हनुमान जयंती मराठीत माहिती | Hanuman jayanti marathit mahiti
हनुमान जयंती माहिती |
हनुमान म्हणले की प्रभू रामाचे भक्त आणि रामासाठी काहीही करायला तयार असलेले एकनिष्ठ भक्त म्हणून हनुमान म्हणजेच मारुती होय. हा मारुती भक्तीचे, शक्तीचे प्रतीक असलेले भक्त .सगळ्यात जास्त भक्त हनुमानाचे आहेत .
सगळ्यांच्या परिचयाचे आणि सगळ्या गावात ज्यांची मंदिर आजही आहेत आणि सगळेच लोक मारुतीला म्हणजेच हनुमंत रायाला मानतात. असा एकमेव रामभक्त म्हणजे हनुमान होय. रामाचा दूत, दास ,भक्त म्हणून हनुमानाला ओळखले जाते.
हनुमान हे रामाचे एकनिष्ठ भक्त आहेत म्हणून ओळखले जाते. भक्त कसा असावा हा हनुमंतरायाकडून शिकावे स्वतःकडे अपारशक्ति असूनही केवळ प्रभूच्या आज्ञेनुसार कोणतीही गोष्ट करण्याचे धाडस होणार नाही एवढी त्यांची रामावर भक्ती होती असा हा हनुमान सगळ्यांच्याच आवडीचा भक्त म्हणून ओळखला जातो.
हनुमान विषयी माहिती | hanuman vishai mahiti
राम हनुमान यांची भेट|ram hanuman bhet
ज्यावेळेस राम वनवासात गेले असता त्या ठिकाणी भेट झाली परंतु त्यांचा जन्म केव्हा झाला हे माहीत असणे गरजेचे आहे. त्यांचा जन्म अंजनेरी या गावी झाला हे गाव डोंगरीकिल्ला म्हणून नाशिक जिल्ह्यात आहे. हनुमंत रायांचे वडील केसरी तर आईचे नाव अंजनी लहानपणीच तो ताकतवान असल्याने भरपूर करामती केल्या तो दैवी गुण घेऊन असल्याने त्याच्याकडे अनेक सिद्धी आपणाला बघायला मिळत आहेत. जन्मल्याबरोबर सूर्याला गिळायला निघालेला हनुमान. सगळ्या देवतांना भीती निर्माण झाली आणि सर्व देव देवता यांना काळजी वाटू लागली त्यामुळे पृथ्वी आणि सूर्य वाचवणे गरजेचे आहे, म्हणून इंद्राने त्यांना म्हणजेच मारुतीरायाला वज्र फेकले यामुळे मारुतीरायाच्या तोंडाला लागले सूर्याला गिळायला निघालेला हनुमंत राय शांत झाला.
राम आणि हनुमान यांची भेट
प्रभू राम हे चौदा वर्षे वनवासात गेले असता त्या ठिकाणी हनुमान यांची भेट झाली त्याच वेळेस लंकेचा राजा रावण यांनी सीतेचे अपहरण केल्यामुळे सीता मातेला शोधून काढण्याचे काम प्रभू रामचंद्रांनी हनुमंतराय यांच्यावर कामगिरी सोपवली. त्यांचा निरोप घेऊन ते लंकेला गेले ज्यावेळेस सीता मातेचा शोध घेतलं जांबुवंत याने हनुमान जी ची शक्ती पाहून तू महापराक्रमी आहेस तुझ्या अंगात भरपूर सामर्थ्य आहे तो कोणतीही गोष्ट करू शकतो. बलवान आहेस अशी आठवण करून दिली ही घटना इ स पू 5067 होती असे दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या ठिकाणचे संशोधकांचे असे म्हणणे आहे.
मारुती चे स्थान | marutiche sthan
मारुती हा प्रभू रामचंद्र रामाचा यांचा एकमेव एकनिष्ठ, विश्वासू , ताकतवान, बलवान ,सामर्थ्यवान असा भक्त म्हणून सगळीकडे नावलौकिक आहेत .
