श्रीरामनवमी मराठीत माहिती | shriRam navami marathit mahiti
श्रीराम माहिती
रामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमी या दिवशी रामजन्म झाला म्हणून ' रामनवमी 'असे म्हटले जाते हा सण साजरा करत असताना गुढीपाडवा ते रामनवमी पMर्यंत काही उत्सव साजरा केले जात असतो. काही ठिकाणी पारायण लावले जात, गीत-रामायण केले जाते असे अनेक विविध कार्यक्रम ज्या ज्या प्रदेशात प्रचलित आहेत त्या त्या पद्धतीने ते करत असतात. राम नवमी चैत्र महिन्यात येत असल्याने भरपूर ऊन या दिवसात असते .दुपारी बारा वाजता राम जन्म झाला त्यावेळेस डोक्यावर सूर्य होता म्हणजे उन्हाच्या तडाख्यात रामाचा जन्म झाला.
रामजन्म माहिती | ram janm mahiti
राजा दशरथाला तीन पत्नी (राण्या ) होत्या .तिन्ही पत्नींना पुत्र प्राप्ति नसल्यामुळे त्यांनी अग्निकामेष्ट हा यज्ञ केला आणि या यज्ञामुळे तिन्ही पत्नींना पुत्र प्राप्ति झाली. त्यातील कौसल्या ह्यांना राम झाला. हा राम म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम एकबाणी, एकवचनी अशी ज्यांची ओळख आहे असे राम नाम घेतल्याने सगळे पाप हरण होते म्हणून राम या नावाला, नामाला खूप महत्त्व आहे. रावण हा भक्ती करुन भगवान शंकराकडून वरदान मागून तो ऋषीमुनींना राजांना आणि जनतेला त्रास देत असल्याने त्याचा वध करण्यासाठी रामाला जन्म घ्यावा लागला. म्हणजेच भगवान विष्णूचे सातवे अवतार म्हणून रामाला ओळखले जाते. राम हा सांसारिक पुरुषांसाठी, संसारी लोकांना एक आदर्श व्यक्ती म्हणून तर परमेश्वर म्हणून सुद्धा आदरणीय आहेच तसेच आपल्या ह्या सगळ्या इच्छा आकांशा ज्या आहेत त्या रामाकडे पाहिल्यास त्यातून बोध आणि मुक्ती मिळत असते म्हणून तर रामाचे नाव घेतले जाते .
राम जन्माच्या आख्यायिका ,कथा | ram janmachya aakhyayika,katha
ज्यावेळेस समाजात अराजकता माजलेली असेल तेव्हा तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागत असतो .भगवान शंकराचे वरदान घेऊन रावण याने सगळ्यांना हैराण केले होते त्यावेळेस भगवान विष्णूला अवतार घ्यावा लागला .श्रीराम हे भगवानविष्णूचे सातवे अवतार म्हणून मानले जाते .
राजा दशरथांनी तीन लग्न केले होते त्या तिन्ही राण्यांना मूल नव्हते .
जेव्हा राजा दशरथ हा शिकारीसाठी जंगलात गेले असताना त्याठिकाणी रात्री थांबण्याची वेळ येते त्यावेळी रात्री राजा दशरथ झाडावर बसले. तळ्यावर कोणी प्राणी आला तर त्या आवाजाच्या दिशेने बाण मारला तर शिकार मिळत होती ,याच धर्तीवर राजा दशरथाने तो बाण सोडला आणि आई किंकाळी ऐकू आली .
राजाने पाहिले तर श्रावण बाळ होता जो आईवडिलांना काशीला घेऊन चालला होता . त्यांना पाणी पाहिजे होते म्हणून तो तळ्यावर पाणी नेण्यासाठी आला असता तेवढ्यात राजा दशरथाने बाण सोडलेला त्याचा वेध घेतला. " आईवडिलांना पाणी घेऊन जा असं श्रावण म्हणाला ,आणि त्यांना सांगू नका तुमचे नाव सांगितले तर पाणीही घेणार नाहीत ."
राजा दशरथाने श्रावणला मारला गेला असे ऐकताच दोघांनी श्रावणच्या आईवडीलांनी प्राण सोडला .
