Google ads

Ads Area

शहीद दिवस मराठीत माहिती | shahid divas in marathi information

 शहीद दिवस मराठीत माहिती | shahid divas in marathi information

शहीद दिन माहिती
शहीद दिन माहिती


शहीद दिन (toc)


शहीद दिवस हा 23 मार्च रोजी साजरा केला जातो .या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भगतसिंग ,राजगुरु ,सुखदेव यांना या दिवशी फाशी दिली म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो .

आपल्या भारत देशात खूप मोठे क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत आपणाला माहीत आहेच या क्रांतिकारकांनी आपल्या भारत देशाला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी आपल्या देशासाठी बलिदान देऊन आपल्या घरादाराचा देशासाठी त्याग केला म्हणून तर आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहे .

असे स्वातंत्र्य उपभोगत असताना आपणाला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशांना स्मरण म्हणून आज शहीद दिन म्हणून साजरा केला जातो, त्यांना विनम्र अभिवादन ! 

शहीद दिन हा दिवस सुखदेव ,राजगुरू, भगतसिंग यांच्या स्मरणार्थ जरी असला तरी भारत देशासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले, त्याग केला आहे आजही भारत देश सुखासमाधानाने शांततेत राहत आहे. तसेच सीमेवरती सैनिक डोळ्यात तेल घालून आपल्या भारतमातेला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.

     शहीद दिवस हा 23 मार्च रोजी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो या दिवशी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिन्ही क्रांतीकारकांना एकाच दिवशी फाशी दिली होती म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

क्रांतिकारकांची  मराठी माहिती  | krantikarakanchi information in marathi


भगतसिंग यांची मराठीत माहिती | Bhagatsing in marathi


भगतसिंग हे पंजाब राज्यातील ,त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला तर त्यांचा मृत्यू म्हणजेच फाशी 23 मार्च 1931 रोजी देण्यात आली. हे एक मोठे क्रांतिकारक म्हणून जन्माला आले होते . ब्रिटीश अधिकारी stok  यांनी लाला लजपतराय यांच्यावर लाठीहल्ला केल्यामुळे त्यात त्यांचे निधन झाले. ब्रिटिश अधिकारी स्टोक या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारावे म्हणून स्टोक समजून एकाच वेळी सँडर्स या अधिकाऱ्यावर हल्ला केला त्या बदल्यात त्यांना वयाच्या 23 व्या वर्षी फाशीची शिक्षा देण्यात आली.

 भगतसिंग यांचे जीवन| Bhagatsings life

 भगतसिंग पंजाब प्रांतातील लालपुर जिल्ह्यातील बंगा गावात त्यांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडील किशनसिंग होते त्यांचे कुटुंब भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले होते तर काही कुटुंबातील लोक महाराजा रणजीत  शिंगाच्या सैन्यात सेवा करत होते, काही कुटुंबातील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून होते तर त्यांचे वडील आणि काका हे गदर पार्टीचे सदस्य म्हणून काम करत होते भगतसिंग यांचे कुटुंब हे ब्रिटिशांविरुद्ध होते म्हणून त्यांनी इंग्रजी शाळेत सुद्धा शिक्षण घेतले नाही .

जालियनवाला बाग हत्याकांड आणि गांधीजींचे असहकार चळवळ या दोन गोष्टी भगतसिंग यांना खूप मनाला वेदना देणाऱ्या ठरल्या गांधीजींचे असहकार चळवळ मागे घेतल्यामुळे भगतसिंग यांचा असहकार चळवळ विरुद्ध म्हणजेच अहिंसक मार्गाने क्रांतिकारी संघटना चालू ठेवणे याविषयी त्यांचा होणार भ्रमनिरास झाला म्हणून त्यांनी क्रांतिकारक चळवळीमध्ये सामील झाले. 

