Google ads

Ads Area

मराठी व्याकरण वाक्प्रचार भाग 2| marathi vakprachar bhag 2

मराठी व्याकरण वाक्प्रचार भाग 2| marathi vakprachar bhag 2



मराठी  व्याकरण भाग 1 अभ्यासल्या नंतर आज भाग -2 या घटकात आपण वाक्यप्रचाराचे शालेय जीवनापासून ते स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वाक्यप्रचार आहेत ,म्हणून एकाच भागात संपूर्ण या वाक्प्रचाराचा घटक बघितले तर तुम्ही हे कंटाळून जाल म्हणून या या वाक्प्रचाराचा अभ्यास करण्यासाठी भाग पाडले आहेत.
मराठी वाक्प्रचार भाग 2
मराठी वाक्प्रचार भाग 2



मराठी वाक्प्रचार भाग 2(toc)
  1. पुंडाई करणे - दांडगाईने वागणे
  2. हात राखून जेवणे -कमी जेवणे
  3. पाठ दाखवणे - पळून जाणे 
  4. सांगड घालणे - मेळ साधणे
  5. पायमल्ली करणे - उपमर्द करणे
  6. पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे 
  7. पोटात घालणे -क्षमा करणे 
  8. पोटात शिरणे  -- मर्जी संपादन करणे
  9. पोटावर पाय देणे  -उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे
  10. पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे
  11. चौदावे रत्न दाखवणे - मार देणे 
  12. जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे
  13.  जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करणे 
  14. जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे
  15.  जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे
  16. जीव भांड्यात पडणे  -काळजी दूर होणे
  17.  जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे 
  18. जिव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे 
  19. जीव अधीर होणे  - उतावीळ होणे 
  20. जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे 
  21. जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे 
  22. जिवाचे रान करणे - खूप कष्ट करणे ,सोसणे
  23. जीव खाली पडणे - काळजीतून मुक्त होणे 
  24. जिवाचा धडा करणे - पक्का निश्चय करणे
  25.  जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे
  26.  जीवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त करणे
  27.  जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे
  28.  जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे
  29.  जीव गहाण ठेवणे  -  कोणत्याही त्यागास तयार असणे
  30.  जीव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे
  31.  जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे
  32.  झाकले माणिक - साधा, पण गुणी माणूस
  33.  झळ लागणे-  थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे
  34.  टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे
  35.  टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे 
  36. टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकद न                               राहणे
  37. टेंभा मिरवणे -  दिमाख दाखवणे
  38.  डाव साधणे -  संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे
  39. डाळ शिजणे - मनाजोगे काम होणे 
  40. डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे
  41.  डोक्यावर मिरीरी वाटणे -  वरचढ होणे
  42.  डोके खाजवणे -  एखाद्या गोष्टीचा विचार करणे 
  43. डोळ्यात धूळफेकणे - फसवणूक करणे 
  44. डोळ्यावर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे
  45.  डोळा चुकवणे -  अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देण टाळणे 
  46. डोळे निवणे -  समाधान होणे 
  47. डोळ्यात खुपणे -  सहन न होणे 
  48. डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे 
  49. डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे सारखे बघत राहणे
  50. डोळे दिपवणे - थक्क करुन सोडणे
  51. डोळ्यात प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतूर होणे 
  52. डोळे फाडून पाहणे -  तीक्ष्ण नजरेने पाहणे ,आश्चर्यचकित होऊन पाहणे
  53.  डोळ्यात तेल घालून राहणे-  अतिशय जागृत राहणे
  54.  डोळे भरून पाहणे -  समाधान होईपर्यंत पाहणे
  55.  तडीस नेणे - पूर्ण करणे
  56.  ताळ्यावर आणणे  - योग्य समज देणे 
  57. तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे
  58.  तारांबळ ओढणे - अतिशय घाई होणे 
  59. तिलांजली देणे - त्याग करणे, सोडणे 
  60. तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे 
  61. तोंडाला पाने पुसणे -  फसवणे 
  62. तळहातावर शिर घेणे-  जीवावर उदार होणे 
  63. तोंडचे पाणी पळणे  अतिशय घाबरणे 
  64. तोंडाला पाणी सुटणे - लालसा उत्पन्न होणे
  65.  त्राटिका - कजाग बायको 
  66. तोंडात बोट घालणे -आश्चर्यचकित होणे 
  67. तोंडावाटे ब्र न काढणे - एकही शब्द न उच्चारणे 
  68. थांग न लागणे  - कल्पना न येणे
  69.  थुंकी झेलणे -  खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे 
  70. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही                                               मदत न करणे
  71. ओनामा  - प्रारंभ
  72.  एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट                                                निकालात काढणे 
  73. अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे 
  74. अंगावर मूठभर मांस चढणे -  धन्यथा वाटणे 
  75. अंगाचा तिळपापड होणे  - अतिशय संताप येणे
  76.  अंथरूण पाहून पाय पसरणे - ऐपतीनुसार खर्च करणे
  77.  कणिक तिंबणे -  खूप मार देणे 
