya sanache prantanusar poojavidhi

उत्तर भारत 

उत्तर भारतामध्ये या दिवशी परशुराम जन्मोत्सव साजरा करत असतात

 गंगा नदी जवळ असल्याने गंगा स्नान करणे अन्नदान करणे ब्राह्मणास दक्षिणा देऊन सातू दान केले जातात. या दिवशी पूजा आणि प्रार्थनाही केल्या जातात.

 दक्षिण भारत

 दक्षिण भारतात लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते या दिवशी अन्नदान केले जाते पूजाअर्चा केल्या जातात

 पश्चिम बंगाल

 या दिवशी व्यापारी वर्गाला अक्षयतृतीयाचा सण खूप महत्वाचा वाटत असल्याने गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली जाते शिवाय हिशोब करण्यासाठी व्यापारी नवीन हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरायला काढत असतात .

राजस्थान

 राजस्थानामध्ये हा दिवस शुभमुहुर्ताचा समजला जातो. या दिवसाला आखा तीज हा शब्द वापरला जातो. या दिवशी त्यांच्याकडे विवाह करण्याची पद्धत आहे .

महाराष्ट्र 

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये अक्षय तृतीयाचा सण साजरा करत असतात नवीन वस्तू खरेदी करणे, दानधर्म करणे, ब्राह्मणास दक्षिणा देणे असा धार्मिक उत्सव साजरा करत असतात .

खानदेशामध्ये : अक्षयतृतीयेला आखजी म्हणून समजले जाते हा आखजी सण जसा दिवाळीचा सण असतो तसाच हा कधी हा त्याच पद्धतीने साजरा करत असतात त्या ठिकाणचे सालदार बलुतेदार अक्षयतृतीया दिवसापासून नवी सुरुवात करत असतात

एकंदरीत या सणाचे महत्त्व अनेक असले तरी लोकांची मानसिकता या सणाविषयी थोडी वेगळीच असते ,या सणात पूर्वजयांचे स्मरण म्हणून पितर जेवण घातले जात असल्याने लोक या दिवशी दसरा ,पाडवा ,गुढीपाडवा यादिवशी खरेदी जेवढ्या उत्साहाने करतात तसा उत्साह या दिवशी लोकांमध्ये दिसत नाही .हा सण साडेतीन मुहुतांपैकी एक असला तरी त्यासवेगळ्या भावनेतून बघितले जाते ,ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे .

         या सणाची आपणच अशी सुरुवात करुया की आपण ज्यांना गरज आले त्याठिकाणी अन्नदान किंवा वस्त्रदान करुन तसेच नवीन काही खरेदी करायचे असेल तर विनासंकोच त्या वस्तू खरेदी करुया.गंगा स्नानाचे महत्त्व असले तरी आपल्याकडे जी गंगा उपलब्ध असेल त्यात समाधान मानून गंगा स्नानाचा आनंद घेऊ आणि खऱ्या अर्थाने आपण अक्षय्य तृतीया सण साजरा करुया.

 👏सगळ्यांना अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा !👏



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area