Google ads

Ads Area

डॉ .बाबासाहेब आंबेडकर माहिती| Dr Babasaheb aambendakar jayanti marathi mahiti

 डॉ .बाबासाहेब आंबेडकर  माहिती| Dr Babasaheb aambendakar  marathi mahiti

डॉ आंबेडकर यांची माहिती
डॉ .आंबेडकर यांची माहिती


डॉ .बाबासाहेब आंबेडकर (toc) 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे महान समाज सुधारक म्हणून जगात त्यांची ओळख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शैक्षणिक क्षेत्रात उच्चांक गाठून त्यांनी अनेक विषयांमध्ये नैपुण्य दाखवले .अर्थशास्त्र या विषयात पी एच डी करून कायदा, अर्थशास्त्र तसेच राज्यशास्त्र या विषयांवरमध्ये त्यांनी संशोधन केले . अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केले असून भारताच्या स्वातंत्र्य यासाठीही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी काढलेले वृत्तपत्रे आणि चर्चासत्रांमध्ये त्यांचा समावेश होता स्पृश्य- अस्पृश्य समाज हा त्यांना नको होता .
        सगळे लोक एकत्रच नांदावेत,जिवाभावाने रहावेत ,असा त्यांचा ध्यास होता म्हणून दलित उद्धारासाठी त्यांनी आपल्या हक्कांचा पुरस्कार केला . "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही " अशा पद्धतीची त्यांची घोषणा होती आणि तशाच प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल करून आणला. माणसाला माणसाप्रमाणे वागवावे माणूस म्हणून जगावे आणि जगू द्यावे यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले आहेत.
        म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न हा मरणोत्तर 1990 मध्ये मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून त्यांची निवड 2012 यास आली द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षण झाले त्यामुळे हे महान समाज सुधारक भारतासाठी होऊन गेले हे खूप मोलाचे आणि सगळ्यांच्या हिताचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर .


 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण | Dr babasaheb asmbedakaranche balpan


 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घराणे देश सेवेसाठी व्रत घेतले होते .त्यांचे आजोबा मालोजी त्यांचे आडनाव सकपाळ. मालोजी हे सैन्यात शिपाई म्हणून काम करत होते .त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. मालोजी यांना चार अपत्ये होती. चारा अपत्त्यातील रामजी हे चौथे अपत्य आणि त्यांनीही इंग्रजी शाळेत शिक्षण घेतले आणि पुढे ते अठराव्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या तुकदडीमध्ये शिपाई म्हणून काम करत होते. त्यांचा विवाह भीमाबाईंची झाला रामजी हे थोर विचारांचे होते त्यांनी कबीरांचे दोहे, ज्ञानेश्‍वर ,नामदेव, चोखामेळा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ होते. त्यांनी या इंग्रजी शाळेत शिक्षण  घेतले आणि सैनिक म्हणून काम करत असताना त्यांना पुढे शिक्षक म्हणून पुढे काम करावे लागले. एवढेच नाही तर त्या शाळेचे मुख्याध्यापक 14 वर्षे त्यांनी काम केले .
    असे हे रामजी आणि भिमाबाई यांना चौदा अपत्य होती त्यापैकी चौदावे रत्न म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय.

डॉ .बाबासाहेबांचे बालपण

बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी हे सैनिक म्हणून कामाला असल्यामुळे त्यांचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण ही झाले असे होते शिवाय ते शिपाई या पदावरून शिक्षक शिक्षक का पासून मुख्याध्यापक असेही त्यांनी आपले काम केले. त्यामुळे त्यांच्या मुलांनी ही इंग्रजी शाळेत शिक्षण घेणे उचित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामजी आणि भीमाबाई यांची चौदावे अपत्यहोती . 
        शेवटचे चौदावे अपत्य होते .14 एप्रिल 1891 मध्ये महू या गावी त्यांचा जन्म झाला त्यांना भीम, भीमा, आणि भिमराव असेही नावे होते यांचे कुटुंब अस्पृश्य म्हणून जी वागणूक  दिली जात होती अशा महार जातीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्यात मांडवे असे गावाचे होते त्यांचे कुटुंब अस्पृश्य समजत असल्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले .या आंबवडे गावचे असल्याने त्यांचे आडनाव आंबवडे असे करण्यात आले.
          अशी प्रथा होती की कर हा शेवटी लावावा  लागत होता किंवा लावत होते म्हणून त्यांचे अंबावडेकर असे आडनाव झाले आणि पुन्हा एकदा अंबावडे ,आंबेडकर असे आडनाव झाले. 