ब्रिटिश हे आपल्या भारतातून सहजासहजी जाणार नाहीत याची कल्पना त्यांना आली आणि हिंसक मार्गाने त्यांचा पाडाव केला पाहिजे या विचारांती पोहोचले. त्यांची संघटनेच्या गटापासून त्यांनी प्रेरणा घेतली म्हणून त्यांनी आपले विचार मांडायला सुरुवात केली. 1926 मध्ये "नवजवान भारत सभा" ही संघटना स्थापन केली. तसेच ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन संघाचे सदस्य झाले. 

अशा या संघटनेमध्ये भारतीय क्रांतिकारक सामील झाले त्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल अश्फाक, चंद्रशेखर आझाद होते ही संघटना स्थापन केल्यानंतर त्यांच्या घरात त्यांनी विवाह करावा असा विचार चालू झाला, पण त्यांनी विवाह करणार नाही माझे जीवन हे देशाच्या सर्वात महत्त्वाच्या कामासाठी वेचले जाणार आहे त्यासाठी मी कोणत्याच सुखाचा बळी होणार नाही आणि त्यासाठी मी हे काम स्वीकारले आहे. त्यासाठी त्या कामातच माझे लक्ष राहिले पाहिजे असा त्यांचा विचार होता म्हणून त्यांनी लग्नाला नकार दिला.

 भगतसिंग यांना फाशीची शिक्षा

 भगतसिंग यांना सँडर्सच्या हत्येमुळे त्यांना फाशी देण्यात आली .ही हत्या 17 डिसेंबर 1928 रोजी झाली होती. यावर अनेक दिवस खटला चालू होता शेवटी 23 मार्च 1931 रोजी त्यांना फासावर चढवले गेले तर याबाबत भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांनी ही फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे विनंती केली 19 मार्च रोजी गांधीजी दिल्ली या ठिकाणी त्या वेळी व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली.  फाशीची शिक्षा रद्द झाली नाही .पंजाबचे गव्हर्नर त्यांच्यापर्यंतही बातमी पोहचली .फाशीची शिक्षा रद्द होईल म्हणून  पोहोचली आणि ही फाशीची शिक्षा रद्द होईल म्हणून 24 मार्च रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

 त्याअगोदरच म्हणजे 23 मार्च 1931 रोजी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली .याच दिवशी गांधीजींनी व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांना पत्र लिहून या तिघांची फाशी रद्द व्हावी म्हणून विनंती केली तर त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याच दिवशी यांना फाशी दिली गेली ते पण एक दिवस अगोदर .


राजगुरू यांची मराठीत माहिती| Rajguru marathi information

 यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड या ठिकाणी 24 ऑगस्ट 1908 रोजी झाला तर मृत्यू 23 मार्च 1931 रोजी लाहोर या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली. हे एक क्रांतिकारक म्हणून जन्माला आले त्यांनी आपले जीवन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात घालवकले ते महान क्रांतिकारक असल्याने त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी  ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये सामील झाले होते त्यांचा या क्रांतिकारक कार्यामध्ये अनेक सहकारी मिळाले त्यापैकी भगतसिंग, सुखदेव आणि चंद्रशेखर आजाद यांचा महत्त्वाचा वाटा होता.

 त्यांनी क्रांतिकारी संघटना हाती घेतली आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू लागले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते आठ दिवसांनी या हल्ल्यात जखमी झालेले लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. 

म्हणून या बदलाचा परिणाम म्हणून भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांनी स्कोर जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याला ठार मारण्याचे ठरवले 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे स्कॉटला मारण्यासाठी कट रचला आणि या कटात स्कॉटला समजून त्यांनी सँडर्स वर गोळ्या झाडल्या. या आरोपाखाली या तिघांना फाशीची शिक्षा झाली.

