Google ads

Ads Area

जागतिक आरोग्य दिन माहिती | jagatik aarogya din marathit mahiti

 जागतिक आरोग्य दिन  माहिती | jagatik aarogya din mahiti

आरोग्य दिन माहिती
आरोग्य दिन माहिती
जागतिक आरोग्य दिन(toc)

जागतिक आरोग्य  दिन हा दिवस WHO या जागतिक संघटनेने लोकांच्या आरोग्य संदर्भात म्हणून महत्वाचा दिवस आहे. लोकांच्या आरोग्याशी अनेक गंभीर समस्या असतात या समस्या सुटणाऱ्या नसतात म्हणून लोक हे आरोग्याविषयी जागरूक राहून आपल्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असतो .

       आजच्या धकाधकीच्या युगात माणूस हा  आरोग्यापासून लांब गेला आहे आपले आरोग्य हीच संपत्ती आहे  हेच लोकांना  समजत नाही तेव्हा आपले घर आणि आपले कुटुंब चालविण्यासाठी लागणारा पैसा हेच आपले ध्येय मानून लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असते आणि  ह्या समस्यांना सामोरे जात असताना त्यांचे आर्थिक, शारीरिक ,मानसिक खच्चीकरण होत असते त्यामुळे या आरोग्याबाबत लोकं  उदासीन आहेत आपला कसाबसा संसाराचा गाडा चालवत असतात या सगळ्या गोष्टीतून सुटायचे असेल तर आपण नेहमी सकारात्मक राहून आपल्या आरोग्याची काळजी घेणे हेच जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.


जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो| jagatik aarogya din ka sajara kartat


आपल्याला सात एप्रिल म्हटले की जागतिक आरोग्य दिन हा दिवस आपल्याला माहीत आहे पण हा दिवस पहिल्यांदा कशा पद्धतीने साजरा केला हे माहिती असणे आवश्यक आहे 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने " जागतिक आरोग्य संस्था" त्यांच्या अधिकाराखाली स्थापन केली आणि दोन वर्षाने जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला गेला. हे वर्ष 1950 होते हाच दिवस संपूर्ण जगात आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण घ्यावयाची काळजी जागतिक आरोग्य घरी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात असला तरी आपण आरोग्याच्या बाबतीत उदासीन असतो हे आपल्याला माहीत आहे म्हणून आपले आरोग्य चांगले असावे यासाठी आपण स्वतःहून अशा पद्धतीने चांगले कसे राहील यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले तर आपला समाज हा चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेईल आपल्याला जागतिक आरोग्य दिनानिमित्त  आरोग्य  सांभाळण्यासाठी घेतलेली  काळजी होईल.

निसर्गातील समतोल हा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आरोग्यही चांगले राहील. पर्यावरणाचा ऱ्हास झाला असल्याने अनेकांना अनेक  समस्यांना तोंड द्यावे लागत असते.  प्रत्येक वर्षी लोक या पर्यावरण ऱ्हासाचे  बळी पडत असतात त्यामुळे आपले आरोग्य हे आपण नीट सांभाळणे गरजेचे आहे.


जागतिक आरोग्य संघटनेची थीम | jagatik sanghtanechi aarogya theam

 प्रत्येक वर्षी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच  प्रत्येक वर्षी थीम ठरवली जाते असते. यावर्षी जागतिक पातळीवर मध्ये आपल्या आरोग्याची theam थीम  सांगितली  आहे.ही theam अशी आहे  की "आपला ग्रह, आपले आरोग्य " म्हणजे  आपला ग्रह म्हणजे आपले आरोग्य होय आणि या ग्रहावरती म्हणजेच आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम वातावरणाचा होता कामा नये तरच आपले आरोग्य चांगले राहील. म्हणजेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आजूबाजूचा पर्यावरणाचा समतोल चांगला राहिला पाहिजे. जगात अनेक  ठिकाणी महामारीने  समस्या उद्भवलेल्या आहेत. कितीतरी  लोक  यास बळी पडलेले असतात त्यामुळे या ग्रहावरचे आरोग्य धोक्यात येते म्हणून असे आरोग्य धोक्यात आल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे अशी या वर्षीची थीम आहे.

आरोग्याविषयी विचार | aarogyavishai vichar

1)  आरोग्य हीच धनसंपत्ती | aarogya hich dhansampatti

योगा आणि व्यायाम यांची जोड असावी संप्रदायाशी जोडणे  अध्यात्म या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही कारण कोणताही संप्रदाय असला तरी लोकांना चांगल्या गोष्टी शिकवत असतो त्यातून आपण कोणताबोध घेतो हे महत्त्वाचे आहे.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण एक एवढी काळजी घेत महत्त्वाचे आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवून आपण आपले आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळणे गरजेचे आहे आपण या जागतिक आरोग्य दिन ह्या  दिवशी एक संकल्प करूया आपले आरोग्य आणि इतरांचेही आरोग्य कशा पद्धतीने चांगले राहील याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, हे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या हातात या सगळ्या गोष्टी असणे गरजेचे आहे . 