  78. कपाळ फुटणे -  दुर्दैव वाढवणे 
  79. कपाळमोक्ष होणे  - मरण पावणे 
  80. कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे 
  81. कागदी घोडे नाचवणे - फक्त लेखनात शूरपणा दाखवणे
  82.  कानउघाडणी करणे - कडक शब्दात चूक दाखवून देणे
  83.  कानावर हात ठेवणे - माहीत नसल्याचा बहाणा करणे 
  84. काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे
  85.  कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे 
  86. कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे 
  87. काट्याने काटा काढणे - एका शत्रूच्या सहाय्याने दुसऱ्या शत्रूचा                                  पराभव करणे 
  88. काट्याचा नायटा होणे - शिल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम                                          होणे 
  89. कावराबावरा होणे - बावरणे
  90. काळजाचे पाणी पाणी होणे - अति दुःखाने मन विदीर्ण होणे
  91.  कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे 
  92. कंठस्नान घालणे -  ठार मारणे 
  93. कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे
  94. कंबर कसणे  - एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे
  95.  कुंपणानेच शेत खाणे - ज्यांच्यावर जबाबदारी आहे अशा                                        विश्वासातील माणसाणे फसवणे 
  96. केसाने गळा कापणे -  वरकरणी प्रेम दाखवून कपटाने                                          एखाद्याचा घात करणे 
  97. कोंबडी झुंजवणे  - दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे
  98. कोपरापासून हात जोडणे  -काही संबंध न राखण्याची इच्छा                                            प्रकट करणे 
  99. खडा टाकून पाहणे  - अंदाज घेणे 
  100. खसखस पिकणे - मोठ्याने हसणे 
  101. खूणगाठ बांधणे  - निश्चय करणे 
  102. खडे चारणे-  शरण येण्यास भाग पाडणे 
  103. खडे फोडणे  - दोष देणे 
  104. खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
  105.  खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण उकरून काढणे
  106.  खाल्ल्या घरचे वासे मोजणे  - उपकार करणाऱ्याचे वाईट                                               चिंतने
  107.  खो घालणे - विघ्न निर्माण करणे 
  108. गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे 
  109. गळ्यातील ताईत  -अतिशय प्रिय 
  110.   गळ घालणे - अतिशय आग्रह करणे 
  111. गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालणे
  112.  गळ्याशी येणे -  नुकसानीबाबत अतिरेक होणे
  113.  गाडी पुन्हा रुळावर येणे -  चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत                                         योग्य मार्गाला येणे
  114.  गुजराण करणे  - निर्वाह करणे 
  115. गुण दाखवणे  - दुर्गुण दाखविणे 
  116. गंगेत घोडे न्हाणे -  कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे
  117.  गळ्यात धोंड पडणे  - इच्छा नसतानाही जबाबदारी अंगावर                                  पडणे
  118.  गाशा गुंडाळणे  - एकाएकी निघून जाणे
  119.  गौडबंगाल असणे -  गूढ गोष्ट असणे, काहीतरी रहस्य असणे
  120.  घडी भरणे  - विनाश काल जवळ येऊन ठेपणे
  121.  घागरगडचा सुभेदार  - पानक्या 
  122. घर डोक्यावर घेणे  - अतिशय गोंगाट करणे 
  123. घर धुवून नेणे -  सर्वस्वी लुबाडणे 
  124. घाम गाळणे - खूप कष्ट करणे 
  125. घालून पाडून बोलणे  - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे
  126.  घोडे मारणे  - नुकसान करणे 
  127. घोडे पुढे दामटणे -  स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे
  128.  घोडे पेंड खाणे  - अडचण निर्माण होणे 
  129. चतुर्भुज होणे - लग्न करणे 
  130. चंग बांधणे  - निश्चय करणे 
  131. चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे 
  132. चुरमुरे खात बसणे - खजील होणे
  133. चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे 
  134. अग्निदिव्य करणे  - कठीण कसोटीला उतरणे 
  135. अंग धरणे - लट्टू होणे 
  136. अटकेपार झेंडा लावणे-  फार मोठा पराक्रम गाजवणे
  137.  अंग काढून घेणे - संबंध तोडणे 
  138. अठराविश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे
  139.  अर्धचंद्र देणे -  हाकालपट्टी करणे 
  140. आडकित्यात सापडणे  - पेचात सापडणे
  141.  अंगाची लाही होणे  - खूप राग येणे
  142.  अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे
  143.  आकाशाची कुऱ्हाड- आकस्मिक संकट
  144.  अन्नास जागणे  - उपकाराची आठवण ठेवणे
  145.  अण्णास मोताद होणे  - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे
  146. अन्नास लावणे -  उपजीविकेचे साधन मिळवून देणे
  147.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्या यशाने चढून जाणे
  148.  आकांडतांडव करणे  - रागाने आदळआपट करणे 
  149. आकाश ठेंगणे होणे  -  अतिशय आनंद होणे
150 .आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने                                     आरडाओरडा  करून सांगणे

विद्यार्थी मित्रहो आपण आपल्या वाक्प्रचार भागामध्ये शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या सगळ्या वाक्प्रचाराचा विचार केला आहे .https://www.marathisampurn.com/2022/05/1-marathi-vakprachar-1.html 
    या लिंक वर जाऊन वाक्प्रचार भाग. 1 चा अभ्यास करा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area