Google ads

Ads Area

मराठी वाक्प्रचार भाग 1 | marathi vakprachar 1

 मराठी वाक्प्रचार भाग 1| marathi  vakprachar 

मराठी वाक्प्रचार भाग 1
मराठी वाक्प्रचार भाग 1
मराठी वाक्प्रचार व अर्थ (toc)

मराठी वाक्प्रचार 1 भागामध्ये आपण वाक्प्रचार भागाचा अभ्यास करणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी या वाक्प्रचाराचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो .
                 दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत वाक्प्रचार वाक्यात उपयोग करायला सांगितला जातो, परंतु वाक्याचा अर्थ जर माहीत असेल तरच वाक्यात उपयोग कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जमेल तसा केला तरी चालत असतो, परंतु अर्थ चुकला तर वाक्यात उपयोग करता येत नाही .म्हणजेच वाक्य समजले तरच आपणाला पुढे पुढची पायरी करता येते म्हणून या वाक्प्रचाराचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे .

वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ


1) हवालदिल होणे  - हताश होणे 

2 ) धुडगुस घालणे  -  गोंधळ करणे

3 ) गाडी आडणे -  खोळंबा होणे 

4 ) सपाटा लावणे - एकसारखे वेगात काम करणे

5) किरकिर करणे -  एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार                                         करणे

