ssc इतिहास विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्न 2023| ssc objective quetions in history
विषयातील बोर्डाला हमखास पडतील असे.प्रश्न.
इतिहास म्हटला की सन सनावळ्या आणि थोडासा अवघड विषय असा बऱ्याच मुलांना वाटत असते,
पण जर आपण समजून घेऊन अभ्यास केला तर इतिहास विषयांमध्ये चांगले मार्क मिळू शकतात .
विषय एकदा वाचून डायरेक्ट परीक्षेला जाता येत नाही तर त्यासाठी अनेक वेळा त्याचे वाचन व्हावे लागते तरच आपल्याला चांगले मार्क मिळून आपण आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतो तर काही मुलांना इतिहास विषय म्हणलं की वस्तुनिष्ठ जे प्रश्न असतात ते सुद्धा कठीण वाटतात, सोडवता येत नाहीत कारण त्याच्याकडे आपण केलेले दुर्लक्ष.
तरी मुलांनो घाबरू नका आज आपण परीक्षेला जाता जाता मी जे प्रश्न देतो तेवढेच फक्त केले तरीही तुम्ही इतिहास विषयात चांगले मार्क मिळू शकता, तर मुलांनो! हे जे प्रश्न आहेत हे फक्त एक ते दोन वेळा वाचा. वेळ लागेल १० मिनीट आणि तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता याच्या पलीकडचे वस्तुनिष्ठ प्रश्न शक्यतो येणार नाहीत .
तरीही याचा अभ्यास केला तर कमीत कमी पास होण्यासाठी खूप उपयोगी असे प्रश्न आहेत.
इतिहास १० मिनिटात 10 गुण मिळवा
प्रश्न 1 अ ) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
असा प्रश्न तुम्हाला तीन मार्कासाठी विचारला जातो यामध्ये चार पर्याय दिले जातात त्यापैकी एक विधान बरोबर लिहायचे असत
.
1 ) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्होल्टेअर यास म्हणता येईल.
2) आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.
3) भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे अलेक्झांडर कनिंग कनिंगहॅम हे पहिले सर्व संचालक होते.
4) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा फेडरीक मॅक्सम्युलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला.
5) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले.
7) चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कला मध्ये समावेश होतो.
8) मथुरा शिल्पशैली कुशान काळात उदयाला आली.
9) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हीकी यांनी सुरू केले.
10) दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे.
11) ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा ग्रीस येथे सुरू झाली.
12) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी भावलेला ठकी असे म्हणतात
13) कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
14) महाबळेश्वर जवळील भिलार ते पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
15)लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश दूर्वा संग्रहालया त आहे.
16) कोलकत्ता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
17) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे
विद्यार्थी मित्रांनो वरील विधाने ही व्यवस्थित वाचा तुम्हालाचांगली मार्क मिळतील
चुकीची जोडी ओळखा
या प्रश्नात फक्त चुकीची जोडी ओळखायची असते यामध्ये चुकीची जोडी दुरुस्त न करता फक्त ओळखायची असल्याने विद्यार्थ्यांना तीन मार्क मिळवून देण्यासाठी बदल केला आहे.
