Google ads

Ads Area

अरुणिमा सिन्हा मराठीत माहिती | arunima sinha marathit mahiti

 ssc इयत्ता दहावी अरुणिमा सिन्हा मराठीत माहिती | arunima sinha marathit mahiti
अरुणीमा सिन्हा माहिती
अरुणीमा सिन्हा माहिती
  अरुणीमा माहिती (toc )

 अरुणिमा सिन्हा इयत्ता दहावीच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात अभ्यासाला असलेली एक महान जिद्दी महिला आहे ही महिला उत्तर प्रदेश या ठिकाणी राहणार असून या महिलेने जगामध्ये सर्वात अवघड आणि उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी, अपंग असून अपंगाचे दुःख न मानता त्यावर मात करून जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे .


अरुणिमा चे जीवन| arunimache jivan

अरुणिमा ही उत्तर प्रदेश या ठिकाणी राहणार असून हॉलीबॉल खेळण्यात तरबेज होती तिने अनेक चॅम्पियन्स जिंकले होते. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर पोहचली होती.

नोकरीनिमित्त लखनऊ पासून दिल्लीला मुलाखतीसाठी जायचे होते. खेळाडू असल्याने नोकरीची शाश्वती होती. 12 एप्रिल 2011 रोजी दिल्लीला पोहचण्यासाठी  रेल्वेने प्रवास करावा म्हणून रेल्वे हे सुरक्षित आणि जलद प्रवास यासाठी योग्य निर्णय घेतला .लखनऊमधून पद्मावती एक्सप्रेस या गाडीने जनरल डब्यात तिने प्रवेश केला.

 प्रवास चालू असताना रात्री अचानक काही गुंड त्या ठिकाणी आले आणि प्रवाशांना लुटू लागले प्रवासी अनेक असूनही त्यांनी या दरोडेखोरांना कोणताही विरोध केला नाही.

 विरोध केला असता तरीही त्याचा उपयोग झाला नसता कारण सगळेच विरोध करणारे नसतात. अरुणिमाच्या गळ्यात सोन्याची साखळी दिसताच त्यांनी अरुणिमाच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांपैकी कितीतरी पुरुष मंडळी यांनी या दरोडेखोरांना विरोध केला नाही, पण अरूणिमा हिने साखळी देण्यास विरोध केला म्हणून एकाने तिच्या पोटात लाथ मारूनतिला फरपटत ओढत रेल्वेच्या दरवाज्याजवळ आणले आणि तिला चालत्या गाडीतून बाहेर ढकलून दिले.


ज्यावेळी रेल्वेच्या बाहेर ढकलण्यात आले त्यावेळेस शेजारीच दुसरा रेल्वे मार्ग होता. रेल्वेतून बाहेर फेकल्याने कंबर निकामी झाली .ती पडली तेथेच दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर तिचा पाय होता. तिला एवढी वेदना होत होती की तिचा पाय ते उचलू शकत नसल्याने तिच्यासमोर रेल्वे गाडी पायावरून गेली आणि तिची शुद्ध हरपून गेल्याने अशा कित्येक गाड्या ये-जा करणाऱ्या तेथून पायावरून जात होत्या. रात्रभर ती त्याच ठिकाणी पडून होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यातून मलमूत्र तसेच फेकलेल्या वस्तू अंगावर पडत होत्या तर रुळाखालचे उंदीर हे तिला त्रास देत होते. यामुळेती बेशुद्ध झाली.

 सकाळी कोणालातरी ही रेल्वे ट्रॅक वर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्या वेळेस तिला दिल्लीतील एम्स हॉस्पिटलला नेण्यात आले .त्या ठिकाणी तिचा पाय निकामी झाला होता म्हणून तो पाय कोणतीही भूल न देता तो पाय तोडावा लागला एक कृत्रिम पाय बसवण्यात आला.


ध्येयवादी अरुणिमा| dheyavadi arunima

ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये समजले की आपला हॉलीबॉल खेळण्याचा पाय निकामी झाला आहे पण तिच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली आणि ती जिद्द अशी होती की जरी कृत्रिम पाय असला तरीसुद्धा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे तिचे स्वप्न होते ते तिने पूर्ण करण्यासाठी समर्थ कशी आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली .पाय जरी निकामी झाला असला तरीही मनाची कुचंबणा न करता तिने हा मोठा निर्णय घेतला व बचेंद्री पाल यांना भेटूनआपल्या ध्येयासंबंधी बातचीत केली. त्यांनी सुद्धा या गोष्टीला विरोध दर्शविला पण तिची जिद्द अशी होती की त्यांनी होकार दिला आणि माऊंट एव्हरेस्ट शिखर करण्यास प्रोत्साहन दिले आणि माउंट एव्हरेस्ट शिखर सुद्धा अरुणीमाने खडतर परिस्थितीत सर केले.