 6 ) खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,        

7 ) मोहाला बळी पडणे - एखाद्या गोष्टीच्या शक्तीमध्ये     वाहून जाणे

 8) हौस भागवणे - आवड पुरवून घेणे

 9) रस असणे - अत्यंत आवड असणे 

10) राबता असणे - सतत ये-जा असणे 

11) फंदात न पडणे - भानगडीतन अडकणे

 12) नाव कमावणे  - कीर्ती मिळवणे

 13) बहिष्कार टाकणे -  वाळीत टाकणे

 14) कारवाया करणे  - कारस्थाने करणे ,कट करणे

15) सख्य नसणे  - मैत्री नसणे

 16) निद्राधीन होणे - झोपणे

 17) प्रत्यय येणे - प्रचिती येणे

 18) रवाना होणे - निघून जाणे

 19 ) करणे - जतन करणे 

20) डोळे फिरणे - खूप घाबरणे

 21) पाळी येणे  - वेळ येणे 

22 ) दडी मारणे - लपून राहणे 

23 ) विसावा घेणे - विश्रांती घेणे 

24) अंगी बांधणे - मनात खोलवर रुजणे

25) व्रत घेणे  - वसा घेणे 

26) प्रतिकार करणे - विरोध करणे

 27 )झुंज देणे-  लढा देणे

 28) अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे

29)  टिकाव लागणे - निभाव लागणे 

28) मुखोद्गत असणे - तोंडपाठ असणे 

29) हशा पिकणे - हास्यस्फोट होणे 

30) वजन पडणे - प्रभाव पडणे

 31) दिस बुडून जाणे - सूर्य मावळणे 

32) भडभडून येणे - हुंदके देणे गलबलणे 

33) डोळ्यास धारा लागणे - अश्रू वाहणे, रडणे

34)  वणवण करणे  - खूप भटकणे

35)  देहातून प्राण जाणे - मरण येणे

 36) हंबरडा फोडणे  - मोठ्याने ओरडणे

 37)चिल्ले पिल्ले वाऱ्यावर सोडणे -  अनाथ करणे

38)  खपणे  -  झिजणे, कष्ट करणे 

39) बत्तरबाळ्या होणे -  नासधूस होणे 

40 ) प्रक्षेपित करणे -  प्रसारित करणे

 41) बेत करणे - योजना आखणे

 42 ) पदरी घेणे -  स्वीकार करणे 

43) भ्रमण करणे-  भटकंती करणे 

44 ) देखरेख करणे -  राखण करणे 

45) उदास  होणे  - खिन्न होणे

46) उत्पात करणे - विध्वंस करणे 

47) अभंग असणे -  अखंड असणे 

48) ललकारी देणे - जयघोष करणे

49) रोष ठेवणे  - नाराजी असणे

50) तोंड देणे - मुकाबला करणे 

51) प्राणाला मुकणे - मरण येणे 

52) मती गुंग होणे  - आश्चर्य वाटणे 

53) आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे 

54) लळा लागणे - ओढ वाटणे 

55) आंबून जाणे  - विटून जाणे

 56) विपर्यास होणे - असंगत अर्थ लावणे

 57) डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे 

58) कापरे सुटणे  - घाबरल्यामुळे थरथरणे 

59) हसता हसता पोट दुखणे  - खूप हसणे 

60) धास्ती घेणे - धस्का घेणे 

61) घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे

 62) प्रचारात आणणे-  जाहीरपणे माहिती देणे

 63) ठसा उमटवणे -  छाप पाडणे 

64) चक्कर मारणे -  फेरफटका मारणे 

65) दप्तरी दाखल होणे - संग्रही जमा होणे 

66) अमलात आणणे  -  कारवाई करणे

67)  प्रतिष्ठापित करणे -  स्थापना करणे 

68) ग्राह्य धरणे  - योग्य आहे असे समजणे

 69) धडपड करणे -  खूप कष्ट करणे 

70) सूड घेणे  - बदला घेणे 

71) चाहूल लागणे - मागोवा लागणे 

72 ) विरस होणे  - निराश होणे

73)  ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे

 74) परिपाठ असणे -- नित्यक्रम असणे 

75) छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे 

76) आडाखे बांधणे  मनात आराखडा किंवा अंदाज करणे

77)  नाळ तोडणे  - संबंध तोडणे 

78) वारसा देणे  - वडिलोपार्जित हक्क सोपवणे

79)  अप्रूप वाटणे --  आश्चर्य ,कौतुक वाटणे 

80) तारांबळ होणे - घाईगडबड उडणे

81) जम बसणे - स्थिर होणे 

 82) पसंती मिळणे - अनुकूलता लाभणे 

83 ) भरारी मारणे - संपवणे 

84 ) आयोजित करणे - सिद्धता करणे 

85) प्रभावित होणे-  छाप पाडणे 

86) परिसीमा गाठणे  - पराकोटीला जाणे 

87) काळ्यापाण्याची शिक्षा  - मरेपर्यंत कैद होणे

88)  प्रघात पडणे - रीत असणे

 89) बाहू स्फुरण पावणे  - स्फूर्ती येणे

 90) भान ठेवणे - जाणीव ठेवणे 

91) नजर वाकडी करणे  - वाईट हेतू बाळगणे 

92) गट्टी जमणे -  दोस्ती होणे 

93) पहारा देणे -  राखण करणे 

94) लवलेश नसणे -  जराही पत्ता नसणे

 95) उपोषण करणे  - उपाशी राहणे 

96) ताटकळत उभे राहणे  - वाट पाहणे 

97) खंत न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे

 98) समजूत काढणे - समजावणे

99)  हेवा वाटणे -  मत्सर वाटणे

100)  काळजी घेणे -  चिंता वाहणे

101)  बडेजाव वाढवणे  - प्रोडी मिळवणे

 102) वंचित राहणे  - एखादी गोष्ट न मिळणे

103) भरभराट होणे - प्रगती होणे

104)  बांधणी करणे - रचना करणे

 105) कटाक्ष असणे  - कल असणे 

106) पुढाकार घेणे - नेतृत्व करणे

 107) हातभार लावणे - सहकार्य करणे 