1) विचारवंताचे नाव ग्रंथाचे नाव
१. जॉर्ज विल्यम फेड्रिक हेगल -- रिझन इन हिस्टरी
२) लिओपोल्ड व्हान रांके - द प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री
३) हिरोडोटस -द हिस्ट्रीज
४) कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड
2) ग्रंथ इतिहास लेखन पद्धत
१) हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
२) स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन
३) द इंडियन और ऑफ इंडिपेंडेंस १८५७ - मार्क्सवादी इतिहास
४ ) केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया - वसाहतवादी इतिहास लेखन
3) अमूर्त वारसा प्रदेश
१) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा
२) रम्मन -पश्चिम बंगाल मधील नृत्य
३) रामलीला-- उत्तर भारतातील सादरीकरण
४) कालबेलिया --राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
4) वृत्तपत्र - संपादक
१) प्रभाकर - आचार्य प्र के अत्रे
२) दर्पण - बाळशास्त्री जांभेकर
३) दिनबंधू - कृष्णराव भालेराव
४) केसरी - बाळ गंगाधर टिळक
5) खेळ
१) मल्लखांब - शारीरिक कसरीतिचे खेळ
२) वॉटर पोलो - पाण्यातील खेळ
३) स्केटिंग- साहसी खेळ
४) बुद्धिबळ - मैदानी खेळ
6) ठिकाण प्रसिद्धी
१) माथेरान - थंड हवेचे ठिकाण
२) ताडोबा - लेणी
३) कोल्हापूर - देवस्थान
४) अजिंठा - जागतिक वारसा स्थळ
7) विद्यापीठ
१) महाराज सयाजीराव विद्यापीठ- दिल्ली
२) बनारस - हिंदू विद्यापीठ वाराणसी
३) अलिगढ- मुस्लीम युनिव्हर्सिटी अलिगढ
४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर
वरील चुकीच्या जोडीमधील जे गडद केले आहेत ती चुकीची जोडी आहे
ssc राज्यशास्त्र | politics objective
विधाने पूर्ण करा
1) महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्था मध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
2) कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले हुंडा प्रतिबंधक कायदा
3) लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण
4) निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात
5) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली होती
6) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे परीसिमान समिती करते
7) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते
8) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे
9) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले
10) शेतकरी चळवळीचे शेतमालाला योग्य भाव हे प्रमुख मागणी आहे
11) शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी परत हरितक्रांती करण्यात आली
पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा
बरोबर विधाने
1) भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते काही
2) काहीवेळा निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात
3) संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाचा प्रमाणे असते
4) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो
5) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात
6) राजकीय पक्ष शासन जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात
7) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात
8) लोकशाही मध्ये चळवळींना फार महत्व असते
9) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली
चुकीचे विधाने
1) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते.
2) एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते.
3) आघाडी शासन आतून असतील का निर्माण होते.
4) शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे.
वरील विधान लक्षात घेतले असता चुकीचे विधाने लक्षात ठेवली असता . बरोबर विधाने आपोआप लक्षात येतात त्यामुळे चूक की बरोबर हे विधान चार मार्कला प्रश्न असून त्यापैकी हे विधान चूक आहे किंवा हे विधान बरोबर आहे असे जरी लिहिले तरी १ गुण मिळवू शकतो त्यानंतर विधानाच्या कशा संदर्भात हे विधान चूक आहे किंवा बरोबर आहे हे जरी लिहिले तरी एक मार्क मिळू शकतो. म्हणून हे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत या प्रश्नांकडे दहा मिनिट जरी वरचेवर वाचले तरी तुम्हाला दहा मार्क मिळू शकतात हे मार्क मिळवणे खूप सोपे असून या मार्काचा विचार आपले स्कोर वाढण्यासाठी खूप उपयोगी पडत असल्याने या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
कारण तुम्ही कितीही मोठे प्रश्न चांगले लिहिले असले तरी हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यातील काही प्रश्न चुकले तर म्हणजेच त्याची जागा भरून निघत नाही .म्हणून हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे ते खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा .
दहा मिनिटात तुम्हाला दहा मार्क मिळणारच याची मी गॅरंटी देत असलो तरी शेवटी बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी येते हे कोणालाच सांगता येत नाही तरीही प्रश्न हेअसतीलच म्हणून तुम्हाला हे प्रश्न दहा मिनिटात दहा गुण मिळवून देणारे आहेत हे लक्षात ठेवा आणि दहा पैकी दहा गुण मिळवा.
ऑल द बेस्ट !👍
आणखी वाचा
Jayashree jagtap
उत्तर द्याहटवाIt's well..
उत्तर द्याहटवा