 अरुणीमाचे प्रशिक्षण | arunimache traning

बचेंद्र पाल यांच्याकडून ध्येय साध्य करण्यासाठी पाठिंबा घेतला बचेंद्र पाल ह्या एक माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला होती, म्हणून त्यांचा पाठिंबा मिळाल्यावर निम्मे यश मिळाल्यासारखे झाले .

प्रशिक्षण घेण्यासाठी देशात चार पर्वतरोहण प्रशिक्षण केंद्रे आहेत त्यापैकी अरुणीमा ही उत्तर काशीच्या केंद्रात दाखल झाली होती .

 या ठिकाणचे प्रशिक्षण खूप कठीण होते मग त्या ठिकाणी अनेक तरबेज मुले मुली प्रशिक्षण घेण्यासाठी आले असता अरुणीमाला पाय नव्हता त्यात तिला चालायला येत नव्हते, सगळ्यांच्या पाठीमागे असायची, तरीही तिने धीर खचू दिला नाही .

चालत असताना तिचा कृत्रिम पाय नेहमी पडायचा आणि त्यातच तिला होत असलेल्या वेदना त्यामुळे ती सगळ्यांच्या पाठीमागे राहत होती ,तीन-चार तास ती  सगळ्यांच्या पाठीमागे राहत होती .

     प्रशिक्षण कालावधीत सगळ्यांना एक नियम असतो की प्रशिक्षण पूर्ण झाले की संध्याकाळी स्वतःचे पाय हे बघावे लागत होते त्या पायांना फोड आले असतील तर ते training center सोडून द्यायला सांगत होते ,.अरुणीमा प्रशिक्षणात यशस्वी झाली त्यांना एक महिन्याच्या प्रशिक्षणात A grade मिळाली .


अरुणीमाचे माऊंट एव्हरेस्ट शिखर स्वार | arunima maunt everest shikhar swar

अरुणीमा प्रशिक्षण पूर्ण करुन प्रत्यक्ष आपल्या निवडलेल्या ध्येयाकडे कूच झाली त्यावेळी तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले .यासाठी टाटा स्टीलकडून प्रायोजकत्व मिळाले.नेपाळमध्ये जाऊन जावून काठमांडू या ठिकाणचे पशुपतीनाथचे दर्शन घेऊन दुसऱ्याच दिवसापासून प्रशिक्षण सुरु होणार होते .त्यासाठी ती सज्ज झाली .

अरुणीमा शिखर सर करणार म्हणून तिच्या मदतीला शेरपा होता ज्यावेळेस अरुणिमाच्या पायाबद्दल समजले तेव्हा अरुणिमासोबत जाण्यास त्याने नकार दिला. अरुणिमाने खूप विनंती करुन त्यांना कसे कसेबसे तयार केले. त्यांना विश्वास दिला की एक अपंग मुलगीसोबत आहे असे न समजता अपंग नाहीच असाच विश्वास तिने शेर्पाला दिला.

 अरुणीमा प्रवासाला सुरुवात करताना| arunima pravasala suruvat kartana

 माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. अनेक संकटे पार करत अनेक कठीण प्रसंगातून मृत्यूच्या प्रसंगातून त्यांनी आपला खडतर प्रवास चालू ठेवला. काही मिनिटाच्या अंतरावर शिखर गाठण्याचे बाकी असताना रस्त्यात जाताना त्यांना अनेक ठिकाणी एव्हरेस्ट सर करणारी तरबेज असलेले  मृत्युमुखी पडलेले दिसले .तिच्यासमोर एक  जर्मन पर्वतरोही पाय घसरुन पडला. तर काही ठिकाणी बर्फावर रक्त सांडले होते हे दिसले. त्या ठिकाणी अनेक मृत्यू पावलेले पर्वतरोही दिसत होते.अरुणीमा खचून न जाता मार्ग चालतच राहिली .शेवटच्या टप्प्यावर ऑक्सीजनची कमतरता भासत होती . त्यातूनही आपला जीव वाचवून त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले. ज्यावेळेस तिचा अपघात 2011झाला होता त्यानंतर 21 मे 2013 रोजी दहा वाजून चार मिनिटांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले.

