मराठी व्याकरण शब्दांच्या जाती सव्यय आणि अव्यय| marathi grammar shabdanchya jati
मराठी व्याकरण शब्दांच्या जाती |
शब्द म्हणजे काय
शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात.
तर शब्दांना प्रत्यय जोडला आणि तो वाक्यात वापरला तर त्यांना पद असे म्हटले जाते.
हे आपण शब्द म्हणजे काय आणि पद म्हणजे काय हे बघितले. व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात. त्याला प्रत्यय जोडला आणि जर बदल झाल्यास त्यास विकृती असे म्हटले जाते.
उदा .आंबा - शब्द ,
आंब्याखाली - पद
शब्द एक असला तरी तो वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे त्याची भूमिका बदलत असतो .
1) चिमणी झाडावर बसली ( शब्दयोगी अव्यय )
2) रामाने सीतेस वरले ( क्रियापद)
3) वरमाय तोऱ्यात वावरत असते ( विशेषण)
4) चेंडू वर गेला ( क्रियाविशेषण अव्यय )
5 ) रामाने स्वप्नात मला एक वर दिला ( नाम )
आपल्या मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत या आठ जाती दोन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत ,त्या दोन विभागलेल्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
शब्द
विकारी (सव्यय) अविकारी ( अव्यय)
नाम क्रियाविशेषण अव्यय
सर्वनाम शब्दयोगी अव्यय
विशेषण उभयान्वयी अव्यय
क्रियापद केवलप्रयोगी अव्यय
1 ) विकारी शब्द (सव्यय ) | vikari shabd ( savyay)
ज्या शब्दांचा लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
2) अविकारी शब्द (अव्यय)
लिंग, वचन, विभक्तीमुळे कोणताही वाक्यात बदल होत नाही, त्यास अविकारी शब्द असे म्हणतात.
विकारी शब्द (सव्यय ) | vikari shabd ( savyay )
नाम म्हणजे काय आणि नामाचे प्रकार | namache prakar
1 ) नाम
सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखायचे असेल त्यासाठी वापरण्यात येणारे जे विकारी शब्द असतात त्याला नाम असे म्हणतात.
नामाचे प्रकार | namache prakar
1) सामान्य नाम | samany nam
एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एक नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हटले जाते.
सामान्य नाम त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते.
वस्तूच्या जातीला दिलेले नाव असते .
सामान्य नामाचे अनेकवचन होते .
उदा .वर्ग ,प्राणी, पक्षी, नदी, पर्वत ,शाळा, देश
2) विशेष नाम | vishesh nam
ज्या नामातून विशिष्ट जातीचा बोध होत असून एका विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा , वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात.
विशेष नाम हे एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा वस्तूचा बोध होतो म्हणजेच हे व्यक्ती वाचक असते .
हे का घटका पुरते मर्यादित असते
ठेवलेले नाव असते
उदा . गंगा, रमेश, सातारा, आंबा, चिमणी ,नववी, राम, पोपट, हत्ती, हिमालय ,भारत
सामान्य नाम आणि विशेष नाम यातील फरक
1 : सामान्य नाम है एका विशिष्ट जातीचा बोध होतो
--तर विशेष नाम मध्ये एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा आणि वस्तूचा बोध होतो.
2 : सामान्य नामात सर्व वस्तूत असलेल्या सामान्यपणाला दिलेले नाव असते
तर विशेष नाम मध्ये त्या व्यक्तीचे वस्तूचे म्हणजे स्वतःचे नाव असते
3 सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते
तर विशेष नामामध्ये त्याचे स्वतःचे नाव असते हे सगळ्या वस्तूंना लागू पडत नाही .