      त्यांच्या बाबतीत एक दुःखाची अशी घटना होती की भीमराव हे पाच वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचा सांभाळ  त्यांची आत्या मीराबाई यांनी केला. 

      रामजी त्यांचे वडील रामजी हे सातारा या ठिकाणी नोकरीनिमित्त आले असताना भिमराव यांना शाळेत दाखल करण्यासाठी आंबेकर हे आडनाव वेगळे वाटत असल्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी जे कृष्ण केशव आंबेडकर हे शिक्षक होते. त्यांनी या आडनावाबद्दल अडचण सांगितली आणि त्यांचे नाव आंबेडकर असे ठेवण्यात आली आणि सगळ्यांना हे  मान्य असल्यामुळे त्यांचे आंबेकर अशा नावातून त्यांचे आंबेडकर हे ना पडले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण | Dr babasaheb aambedakar yanche shikshan


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी हे सैन्यात होते. ते इंग्रजी शाळेत शिकले आणि आपल्या मुलांनाही शिक्षण मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे.  परंतु ते अस्पृश्य समजल्याने त्यांना शाळेत इतर मुलांसारखी वागणूक मिळत नव्हती.  शाळेतील पाणी पिण्यासाठी त्यांना परवानगी नव्हती शाळेतील जो शिपाई असेल तो त्यांच्या हातावर पाणी देऊन त्यांची तहान भागवत असे, जर शाळेत शिपाई नसेल तर त्यांना पाणीही मिळत नव्हते अशा कठिण परिस्थितीमध्ये त्याकाळी सर्वच दलित समजणाऱ्या विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत होते. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण हे दापोलीत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर ते मुंबईला एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल 1907  रोजी त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली .

एका दीक्षांत समारंभ कार्यक्रम होता त्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिभा पाहून कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे शिक्षक त्यांच्या प्रतिभेवर खुश होऊन त्यांनी स्वतः लिहिलेले 'बुद्ध चरित्र' हे बाबासाहेबांना वाचण्यास दिले आणि पुढे सयाजीराव गायकवाड यांची विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जी फेलोशिप मिळत होती त्या फेलोशिपवर त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले.

बाबासाहेब हे लहानपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते 190 7 मध्ये त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजला ऍडमिशन घेतले ते दलित समाजातील पहिले विद्यार्थी होते त्यानंतर 1912 मध्ये मुंबई विश्वविद्यालय येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली संस्कृत शिकता  येत नसल्याने त्यांनी फारसी  भाषेतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्याच महाविद्यालयात त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीति विज्ञान हे विषय घेऊन त्यांनी आपली  पदवी पूर्ण केली. 

त्यांची हुशारी पाहून त्यावेळचे बडोद्याचे जे सरकार होते त्यांनी आंबेडकरांना 'रक्षामंत्री' बनवले पण त्याही ठिकाणी जातिव्यवस्थेचे ते बळी पडले त्यांना अपमानित असं जीवन जगावे लागत असल्यामुळे त्यांनी ही नोकरी फार काळ टिकवून ठेवली  नाही. बडोद्याच्या राज्य शिष्यवृत्ती ने त्यांनी आपले उच्च शिक्षण हेअमेरिका  मधील कोलंबिया या विद्यापीठ विश्वविद्यालयात आपली  पदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली.  हे शिक्षण चालू ठेवण्यासाठी 1913 मध्ये ते अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावले कोलंबिया विश्वविद्यालयात त्यांनी इतिहास, तत्वज्ञान म्हणजेच दर्शन शास्त्र ,समाजशास्त्र शिकले विज्ञान या विषयावर बरंच. अर्थशास्त्र या विषयात एम ए ची पदवी घेतली . या शिक्षणानंतर प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन सुरु केले .
1916 रोजी अमेरिकेत असलेले कोलंबिया विद्यापीठात पी एच डी प्राप्त केली .या पी एच डीसाठी   "ब्रिटीश भारतात प्रांतीय वित्त याचे विकेंद्रीकरण" हा विषय त्यांनी निवडला .