प्राण सोडण्यापूर्वी राजा दशरथला शाप दिला तो शाप असा होता की "तुझा शेवट पुत्रशोकाने होईल "
राजाने ही हकीकत वशिष्ठमुनींना सांगितली तेव्हा त्यांनी अश्वमेध करण्याची परवानगी दिली .नकळत घडलेल्या पापाचा दोष घालविण्यासाठी हा यज्ञ करवून घेतला.
ह्या यज्ञानंतर ऋषयशृंग नावाच्या ऋषी मुनींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रकामेष्ठी यज्ञ केला .त्यावेळी अग्निदेव प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला .हा प्रसाद राजाने तिन्ही राण्यांना खाण्यास दिला.
तिन्ही राण्यांनी हा प्रसाद खाल्ला आणि त्या तिघींना पुत्र प्राप्त झाले .
कौशल्यास -राम ,शांता
सुमित्रा- लक्ष्मण,शत्रुघ्न
कैकयी - भरत
असे चार पुत्र झाले .
रामनवमीचे महत्त्व माहिती| ram navami che mahttva
राम हा मर्यादापुरुषोत्तम आदर्श व्यक्ती आणि कठीणातील कठीण प्रसंगातही त्यांनी आपला संयम आणि आपली नीतिमत्ता चांगली राखून ठेवली म्हणून लोकांना राम एक आदर्श व्यक्ती म्हणून रामाकडे पाहिले जाते एक वचनी एक बाणी असा असलेला राम त्यांचा जन्मदिवस आणि भगवान विष्णू चे सातवे अवतार म्हणून रामाकडे पाहिले असता रामाचे आचरण करण्यासाठी या दिवशी सगळेजण रामनवमीचा उपवास करत असतात या उपवासातून त्यांना एकच अभिप्रेत असते की आपण ही रामाच्या सानिध्यात राहून रामनाम घेऊन किंवा भजन कीर्तन या माध्यमातून आपण रामनामाध्ये तल्लीन होऊन आपल्या मध्ये जे वाईट दुर्गुण आहेत ते नष्ट व्हावेत एवढी इच्छा लोकांच्या ,भक्तांच्या मनात असते आणि म्हणून मोठ्या श्रद्धेने लोक चैत्र प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत राम नवमी जन्म साजरा करत असतात आता हा रामनवमीचा जो उत्सव आहे तो साजरा करत असताना अनेक प्रदेशांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे असे उत्सव साजरे करत असतात. आपल्याला जे माहित आहे तेच आपण करणे गरजेचे आहे.
राम नवमी का साजरी करावी | ram navami का sajari karavi
राम हा भगवान विष्णूचा जरी अवतार असले तरी सांसारिक लोकांना एक आदर्श म्हणून समाजापुढे रामाचे आदर्श ठेवले आहे. प्रभू रामाच्या नामस्मरणात राहिल्याने त्यांचे आचार-विचार जसे आहेत त्यांच्याप्रमाणे आपलेही व्हावेत अशी लोकांची अपेक्षा असते. समाजात अनेक रावणासारखे कपटी लोक जरी असले तरीही आपण रामविचाराने आपण त्यास उत्तर देऊ असेही लोकांना वाटते समाजातील जो दुष्टपणा आहे तो दुष्टपणा नष्ट करावा यासाठी आपण राम यांच्या विचारानुसार त्यांच्या आचरणानुसार आपण चालले तर आपण खऱ्या अर्थाने ही रामनवमी साजरी केली असे होईल.