उदारणार्थ
सामान्यनाम - देव
विशेषनाम - राम
सामान्यनाम - प्राणी
विशेषनाम - ससा
सामान्यनाम - पक्षी
विशेषनाम - मोर
सामान्यनाम - नदी
विशेषनाम - गंगा
सामान्यनाम- झाड
विशेषनाम - बाभूळ
आणखी काही उदाहरणे
सामान्य नाम विशेष नाम
- मुलगा हरी( मुलाचे नाव)
- पक्षी पोपट (पक्षाचे नाव )
- प्राणी घोडा ( एक )
- नदी सिंधू
- पर्वत हिमालय
- देश भारत
- जिल्हा पुणे
- भांडी ताट
- संत ज्ञानेश्वर
- शिक्षक बोबडे गुरुजी
- मिठाई लाडू
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
- नेता अरविंद केजरीवाल
- पेन रेनॉल्ड्स
- राजा शिवाजी महाराज
- गाव। जाधववाडी
- देव राम
- विद्यार्थी राम
- शाळा आदर्श विद्यालय
- भाजी चाकवत
- धान्य गहू
- फळ। परू
- झाड आंबा
- शहर मुंबई
- राजधानी मुंबई
- ग्रह पृथ्वी
- खेळाडू सचिन तेंडुलकर
- खेळ। क्रिकेट
3 भाववाचक नाम | bhavavachak nam
ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो तेव्हा त्यास भाववाचक नाम असे म्हणतात .
उदाहरणार्थ. कीर्ती, चांगुलपणा, आनंद,शौर्य ,थोरवी
भाववाचक नाम यांना वेगळे असे अस्तित्व नसते कल्पनेने ते आहे असे मानून नाव दिले जाते त्यास भाववाचक नाव असे म्हटले जाते.
भाववाचक नाम यास धर्मवाचक नाम असे म्हटले जाते. ज्याला स्पर्श करता येत नाही, जवळ घेता येत नाही, जे आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही पण कल्पनेने आपण ते मानू शकतो असे गुण, अवस्था, कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हटले जाते .
उदा . सौंदर्य, गांभीर्य ,धैर्य, माधुर्य ,क्रौर्य, शौर्य ,नाविन्य , शत्रुत्व ,मित्रत्व, प्रभुत्व ,नेतृत्व, नम्रता, थोरवी, नवलाई, फसवेगिरी, भामटेगिरी ,दादागिरी, हुशारकी, गावकी , आपुलकी ,मालकी, समता, एकता, एकता, बंधुता ,श्रीमंती, गरीबी ,गोडी, चोरी, हुशारी ,बालपण, देवपण, शहाणपण, वेडेपणा ,चांगुलपणा, मूर्खपणा ,गोडवा, गारवा ,ओलावा, दुरावा, सुगावा, पुरावा ,थकवा
सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात
१) पदार्थवाचक नाम
जे घटक ग्राम, मीटर, लिटर मध्ये मोजले जातात म्हणजेच संख्येत मोजले जातात त्याला पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उदा . तांबे ,कापड ,पीठ ,पाणी, सोने
२) समूहवाचक नाम
समान गुणधर्म असणारे अनेक घटकांच्या एकत्रित समाजाला दिलेले नाव म्हणजेच समूहवाचक नाम असे म्हणतात.
उदा. मोळी , ढिगारा , जोडी , गंज
2 ) सर्वनाम | sarvanam
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदा . मी, तु, तो ,ती, त्या, हा,ही , हे, ह्या, जो, जी,ज्या, कोण, आपण, काय, स्वतः .
3 ) विशेषण | visheshnam
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात.
उदा .चांगला, सुंदर, कडू,-गोड, धूर्त, पहिला, पाचवा, द्विगुणित ,चौपट
4 ) क्रियापद | kriyapad
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा . हसतो, पळतो, धावतो, खातो,-पितो, वागतो, रडतो मारतो, जिंकतो, पकडतो ,ऐकतो ,उडतो, करतो नाचतो ,गातो, लिहितो, बोलतो ,वागतो
5) क्रियाविशेषण अव्यय | kriyavisheshan avyay
१】 क्रियाविशेषण
लिंग, वचन ,विभक्ती मुळे बदल होतो.
राम चांगला खेळतो
सीता चांगली खेळते
ते चांगले खेळतात
त्याला चांगले खेळता येते
तिला चांगले खेळता येते
२】 क्रियाविशेषण अव्यय
लिंग वचन विभक्ती मुळे यात बदल होत नाही त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
राम हळू चालतो
सीता हळू चालते
ते हळू चालतात
त्याला हळू चालवते
तिला हळू चालवते
आपल्या मराठी व्याकरणमध्ये शब्दांच्या आठ जाती आहेत या आठ जाती दोन विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत ,त्या दोन विभागलेल्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
छान व सखोल माहिती
उत्तर द्याहटवाखूपच छान माहिती आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम
हटवा