हनुमंत राय हे सप्तचिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत म्हणजेच ते अजूनही जिवंत आहेत असे म्हटले जाते ज्या ठिकाणी आपल्या प्रभू चे नाव घेतले जाते म्हणजेच रामाचे नाव घेतले जाते त्या त्या ठिकाणी हा मारुती असतोच असे लोकांचे म्हणणे आहे, म्हणून तर या आधारित संत तुलसीदास यांनी मारुतीला शोधून काढले तसेच संत रामदास स्वामी यांनीही राम भक्ती करत असताना हनुमानाचे महत्त्वही जाणले होते.
हनुमानाने लंकेत केलेला पराक्रम| hanumanane lanket kelela parakram
ज्यावेळेस रामाने हनुमंतरायला सीतेला शोधण्यासाठी समुद्र ओलांडून पाठवले त्यावेळेस सीता मातेला शोध घेण्यासाठी गेले असता वानर म्हणून टवाळी केली आणि रावणाच्या दरबारातच मारुतीच्या शेपटीला आग लावल्याने शेपटी घेऊन तो इकडे तिकडे उड्या मारत फिरू लागल्याने त्या ठिकाणची असलेले घरे जळाली , आपण त्यालाच लंका जाळली असेही म्हणतो.
तेथून सीता मातेचा निरोप घेऊन प्रभू रामचंद्राकडे आला. रामाने लंकेत आपले वानर सेना घेऊन रावणाशी युद्ध केले या युद्धात हनुमानाने रामाला खूप मोठी मदत केली .यामध्ये इंद्रजीत याच्याकडून लक्षमन याला बाणलागला आणि तो बेशुद्ध पडला म्हणून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी द्रोनागिरी पर्वताकडे मारुतीराया निघाले. संजीवनी वनस्पती घेऊन येण्यास सांगितले असल्याने या द्रोणागिरी पर्वतावर कोणती वनस्पती आहे हे न कळल्याने त्यांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि वेळ न घालवता लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाचे खूप मदत झाली.
अकरा मारुती | aakra maruti
संत रामदास स्वामी हे राम उपासना ,हनुमंत यांची उपासना करून त्यांनी लोकांसाठी जनजागृती निर्माण केली .तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना बलोपासना आणि मारुतीरायाचे दर्शन करून देणे हे समर्थ रामदासांनी तरुण लोकांसमोर आदर्श निर्माण करून ठेवला. सातारा कराड आणि कोल्हापूर या परिसरामध्ये समर्थ स्थापित अकरा मारुती आहेत या अकरा मारुती ची स्थापना इ स 1645- 55 या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये झाली या अकरा मारुतीची माहिती आपण बघणार आहोत.
1) चाफळचा दास मारुती | chaphalchadas maruti
सातारा कराड रस्त्यावर उंब्रज हे मोठे गाव असून उंब्रज पासून उजवीकडे 11 किलोमीटर अंतरावर चाफळ हे गाव आहे सातार मध्ये 1648 रोजी अंगापूरचे डोह आहे त्या डोहात रामाची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळ याठिकाणी केली याच मंदिरासमोर हात जोडलेला दासमारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना समर्थ यांनी केले. या मारुतीची मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. 1967 मध्ये कोयनेचा भूकंप झाला थोडे राम मंदिराचे नुकसान झाले परंतु मारुती मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही असे म्हटले जाते.
2) वीर मारुती
चाफळच्या राम मंदिराच्या पाठीमागे 100 अंतराKवर रामदास स्वामी यांनी या मारुतीची स्थापना केली ही वीर मूर्ती दिसत असून मारुतीच्या पायाखाली राक्षस आहे याच ठिकाणी रामदास स्वामी यांनी दोन मारुतीची मंदिरे स्थापित केली
3) माजगावचा मारुती
चाफळपासून आत तीन किलोमीटर च्या अंतरावर असलेले हे मंदिर आहे त्या मंदिराची म्हणजेच मारुतीरायाचे एक वैशिष्ट्य असे आहे की गावासाठी एक तटबंदी होते त्या तटबंदीमध्ये घोड्यासारखा दिसणारा असा दगड होता, या दगडालाच कोरुन समर्थ रामदासांनी मारुतीची प्रतिमा करून 1650 मध्ये स्थापन केली. या मूर्तीची उंची पाच फूट आहे या मंदिराचे म्हणजेच मूर्तीचे तोंड चाफळच्या दिशेने आहे.