2) परिसर स्वच्छ ठेवणे | prisar swachha thevane

 आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपल्या आजूबाजूचा परिसर जो आहे तोही प्रसन्न राहून आपल्याला आरोग्य चांगले लाभेल  जेणेकरून आजूबाजूला डासांची पैदास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जर डासांची पैदास झाली तर आपल्याला अनेक रोगांना बळी पडावे लागते म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

3)  शरीर स्वास्थ्य | sharir swasthya

 आरोग्यम् धनसंपदा यानुसार आपले आरोग्य ही मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती चांगल्या प्रकारे जपणे आपल्याच हातात आहे जर आपण आपल्या आरोग्याची काळजी न घेता आरोग्याची हेळसांड करायला लागलो म्हणजेच आपल्या शरीराचे फाजील लाड करून आपण जर आपले आरोग्य बिघडवू. आपण प्रकृतीच्या मानाने खालावलेले असणार. आपलीही धनसंपत्तीची आहे  धनसंपत्ती आपण चांगल्या प्रकारे जपली पाहिजे एखाद्याला पैसाअडका भरपूर प्रमाणात असेल पण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व कमी  होत असेल तर त्या पैशाला काडीचीही किंमत नाही म्हणून आपले आरोग्य हेच आपले धन आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


 नैसर्गिक जगणे आणि वागणे हे जरी आपल्या हातात असले तरी सुद्धा भोवतालचा परिसर आहे या परिसरातून लोकांना नैसर्गिक भौतिक सुविधा सुसज्ज असे वातावरण निर्माण झाले असेल तर त्याठिकाणी अनेक चैनीच्या गोष्टी लोक स्वीकारत असतात. आपण मोठमोठे मॉल्स मधून आपण नको त्या गोष्टी ज्यामध्ये केमिकल आहेत अशा केमिकलच्या वस्तू आपण घरात आणून आपल्या लहान मुलांना खाण्यासाठी देत असतो. त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत असते यासाठी नैसर्गिक जे नैसर्गिकरित्या जी शेती केली जाते त्या शेतीतून मिळणारे फळे,   भाजीपाला आहे ती आरोग्यासाठी चांगला आहे केमिकल वापरलेले औषध मारलेली  जी फळे आहेत त्याचा जास्त वापर करू नये हे महत्त्वाचे आहे त्याने आपली प्रकृती बिघडली जाते.

5) जुनं ते सोनं | junn te sonn

 ह्या म्हणण्यानुसार आज ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लोकांना याची गरज भासत आहे ज्या वेळेस लोकांना खाण्याची पंचाईत होती, त्यावेळेस लोक कसे तरी आपले पोट भरण्यासाठी मिळेल त्या साधन मार्गाचा उपयोग करत होते, पण आज ती फॅशन झाली आहे .

उदाहरणार्थ .घरामध्ये पूर्वीच्या काळी पाणी पिण्यासाठी   रांजण किंवा कुंभाराकडून आणलेले काही भागांमध्ये डेरा तर म्हणतात तर काही भागांमध्ये माठ म्हणतात.  म्हणून त्यातील पाणी अधिक चविष्ट लागत होते पण तेच पाणी आज फ्रीजमध्ये ठेवून दिले जाते. लोकांना पुन्हा एकदा जुनं ते सोनं या गोष्टीची ओढ लागली आहे फ्रिज मधील भाजीपाला आणि थंड पेय पिण्यासाठी अजूनही आपली पिढी त्याकडे आकर्षित होत आहे हे मात्र बदलले पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आरोग्यासाठी टाळणे गरजेचे आहे.

6) तंत्रज्ञानाचा वापर कमी करणे

 आधुनिक तंत्रज्ञान अधिक प्रगल्भ होत चालले आहे. त्यामध्ये माणूस हा स्वतःला त्यामध्येच गुंतवून घेत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये नवीन नवीन स्मार्ट टीव्ही घरात आले त्यामुळे छोटे छोटे बॉक्स मधले टीव्ही हद्दपार झाले. त्यामुळे लहान मुलांना टीव्ही बघणं हा शोक लागला.

 त्यानंतर घरामध्ये छोटे मोबाईल होते. संपर्काचे माध्यम म्हणून मोबाईल याचा वापर अधिक  चांगला केला जात होता, पण त्या छोट्या मोबाईलची जागा आता अँड्रॉइड मोबाइल ने घेतली असल्याने पाच-सहा महिन्याचे मूल जरी असले तरीही त्याला मोबाईलची आवड निर्माण होते. हे सगळे आपणच करतो अनेक मुलांना रडायला लागले की त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला की मूल शांत बसते मग त्या मुलाला तहान भूक काही लागली असेल किंवा नाही किंवा कशामुळे रडते याचा विचार न करता त्याच्या हातात मोबाईल दिला की ते शांत बसते अशी समजूत झाली आहे .यामुळे मुलांच्या दृष्टीस आणि मानसिकरित्या त्यांचे प्रकृतिमान बिघडत चालले आहे.

 हे झाले लहान मुलांच्या बाबतीत मोठ्या माणसांच्या बाबतीत  हाच प्रकार दिसून येत आहे. चोवीस तासांपैकी कमीत कमी दिवसाचे सात ते आठ तास हे पूर्णपणे मोबाईल मध्ये बिझी असतात. मग ते एखाद्याला कॉल करून विचारपूस करणे अवघड वाटू लागले आहे. फक्त गुड मॉर्निंग मेसेज टाकला की   संपर्क ठेवतो  हेच लोकांना पटले आहे .दररोज न चुकता massage करतो पण वर्षभर एखादाही call करुन चौकशी करत नाहीत . त्याहीपेक्षा व्हाट्सअप कमी झालेला आहे. आता त्याची जागा फेसबुक, टेलिग्राम,instagram या माध्यमांमध्ये जास्त झाले आहे आणि त्यामध्ये अनेक स्त्रिया पुरुष याच्यामध्ये अडकून पडले आहेत घरामध्ये मुलांकडे लक्ष जात नाही यामुळे आपल्याही आरोग्यावर याचा परिणाम होत असतो हे आपण समजून घेणे गरजेचे आहे.

रामनवमी विषयी माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा  .

https://www.marathisampurn.com/2022/04/ram-navami-marathit-mahiti.html

★★★★★★■■■★★★★★★■■■★★★★★★


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area