 अरुणीमाचा परतीचा प्रवास| arunimacha paraticha pravas

 माऊंट एव्हरेस्ट सर केल्याचा आनंद होता पण त्या ठिकाणी परतीचा प्रवास हे खूप कठीण होऊन गेला होता कारण तिचा प्राणवायू संपलेला होता काही मिनिटेच तो प्राणवायू टिकणाऱ होता तिचे मरण अटळ होते तरीही त्यांनी अरुणिमाच्या सांगण्यावरून फोटो काढले. शिखरावर खूप मोठे वादळ निर्माण होत होते त्यातून माघारी फिरणे खूप कठीण होते. ज्यावेळेस ते खाली उतरण्यास निघाले त्यावेळेस तिचा कृत्रिम पाय हा सततखाली सरकत होता या सगळ्या कारणांमुळे तिला त्रास होऊ लागला एक तर प्राणवायू संपत आलेला तिच्या या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. डोळ्यातून अश्रू खाली पडेपर्यंत  बर्फ तयार होत होता,तोंडातील लाळ सुद्धा खाली पडत असताना ती खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ तयार होत होता . हात  निळा होऊ लागला या सगळ्या करायला फ्रॉस्ट बाईट म्हणजेच बर्फबाधा असेही म्हणतात.

तिचा हात निळा झाल्यामुळे तिचा हात कापावा लागणार असल्याचेही  होते तरीही अरुणिमा ने जिद्द तशीच ठेवली. आपला पाय हातात घेऊन चालू लागले त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. ती घसरत घसरत खाली येत होते पण महत्वाचा म्हणजे त्याच्याकडे प्राणवायू शिल्लक नसल्याने मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडणे अवघड होते पण त्याच वेळेस दैव बलवत्तर म्हणून योगायोगाने त्या ठिकाणी जो ब्रिटिश  पर्वतरोही प्राणवायू जास्तीचा घेऊन वर आलेला होता, त्याला वजन जास्त झाल्यामुळे तो एक प्राणवायू तिथेच टाकुन गेला होता. तुझ्या शेरपाने त्याचा सिलेंडर घेऊन अरुणीमाच्या पाईपला जोडून अरुणिमाला जीवनदान दिले.


जिद्दी अरुणिमा | jiddi arunima

तिच्या या सहसाबद्दल संपूर्ण जगात नामोल्लेख होऊ लागला या कठीण प्रसंगात या परिस्थितीवर मात केलेले हे जिवंत उदाहरण जगासमोर तिने ठेवले आहे. पाय निकामी असूनही त्या पायाचे अपंगत्व मानले नाही. मनाने शूर होती. अनेक युवकांना प्रेरणा, प्रोत्साहन लागले. हलाखीची परिस्थिती असतानाही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत हेच  आपण या पाठात शिकलो आहोत.

प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते | pratekamadhe jiddi arunima aste

 हे आतातिच्या साहसाबद्दल बद्दल जाणून घेतले आहे. प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या कलागुणांना वाव मिळाला की त्याचे सोने करणे हे आपल्या हातात असते. अरुणिमा ही खेळाडू होती पण पायाने कमजोर झाली.अपंगत्व मनाने स्वीकारले नाही.

 मनाने ती खंबीर बनून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले तसेच आपणही अरूणिमा सारखे खंबीर बनून आपल्या कलागुणांना जोपासले पाहिजे म्हणजेच आपल्याही अंगी अशी अरुणिमा आहे, फक्त आपण आपल्याकडे कोणते कौशल्य आहे त्या कौशल्याला आपण विकसित करणे मनावर पाहिजे आणि  आलेल्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन आपण आपला मार्ग काढला पाहिजे यातच प्रत्येकामध्ये जिद्दी अरुणिमा असू शकते. 

असे याचे उत्तर मिळू शकते इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये अरुणिमा हा पाठ दिलेला असून यावर हमखास परीक्षेत  असतो आणि त्यावर स्वमताचा प्रश्न असू शकतो.अरुणीमाची जिद्द अशीच आपल्यामध्ये बाळगावी ,हे या पाठातून आपल्याला बोध घेता येऊ शकतो.

आणखी वाचा 

आदर्श माता जिजाऊ ज्यांनी घडविला शिवाजी

मित्र कसा असावा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area