4 ) शिंगणवाडीचा मारुती
हा मारुती बाल मारुती, चाफळचा तिसरा मारुती, खडीचा मारुती असेही या मारुतीला नावे आहेत .हा मारुती चाफळपासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे ही टेकडी म्हणजे समर्थ या ठिकाणी ध्यानस्थ बसत होते .त्या जागेला रामनगर असेही म्हटले जाते त्याठिकाणी1650 मध्ये समर्थांनी छोटीशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. केवळ चार फूट उंचीची ही मूर्ती आहे. उत्तरेकडे तोंड असून याठिकाणी चाफळच्या अगोदरच शिंगणवाडी याठिकाणी स्वामी समर्थ रामदास स्वामींचा मठ होता. तिथे असलेले चिंचेचे झाड या झाडाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. ज्यावेळेस त्यांची भेट झाली त्या वेळेस शिवरायांना तहान लागली त्यावेळेस समर्थांकडे कुबडी होती त्या कुबडीने तेथील दगड ढकलला त्या दगडाखाली पाण्याचा झरा वाहता झाला, त्यामुळे हे ठिकाण कुबडीतीर्थ म्हणून हे ओळखले जाते.
5 ) उंब्रजचा मारुती
उंब्रज याठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांना उंब्रज हे येथील जमीन इनाम म्हणून दिली होती ,त्या ठिकाणी 1650 मध्ये समर्थांनी मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली या मूर्तीची स्थापना केल्यानंतर समर्थ याठिकाणी 14 दिवस राहून त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्याचे काम रामदास स्वामी यांनी केले आहे .
6 ) मसूर चा मारुती
उंब्रज पासून केवळ मसूर या ठिकाणी मारुतीची स्थापना केली या मूर्तीची उंची पाच फूट आहे आणि चुन्यापासून बनवलेली आहे .संपूर्ण अकरा मारुती मध्ये हा मारुती सुंदर आहे या मूर्तीची स्थापना 1646 रोजी केली. या मूर्तीच्या पायाखाली जम्बोमाळी हा राक्षस दाबून धरलेला दिसतो
7 ) शिराळे चा मारुती
शिराळे म्हटले की आपल्याला नागपंचमीच्या सणाची आठवण होते .हे शिराळे नागासाठी प्रसिद्ध आहे .या ठिकाणी ही मूर्ती मोठी असून मंदिरही चांगले आहे 1655 साली या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीची उंची सात फूट असून चुन्यात बनवलेली आहे ,उत्तराभिमुख आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे झरोके ठेवले आहेत त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीच्या मुखावर प्रकाश पडत असतो.
8 ) शहापूर चा मारुती
हा मारुती कराड मसूर या रस्त्यावर आहे म्हणजेच मसूर पासून तीन किलोमीटर अंतरावर पासून शहापूर गावाचा जो फाटा आहे तेथून एका किलोमीटर अंतरावर हे मारुती मंदिर आहे. समर्थांनी अकरा मारुती पैकी हे मंदिर सर्वात अगोदर स्थापन केले असावे असे म्हटले जाते. 1645 साली या मूर्तीची स्थापना केली. या मारुतीला चुन्याचा मारुती असेही नाव दिले आहे ,या या मूर्तीची उंची सात फूट असून थोडी फार उग्र असलेली दिसते शहापूर जवळ रांजणखिंड या ठिकाणी समर्थांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते .
9) बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका या ठिकाणी बहे हे गाव आहे कराड कोल्हापूर रस्त्यापासून पेठ वरून 12 किलोमीटर अंतरावर मारुतीचे मंदिर आहे .मारुतीचे दर्शन घडेल या इच्छेने समर्थ त्या ठिकाणी गेले त्याठिकाणी हनुमंतरायाची भक्ती चालू केली. त्यांचा धावा करू लागले आणि पाठीमागे आहे त्या डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थांनी त्या डोहामध्ये उडी मारून त्या डोहातून मूर्ती बाहेर काढली ती हीच मूर्ती 1652 मध्ये स्थापना केली या ठिकाणी राम मंदिर होते त्याच्याच पुढे भगवान शंकराचे मंदिर होते आणि त्याच्या पाठीमागे मारुतीचे मंदिर स्थापन केले.
10 )मनपाडळे चा मारुती
मनपाडळे आणि पारगाव दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा आणि पन्हाळगड च्या बाजूला आहेत .या गावचे राजकीय महत्त्व जाणून रामदास स्वामी यांनी शक्ती केंद्रे स्थापन केले कोल्हापूर ते वडगाव सुमारे बावीस किलोमीटर अंतर वडगाव वाटर वरून आंबा मार्गे मनपाडळ अंतर सुमारे 14 किलोमीटर आहे अकरा मारुतींपैकी हे दक्षिणेकडचे असलेले मारुती मंदिर 1652 साली या मंदिराची स्थापना केली. या मूर्तीची उंची पाच फूट अशी आहे मारुतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे .
11) पारगावचा मारुती
ह्या मारुतीला बालभारती आणि समर्थांच्या झोळीतील मारुती असे म्हणतात. 1653 साली या मूर्तीची स्थापना केली अकरा मारुतींपैकी ही सर्वात शेवटून स्थापन केलेले आणि सगळ्यात लहान अशी मूर्ती आहे .या मंदिरातील मूर्ती साधारण दीड फूट उंचीची असलेली दिसते .मनपाडळे ते पारगाव अंतर केवळ पाच किलोमीटर असून तरीही फिरुन या ठिकाणी यावे लागत असते.
अशा पद्धतीने आपण समर्थांनी भक्तीचा महिमा दाखवून देण्यासाठी आणि लोकांना हनुमंतरायाची शक्ती दाखवण्यासाठी अकरा मारुती ची स्थापना केली रामदास स्वामी रामभक्त आणि हनुमानाचे हे भक्त होते त्यामुळे प्रत्येक गावात हनुमानाचे मंदिर आजही आपल्याला दिसून येते.
हनुमंताची अशी उपासना करावी | hanumanachi upasana ashi karavi
1) मारुतीरायाचे आठवड्यातून दोन वार समजले जातात एक मंगळवार आणि दुसरा शनिवार या दोन्ही वारी आपण मंदिरात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले पाहिजे.
2) मारुतीला केसरी रंग आवडीचा असून त्या मूर्तीला वस्त्रालंकार परिधान करण्यापूर्वी तेल आणि केसर मिसळून ते संपूर्ण अंगाला लावावे.
3) मारुती रायाचे पूजा करत असताना ब्रह्मचर्य व्रत पालन करावे.
4) हनुमान चालीसा हे घरात म्हंटले पाहिजे.
5) हनुमान जी साठी सिंदूर तुळशीचे माळ असे अर्पण करावे.
6) हनुमानजीचा जप करायचा ओम श्री हनुमंते नमो .
7) प्रभू रामचंद्र यांचे नामस्मरण करावे सुंदर आहे त्या सुंदरकांड सहीत चिंतन करायचे.
8) मारुतीरायाला बुंदीचे लाडू आवडतात बेसन लाडू आवडतात ते किंवा चपातीचा चुरमा तोही अर्पण करावा.
9) मंगळवारी किंवा शनिवारी गोड बुंदीआणि फुटाणे यांचा प्रसाद मारुतीला द्यावा.
10) रुईच्या पानांची माळ घालावी
अशा पद्धतीने हनुमान हे राम भक्त होते .हनुमानासारखे आपल्यामध्ये भक्ती असावी .स्वामी निष्ठा ही कशी जपावी हे हनुमानाकडून शिकले पाहिजे . कर्तव्यपूर्ती करताना कोणतेही मनात विचार न करता त्यास सामोरे जावे लागेल .
Khup Sundar likhan ahe Sir 👌👌
उत्तर द्याहटवा