रामजन्म असा साजरा करतात | ram janm असा sajara karatat
रामनवमी हे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जात असते ,आपण महाराष्ट्रामध्ये रामनवमी चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत या जन्माचे आपण उत्साहाने रामजन्म करत असतो. पारायण ,किर्तन ,भजन ,गाथा पारायण, भागवत कथा, गीत रामायण असे अनेक कार्यक्रम आपण साजरे करत असतो . राम जन्माचा जो दिवस आहे त्या दिवशी लोक सकाळी लवकर उठून देवपूजा करून उपवास धरत असतात. आपल्या स्वतःच्या घरी सुद्धा राम जन्म साजरा करतात किंवा एखादा सप्ताह मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल अशी अनेक मंडळी किंवा सार्वजनिक ठिकाणी असे रामनवमीचा उत्सव साजरा करतात .घरातील जी राममूर्ती आहे ती घेऊन पाळण्यामध्ये ठेवून तो पाळणा अनेक पाना फुलांनी सजवलेला असतो आणि हा पाळणा सगळ्यांच्या मधोमध बांधला जातो. जेणेकरून सगळ्यांना तो दिसेल अशा पद्धतीने तो बांधला जातो .आता रामाचा जन्म हा भर दुपारी बारा वाजता झालेला असल्यामुळे पाळणा ज्या ठिकाणी बांधला जातो त्याच्यावर मंडप किंवा पत्र्याचे शेड असेल त्या खाली बांधला जातो. असा मोकळ्या ठिकाणी असावा .उन्हामध्ये पाळणा नसतो त्यासाठी सावली खालीच असा पाळणा बांधला जातो पाळण्यामध्ये मूर्ती ठेवून त्या ठिकाणी जन्म साजरा केल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन रामाचा पाळणा म्हणू लागतात .राम जन्माचा पाळणा म्हणू लागतात आणि हा पाळणा म्हटल्यानंतर सगळ्यांनी त्या ठिकाणचा जो प्रसाद असेल तो प्रसाद घेऊन खाणे .असा साजरा केला जातो .
काहींचा हा दिवसभराचा उपवास असल्याने काही भक्तमंडळी दिवसभर राम नामामध्येच रंगून गेलेले असतात तर काहीजण कीर्तन असेल तर बारा वाजता बरोबर राम जन्माच्या वेळेस कीर्तन बंद केले जाते आणि राम जन्म साजरा केला. जातो तर काही ठिकाणी भजन चालू असते आणि ह्या भाजनामध्ये राम जन्मा साजरा करत असतात काही ठिकाणे राम जन्माच्यानंतर असा उत्सव साजरा करुन रामाचे भक्त हनुमंत राया यांच्या जयंतीपर्यंत असा उत्सव साजरा करत असतात.
रामनवमीचे महत्त्व | ram navamiche mahttva
राम हा मर्यादापुरुषोत्तम ,आदर्श व्यक्ती आणि कठीणातील कठीण प्रसंगातही त्यांनी आपला संयम आणि आपली नीतिमत्ता चांगली राखून ठेवली म्हणून लोकांना राम एक आदर्श व्यक्ती म्हणून रामाकडे पाहिले जाते एकवचनी एकबाणी असा उल्लेख असलेला राम त्यांचा जन्मदिवस आणि भगवान विष्णूचे सातवे अवतार म्हणून रामाकडे पाहिले असता, रामाचे आचरण करण्यासाठी या दिवशी भक्तमंडळी रामनवमीचा उपवास करत असतात या उपवासातून त्यांना एकच अभिप्रेत असते की आपणही रामाच्या सानिध्यात राहून रामनाम घेऊन किंवा भजन कीर्तन या माध्यमातून आपण राम नामामध्ये तल्लीन होऊन आपल्यामध्ये जे वाईट दुर्गुण आहेत ते नष्ट व्हावेत एवढी इच्छा भक्तांच्या मनात असते आणि म्हणून मोठ्या श्रद्धेने लोक चैत्र प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत राम नवमीचा जन्म साजरा करत असतात.
आता हा रामनवमीचा जो उत्सव आहे तो साजरा करत असताना अनेक प्रदेशांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे असे उत्सव साजरे करत असतात आपल्याला जे माहित आहे तेच आपण करणे गरजेचे आहे.
प्रश्नावली
1) श्रीरामाच्या पिताजीचे नाव काय?
>>राजा दशरथ
2) रामाच्या बहिणीचे नाव ?
> शांता
3 )रामाच्या आईचे नाव ?
>कौसल्या
4) रामाच्या पुत्रांचे नाव ?
> लव ,कुश
5) सुमित्राचा पुत्र कोण ?
> भरत
6 ) राजा दशरथाने कोणास शिकार समजून मारले ?
> श्रावण
7 श्रीरामाचा एकनिष्ठ भक्त?
> हनुमान
आणखी वाचा
★◆●♂∆®★■●◆●◆★★©®℃©◆●●●◆◆◆◆★
अतिशय सुंदर मांडणी.
उत्तर द्याहटवाजय श्री राम 🙏🙏🙏