 राजगुरू यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग | rajguru yancha swantantryasathi sahabhag

 राजगुरू यांना इंग्रजी शिक्षण जमत नव्हते चौदाव्या वर्षी भावाने इंग्रजी शिक्षण  येत नसताना केलेला हा जो अपमान आहे तो अपमान त्यांना सहन झाला नाही त्यांनी आपल्या घरातून पळ काढला आणि काशी या ठिकाणी वास्तव्यास गेले

 त्यांना वादविवाद ऐकणे, दानपट्टा ,कुस्ती खेळणे, लाटी काटी असे शिक्षण त्यांनी घेतले त्या काळामध्ये कलकत्ता, पाटणा, कानपूर ,लखनौ ,झाशी ,मीरत ,दिल्ली, लाहोर ही गावे जी होती ती क्रांतीकारकांसाठी महत्त्वाची होती म्हणजेच क्रांतिकारकांचे माहेरघर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काशी या ठिकाणी हिंदू विद्यापीठ जे आहे ते सगळ्यांचे आश्रयाचे स्थान व गुप्त केंद्र म्हणून होते.

 राजगुरूंनी व्यायाम विषयाची पदवी मिळवली तसेच ते सेवादलचे सुद्धा शिक्षण घेतले . काशीत त्यांचा चंद्रशेखर आझाद यांच्याशी परिचय झाला त्यांनी आपल्या क्रांतिकारक संघटनेमध्ये सामील करून घेतले. त्या दोघांचे छत्तीस गुण जुळले आणि त्यांचा जो सरकारशी 36 चा आकडा होता तो त्यांनी तडीस नेला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राजगुरू नेहमीच उतावळे होते  .राजगुरू यांना फाशीची शिक्षा राजगुरू यांची खरी ओळख भारतीय लोकांना झाली ती सेंटरच्या पदामुळे ज्यावेळेस लाला लजपत राय यांच्यावर  हल्ला झाला.

 त्याच वेळेस चित्तरंजन दास यांच्या पत्नी लालाजींच्या चित्याची आग जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत भारतीय तरुणांनी या क्रूर हत्येचा बदला घेतला पाहिजे .अशा चित्तरंजन दास यांच्या पत्नी यांचे खडे बोल ऐकून भगतसिंग व्याकुळ झाले आणि स्कॉटला मारण्याचा विचार भगतसिंग यांनी मांडला.

  राजगुरू यांनीही पोलीस अधिकारी स्कॉट याला मारण्यासाठी निर्णय घेतला पण त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद ,भगतसिंग आणि राजगुरू हे मारण्यास तयार होते .त्या ठिकाणी स्कॉट याच्यावर जय गोपाळ हा लक्ष ठेवत होता.  त्याच्या इशाऱ्यावर भगतसिंग आणि राजगुरू हे गोळीबार करणार होते पण चार दिवस झाले तरी स्कॉट हा बाहेर पडलाच नाही शेवटी पाचव्या दिवशी गोरा अधिकारी बाहेर पडला आणि जय गोपाळ यांनी हाच असावा असा इशारा केला भगतसिंग यांना हा नसावा असे वाटले पण राजगुरु हाच नसावा हे त्यांना समजले नाही आणि त्यांनी त्या सॅडर्सवर गोळीबार केला. लगेच भगतसिंग यांनी सात ते आठ गोळ्या त्यांच्यावर झाडल्या आणि तिघेही तेथून राजकोट याठिकाणी निसटले. 

भगतसिंग हे मिलिटरी ऑफिसरच्या वेषात तर यावेळी ते भगवतीचरण व्होरा यांची जी पत्नी या पत्नीचा नवरा समजून त्यांनी पलायन केले, राजगुरू हे त्यांचे नोकर म्हणून आणि आझाद हे मात्र यातील फंडा यांच्या रूपात. भगत हा बरोबर तिघेही लावून मधून राजकोट पोहचले राजगुरू हे बरेच महिने काशीत उघडपणे फिरत होते, निर्भयतेने वागत होते धनुष्यबान चालवणे, काठीचा वर्ग चालवणे असे ते तरबेज होऊ लागले होते पण 1929 रोजी ते पुणे या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात सापडले.  

क्रांतिकारक सुखदेव मराठीत माहिती | sukhadev marathi information 

हे एक क्रांतिकारक म्हणून संपूर्ण भारतीयांना ओळखीचे आहेत त्यांचा जन्म 15 मे 1907 रोजी तर मृत्यु 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा देऊन झाला .त्यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर पंजाब मधील लुधियाना मध्ये या ठिकाणी त्यांचा जन्म झाला.