जातिभेद ,अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न  |  jatibhed asprushyata nasht karnyasathi prayatn



           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच नाही तर संपूर्ण भारतात जातिभेदाचे चटके सहन करावे लागत होते . त्यामुळे अनेक लोकांना अपमान ,अनादर अशी वागणूक मिळत होती  अशा मानसिकतेमुळे लोकांचे खच्चीकरण होत असल्याने त्यांचाही विकास होण्यास अडचण येत होती म्हणून अशा बुरसटलेल्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी आपल्या विचाराने लढा द्यायला सुरुवात केली .1919 मध्ये भारत अधिनियम करता दक्षिण बोरं या समिती च्या पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासलेल्या लोकांना आणि अस्पृश्य समजणाऱ्या लोकांसाठी वेगळी निवडणूक प्रणाली हवी.  यामध्ये मागासवर्गीय लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 
          पण त्यांचा हा विचार पुढे विचारात घेतला नाही समाजातील उच्चभ्रू समजणाऱ्या लोकांनी तळागाळातील लोकांना गुलाम  ठेवून अशा या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आणि समाजाला लागलेली जातीव्यवस्थेची कीड  यासाठी त्यांनी "बहिष्कृत हितकारणी सभा" शोधून काढली  त्यानंतर त्यांनी आपल्या समाजाला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना मुके बोल ते नष्ट करण्यासाठी त्यांच्या पर्यंत विचार जाण्यासाठी मग नाही मूकनायक सामाजिक पत्राची स्थापना केली यामुळे समाजामध्ये खडबडून त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
         सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी अस्पृश्य  समजणाऱ्या लोकांना पाणवठा बंद होता यासाठी त्यांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला तसेच नाशिक येथे काळाराम मंदिर या ठिकाणी सुद्धा मंदिर प्रवेशा विरोधात संदर्भात त्यांनी विरोध केला.


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान | Dr babasaheb aambedakar yanche savindhan


 भारतीय समाजात अनेक बुरसटलेल्या विचारांनी काही लोकांना या मनोविकृत विचाराचा त्रास सहन करावा लागत होता समान कायदा, लोकांचे नागरिकत्व, त्यांचे हक्क  या सगळ्या गोष्टी समप्रमाणात आणण्यासाठी आणि भेदभाव या गोष्टीला  ज्या खतपाणी घालत होत्या. त्या मुळापासून नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची रचना केली. 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधानसाठी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची  निवड करण्यात आली.  यासाठी त्यांना समाजामध्ये जी दरी  विषमतेची जी दरी निर्माण झाली आहे ती दरी कमी करणे हा एकमेव हेतू होता . 
              शिक्षणाच्या संधी, समान नागरी हक्काच्या संधी या मिळण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले.  म्हणून त्यांनी ही अस्पृश्यता जी आहे ती लोकांच्या मनातून नष्ट केली पाहिजे . स्त्रीयांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत जी  वर्णव्यवस्था आहे या वर्णव्यवस्थेला चाप बसला पाहिजे, सगळे लोक समान दर्जाचे आहेत त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही यासाठी प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 
           म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधारावर 2 वर्षे 11 महिने आणि सात दिवसाच्या  कमी कालावधीमध्ये संविधान तयार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले.  या संविधानाचा आधार घेऊन आज  भारत देश हा लोकशाही पद्धतीने चालला आहे.  या संविधानाच्या आधारे भारताला स्वातंत्र्य समता, न्याय, बंधुता या आधारे आहे कोणी कोणावर अन्याय करणार नाही आणि करणार असेल तर तो गुन्हा समजला जातो या संविधानात असल्यामुळेच हे सगळे शक्य झाले आहे म्हणून आपला भारत देश हुकूमशाही पद्धतीने नाही तर लोकशाही पद्धतीने गुण्यागोविंदाने सर्वत्र राहत आहेत.


बौद्ध धर्म स्वीकारला | bauddha dharm swikarala


      1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संमेलनासाठी सहभाग नोंदविण्यासाठी  श्रीलंकेत गेले त्याठिकाणी बौद्ध धर्मातील विचार एवढे आवडले की  त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्मात अनेक पुस्तके लिहिली .1955 रोजी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. "द बुद्ध आणि त्याचा धम्म" त्यांच्या मृत्यूनंतर हे पुस्तक प्रकाशित झाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी एक सभा आयोजित केली होती या सभेमध्ये जवळपास पाच लाख त्यांचे अनुयायी होते या लोकांना घेऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.