 108) कणव असणे - आस्था किंवा करुणा असणे 

109) गळून जाणे -  मग्न होणे ,गुंग होणे 

110) काळ्या दगडावरची रेघ  - खोटे न ठरणारे शब्द 

111) मिशांना तूप लावणे -  उगीच ऐट दाखवणे 

112) योगक्षम चालवणे - रक्षणाची काळजी वाहणे 

113) जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे

 114) अंगाला होणे - अंगाला छान बसणे

115) अंगी ताठा भरणे -  मगरुरी करणे 

116) पोटात ठेवणे  - गुप्तता ठेवणे 

117) अठरा गुणांचा खंडोबा -  लबाड माणूस 

118) धारवाडी काटा -  बिनचूक वजनाचा काटा

119)  डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे

 120) कुणकुण लागणे  - चाहूल लागणे

 121) कच्छपी लागणे  - नादी लागणे 

 122) धिंडवडे निघणे  - फजिती होणे

123)  बाजारगप्पा - निंदा नालस्ती 

124) अंगावर काटा येणे -  भीती वाटणे 

125) जीव वर खाली होणे - घाबरणे 

 126)  उसंत मिळणे - वेळ मिळणे 

 127)  चीतपट करणे -  कुस्तीत हरवणे

128) फटफटणे - सकाळ होणे

 129) पोटात कावळे ओरडणे  - भुकेने व्याकूळ होणे 

130) डोळे वटारणे - रागाने बघणे 

131) दक्षता घेणे  - काळजी घेणे

 132) साशंक होणे - शंका येणे 

133) ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे 

134) भानावर येणे - परिस्थितीची जाणीव होणे

135)  निक्षून सांगणे - स्पष्टपणे सांगणे 

136) वाचा बंद होणे - तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे

137) तोंडभरून बोलणे  - खूप स्तुती करणे 

138) गाजावाजा करणे  - प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे
 
139) नूर पातळ होणे -  रूप उतरणे 

140) उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे 

141) उताणा पडणे - पराभूत होणे

 142) खितपत पडणे  क्षीण होत जाणे

 143) भाऊबंदकी असणे -  नात्यानात्यात भांडण असणे

144)  सांजावणे -  संध्याकाळ होणे

 145) कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे

 146) भंडावून सोडणे -  त्रास देणे

 147) खायचे वांदे होणे -  उपासमार होणे

 148) तगादा लावणे - पुन्हा पुन्हा मागणी करणे

 149) पडाव पडणे -  वस्ती करणे 

150) चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे

 151) लष्टक लावणे -  झंजट लावणे

151) ऊहापोह करणे -  सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे

 152) पाळत ठेवणे  - लक्ष ठेवणे 

153) अनभिज्ञ असणे-  मुळीच ज्ञान नसणे

 154) कूच करणे - वाटचाल करणे

 155) संभ्रमित होणे-  गोंधळणे

156)  विदीर्ण होणे - भग्न होणे 

157) साद घालणे - मनातल्या मनात दुःख करणे

 158)  वेसण घालणे  - मर्यादा घालणे 

 159) बारा गावचे पाणी पिणे - विविध प्रकारचे अनुभव घेणे

160)  रक्षणाची काळजी घेणे -  योगक्षेम चालविणे

 161) मिनतवारी करणे  - दादा पूता करणे

 162) गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे

 163 )उसने बळ आणणे -  खोटे शक्ती दाखवणे 

164) उताणे पडणे  - पराभूत होणे 

165) कानशिलांची भजी होणे - गुच्छ मारून मारून             कानशिलांचा आकार बदलणे

167)  हीसका दाखवणे  -  गंमत लक्षात आणून देणे

168)  दातखिळी बसणे  - बोलती बंद होणे 

169) नाक मुठीत धरणे - अगतिक होणे 

170) काळीज उडणे  -  भीती वाटणे 

171) नसती बिलामत येणे -  नसती कटकट वाढवणे 

172) पिंक टाकणे - थुंकणे

 173) सख्या नसणे  - प्रेमाचे नसणे 

174) चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे

175)  आंदण देणे -  देऊन टाकणे

176) नोरथ पूर्ण करणे - इच्छा पूर्ण होणे

178 ) पुन्हा पुनरुज्जीवन करणे  -  पुन्हा उपयोगात आणणे

179)  निष्प्रभ करणे  - महत्व कमी करणे 

180) अट्टाहास करणे -  आग्रह धरणे

 181) बळ लावणे -  शक्ती खर्च  करणे

181) हुडहुडी भरणे - थंडी भरणे  

182) उच्छाद मांडणे -  धिंगाणा घालने 

183) सही ठोकणे  -  निश्चित करणे 

184) माशी शिंकणे  - अडथळा येणे 

186) पाचवीला पूजने -  एखादी गोष्ट जन्मापासून असणे

 187) तजवीज करणे -  तरतुद करणे 

188) प्रतिबंध करणे -  अटकाव करणे 

189) जळफळाट होणे - रागाने लाल होणे 

190) डोक्यावर घेणे  - अति लाड करणे

191) देणे-घेणे नसणे  - संबंध नसणे

विद्यार्थी मित्रहो आपण आज वाक्प्रचार या घटकाचा अभ्यास केला तुम्हीह चांगला अभ्यास करुन आपले स्पर्धा परीक्षेतील आपले स्थान निश्चित .

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी marathisampurn.com या site वर जाऊन अभ्यास करा .

अधिक माहिती अभ्यासण्यासाठी

समास आणि त्याचे प्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area