 वडिलांचे नाव रामलाल थापर 

आई श्रीमती हारल्ली देवी 

 सुखदेव यांनी नवजवान भारत सभा या संघटनेत भाग घेतला होता. भारतीयांवर ब्रिटिशांनी केलेले अत्याचार यामुळे ते स्वातंत्र्यचे स्वप्न अगोदरपासूनच पाहत होते आणि अशा या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी या देशासाठी आपले बलिदान दिले हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये ते सामील झाले होते. त्यामध्ये एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. भारतीय लोकांना इंग्रजी गुलामगिरीपासून सोडवण्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न होते.

 भारत देश स्वतंत्र व्हावा हा त्यांचा महत्त्वाचा हेतू होता असे क्रांतिकारक मिळून त्यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली ते एक शिक्षक म्हणूनही काम करत होते. महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देश  चळवळी, आंदोलने ,उपोषण ,अर्ज ,विनंत्या या मार्गाने भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला सुरुवात केली पण भारत देशाला यातून स्वातंत्र्य मिळणे अवघड होते.

 अशातच 1928 मध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी लाला लजपतराय यांच्यावर हल्ला केल्यामुळे आणि त्यांचा त्यात मृत्यू झाल्यामुळे सगळे लोक नाराज झाले. या अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही याची जाणीव होऊ लागली. आणि हळू हळू त्याच्या मागे न जाता भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ असे नव तरुण कार्यकर्ते एकत्र येऊ लागले. 

त्यांच्यामध्ये संघटना निर्माण झाली आणि अशातच स्कॉट अधिकाऱ्यांचा हत्या करण्याचे ठरवले पण ते स्कॉट अधिकारी  समजून सँडर्सवर  गोळीबार करण्यात आला आणि या आरोपाखाली भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशीची शिक्षा करण्यात आली.

अशा या महान क्रांतिकारकांना श्रद्धांजली ,अभिवादन करण्यासाठी संपूर्ण भारतात शहीद दिन म्हणून साजरा केला. जातो आजपर्यंत भारत देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांचे स्मरण म्हणून 23 मार्च हा दिवस शहीदांसाठी विनम्र अभिवादन म्हणून केला जातो .

त्यातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की जे भारत देशासाठी लढले ते अमर झाले असे समजून चालले पाहिजे, म्हणजे आपला स्वार्थ न साधता देशासाठी काहीतरी केले पाहिजे.

     आपण देशाचे ऋणी आहोत आणि हे ऋण फेडण्यासाठी आपण क्रांतिकारक बनलेच पाहिजे असे नसून  देशाची सेवा कोणत्या ना कोणत्या मार्गातून केली पाहिजे. असे आपल्याला या क्रांतिकारकांच्या कार्यातून सांगता येते .

त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केला आपल्या प्राणांची आहुती दिली कोणत्याही मोहमाया फसले नाहीत.  हेच आपले कर्तव्य म्हणून प्राणाची बाजी लावली आपणही, त्यांच्या विचारांचा ठसा आज आपल्या मनावर बिंबवला पाहिजे त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतली तशी परिस्थिती होती .

 आज आपल्याला लोकांच्या समस्या जाणून घेऊन ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अशा ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हातात लेखणी घेऊन किंवा शांततेच्या मार्गाने  आपण अन्यायातून न्यायाचा मार्ग निवडून दिला पाहिजे .  आपली मातृभूमी आहे या मातृभूमीच्या रक्षणासाठी, सगळ्यांसाठी आपले देहभान विसरून ज्यांनी आपले प्राण पणास लावले अशा या महान क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन!  त्यांना शतशः नमन ! त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या शहीद दिनानिमित्त त्यांना त्यांच्या त्यांच्या विचारांना  मी नतमस्तक होऊन  त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांना जय हिंद !

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area