डॉक्टर बाबासाहेब यांचे महापरिनिर्वाण | Dr babasaheb aambedakar yanche महापरिनिर्वाण


1954-55  साली  बौद्ध धर्म या विषयी त्यांनी आपले योगदान देण्यास सुरुवात केली होती . परंतु त्यांचे आरोग्य हे ठीक नव्हते त्यांना मधुमेह चा त्रास होता, शिवाय त्यांचे दृष्टीही कमी झाली होती यामुळे त्यांचा आजार बळावत गेला आणि या आजारात 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली या ठिकाणी आपल्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्यांचा अंतिम अंतिम संस्कार हे बौद्ध धर्माप्रमाणे करण्यात आले.


        डॉ .आंबेडकरांची पुस्तके | Dr babasheb asmbedakaranchi pustake


  • एवल्युएशन ऑफ प्रोविजनल
  •  फायनान्स इन ब्रिटीश इंडिया
  • जातीचा विनाश 
  • शूद्र कोण होते
  • द अन्टचेबल्स
  • थॉट्स ऑन पाकिस्तान
  •  बुद्ध or कार्ल मार्क्स

खालील प्रश्न अभ्यासा 


   1 )  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे कितवे अपत्य होते ?
        चौदावे

  2)  बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव होते ?
        अंबावडेकर

3 ) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना किती भाषा येत होत्या ?
       9

4 ) कोणत्या विषयात विदेशात जाऊन डॉक्टरेट पदवी मिळवली ?
      अर्थशास्त्र

5 ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक जगातील सगळ्यात मोठी लायब्ररी होती किती पुस्तके होती  ?
    पन्नास हजार पुस्तके

 6) बौद्ध धर्म कधी स्वीकारला ? 
       14 ऑक्टोबर 1956

7) हिंदूधर्म सोडताना किती वचने दिली होती ? 
        बावीस वचने

8 ) कामगारांवर अन्याय होत असल्याने त्यांना 12 तास कामावर हजर राहावे लागत होते त्यांनी हा कायदा मोडून त्यांना किती तास काम करावे लागेल यासाठी प्रयत्न केले ?
     आठ तास

9 ) 1990 रोजी त्यांना कोणता पुरस्कार सर्वोच्च मिळाला ? 
     भारतरत्न

10 )डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय?
     यशवंत

11) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव ?
      रमाबाई

 12 ) दुसऱ्या पत्नीचे नावकाय होते  ?
      शारदा लग्नानंतर त्यांनी सविता नाव ठेवले

13 ) संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? 
       2 वर्षे 11 महिने आणि सात दिवस

 14 ) हे संविधान कधी तयार करण्यात आले ?
       26 नोव्हेंबर 1949 रोजी

15 ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे               अध्यक्ष म्हणून केव्हा निवडण्यात आले ?
        29 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस 

 16 )  गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात कोणत्या साली                 आणि कोणता करार झाला?
          1932 रोजी पुणे करार झाला

 17 ) कोणत्या साले त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली
            1907

18 ) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते ?
        रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव होते

19) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव ?
        रामजी मालोजी सकपाळ

 20 ) बाबासाहेब यांच्या आईचे नाव ?
         भिमाबाई
 
बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था मोडून काढण्यासाठी खूप प्रयत्न केले हिंदू धर्मात न राहता त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावे त्यांचा विकास व्हावा त्यांना मानाचा सन्मान मिळवून त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले .
         उच्चभ्रू लोकांनी या सर्वसामान्य लोकांचे शोषण केले होते हे जातिव्यवस्थेवर चालणारे  शोषण थांबले पाहिजे यासाठी जात हे नष्ट झाली पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या विचारांच्या आधारे त्यांनी संविधानाची निर्मिती केली .
       याच संविधानाच्या आधारे आजही भारत आपला भक्कमपणे सर्व जगासमोर ताठ मानेने उभा आहे, त्यांनी स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता या निर्णयाच्या आधारे सर्व लोकांना आपलेसे करून घेतले आहे. याठकाणी
लोकशाहीला महत्व प्राप्त करून दिले आहे म्हणून हे दलितांचे कैवारी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहान कार्याला विनम्र अभिवादन !
आजही आपण त्यांनी मागासवर्गीय लोकांसाठी जे प्रयत्न केले त्या लोकांनी आपला कोणीतरी दाता आहे आणि आपणही आपल्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे आपण समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपल्याही आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे तरच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले असे होईल.त्यांचे विचार आपल्यात रुजले पाहिजेत.

हे ही वाचा














टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area